In this Article
जसजसा ४० वा आठवडा जवळ येतो तसे होणारी आई स्वतःला शारीरिकरीत्या आणि भावनिकरीत्या प्रसूतीसाठी तयार करीत असते.
बाळाच्या आगमनासाठी तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का?
बऱ्याच वेळेला प्रसूती काळांना आपोआप सुरुवात होत नाही. उदा: जर आईला काही वैद्यकीय प्रश्न असतील तर प्रसूतीला उशीर होऊ शकतो. आणि गर्भारपणाचा हा वाढीव काळ तुमच्या बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी धोकादायक आहे, विशेषकरून खालील तब्येतीच्या समस्या असतील तर
- मधुमेह
- गर्भजलाचा अभाव
- उच्चरक्तदाब
- गर्भाशयाला संसर्ग
- नाळ विलग होणे
जेव्हा तुम्हाला तेव्हा गर्भजल पिशवी फुटून सुद्धा कळा येत नाहीत तेव्हा प्रसूती प्रवृत्त करणे गरजेचे असते.. गर्भाशयात कळा सुरु झाल्यावर गर्भाशयाचे मुख उघडून गर्भाशय बाळाच्या जन्मासाठी तयार होते. कळा येत नसतील तर ही प्रसूतीची तयारी झालेली नसते.
नैसर्गिकरित्या प्रसूत कशी प्रवृत्त करावी?
गर्भजलपिशवी फुटल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना प्रसूतीकळा २४ तासात सुरु होतात. पण जर त्यांनंतरही प्रसूतीकळा सुरु झाल्या नाहीत तर तुमच्या मुलांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये तुमचे डॉक्टर्स प्रसूती प्रवृत्त करण्याचे ठरवू शकतात.
तथापि, जर तुम्हाला औषधे टाळायची असतील. तर तुम्ही खालील पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी खालील नैसर्गिक मार्गांचा वापर केला पाहिजे.
प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी खालील नैसर्गिक मार्ग
१. चालणे
प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. आणि त्या साठी खूप जास्त प्रयन्त लागत नाहीत. ह्यामुळे बाळ ओटीपोटाकडे सरकते. कारण त्यामुळे गुरुत्वाकर्षणचा परिणाम मिळतो. बाळ ओटीपोटाच्या भागावर दाब देते आणि त्यामुळे गर्भाशयाचे मुख प्रसूतीसाठी तयार होते. तुमची गर्भजल पिशवी फाटली असेल आणि प्रसूतीकळा सुरु झाल्या नसतील तर चालणे सुरु करा. जरी तुम्ही प्रसूतीकळांसाठी तयार असाल तरी प्रसूतीदरम्यान चालण्याने मदत होते.
२. लैंगिक संबंध
आता हे अशक्य वाटत असेल हो ना? विशेषकरून जेव्हा तुम्ही ४० आठवड्यांपेक्षा जास्त आठवड्यांच्या गर्भवती असाल तर लैंगिक संबंध ठेवणे हा शेवटचा पर्याय असू शकतो. तथापि, पुरुष शुक्राणूंमध्ये प्रोस्टाग्लान्डिन नावाचे संप्रेरक असल्याने ते गर्भाशयाचे मुख उघडायला मदत होते आणि गर्भाशयाचे मुख मऊ पडते आणि त्यामुळे प्रसूतीची तयारी तयारी होते.
नैसर्गिक व्यायामाने ताण नाहीसा होतो. ही पद्धत अगदी आनंददायी आणि प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी मोफत पद्धत आहे. लक्षात ठेवा की ही पद्धत निवडण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
३. इव्हनिंग प्रिमरोझ ऑइल
हे बहुगुणी औषधी ठरेल गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत करते. इव्हीनिंग प्रिमरोझ ऑइल हे कॅपशूल स्वरूपात उपलब्ध असते आणि ते तोंडाने घेतले तरी चालते. हे तेल गर्भाशयाच्या मुखावर गर्भारपणाच्या शेवटच्या दिवसात लावले तरी चालते. तथापि, लावण्याआधी किंवा तोंडातून घेण्याआधी तुम्ही चांगल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांची परवानगी घेतली पाहिजे.
४. एरंडेल तेल
एरंडेल तेल हे रेचक आहे आणि त्याची चव अजिबात चांगली नसते. पिढ्यान पिढ्या सुईणी आणि आज्ज्यानी प्रसूतीस विलंब होत असताना हे तेल वापरण्याचा सल्ला दिला आहे. रेचक घेतल्यामुळे शौचास साफ होते आणि त्यामुळे गर्भाशयात अस्वस्थता निर्माण होते आणि त्यामुळे प्रसूतीकळा येतात. जरी ही नैसर्गिक प्रसूतीसाठी सामान्य टीप असली तरी तुम्ही किती प्रमाणात एरंडेल तेल घेतले हे तुमच्या डॉक्टरांना विचारा कारण तुम्हाला ह्या टप्प्यावर जुलाब टाळले पाहिजेत.
५. मसालेदार पदार्थ
एरंडेल तेलाप्रमाणेच, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शौचास होऊन, गर्भाशयात कळा सुरु होतात. तुम्ही किती प्रमाणात ते घेत आहात ह्यलासुद्धा महत्व आहे कारण खूप जास्त प्रमाणात घेतल्यास त्याने छातीत जळजळ होते. आणि हा पर्याय निवडल्यास पोट बिघडते त्यामुळे प्रसूती होताना हा पर्याय निवडायचा झाल्यास तो शेवटचा पर्याय म्हणून त्याचा विचार व्हावा.
६. ऍक्युपंक्चर
नैसर्गिकरित्या प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी ही पद्धत परिणामकारक आहे. वेदना कमी करण्यासाठी हे नैसर्गिक तंत्रज्ञान आहे. शरीराचे विशिष्ट अवयव सक्रिय करण्यासाठी ह्या सुया वापरतात. ह्या सुया विशिष्ट ठिकाणी हात आणि पायांवर वापरतात.
ह्या सुया गर्भाशयाच्या विविध क्रियांना चालना देण्यासाठी वापरतात आणि बाळाचा ह्या जगात प्रवेश होण्यासाठी मदत करतात. बऱ्याच होणाऱ्या आया आणि तसेच जे लोक ही पद्धती वापरतात ते लोक ह्या पद्धतीचे समर्थन करतात आणि ह्या पद्धतीचे काहीच दुष्परिणाम होत नसल्याने त्याचा प्रभावीपणा जास्त असतो.
७. ऍक्युप्रेशर
ह्या तंत्रज्ञानामुळे शरीरावरील वेगवेगळे बिंदू सक्रिय होतात, परंतु ह्या पद्धतीत ऍक्युपंक्चरप्रमाणे सुयांऐवजी बोटांनी दाब दिला जातो. अंगठा आणि तर्जनी तसेच घोट्याच्या वरती पायाच्या आतल्या बाजूस दाब दिल्यास नैसर्गिक पद्धतीने प्रसूती प्रवृत्त होऊ शकते.
८. कल्पना करणे
तुम्ही स्वतःची प्रसूती होत असून बाळाचा जन्म होत आहे अशी कल्पना करा. तुम्ही बाळाचा जन्म होत आहे आणि बाळ खाली सरकते आहे असे स्वतःशी बोला. अशी फक्त कल्पना करून आरामदायक व्हा आणि स्वतःच्या आयुष्यातील एक मोठा दिवस साजरा करण्यास सज्ज व्हा.
९. स्तनाग्रांना उत्तेजन
ऑक्सिटोसिन ह्या संप्रेरकांमुळे कळा सुरु होतात आणि स्तनाग्रांना उत्तेजना देऊन हे साध्य होऊ शकते. हे तुम्ही दिवसातून काही तास करू शकता. तुम्ही स्तनाग्रांना मसाज करून किंवा पिळून उत्तेजित करू शकतात आणि त्यामुळे प्रसूती प्रवृत्त होऊ शकते. लक्षात ठेवा, असे केल्याने गर्भाशयात कळा सुरु होतात आणि त्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होतात. म्हणून, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमची विवेकबुद्धी वापरा.
१०. मसाज
अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की मसाज केल्याने शरीरातून ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक तयार होते आणि ह्या संप्रेरकांमुळे प्रसवकळा प्रवृत्त होतात. सगळ्या पद्धतींमध्ये प्रसूतीकळा नैसर्गिकरित्या सुरु होतात. ह्या पद्धतीला प्राधान्य दिले जाते.
