आरोग्य

मुलांसाठी कोरोनाविषाणू लस – पालकांना माहिती असावीत अशी सामान्य प्रश्नांची उत्तरे

कोविड -१९ साथीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून, मोठ्या माणसांपेक्षा मुलांना कोरोनाचा त्रास कमी होतो असा प्रत्येक पालकाचा समज आहे. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही मुले खूप आजारी पडतात. कोरोनाची लक्षणे काही महिने राहतात. त्यामुळे बालरोगतज्ञ आणि पालकांना मुलांचे लसीकरण करून घेणे योग्य वाटते.

अमेरिकेसारख्या देशांनी १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे लसीकरण केले आहे आणि इतर लोक क्लिनिकल चाचण्या संपल्यानंतर आणि लस बाजारात आल्यावर ती घेण्याची वाट पहात आहेत.

आता भारतातील मुलांसाठी कोविड लसीकरणाविषयी जाणून घेऊयात.

मुलांना कोविड -१९ लस मिळू शकते का?

लहान मुलांसाठी भारतात लसीकरण सुरू झाले नाही, कारण सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. २०२२ च्या पहिल्या तिमाहीपासून मुलांसाठी लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

मुलांना कोविड -१९ लस देणे महत्वाचे का आहे?

लहान मुलांना क्वचितच कोविड -१९ संसर्गाचा गंभीर स्वरूपाचा त्रास होतो आणि रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अगदी दुर्मिळ आहे. परंतु अगदी सौम्य लक्षणे दिसणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी) म्हणून ओळखली जाणारी प्राणघातक स्थिती कधीकधी विकसित होण्याची शक्यता असते.

मुले, विशेषत: लहान मुले बहुधा कोविड -१९ चे अतिप्रसारक नसतात. परंतु प्राणघातक आणि वेगाने पसरणाऱ्या कोरोनाविषाणूच्या प्रकारांमुळे लहान आणि किशोरवयीन मुले सुद्धा लवकरच कोरोनाविषाणूच्या प्रसारामध्ये योगदान देतील. म्हणूनच, मुलांना लस उपलब्ध होताच त्यांचे लसीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे.

आतापर्यंत मुलांसाठीच्या कोणत्या कोविड - १९ लसींना कोणत्या देशांमध्ये परवानगी देण्यात आली आहे?

अमेरिकेने या वर्षी मे महिन्याच्या मध्यापासून तरुण किशोरवयीन मुलांचे (१२-१५ वर्षे) लसीकरण सुरू केल.

३१ मे २०२१ रोजी इटलीने १२-१५ वर्षांच्या मुलांसाठी फायझर-बायोटेक लस वापरण्यास मान्यता दिली

जर्मनी लवकरच १२ आणि त्यावरील वयोगटातील सर्व मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी कोविड -१९ लसीकरणास सुरुवात करेल

इटलीने यावर्षी जूनच्या सुरुवातीपासून १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे

फ्रान्सने १५ जून २०२१ रोजी १२ वर्षांवरील सर्व मुलांना कोविड -१९ लस देण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत २ दशलक्षाहून अधिक मुलांना पहिला डोस मिळाला आहे

स्वित्झर्लंडमध्ये, सध्या १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व मुलांसाठी ही लस देण्याची शिफारस केली जात आहे

इस्राईल ने ५-११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड -१९ लस मंजूर केली आहे

२८ मे २०२१ रोजी जपानने १२ वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी फायझर लस मंजूर केली

मुलांसाठी उपलब्ध असलेली कोविड -१९ लस सुरक्षित आहेत का?

होय, मुलांसाठी उपलब्ध असलेली कोविड -१९ लस सुरक्षित आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये सुरक्षितता ही नेहमीच मुख्य चिंता असते आणि त्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. सर्व लसी यशस्वी चाचणीनंतरच मंजूर केल्या जातात.

भारतातील मुलांना कोविड -१९ लस कधी मिळू शकते?

