गर्भारपण

प्रसूतीनंतर होणारी सांधेदुखी

गरोदरपणामुळे तुम्हाला तुमच्या शरीराविषयी जास्त कळू लागते आणि गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत झालेल्या बदलांशी ते जुळवून घेऊ लागते. तथापि, बाळाच्या जन्मानंतर सुद्धा आईच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. बर्‍याच मातांना शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या नितंबांमध्ये वेदना जाणवते आणि गर्भाशयातून बाळ बाहेर आले तर गुडघ्यात विचित्र दुखू लागते. बाळाला जन्म दिल्यानंतर सांधेदुखीच्या त्रासामुळे सतत तीव्र वेदना होऊ लागतात आणि अचानक वयस्क झाल्यासारखे वाटू लागते.

प्रसूतीनंतर सांधेदुखी कशामुळे होते?

प्रसूतीनंतर सांधेदुखी होण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे:

बाळंतपणानंतर सांधेदुखी बरे होण्यास किती वेळ लागतो?

कोणत्याही प्रकारच्या पुनर्प्राप्तीप्रमाणेच, पुनर्प्राप्तीचा कालावधी एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असतो. सामान्यपणे, सांधेदुखीच्या वेदना काही आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त काळ सुरु राहू शकतात. काही वेळा ह्या वेदना चार ते सहा महिने टिकतात. जर एखाद्या स्त्रीचे निरोगी गरोदरपण आणि प्रसूती झालेली असेल आणि योग्य आहार व व्यायामाकडे लक्ष दिले असेल तर दुखण्यापासून बरे होण्याची शक्यता जास्त असते. प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतल्यास आणि आरोग्याच्या पूर्वीच्या परिस्थतीकडे लक्ष दिल्यास हा बरे होण्याचा कालावधी आणखी कमी केला जाऊ शकतो. बाळाला स्तनपान देताना, स्तनपान देण्याची स्थिती योग्य असल्याची काळजी बाळगणे आवश्यक आहे, बाळाला अगदी खाली वाकून न उचलणे, बाळाला अगदी कमी कालावधीसाठी आणि आरामात धरून ठेवणे अशी काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास सांधेदुखीच्या वेदना तीव्र होऊ शकतात आणि गरोदरपणानंतर सांधे दुखू लागतात.

घरगुती उपचार

प्रसूतीनंतर सांधेदुखीवर उपचारांची कोणतीही विशिष्ट प्रक्रिया नाही. तथापि, काही उपाय वेदना कमी करण्यास मदत करतात. प्रसूतीनंतर होणाऱ्या सर्व वेदना गरोदरपणात होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग आहेत. संपूर्ण गरोदरपणाच्या नऊ महिन्यात शरीरात प्रचंड बदल झाला आहे. एकदा आपण योग्य प्रकारे आराम, कार्यशैली आणि क्रियाकलाप संतुलित करण्यासाठी चांगला वेळ दिल्यास, वेदना कमी होण्यास सुरुवात होईल आणि आपल्यास आराम मिळेल. जर वेदना अधिकच वाढली किंवा आपण यापूर्वी कधीही न पाहिलेले बदल शरीरात दिसण्यास सुरुवात झाली तर प्रसूतीनंतरची कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी किंवा वेदना कमी करण्याच्या उपचारांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा. आणखी वाचा: सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार नॉर्मल प्रसूतीनंतर पडणारे टाके: काळजी कशी घ्यावी आणि लवकर बरे कसे व्हावे?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved