Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी नॉर्मल प्रसूतीनंतर पडणारे टाके: काळजी कशी घ्यावी आणि लवकर बरे कसे व्हावे?

नॉर्मल प्रसूतीनंतर पडणारे टाके: काळजी कशी घ्यावी आणि लवकर बरे कसे व्हावे?

नॉर्मल प्रसूतीनंतर पडणारे टाके: काळजी कशी घ्यावी आणि लवकर बरे कसे व्हावे?

नॉर्मल प्रसूतीनंतर टाके पडणे खूप सामान्य आहे आणि बऱ्याच वेळा पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांना ह्याचा अनुभव घ्यावा लागेल. प्रसूतिशास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे नॉर्मल प्रसूतीदरम्यान योनिमार्गाच्या भित्तिका फाटणे सामान्य आहे आणि त्या आणखी फाटण्यापासून रोखण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी टाके आवश्यक असतात.

टाक्यांना सुरुवातीला सूज असते आणि ते बरे होण्यास सुरवात होते तेव्हा त्यांना खाज सुटते. प्रसूतीनंतर थोडी जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे जेणेकरून टाक्यांना संसर्ग होऊ नये कारण त्यामुळे गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. नॉर्मल प्रसूतीनंतर योनी सामान्यत: वेदनादायक आणि सूजलेली असते. अशाप्रकारे, त्यातून बरे होण्यासाठी आणि टाक्यांची जखम भरून येण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रसूतीनंतर टाके का घालतात?

प्रसूतीच्या वेळी, बाळ योनीमार्गातून प्रवास करते. बाळाला सामावून घेण्यासाठी जरी शरीराचा हा भाग ताणला गेला असला तरी बाळाला अधिक जागेची आवश्यकता असू शकते. जेव्हा हे घडते तेव्हा पेरिनियम (गुद्द्वार आणि वल्वा दरम्यानचे क्षेत्र) त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वाढू शकते आणि ह्या प्रक्रियेत त्वचा फाटू शकते. काही वेळा त्वचेचे हे फाटणे वरवरचे असू शकते आणि ते नैसर्गिकरित्या बरे होऊ शकते. तथापि, कधीकधी, स्नायूंच्या ऊती फाटतात आणि त्यामुळे रक्तस्त्राव आणि लक्षणीय वेदना होऊ शकतात. म्हणून, त्यांना टाके घालणे आवश्यक ठरते.

काही प्रकरणांमध्ये, एपिसिओटोमी करावी लागू शकते. एपिसिओटोमी म्हणजे बाळ सहजतेने पुढे सरकण्यासाठी आणि प्रसुतिच्या वेळी ऊतींचे फाटणे टाळण्यासाठी पेरीनियमवर केलेली शस्त्रक्रिया होय. अशा परिस्थितीत, देखील टाके घालणे आवश्यक असते.

त्वचा फाटल्यावर टाक्यांची गरज केव्हा असते?

उती फाटणे सामान्यत: प्रसूती दरम्यान होते, विशेषत: पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत त्वचा फाटण्याची तीव्रता भिन्न असू शकते. त्वचा फाटण्याची श्रेणी ४ प्रकारात विभागली जाऊ शकते.

 • प्रथम श्रेणी: त्वचेचे हे फाटणे इतके किरकोळ असू शकते की त्यावर कोणतेही उपचार न करता ते स्वतः बरे होते. ह्यामध्ये पेरिनियमचे फाटणे वरवरचे असते आणि फक्त योनिमार्गाच्या बाहेरील थरांचा समावेश असतो. अशावेळी टाके घालावे लागत नाहीत आणि ते लवकर बरे होतात.
 • व्दितीय श्रेणी: त्वचेचे हे फाटणे खोलवर जाते. ह्यासाठी त्वचेच्या थरांवर टाके घालणे आवश्यक आहे. ते साधारणतः काही आठवड्यांच्या कालावधीत बरे होतात.
 • तृतीय श्रेणी: त्वचेचे फाटणे अधिक तीव्र असते आणि गुदद्वाराजवळील ऊती आणि स्नायूंच्या सखोल गुदद्वाराजवळील स्नायू (गुद्द्वार भोवतीच्या स्नायू) पर्यंत पसरते. त्यांना अनिवार्यपणे टाके आवश्यक आहेत आणि काही महिन्यांपर्यंत वेदना होऊ शकते. ह्या टाक्यांमुळे आपल्याला गुद्द्वार असंयमतेची जोखीम निर्माण होऊ शकते (मल नकळत पार करणे).
 • चतुर्थ श्रेणी: ह्या श्रेणीत त्वचेचे फाटणे गंभीर स्वरूपाचे असते जे गुद्द्वार आणि खाली असलेल्या ऊतींच्या सभोवतालच्या स्नायूंमध्ये जाऊन गुदाशय पर्यंत जाते. ही फाटलेली त्वचा शिवण्यासाठी तुम्हाला लहान शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते

काही प्रकरणांमध्ये, योनिमार्गाच्या वरच्या बाजूला मूत्रमार्गाच्या जवळ त्वचा फाटू शकते. त्यामुळे त्वचेला पडलेला छेद सहसा खूपच लहान असतात आणि अगदी थोडे टाके पडतात किंवा काही वेळा टाके पडत सुद्धा नाही . त्यामध्ये सामान्यत: स्नायूंचा समावेश नसतो, म्हणूनच ते लवकर होते. लघवी करताना अस्वस्थता येते.

टाके कसे घातले जातात?

जर त्वचा किरकोळ फाटली असेल तर ज्या खोलीत प्रसूती झाली त्याच खोलीत टाके घालणे आवश्यक आहे. प्रसूतिशास्त्रज्ञ, तो भाग सुन्न करण्यासाठी स्थानिक भूल देतील आणि जखम बंद करतील. बहुतेक वेळा, विरघळणारे टाके वापरले जातात कारण ते बरे झाल्यावर काढण्याची आवश्यकता नसते.

टाके कसे घातले जातात?

एपिसिओटॉमी किंवा त्वचा दिवितीय श्रेणी पर्यंत फाटलेली असल्यास प्रसूती कक्षातच त्याची काळजी घेतली जाते, परंतु तृतीय श्रेणी मध्ये त्वचा खोलवर फाटलेली असल्याने रुग्ण सहसा ऑपरेशन थिएटरमध्ये स्थानांतरित होतो. प्रसूतिशास्त्रज्ञ स्थानिक भूल देऊ शकतात. आवश्यक असल्यास, नुकसानाच्या प्रमाणात, एपिड्यूरल, पाठीच्या कण्यामध्ये किंवा सामान्य भूल देण्याची शक्यता असते. तथापि, हे दुर्मिळ आहे. त्यानंतर पेरिनियमला टाके घातले जातात. मूत्र रिकामे करण्यासाठी मूत्राशयात पातळ ट्यूब (कॅथेटर) टाकली जाऊ शकते. त्यामुळे पेरिनियम लवकर बरे होण्यास मदत होईल. सहसा, एपिसिओटॉमी टाके शोषण्यायोग्य किंवा विघटनशील असतात.

बरे होण्यासाठी किती वेळ लागेल?

खासकरून जर चांगली काळजी घेतली गेली असेल तर नॉर्मल प्रसूतीमध्ये टाके बरे होण्यासाठी लागणारा वेळ सामान्यत: कमी असतो. उपचार प्रक्रिया सामान्यत: एपिसिओटॉमीच्या बाबतीत प्रसूतीनंतर २ आठवडे घेते, ह्या प्रक्रियेमध्ये छोटा छेद घेतला जातो. परंतु ही प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असू शकते. त्वचा जितकी जास्त फाटली असेल तितकी ती बरे होण्यासाठी वेळ जास्त लागतो. एका आठवड्यानंतर वेदना कमी होऊ शकते परंतु अस्वस्थता महिनाभर किंवा त्यानंतरही चालू राहू शकते.

त्वचा आणखी गंभीर फाटली असेल तर पूर्णपणे बरे होण्यासाठी ६ ते ८ आठवडे लागू शकतात. वेदना सुमारे एक महिना चालू राहू शकते. बरे होताना टाक्यांना खाज सुटू शकते. टाक्यांच्या प्रगतीवर नजर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडे जवळजवळ ६ आठवड्यात तपासणी करणे योग्य ठरेल.

टाके घातलेल्या भागाला आराम पडण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

नॉर्मल प्रसूतीमध्ये टाके खूप वेदनादायी असतात. त्यांना आराम पाडण्यासाठी काही गोष्टी करता येतील:

 • कोमट पाण्याच्या एका टबमध्ये बसल्यामुळे टाक्यांना आराम पडतो तर सूजही कमी होते. नंतर मऊ, स्वच्छ टॉवेलने हळूवारपणे तो भाग कोरडा करायचे क्षात ठेवा. वैकल्पिकरित्या, कोल्ड कॉम्प्रेस किंवा जेल पॅक देखील वापरला जाऊ शकतो.
 • बसल्यावर तुम्हाला वेदना होत असल्यास तुम्हाला आराम मिळण्यासाठी रिंगच्या आकाराच्या उशीवर बसा त्यामुळे तुम्हाला बसल्यावर आरामदायक वाटेल.
 • शौचास करताना पेरिनियमवरील दबाव कमी करण्यासाठी, टाक्यांवर हळूवारपणे एक स्वच्छ पॅड दाबा.
 • लघवी करताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास, त्या जागेवर कोमट पाणी टाकल्याने जळजळ कमी होण्यास मदत होईल.
 • संसर्ग टाळण्यासाठी पेरिनियम आणि योनिमार्गाचे क्षेत्र स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचे लक्षात ठेवा.
 • वेदना कमी करण्यासाठी तुम्ही सुरक्षित पेनकिलरची निवड करू शकता, परंतु प्रथम या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

टाके घातलेल्या भागाला आराम पडण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

लवकर बरे होण्यासाठी काही टिप्स

येथे टिप्सची सूची आहे जी आपल्याला लवकर बरे करण्यास मदत करू शकते:

 • आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या एन्टीसेप्टिक क्रीमचा काटेकोरपणे वापर करा.
 • लघवीनंतर प्रत्येक वेळी योनीच्या जवळील भाग पाण्याने धुण्याचे लक्षात ठेवा आणि आपले तळ काळजीपूर्वक पुढील आणि योनिमार्गाजवळील भाग पुढून मागे स्वच्छ करा.
 • दररोज १०१५ मिनिटांपर्यंत ताज्या हवेमध्ये टाके उघडे ठेवल्यास ते जलद कोरडे होऊ शकतात.
 • कोमट पाण्याने आणि तसेच वास नसलेल्या, सौम्य साबणाने टाके स्वच्छ करणे लक्षात ठेवा.
 • दिवसातून काही वेळा १५२० मिनिटांसाठी कोमट पाण्याच्या टब मध्ये बसल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही कोमट पाण्यात काही एंटीसेप्टिक लोशन घालू शकता.
 • आपल्या आहारात भरपूर फायबर समाविष्ट करा, संतुलित जेवण घ्या आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.
 • शौचास त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ओव्हरकाउंटर स्टूल सॉफ्टनरसाठी वापरू शकता. तथापि, असे करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • टाकेवर अनावश्यक दबाव आणू नये म्हणून भारतीय शैलीऐवजी पाश्चिमात्य शैलीतील शौचालये वापरणे योग्य ठरेल.
 • नियमितपणे चालायला आणि श्रोणीच्या काही फ्लोर एक्सरसाइज केल्यास रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते ज्यामुळे पुनर्प्राप्ती प्रक्रिया वेगवान होऊ शकते.
 • शौचालयाचा वापर केल्यानंतर आणि आपले प्रसूती पॅड बदलण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुणे आवश्यक आहे.
 • टाकेवर दबाव कमी करण्यासाठी वजन उचलणे आणि कठोर व्यायामापासून दूर रहा.
 • संभाव्य संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी योनिमार्गाजवळील भाग कोरडा व स्वच्छ ठेवून योग्य वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. प्रसूती पॅड वारंवार बदलणे त्याचा टाक्यांना त्रास होऊ नये ह्याची नये याची काळजी घेणे चांगले.
 • बरे होताना काटेकोरपणे टाळण्यासारख्या काही गोष्टी: सॉल्ट बाथ, लैंगिक क्रियाकलाप, टॅम्पन्सचा वापर, सुगंधित साबण आणि शरीराची धुलाई, टेलकम पावडर आणि अत्यंत गरम पाणी.

तुम्ही टाके टाळू शकता?

विशेषतः पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याच डॉक्टरांना सामान्य प्रसूतीसाठी एपिसिओटॉमी निवडणे आवडेल. तरीही, जर तुम्हाला टाके टाळायचे असतील तर डॉक्टरांशी आपल्या पर्यायांची सविस्तर चर्चा करणे चांगले.

प्रसूती दरम्यान त्वचा तीव्र फाटण्याची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यासाठी काही उपाय असू शकतात गरोदरपणात दररोज हळूवारपणे पेरीनेमची मालिश करणे किंवा प्रसूतीच्या वेळी पेरिनियमवर एक उबदार कॉम्प्रेस लागू करणे हे त्यापैकी काही उपाय होत. पेल्विक स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि त्वचेची लवचिकता वाढविण्यासाठी योग्य स्क्वाटिंग आणि पेल्विक फ्लोर व्यायाम किंवा योग शिकवण्याविषयी आपल्या प्रशिक्षकास विचारू शकता.

तुम्ही टाके टाळू शकता?

टाके घातल्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होतील का?

प्रसूतीनंतरच्या टाक्यांची योग्य काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून ते सुरक्षित आणि पूर्णपणे बरे होतील. काही स्त्रियांना संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात. अशा परिस्थितीत थोडा वेळ थांबावे आणि टाके व्यवस्थित बरे होऊ द्यावेत. काही वेळा, स्त्रियांना सतत वेदना होतात आणि मल किंवा मूत्र नियमित करण्यात अडचण येते. कोणतीही समस्या उद्भवल्यास आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेऊन, निरोगी आहार घेतल्याने आणि नियमित व्यायाम केल्याने हे टाळता येऊ शकते. तरीही समस्या कायम राहिल्यास योग्य वैद्यकीय मदत घ्या.

आपल्या स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला कधी घ्यावा?

चांगली काळजी घेतल्यानंतरही काही वेळा टाक्यांमुळे काही अडचणी उद्भवू शकतात. तुम्ही पुढील गोष्टी अनुभवल्यास आपल्या स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्या:

 • टाके घातलेल्या भागात सतत आणि तीव्र वेदना
 • योनिमार्गाच्या भागातून दुर्गंध येणे
 • खूप ताप येणे आणि थंडी
 • लघवी करताना तीव्र जळजळ
 • आतड्यांवरील हालचालींवर नियंत्रण नसणे
 • अनियंत्रित रक्तस्त्राव, विशेषत: गुठळ्या
 • टाक्यांना जास्त लालसरपणा किंवा सूज
 • टाक्यांमधून असामान्य स्त्राव

प्रसूतीच्या वेळी बऱ्याच स्त्रियांना टाके पडू नयेत असे वाटत असते. परंतु बाळाच्या जन्मादरम्यान काही ऊतींचे फाटणे अपरिहार्य असतो आणि संपूर्ण जन्माच्या प्रक्रियेचा सामान्य भाग मानला जातो. महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी विश्रांती घेणे आणि निरोगी रहाणे हे लवकर आणि पूर्णपणे बरे होण्यास मदत करते.

आणखी वाचा:

प्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका
प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article