भारत सरकारच्या कोविड लस सल्लागार पॅनेलचे प्रमुख डॉ एन. के. अरोरा यांच्या मते, कोरोनाविषाणूची लस २०२२ च्या पहिल्या तिमाहीत निरोगी मुलांसाठी उपलब्ध होईल.

दरम्यान, भारतातील औषध नियामक- सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने आपत्कालीन वापरासाठी झीडस कॅडिलाद्वारे स्वदेशी विकसित सुई-मुक्त कोविड -१९ लस ZyCoV-D अधिकृत केली आहे. यामुळे देशातील १२ ते १८ वयोगटातील तरुणांसाठी ही पहिली लस दिली जाते.

कोरोनाव्हायरस लसीची मुलांवर चाचणी करण्याची आवश्यकता का आहे?

कोविड -१९ लस लहान मुलांसाठी उपलब्ध होण्यापूर्वी, प्रत्येक वयोगटासाठी क्लिनिकल चाचण्या पूर्ण करणे आवश्यक आहे. असे केल्याने या वयोगटांसाठी लसी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहेत हे सुनिश्चित होते . लसीचा प्रौढांवर होतो तसाच लहान मुलांवर परिणाम होईल हे गृहीत धरता येत नाही. एकदा चाचण्या केल्यावर त्याचे निकाल तपासून त्यानुसार मुले आणि पौगंडावस्थेसाठी लसीची शिफारस केली जाईल.

भारतात मुलांसाठी कोणत्या लसीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत?

भारतात, २ ते १७ वयोगटातील मुलांमध्ये कोविव्हॅक्स लसीच्या २/३ क्लिनिकल चाचणीसाठी स्वयंसेवकांची भरती २६ ऑगस्ट २०२१ रोजी हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च येथे सुरू झाली आहे. ही चाचणी दहा ठिकाणी आयोजित केली जाईल. त्यात एकूण ९२० मुले असतील आणि २ ते ११ आणि १२ ते १७ वयोगटातील प्रत्येकी ४६० मुले असतील.

यावर्षी जुलैमध्ये भारताच्या औषध नियामकाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला, विषय तज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारावर, विशिष्ट अटींसह २ ते २७ वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्होव्हेक्स लसीच्या २/३ टप्प्याची चाचणी घेण्याची परवानगी दिली होती.

कोवाक्सिन चाचणीमध्ये, १२ ते १८ वर्षे व ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. २ ते ६ वर्षे वयोगटातील लोकांना अद्याप ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दुसरा डोस मिळायचा आहे.

कोविड -१९ लस मुलांना शाळेत परत जाण्यास आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास मदत करेल का?

होय. कोविड -१९ ची लस घेऊन, शारीरिक अंतर राखल्यास आणि मास्क घालून इतर सावधगिरी बाळगल्यास तुमच्या मुलाला शाळेत जाता येईल आणि क्रीडा आणि इतर गट उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यास मदत होईल.

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत, १९ जुलै २०२१ रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चे संचालक म्हणाले की, भारताने "स्तब्ध पद्धतीने" शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा.

कोविड -१९ लस घेतल्यानंतर माझ्या मुलाला काही दुष्परिणाम जाणवतील का?

साधारणपणे, होय. तुमच्या मुलाला इंजेक्शन घेतलेल्या जागेवर म्हणजेच हाताच्या वरच्या भागात वेदना होऊ शकतात आणि नेहमीपेक्षा जास्त थकल्यासारखे वाटू शकते. सांधे दुखणे किंवा स्नायू, डोकेदुखी, आणि अगदी ताप आणि थंडी वाजणे इत्यादींची सुद्धा शक्यता आहे. हे दुष्परिणाम सहसा अल्पकालीन असतात आणि साधारणपणे ४८ तासांच्या आत दिसू लागतात.

कोविड -१९ चा संसर्ग झालेल्या किंवा त्यातून नुकत्याच सावरलेल्या मुलाच्या पालकांनी त्याच्या इतर लसी पुढे ढकलल्या पाहिजेत का ?

आपल्या मुलाचे नियमित लसीकरण पुढे ढकलू नये अशी शिफारस केली जाते. लहान मुलांचे लसीकरण वेळेनुसार सुरु ठेवणे आवश्यक आहे कारण लसीकरण करून घेतल्याने लहान मुलांचे गंभीर आजारांपासून संरक्षण होते. तुमचे लहान मूल जेव्हा इतर मुलांमध्ये मिसळू लागते तेव्हा त्याचे इतर रोगांपासून सुद्धा संरक्षण होते.

मुले आणि प्रौढ कोविड - १९ लसींना वेगळा प्रतिसाद देतात का?

होय, मुले आणि प्रौढ कोवीड -१९ लसींना वेगळा प्रतिसाद देतात. १२ ते १५ वर्षे वयोगटातील ज्या मुलांनी फायझर - बायोटेक लसींचे दोन प्रमाणित डोस घेतलेले आहेत त्यांनी मागील चाचण्यांमध्ये १६ ते २५ वर्षांच्या मुलांपेक्षा जास्त प्रमाणात व्हायरस-ब्लॉकिंग अँटीबॉडीज विकसित केल्या.

न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठातील इम्यूनोलॉजिस्ट डोना फार्बर यांच्या म्हणण्यानुसार, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती रोगजनकांशी संवाद साधत नसलेल्या पेशींनी भरलेली असते आणि त्यामुळे ते लसींना चांगला प्रतिसाद देतात.

मी कोविड -१९ लस घेण्यासाठी माझ्या मुलाला कसे तयार करू शकतो?

  1. लसीकरण केंद्राला भेट देण्यापूर्वी आपल्या मुलाशी त्याबद्दल बोला
  2. आपल्या मुलाच्या कोणत्याही एलर्जीबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांना सांगा
  3. आपल्या लहान मुलाला शांत करा आणि लस घेताना धीर द्या
  4. लस घेताना बाळाला कुठलीही जखम होऊ नये म्हणून लस घेताना आणि लसीकरणानंतर तुमचे मूल १५ मिनिटे बसलेले किंवा झोपलेले असल्याची खात्री करा
  5. तुमच्या मुलाच्या कोविड -१९ लसीकरणानंतर, तुम्हाला त्याच्यासोबत १५ - ३० मिनिटे राहण्यास सांगितले जाईल जेणेकरून जर त्याला गंभीर एलर्जीची प्रतिक्रिया असेल आणि त्याला त्वरित उपचारांची आवश्यकता असेल तर तुम्ही त्याच्या जवळ असाल.

बहुतेक छोटी मुले आणि पौगंडावस्थेतील मुले कोविड -१९ पासून गंभीर आजारी पडत नाहीत परंतु अल्प प्रमाणात मुले अत्यंत आजारी पडतात आणि त्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असू शकते. ज्यांना पूर्णपणे बरे वाटते ती मुले अजूनही शाळा आणि इतर महत्वाच्या सामाजिक गोष्टींना मुकतात आणि डोकेदुखी, मळमळ किंवा चव आणि वास कमी होणे यासारखे दुष्परिणाम अनुभवू शकतात. म्हणून, भारतात लस उपलब्ध झाल्यावर आपल्या मुलाला कोविड -१९ लसीकरण करण्याची शिफारस केली जाते. तुमच्या लहान मुलाला आणि कुटुंबाला या सर्व जोखमींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समुदायाला प्रतिकारशक्ती मिळवण्यास मदत करण्यासाठी कोविड -१९ लस घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

आणखी वाचा: कोरोनाविषाणूचा उद्रेक झालेला असताना, तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी घरात करता येतील असे १५ क्रियाकलाप तुमच्या मुलाच्या मनात करोनाविषाणूविषयी भीती निर्माण न करता त्याच्याशी कसे बोलाल?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved