मोठी मुले (५-८ वर्षे)

शाळाप्रवेशाच्या मुलाखतीदरम्यान पालकांना विचारले जाणारे प्रश्न

शाळेतील पहिला दिवस हा पालक आणि मुलांसाठी सर्वात महत्वाचा क्षण असतो.  तुमचे लहान मूल शिक्षणाच्या जगात पहिले पाऊल टाकत आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिंता वाटणे अगदी साहजिक आहे. तुमच्या मुलाच्या आयुष्यातील इतर प्रत्येक टप्प्याप्रमाणे, तुम्ही येथेही तुमची भूमिका योग्य पद्धतीने बजावणे आवश्यक असते. कारण शाळा, तुमच्या कामगिरीच्या आधारावर तुमच्या मुलाच्या प्रवेशासाठी पात्रतेचे मूल्यांकन करते. साधारणपणे, मुलांच्या प्रवेशासाठी शाळेकडून पालकांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यासाठी, पालक म्हणून, तुम्ही मुलाच्या शाळेत प्रवेशासाठी मुलाखतीच्या प्रश्नांच्या उत्तरांसह तयार असले पाहिजे.

शाळा प्रवेशासाठी पालकांच्या मुलाखतीचे प्रश्न महत्त्वाचे का आहेत?

मुलाच्या शाळेत प्रवेशादरम्यान पालकांची मुलाखत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. पालकांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी शाळेच्या प्रतिनिधींद्वारे मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमुळे शाळांना पालकांचे विचार आणि त्यांच्या मुलाचे शिक्षण, वाढ, जीवनशैली आणि घरातील वातावरण समजून घेण्यास मदत होते.

मुलांच्या शाळाप्रवेशासाठी पालकांच्या मुलाखतीचे सामान्य प्रश्न आणि उत्तरे

शाळा प्रवेशासाठी पालकांच्या मुलाखतीत वापरलेले सर्वात सामान्य प्रश्न येथे आहेत, ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही विचारात घेऊ शकता.

1. तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे?

मुलाखतीदरम्यान पालकांना हा प्रश्न विचारला जातो. पालकांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणात किती गुंतवणूक केली आहे हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा उपयोग तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाची योजना आखण्यासाठी कशी करता हे जाणून घेता येऊ शकते.

2. तुम्ही विभक्त किंवा संयुक्त कुटुंबात राहता का?

तुम्ही तुमच्या मुलाचे संगोपन कोणत्या कौटुंबिक वातावरणात करता आहात ह्याची काळजी करू नका. त्यामुळे तुमच्या मुलाच्या शाळेत प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येणार नाही. तुमच्या मुलाचे संगोपन कोणत्या वातावरणात होईल, तुम्ही कामावर असाल तर त्यांची काळजी कोण घेईल किंवा तुमच्या जागी पालक-शिक्षक सभांना कोण येऊ शकेल हे शाळेला जाणून घ्यायचे असते.

3. दोन्ही पालक काम करतात का?

ह्या प्रश्नाच्या उत्तरामुळे तुमचे मूल कुठल्या वातावरणात वाढले आहे आणि त्याचा मुलाच्या विकासात कसा उपयोग होईल हे जाणून घेण्यास मदत होते. तुमची बदलीची नोकरी असेल तर तुमच्या मुलाने CBSE बोर्डच्या शाळेत प्रवेश घेतला पाहिजे, कारण ते सर्वत्र स्वीकार्य आहे आणि त्यांना इतर बोर्डांमध्ये देखील जुळवून घेऊ देते.

4. तुम्ही तुमच्या मुलाला शाळेच्या अभ्यासासाठी तयार केले आहे का?

तुमचे मूल सध्याच्या अभ्यासाशी जुळवून घेऊ शकते आहे का, ह्याकडे लक्ष द्या. त्याच्याकडे काही वाचन किंवा संख्यात्मक क्षमता आहे का? तुमच्या मुलाची अँटिट्यूड पातळी किती आहे? या टप्प्यावर प्रामाणिक रहा. शेवटी, तुमचे मूल शिकण्यासाठी आणि त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत जाणार आहे. सगळ्याच गोष्टी त्याला आल्याच पाहिजेत असे नाही.

5. तुमचे घर शाळेपासून किती दूर आहे?

वैद्यकीय समस्या असल्यास किंवा तुम्हाला शाळेत येणे आवश्यक असल्यास, तुम्ही किती लवकर पोहोचू शकता हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. घरापासून शाळा दूर असल्यास त्याचा मुलाच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होतो. जर तुमच्या मुलाला लांबचा प्रवास करावा लागला, तर तो लहान मुलगा शाळेत चांगली कामगिरी करण्याआधीच थकून जाईल किंवा त्याला आनंदी जीवन जगता येणार नाही.

6. तुमच्या मुलाला पॉटी ट्रेनिंग दिलेले आहे का?

शालेय मुलाखतीत पालकांना विचारलेल्या विचित्र प्रश्नांपैकी हा एक वाटू शकतो. परंतु, शिक्षकांसाठी हे महत्त्वाचे आहे, कारण मुलांची जबाबदारी शिक्षकांवर असते आणि कोणावर लक्ष ठेवावे किंवा प्रशिक्षणात मदत करावी हे त्यांना माहित असणे आवश्यक आहे.  विशेष गरजा असलेली काही मुले एकटी शौचालयात जाण्यास नकार देतात आणि त्यांना या सवयीतून बाहेर पडण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

7. तुम्ही तुमच्या मुलाच्या स्वभावाचे वर्णन कसे कराल?

शाळा मुलांच्या भविष्याला आकार देते आणि त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पहिल्यांदा जुळवून घेण्यास मदत करते. तुमचे मूल तुमच्यापासून वेगळे होण्याचा कसा सामना करते? तुमचे मूल अनोळखी व्यक्तींना वाईट प्रतिक्रिया देते का? काही मुलांचे इतर मुलांशी जमत नाही आणि शिक्षकांनी त्यांना विशिष्ट पद्धतीने गुंतवून ठेवले पाहिजे.

8. तुम्ही ही खास शाळा का निवडली?

ह्या प्रश्नाच्या उत्तरामुळे त्यांना तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी तुमचा हेतू काय आहे याची माहिती मिळेल. शाळेच्या अभ्यासक्रमाशी तो जुळतो आहे का हे लक्षात येईल.

9. मुलाच्या खाण्याच्या सवयी काय आहेत?

मुलांना शाळेत जेवण दिले जात असेल तर हा प्रश्न सामान्य आहे. तुमचे मूल जेवायला त्रास देते का  किंवा त्याला काही ऍलर्जी आहे का? शाळा शेकडो मुलांची काळजी घेत असते आणि त्यांच्या आहाराचे काळजीपूर्वक निरीक्षण करते. तुमच्या मुलाला शाळेत खाण्याच्या पदार्थांची निवड करण्यात शाळेतील सदस्य मदत करू शकतात.

10. तुम्ही तुमच्या मुलाला कधी शिक्षा केली आहे का?कशी?

तुम्ही मुलाला शिक्षा का करता आणि शिक्षेमागचे कारण शाळेच्या परिस्थितीशी जुळते का याचे मूल्यांकन करण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. अर्थात, एक पालक या नात्याने, तुम्ही तुमच्या मुलाला एका विशिष्ट पद्धतीने शिस्त लावण्यासाठी तुम्ही पात्र आहात. ह्या प्रश्नाच्या उत्तरामुळे शाळेला तुमच्या मुलाच्या शिस्तीसंबंधित समस्या जाणून घेण्यास मदत होईल.

11. तुमचे मूल लसीकरणाबाबत अद्ययावत आहे का?

तुमचे मूल इतर मुलांच्या संपर्कात येईल. लसीकरण न केल्यास तो जंतूंच्या संपर्कात येऊ शकतो किंवा त्याच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो. तुमच्या मुलाला काही गंभीर आजार झाला आहे का? ह्या प्रश्नांच्या उत्तरांमुळे  लक्ष ठेवणे आवश्यक आहे अश्या मुलांवर शिक्षक लक्ष ठेवू शकतील.

12. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी तुमची स्वप्ने आणि हेतू काय आहेत?

तुमच्या उत्तरावरून तुमच्या मुलामध्ये तुमची किती गुंतवणूक आहे आणि तुम्हाला शाळेकडून किती अपेक्षा आहेत हे कळेल. तुमच्यावरून तुमच्या मुलाची वागणूक कशी असेल हे सुद्धा त्यांना कळेल.

13. तुमच्या घरातील वातावरण तसेच तुमचे वैवाहिक जीवन कसे आहे?

हा प्रश्न थोडा आक्रमक वाटू शकतो. ह्या प्रश्नात विचारलेल्या मुद्द्यांशी शाळेचा संबंध नसला तरीसुद्धा  तुमचे मूल कोणत्या वातावरणात वाढले आहे हे जाणून घेण्यासाठी शाळेला मदत होईल. घरातल्या वातावरणावरून तुमचे मूल शाळेला कळेल. घरात खूप अशांतता आहे का, आणि असल्यास, तुमच्या मुलाला ते माहिती आहे का? चला याचा सामना करूया, घटस्फोट सामान्य आहे आणि जोडप्यांमध्ये भांडणे होणे सामान्य आहेत. तणावाचा सामना करण्यास मुलांना मदत कशी करावी किंवा मुले विशिष्ट पद्धतीने का वागतात हे शिक्षकांना जाणून घ्यायचे असते.

14. गृहपाठाबद्दल तुमचे मत काय आहे?

काही नवीन शाळांनी गृहपाठ काढून टाकला आहे, तर काहींनी प्रयोगावर आधारित, व्यावहारिक कार्य इत्यादींचा समावेश केलेला आहे आणि काही शाळांमध्ये पारंपारिक पेन आणि कागद वापरूनच अभ्यास केला जातो. येथे, तुम्ही शाळेबद्दलच्या तुमच्या अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजेत आणि तुमची मते त्यांच्या दृष्टिकोनाशी जुळतात का ते त्यांना कळवावे.

15. तुमच्या मुलाच्या शिक्षणात तुमच्या भूमिकेवर तुमचा विश्वास आहेका?

काही पालकांना प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या मुलांसोबत राहायचे असते, तर काही पालक अगदी ह्याच्या उलट असतात. ह्या दोन्हीचा समतोल असणे चांगले असते, परंतु घरी मुलाच्या शिक्षणाकडे कोण लक्ष देणार  आणि तुम्ही ते कसे कराल हे शिक्षकांना जाणून घ्यायचे असते.

16. तुमच्या मुलाला सर्वात जास्त काय आवडत नाही?

हा प्रश्न विचारून, शाळेचे अधिकारी तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टी आणि परिस्थिती आवडत नाहीत हे जाणून घेतात. अशाप्रकारे त्यांना मुलांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत होते.

17. तुम्ही यशस्वी पालकत्वाची व्याख्या कशी करता?

तुम्ही लक्षात ठेवा की पालकत्वाची कोणतीही विशिष्ट रचना नाही.  प्रत्येक व्यक्तीची आपल्या मुलासोबत राहण्याची स्वतःची पद्धत असते. हा प्रश्न विचारून शाळेला फक्त तुमची पालकत्वाची पद्धत जाणून घ्यायची आहे. तुमच्या मुलाला कुठल्या प्रकारचे पालकत्व मिळलेले आहे हे जाणून घेण्यास शाळेला ह्यामुळे मदत होईल. तसेच मुलांचे संगोपन कसे केले गेले आहे हे शाळेला समजेल.

18. तुम्ही तुमच्या मुलासोबत किती वेळ घालवता?

मुलांचे चांगले संगोपन होण्यासाठी आपल्या मुलासाठी थोडा वेळ काढणे महत्वाचे आहे. या प्रश्नाद्वारे, शाळेला तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी योग्य वेळ काढता का आणि शालेय शिक्षणाच्या महत्त्वाच्या वर्षांत तुम्ही त्यांना मदत करू शकता का.? हे जाणून घेता येईल

19. तुमच्या मुलाला प्रवेश देण्यासाठी तुम्ही शाळेत कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शोधत आहात?

या प्रश्नाच्या उत्तरामुळे शाळेला तुमच्या अपेक्षा चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. म्हणून, आपण ज्या गोष्टी शोधत आहात त्या सर्व गोष्टींचा स्पष्टपणे उल्लेख करा, जसे अंतर (मुलाला दररोज 2-2.5 तास ये-जा करणे त्रासदायक असेल, म्हणून मी हा मुद्दा लक्षात घेईन)

मुलाखत यशस्वी होण्यासाठी काही टिप्स

1. स्वतःशी प्रामाणिक रहा

मुलाखतीच्या वेळी फक्त प्रवेश मिळावा म्हणून खोटे बोलण्याऐवजी खरे बोला. शाळेला शेवटी सत्य सापडेल, आणि तेव्हा ते तुमच्यासाठी लाजिरवाणे ठरू शकते. तुम्ही कुणीही असलात तरीही तुमच्या जागी चांगलेच आहात.

2. मुलाखत घेणाऱ्याला व्यत्यय आणू नका

मुलाखतकार किंवा प्रवेश संचालकांना ते काय म्हणत आहेत ते पूर्ण पणे सांगू द्या. नीट ऐकून घेतल्याने तुम्हाला शाळेविषयी अधिक जाणून घेण्यास मदत होईल. शिवाय, तुमच्या मुलाखतीमध्ये व्यत्यय आणल्यास त्याचा वाईट प्रभाव पडतो.

3. तुमच्या मुलासाठी प्रश्नांची उत्तरे देऊ नका

तुमच्या मुलाला त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ द्या. मुले स्वतंत्र आणि स्वत: च्या बाजूने उभे राहण्यास त्यांच्यामध्ये पुरेसा आत्मविश्वास येण्यास त्यामुळे मदत होईल.

4. वांशिकता टाळा

विचारल्याशिवाय, जातीय किंवा धार्मिक विचारांचा उल्लेख करू नका. हा बर्‍याच लोकांसाठी एक नाजूक  विषय असू शकतो आणि पालकांची मते स्वतःची म्हणून मांडणारी मुले शाळेला नको असतात.

5. योग्य प्रश्न विचारा

अनेक पालक मुलाखत घेणाऱ्याला प्रभावित करण्यासाठी अनेक प्रश्न विचारू शकतात, परंतु त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. संबंधित प्रश्न विचारा ज्याबद्दल तुम्हाला खरोखर उत्सुकता आहे.

6. उशीर करू नका

तुम्ही मुलाखतीसाठी वेळेवर जात आहात याची खात्री करा कारण वक्तशीरपणाच्या अभावामुळे शाळा व्यवस्थापनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. मुलाच्या शाळा प्रवेश मुलाखतीला पालक काय परिधान करू शकतात?

पालकांनी फॉर्मल कपडे घातले पाहिजेत जेणेकरुन त्यांचा प्रभाव पडेल.

2. मूल पालकांच्या शाळेच्या मुलाखतीत असू शकते का?

काही शाळा मुलाखतीच्या वेळी मुलाला पालकांसोबत उपस्थित राहण्याची परवानगी देतात. परंतु मुलाखतीसाठी तुमच्या मुलाला तुमच्यासोबत घेऊन जाण्यापूर्वी शाळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. जॉब इंटरव्ह्यूसारखाच उत्साह आणि भरपूर नियोजनासह हा शाळा प्रवेशाच्या मुलाखतीचा अनुभव घ्या. तुमच्या मुलाच्या शिक्षणप्रवासात हे फक्त एक छोटेसे पाऊल आहे, त्यामुळे घाबरू नका, कारण मुलांकडे जबाबदार आणि हुशार नागरिक बनण्यासाठी भरपूर वेळ आहे. तुमच्या जोडीदारासोबत मुलाखतीची योजना करा आणि एकमेकांची मते, शिक्षण आणि तुमच्या मुलाच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन जाणून घेण्याची ही एक संधी म्हणून ह्या मुलाखतीकडे पहा. शुभेच्छा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved