प्रीस्कूलर (३-५ वर्षे)

दिवाळी 2023: मुलांसाठी दिवाळीची माहिती

दिवाळी, दिव्यांचा सण, देशाच्या जवळपास सर्वच भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, उत्तर भारतात सर्वात जास्त प्रमाणात साजरा केला जाणारा हा सण आहे. मुलांना हा सण साजरा करायला आवडतो कारण त्यांना फटाके फोडायला, खेळ खेळायला आणि मित्रांसोबत मजा करायला मिळते. पण पालक या नात्याने तुम्ही त्यांना ह्या हिंदू सणाचे महत्व सांगायलाच हवे. हा लेख वाचा आणि तुमच्या मुलाला देशाचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीशी मनोरंजक मार्गांनी परिचय करून द्या.

दिवाळी का साजरी केली जाते?

मुलांना पौराणिक पात्रे आणि त्यांच्या कथांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या मुलांना दिवाळीच्या वेगवेगळ्या कथा सांगून आपली संस्कृती आणि परंपरांबद्दल माहिती करून देण्यासाठी ही चांगली संधी आहे. मुलांना दिवाळीचा इतिहास समजावून सांगण्यासाठी खालील काही कथा आहेत:

. प्रभू श्रीरामांचे पुनरागमन

प्रभू राम वनवासातून परतल्याचा सन्मान करण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. श्रीराम हे राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र होते आणि त्यांचा विवाह सीतेशी झाला होता. राजाने आपल्या ज्येष्ठ मुलाकडे राज्य सोपवण्याचा निर्णय घेतला. राजाच्या या निर्णयाने राणी कैकेयीला राग आला आणि तिने षड्यंत्र रचून राजा दशरथाला श्रीरामांना १४ वर्षांसाठी वनवासासाठी पाठवण्यास सांगितले. श्रीराम, सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत वनवासाला निघून गेले. त्या १४ वर्षांत त्यांना अनेक परीक्षांना सामोरे जावे लागले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजा रावणाने सीतेचे अपहरण केले. रामाने रावणाचा पराभव करून वध केला आणि चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतले. लोकांनी 'पणत्या' लावून आणि फटाके फोडून रामाच्या पुनरागमनाचा उत्सव साजरा केला आणि तेव्हापासून हा दिवस रामाच्या पुनरागमनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

. देवी लक्ष्मीची कथा

देवी लक्ष्मीच्या जन्माची कथा दुर्वास ऋषी आणि इंद्रदेवाच्या भेटीने सुरू होते. दुर्वास ऋषी इंद्रदेवाना फुलांचा हार अर्पण करतात, आणि इंद्रदेव तो हार आपल्या हत्तीच्या, ऐरावतच्या कपाळावर ठेवतात. तो हार हत्ती पृथ्वीवर फेकतो. दुर्वास ऋषी क्रोधित होतात आणि इंद्राला शाप देतात की तो हार ज्याप्रकारे नष्ट झाला त्याचप्रमाणे त्यांचे राज्यही नष्ट होईल. इंद्रदेव राजधानीला परतल्यावर तिथले सर्व काही नष्ट होत असल्याचे त्यांना समजते . देव दुर्बल होत चालले होते आणि राक्षस त्यांच्यावर आक्रमण करत होते. पराभूत झाल्यानंतर, देव भगवान विष्णूंकडे जातात , श्री विष्णू त्यांना सुचवतात की जर त्यांना त्यांची शक्ती पुनर्संचयित करण्यासाठी 'अमृत' किंवा अमरत्वाचा भाग हवा असेल तर समुद्र मंथन करावे. त्यानंतर समुद्रमंथन सुरू झाले. या मंथन प्रक्रियेतून कमळावर लक्ष्मीचे दर्शन झाले. देवी ‘अमावस्येच्या दिवशी’ समुद्रातून अवतरली आणि तिने त्याच दिवशी भगवान विष्णूला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. अनेक हिंदू संस्कृती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे मिलन साजरी करण्यासाठी दिवाळी साजरी करतात.

. पांडवांच्या परतीचा उत्सव साजरा करणे

१३ वर्षांच्या वनवासातून पांडव परत आल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. पांडव हे पाच राजपुत्र होते, त्यांनी सारीपाटाचा खेळात कौरवांचे राज्य गमावले आणि १३ वर्षे वनवास भोगला. ते 'कार्तिक अमावस्येला' हस्तिनापूरला परतले आणि लोकांनी दिवे लावून त्यांचा आनंदोत्सव साजरा केला.

. नरसिंह आणि हिरण्यकशिपूची कथा

ह्या कथेनुसार दक्षिण भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये दिवाळी साजरी करते. कठोर तपश्चर्या केल्यावर हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवाने एक भेट दिली. त्यामुळे तो अमर झाला. त्याला माणूस किंवा पशू दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर मारू शकणार नाही असा वर दिला. त्यामुळे राजा जुलमी बनला आणि त्याचे अत्याचार असह्य झाले. नरसिंह हा भगवान विष्णूचा पुनर्जन्म अवतार होता, जो अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी होता. नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला तो दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती. संध्याकाळ होती. नरसिंहाने सर्व संकटांना झुगारून राजाचा वध केला आणि अशा प्रकारे वाईटावरचा विजय दिवाळीच्या रूपात साजरा केला गेला.

. गुरांची पूजा करणे

भारतातील खेड्यांमध्ये, लोक त्यांच्या शेतांची आणि गुरांची पूजा करतात कारण ते त्यांना त्यांचे जीवन जगण्यास मदत करतात. उलट खेड्यातील लोक गुरेढोरे म्हणजे लक्ष्मीचा पुनर्जन्म अवतार मानतात. जेव्हा त्यांची शेतं पिकांनी भरलेली असतात आणि गुरेढोरे भरभराटीला येतात तेव्हा ते गायींची पूजा करून हा सण साजरा करतात.

वर नमूद केलेल्या काही प्रसिद्ध कथा आणि श्रद्धा दिवाळीच्या उत्सवाशी संबंधित आहेत ज्या तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत शेअर करू शकता त्यामुळे मुलांना ह्या सणांचे महत्व कळण्यास मदत होईल.

"दिवाळीचे ५ दिवस" ​​ आणि त्यांचे महत्व

दिवाळी हा काही एक दिवसाचा सण नाही. हा उत्सव ५ दिवस चालतो. मिठाई वाटणे, प्रेम पसरवणे आणि फटाके फोडणे हे केवळ दिवाळीच्या दिवसापुरतेच मर्यादित नाही तर ते दिवाळीच्या दोन दिवस आधी सुरू होते आणि दिवाळीनंतर दोन दिवस चालते. दिवाळीचे ५ दिवस काय सूचित करतात ते येथे दिलेले आहे.

1) उत्सवाचा पहिला दिवस - धनत्रयोदशी

ह्या ५ दिवसांच्या सणाचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो. या दिवशी समृद्धीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. लोकांचा असा विश्वास आहे की या शुभ दिवशी देवीच्या पूजनासाठी सोने, चांदी, घर, कार किंवा इच्छित कोणतीही वस्तू खरेदी करावी. लोक आपली घरे सजवतात आणि मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडतात.

2) उत्सवाचा दुसरा दिवस - नरक चतुर्दशी

हा दिवस महत्त्वाचा आहे कारण लोक नरकासुरावर भगवान कृष्ण आणि सत्यभामा यांनी मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करतात. सकारात्मक ऊर्जेसाठी लोक लवकर उठतात आणि सुगंधी तेलाने आंघोळ करतात. लोक मातीचे दिवे लावतात आणि प्रार्थना करतात.

3) उत्सवाचा तिसरा दिवस दिवाळी किंवा लक्ष्मीपूजा

हा दिवस ह्या ५ दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी लोक दिवाळी साजरी करतात. लोक त्यांचे घर पणत्या, फुले आणि रांगोळीने सजवतात. मित्र आणि कुटुंबात मिठाई वाटली जाते. लोक या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीची प्रार्थना करतात आणि सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

4) उत्सवाचा चौथा दिवस - गोवर्धन पूजा

या पाच दिवसीय उत्सवाच्या चौथ्या दिवशी गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. एका लोककथेनुसार, श्रीकृष्णाने इंद्रदेवाने पाडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला. लोक लहान पर्वत बनवतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी या पर्वतांची पूजा करतात.

5) उत्सवाचा ५ वा दिवस - भाऊ बीज

५ दिवस चालणाऱ्या ह्या सणाचा शेवटचा दिवस भाऊ-बहिणीच्या नात्याने संपतो. नरकासुर या राक्षसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण आपल्या बहिणीला भेटायला गेले होते असे मानले जाते. बहिणीने आपल्या भावाच्या विजयाचा आनंद श्रीकृष्णाच्या कपाळावर टिळालावून साजरा केला होता. या शुभ दिवशी, भाऊ आणि बहिणी एकत्र येतात आणि पवित्र बंधन साजरे करतात. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात.

दिवाळी कशी साजरी केली जाते?

भारतात विविध संस्कृती आणि परंपरांचा देश आहे तथापि, दिवाळी हा असाच एक सण आहे जो संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा प्रकारे लोक प्रकाशाचा हा सुंदर उत्सव साजरा करतात:

. पणत्या, दिवे लावून

दिवे आणि मेणबत्त्या लावणे ही दिवाळीशी संबंधित सर्वात महत्वाची परंपरा आहे. दिव्यांचा प्रकाश जगातून अंधार दूर करण्याचे प्रतीक आहे. अशा प्रकारे जेव्हा लोक दिवे लावतात, तेव्हा ते त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारची नकारात्मकता, वाईट भावना किंवा अंधार दूर करण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. दिवाळी अमावस्येच्या रात्री येते आणि सर्वत्र अंधार असतो, दिवे लावल्याने देवी लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यास मदत होते असाही एक विश्वास आहे.

. लक्ष्मीची पूजा करून

देवी लक्ष्मीची पूजा हा दिवाळीच्या सणातील महत्वाचा विधी आहे. देवी लक्ष्मीची आराधना केल्याने एखाद्याला इच्छा असलेली सर्व समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते ही हिंदूंची एक श्रद्धा आहे. संध्याकाळी, कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि देवी लक्ष्मीसमोर तिचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करतात.

. मिठाई वाटून

प्रत्येक भारतीय सण मिठाई खाल्ल्याशिवाय आणि वाटून घेतल्याशिवाय अपूर्ण आहे, आणि दिवाळीही त्याला अपवाद नाही. लोक त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना भेटतात आणि त्यांच्यासाठी मिठाई आणि भेटवस्तू घेतात. मिठाई हे नातेसंबंधातील गोडपणाचे प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत मिठाई शेअर करता तेव्हा तुमच्या नात्यात असाच गोडवा कायम राहावा अशी तुमची इच्छा आणि आशा असते.

. फटाके फोडून

फटाके फोडल्याशिवाय मुलांचा दिवाळी सण अपूर्ण आहे. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच फटाक्यांचेही महत्त्व आहे आणि ते म्हणजे नकारात्मकता किंवा वाईट गोष्टींना तुमच्या जीवनातून दूर ठेवणे. पर्यावरणास अनुकूल असे फटाके तुम्ही खरेदी केले पाहिजेत तसेच हानिकारक असे फटाके फोडणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे प्रदूषण होऊ शकते.

. रांगोळी काढून

देशभरातील अनेक घरे आणि मंदिरांच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात. देवी लक्ष्मीचे त्यांच्या नम्र निवासस्थानात स्वागत करण्याचा हा एक मार्ग आहे. लोक त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी देखील हे बनवतात. हे सुंदर नमुने तयार करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली फुले, तांदळाचे पीठ आणि इतर प्रकारचे रंग वापरले जातात.

. गुरांची पूजा करून

देशाच्या दक्षिणेकडील भागातील खेड्यापाड्यातील अनेक लोक आपल्या गुरांची पूजा करतात. कारण श्रद्धेनुसार गुरेढोरे त्यांच्यासाठी लक्ष्मीचा अवतार अवतार घेतात.

भारताशिवाय इतर कोणते देश दिवाळी साजरी करतात?

जगात भारताची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि अनेक शेजारील देशांमध्ये म्हणजेच सिंगापूर, नेपाळ, श्रीलंका आणि इतर काही देशांमध्ये भारतीय लोकसंख्या आहे जास्त आहे. या सर्व देशांमध्ये दीपावलीची अधिकृत सुट्टीही असते

लहान मुलांसाठी दिवाळी एक सुरक्षित सण बनवण्यासाठी टिप्स

दिवाळी हा सण तुम्ही प्रियजनांसोबत साजरा करता. परंतु दिवे आणि फटाके हाताळताना तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी घ्यावी लागेल. जेव्हा सण सुरक्षित आणि आरोग्यदायी पद्धतीने साजरे केले जातात तेव्हा त्यांचा उत्तम आनंद लुटला येतो. येथे मुलांसाठी दिवाळीची काही माहिती दिलेली आहे जी तुम्हाला तुमच्या लहान मुलांसोबत शेअर करायला आवडेल:

दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी आनंदाने, उत्साहाने आणि प्रेमाने साजरी करा. ह्या पाच दिवसीय सणाचे महत्त्व तुमच्या मुलांसोबत शेअर करा. तुमच्या प्रियजनांसोबत तुम्हाला ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो.

आणखी वाचा:

मुलांसाठी दिवाळी ह्या विषयावर निबंध – लिहिण्यासाठी टिप्स आणि नमुने तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेजेस आणि कोट्स

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved