मुलांसाठी महात्मा गांधींचे सोप्या पद्धतीने लिहिलेले चरित्र सापडणे अवघड आहे. गांधीजींच्या जीवनातील विविध पैलूंचे वर्णन करणारी असंख्य पुस्तके आहेत, परंतु लहान मुलांना समजतील अशी त्यापैकी काही थोडीच पुस्तके आहेत. काळाचे संदर्भ देऊन मुलांना इतिहासाचे धडे दिले जाऊ शकतात आणि गांधीजींची प्रेरणा समजून घेऊन त्याची सुरुवात केली जाऊ शकते. आपल्या देशाच्या महान नेत्याबद्दल प्राथमिक माहिती असल्यास आपल्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्याची नक्कीच मदत होऊ शकते.
मुलांसाठी महात्मा गांधीजींविषयी माहिती
महात्मा गांधींच्या जीवनाशी संबंधित काही समर्पक माहिती आणि तथ्ये आम्ही इथे एकत्र केलेली आहेत. आम्ही इथे त्यांच्या जन्मापासून बालपणापर्यंत तसेच त्यांनी आफ्रिकेत घालवलेला काळ आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची झालेली हत्या ही सर्व माहिती इथे संकलित केलेली आहे.
बालपण आणि कुटुंब
- महात्मा गांधींचे खरे नाव मोहनदास करमचंद गांधी आहे
- त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ मध्ये पोरबंदर येथे झाला
- त्याचे पालक करमचंद गांधी आणि पुतलीबाई हे होते. त्यांचे वडील हे पोरबंदरचे मुख्यमंत्री होते
- त्या काळात बालविवाह होत असत, मोहनदास गांधींच्या लग्नाच्या वेळी त्यांचे वय १३ वर्षे इतके होते
- महात्मा गांधींच्या आई पुतलीबाई ह्या अतिशय धार्मिक स्त्री होत्या.
- त्यांचे कुटुंब जुनागड राज्यातील कुतियाना गावातून आले होते.
- त्यांचे लग्न कस्तूर कपाडिया यांच्याशी झाले, त्यांनी लग्नानंतर त्यांचे नाव बदलून कस्तुरबा गांधी असे ठेवले. १८८३ साली त्यांचे लग्न झाले. कस्तुरबा त्यावेळी १४ वर्षांच्या होत्या
- लग्नानंतरही कस्तुरबा त्यांच्या आई वडिलांसोबत स्वतःच्या घरीच राहिल्या. कस्तुरबा गांधीसुद्धा त्यांच्या आयुष्यात राजकीयदृष्ट्या सक्रिय होत्या आणि प्रत्येकासाठी नागरी हक्क मिळवण्यावर त्यांनी भर दिला होता
- मोहनदास गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना ४ मुले होती. ती सर्व मुले होती. हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी त्यांची नावे होती
- १८८५ मध्ये, गांधीजी आणि कस्तुरबा यांना पहिले बाळ झाले, जन्मानंतर काही दिवसांनीच त्यांचे निधन झाले. त्याच वर्षी, मोहनदास अनाथ झाले, करमचंद गांधी यांचेही निधन झाले.
- मोहनदास गांधी शाळेत एक कमकुवत विद्यार्थी होते. त्यांना भूगोल हा विषय समजणे खूप कठीण वाटत असे. तथापि, त्याला हिंदू धर्मग्रंथाचे वाचन आवडत असे आणि त्यांनी सत्यवचनी राजा हरिश्चंद्र यांना आदर्श मानले
दक्षिण आफ्रिकेत काम
- सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गांधींनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला जाण्याचा मार्ग पत्करला. त्याचे ध्येय बॅरिस्टर बनणे हे होते आणि त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा तीच इच्छा होती
- त्यांनी १८८० मध्ये लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते भारतात परत आले आणि त्यांनी स्वतःची कायद्याची प्रॅक्टिस सुरू करण्याचा प्रयत्न केला
- जेव्हा त्या प्रयत्नांना कोणतेही फळ मिळाले नाही, तेव्हा त्याने एका लॉ फर्ममध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्या नोकरीच्या निम्मिताने ते दक्षिण आफ्रिकेत गेले
- दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी आयुष्याची २१ वर्षे घालवली.
- तेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन तसेच नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली.
- त्या काळात, दक्षिण आफ्रिकेतील जनता वंश आणि रंग ह्या मुद्द्यांवर खूप भेदभावाचा सामना करत होती. गांधीजी सुद्धा सावळे होते
- पूर्णपणे भरलेल्या बसमध्ये जात असताना, एका गोऱ्या माणसाने गांधींना ज्या सीटवर बसले होते तिथून त्यांना उठण्यास सांगितले कारण त्यांची त्वचा सावळी होती. गांधीजींनी उठण्यास नकार दिला म्हणून त्यांना बसमधून बाहेर ढकलण्यात आले
- ह्या घटनेसारखीच, अशी अनेक उदाहरणे होती. गांधीजींना दक्षिण आफ्रिकेच्या हॉटेल्समध्ये खोली नाकारण्यात आली होती तसेच कोर्ट मॅजिस्ट्रेटने त्यांची पगडी काढण्याचे आदेश दिले होते
- या सर्व क्षणांनी त्यांना समानतेसाठी लढण्यासाठी आणि लोकांना मदत करू शकणाऱ्या राजकीय कल्पना विकसित करण्यास प्रेरित केले
महात्मा गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम
- भारतीय जनता ब्रिटिशांच्या राजवटीत कशी पीडित आहे हे महात्मा गांधींना भारतात परत आल्यावर जाणवले. स्वतंत्र राष्ट्र व्हावे ह्या उद्देशाने त्यांनी चळवळीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला
- त्यांच्या राजकीय विचारांची मुख्य रणनीती म्हणजे अहिंसेचा वापर होय. हिंसा करणे हा कोणत्याही समस्येवर कधीच उपाय नसतो असा गांधीजींचा विश्वास होता
- त्यांनी सविनय कायदेभंगाच्या असंख्य मोहिमा सुरू केल्या. हे धोरण सोपे होते: आणि ते म्हणजे कोणत्याही हिंसाचाराचा अवलंब न करता ब्रिटिश साम्राज्याने दिलेल्या कोणत्याही आदेशाला नकार देणे. लवकरच लोकांनी त्यांच्या कामावर बहिष्कार टाकून ब्रिटिशांना सहकार्य करण्यास नकार दिला
- त्याचप्रमाणे, जेव्हा ब्रिटिशांनी मिठावर मोठा कर लावला तेव्हा सुद्धा गांधीजींनी दांडी पदयात्रा काढली
- १९२० मध्ये गांधीजींना काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडण्यात आले, नंतर ते १९३४ मध्ये पक्षातून बाहेर पडले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी स्वतःच काम सुरू ठेवले
- वारंवार बहिष्कार, आज्ञाभंगाच्या चळवळी आणि साम्राज्य उलथून टाकण्यासाठी "भारत छोडो" चळवळी, लोकांच्या देशव्यापी रॅली, ह्या सगळ्यामुळे ब्रिटिशांनी शेवटी कबूल केले आणि भारत सोडण्यास सहमती दर्शविली आणि स्वातंत्र्य मिळाले.
महात्मा गांधींच्या मृत्यूबद्दल
- भारताची फाळणी अंमलात आल्यानंतर राष्ट्र भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागले गेले
- बरेच लोक गांधींच्या धोरणांचा तिरस्कार करू लागले. नथुराम गोडसे हे हिंदू राष्ट्रवादी होते, त्यांना गांधींबद्दल तीव्र तिरस्कार होता
- म्हणून, त्यांनी ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी ५:१७ च्या सुमारास गांधींवर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली
- गांधीजींना “महात्मा” ही पदवी देण्यात आली आणि त्यांच्यासाठी मोठ्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली. आपल्या राष्ट्रपित्याला निरोप देण्यासाठी २० लाखांहून अधिक लोक अंत्यसंस्कारात सहभागी झाले.
लहान मुलांना गांधीजींविषयी सांगताना घटनाक्रम समजून घेणे आणि त्यांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी ह्या घटनांनी कसे प्रेरित केले हे सांगणे अत्यंत महत्वाचे आहे. सत्याग्रहाचे तत्व त्यांच्या जीवनाचा मुख्य भाग होता. आपल्या मुलांना सत्य, प्रामाणिकपणा आणि अहिंसेची गरज समजून घेण्यास मदत करणे देखील आवश्यक आहे.
आणखी वाचा:
तुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती
मुलांसाठी भारताविषयी १०० मजेदार तथ्ये