ह्या पद्धतीमुळे आरामदायक राहण्यास मदत होते तसेच तुम्हाला प्रसूती लवकर होते. ह्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटून आवश्यक असणारी संप्रेरके स्रवतात आणि प्रसूतीकळा नैसर्गिकरित्या प्रवृत्त होते.
११. केळी
केळी पोटॅशियमने समृद्ध असतात आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी ते महत्वाचे असतात. त्यामुळे जर तुमच्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असले तर तुमच्या प्रसूतीकळा उशिराने सुरु होऊ शकतात. जर तुम्ही गर्भारपणाच्या पहिल्या काही आठवड्यांच्या काळात केळी खाल्ली तर प्रसूती प्रवृत्त होण्याची शक्यता खूप जास्त असते. तथापि, केळी खाताना थोड्या प्रमाणात खाल्ली पाहिजेत. केळ्यांचा तुमच्या आहारात समावेश करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ञांशी संपर्क साधा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पोटॅशिअमच्या पूरक गोळ्या घेऊ शकता.
१२. व्यायामाचा बॉल
ह्या व्यायामाच्या बॉलने तुमच्या गर्भाशयाचे मुख जलद उघडण्यास मदत होते तसेच तुमचे बाळ जन्म कालव्याच्या दिशेने पुढे सरकते. आणि ही पद्धतीची सुईणी शिफारस करतात.
ह्या व्यायामप्रकारांमुळे बाळ पुढे ओटीपोटाकडे सरकते आणि ह्या जगात प्रवेश करण्यासाठी योग्य स्थितीत येते.
१३. अननस
हे फळात ब्रोमेलियाड नावाचे संप्रेरक असते, जे ताजे आणि कच्च्या प्रमाणात घेतल्यास त्याने गर्भाशयाचे मुख मऊ होते आणि प्रसूतीकळा सुरु होतात. अननसातील रसायनांमुळे प्रसूतीकळा सुरु होतात
१४. आवरण फाडणे
ह्यामध्ये कुठलीही वैद्यकीय प्रक्रिया केली जात नाही किंवा औषधे दिली जात नाहीत. ह्यामध्ये फक्त प्रसूतीकळा सुरु होण्यासाठी आवरण फाडले जाते. गर्भाशयाच्या मुखापासून गर्भजल पिशवी वेगळी करण्यासाठी ग्लोव्ह घातलेल्या हाताचे बोट वापरतात. असे केल्याने शरीर प्रोस्टाग्लान्डिन ह्या संप्रेरकाची निर्मिती करते ज्यामुळे तुम्हाला प्रसूतीकळा सुरु होतात. जेव्हा ही प्रक्रिया सुरु होते तेव्हा गर्भजल पिशवी फुटून प्रसूती सुरु होते.
१५. संमोहन
प्रसूतीकळा सुरु होण्याआधी आरामदायक राहण्यासाठी तुम्हाला संमोहन क्रियेची मदत होऊ शकते कारण ताणामुळे शरीर ऑक्सिटोसिन हे संप्रेरक तयार करीत नाही, हे संप्रेरक प्रसूती सुरु करण्यासाठी गरजेचे असते. संशोधनाद्वारे असे दिसून येते की ह्या पद्धतीत तुम्ही सीडी आणून त्यातील मार्गदर्शनानुसार स्वतःवर संमोहन करू शकता त्यामुळे तुमचे मन ताणविरहित होण्यास मदत होते.
लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी
प्रसूती प्रवृत्त होण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात घेऊ शकता
- प्रसूतीची तारीख उलटून गेली ह्याचा ताण घेऊ नका: पहिल्यांदाच प्रसूती होत असलेल्या ८०% स्त्रियांच्या बाबतीत प्रसूतीला उशीर होतो आणि जर ४२ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले असल्यास तुमची प्रसूतीची तारीख उलटून गेली आहे असे तुम्ही समजू शकता. प्रसूती प्रवृत्त करणे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे आणि तुमच्या परवानगी शिवाय डॉक्टर तसे करू शकत नाहीत.
- प्रसूती नैसर्गिकरित्या प्रवृत्त केली पाहिजे: ३९ किंवा ४० व्या आठवड्यांच्या आधी प्रसूती प्रवृत्त केली पाहिजे आणि ती प्रक्रिया सौम्य असली पाहिजे त्यामुळे तुमच्या शरीराला तुम्ही त्रास होईल असे काही करून प्रसूती प्रवृत्त करू नका.
- थोडे संशोधन करा: लक्षात ठेवा की प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही वापरत असलेली तेलं आणि अन्नपदार्थ ह्यामुळे तुमच्या बाळाला आणि तुम्हाला कुठला धोका पोहोचणार नाही ना हे आधी पडताळून पहा. जे व्यायाम तुमच्या शरीराला योग्य नाहीत ते तपासून पहा आणि स्वतःला कुठल्याही पद्धतीने ताण येणार नाही हे तपासून पहा.
- तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा: तुम्हाला प्रसूती प्रवृत्त करण्याच्या कुठल्याही पद्धतीमुळे हानी पोहचेल असे वाटत असेल तर वेळ न घालवता तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन करा. तुमच्या गर्भारपणाला त्यामुळे धोका पोहचत असेल तर तुम्ही प्रसूती प्रवृत्त करण्याच्या पद्धती टाळू शकता.
खालील पर्यायांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधून नंतर निवड करा
प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी काही पद्धती आहेत ज्या तुम्ही प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी वापरू शकता. तथापि, ह्या पद्धती वापरण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि तुम्ही व तुमचे बाळ सुरक्षित आहात किंवा नाही ह्याची खात्री केली पाहिजे.
१. वनौषधी
दोन वनौषधी आहेत ज्यामुळे प्रसूती प्रवृत्त होऊ शकते आणि त्या म्हणजे ब्लू कोहोष आणि ब्लॅक कोहोष. तथापि, त्यामुळे बाळाला स्ट्रोक आणि हृदयाचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. तुम्ही हे वापरण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
२. रासबेरीची पाने
ही आणखी एक वनौषधी आहे जी प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी वापरली पाहिजे. ही उपचारपद्धती गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये वापरू नये. रासबेरीची पाने खाल्ल्याने खूप तीव्र कळा येऊ शकतात आणि त्यामुळे बाळाला हानी पोहचू शकते. तुम्ही रासबेरीच्या पानांचा रस तुमच्या गर्भारपणाच्या ३२व्या आठवड्यांच्या आसपास घेऊ शकता आणि त्यामुळे तुमच्या गर्भाशयाचे स्नायू मजबूत होऊ शकतात आणि त्यामुळे प्रसूतीला मदत होऊ शकते. वनौषधी घेण्यासाठीची योग्य वेळ आणि ते किती प्रमाणात घ्यावे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून ठरवू शकता. जर तुम्हाला चव आवडली नाही तर तुम्ही रासबेरीच्या पानांच्या कॅपशूल (तुमच्या डॉक्टरांशी आधी बोलून घ्या) विकत आणू शकता. त्या पॅकवर दिलेल्या सूचना नीट वाचा.
३. होमिओपॅथिक उपचार
प्रसूती होण्यासाठी होमिओपॅथिक औषध उपचारांचा उपयोग होतो ह्याबाबत काहीच पुरावा नसला तरी, Pulsatilla आणि Caulophyllum ही औषधे लिहून दिली जातात. ही औषधे घेतल्याने काही हानी पोहचत नाही तसेच त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत, होमिओपॅथिक उपचारपद्धती तुम्ही करून बघू शकता. परंतु कुठलेही औषध घेण्याआधी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना विचारून ती घेणे अत्यंत गरजेचे आहे.
निष्कर्ष
४२ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल किंवा तुमच्या आधीच्या प्रसूती वेळेवर झाल्या असतील तर प्रसूती प्रवृत्त करणे गरजेचे आहे. जर तुमचे गर्भारपण ४० आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचे असेल तर तुमच्या बाळाला नाळेद्वारे पोषणमूल्ये किंवा ऑक्सिजन ह्यांचा पुरवठा होऊ शकत नाही आणि वैद्यकीय दृष्ट्या प्रसूती प्रवृत्त करणे गरजेचे आहे. प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्याआधी औषधे टाळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपचारांचा अवलंब करू शकता. कुठलीही पद्धत निवडण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आणखी वाचा: तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे