आरोग्य

मुलांमधील टाईप २ मधुमेह

काही वर्षांपूर्वी टाइप २ मधुमेह हा आजार लहान मुलांना होणे अगदी दुर्मिळ होते, परंतु आता तशी परिस्थिती नाही. जर तुमच्या मुलामध्ये टाइप २ मधुमेहाचे निदान झाले असेल, तर तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल, परंतु वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रगतीमुळे आता हा आजार सहज व्यवस्थापित केला जाऊ शकतो. मुलांमधील टाइप २ मधुमेहावर अधिक चर्चा करूया. त्याची कारणे आणि चिन्हे आणि उपलब्ध विविध उपचार पर्यायांबद्दल जाणून घेऊयात.

टाइप २ मधुमेह म्हणजे काय?

टाइप २ मधुमेह ही समस्या असल्यास शरीर साखरेवर प्रक्रिया करू शकत नाही. जेव्हा आपण कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातो तेव्हा आपले शरीर कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये विघटन करते. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते. हे संप्रेरक आपल्या रक्तातून आपल्या शरीरातील विविध पेशींमध्ये ही साखर पोहोचवते. आपले शरीर ह्या साखरेचा वापर इंधनाच्या रूपात करते. परंतु, जेव्हा शरीरातील इन्सुलिन कार्य करू शकत नाही, तेव्हा रक्तप्रवाहात ग्लुकोज जमा होत राहते आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे किडनी निकामी होणे, अंधत्व येणे आणि हृदयविकार यांसारख्या इतर अनेक समस्या देखील होऊ शकतात.

टाइप २ मधुमेह टाइप १ मधुमेहापेक्षा कसा वेगळा आहे?

अधिक व्यापक चाचण्या न केल्यास बर्‍याच वेळा टाइप २ मधुमेहाला टाइप १ मधुमेह समजले जाऊ शकते. परंतु, दोन्ही प्रकारच्या मधुमेहामध्ये लक्षणीय फरक आहे. टाईप १ मधुमेह मुख्यत्वे रोगप्रतिकारक प्रणालीतील समस्यांमुळे होतो,  टाइप २ मधुमेह सामान्यतः आनुवंशिक कारणांमुळे मुलांमध्ये दिसून येतो, परंतु तो मुख्यतः अस्वास्थ्यकर किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो.

मुलांमध्ये आढळणाऱ्या टाइप २ मधुमेहाची कारणे

खालील काही कारणांमुळे मुलांमध्ये मधुमेह होऊ शकतो

टाईप २ मधुमेह कोणाला कोणाला होण्याची अधिक शक्यता आहे?

टाईप २  मधुमेहाचा खालील मुलांवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते:

टाइप २ मधुमेहाची चिन्हे आणि लक्षणे

मुलांमध्ये टाइप 2 मधुमेहाची काही लक्षणे येथे आहेत:

1. तहान

जर तुमचे मूल सतत तहानलेले असेल, तर ते त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे असू शकते.

2. वारंवार बाथरूमला जाणे

तुमचे मूल अनेकदा लघवी करण्यासाठी बाथरूममध्ये जात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने लघवीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त होते आणि त्यामुळे वारंवार बाथरूमला जावे लागते.

3. भूक वाढ

जर तुमचे मूल नेहमीपेक्षा जास्त भुकेले असेल, तर शरीरातील न पचलेल्या साखरेमुळे असे होऊ शकते.  त्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. मधुमेह असलेल्या मुलांच्या शरीरात त्यांच्या शरीरातील पेशींना इंधन देण्यासाठी पुरेसे इन्सुलिन नसल्यामुळे, अन्न हे ऊर्जेचे पुढील स्त्रोत बनते. म्हणून, मूल नेहमीपेक्षा जास्त खातो.

4. थकवा

शरीरातील उर्जा कमी झाल्यामुळे, तुमच्या मुलाला थकवा आणि सुस्त वाटू शकते आणि ते टाईप २ मधुमेहाचे लक्षण आहे.

5. त्वचेवर गडद ठिपके

तुमच्या मुलाला अॅकॅन्थोसिस निग्रिकन्सचा त्रास होऊ शकतो. ही समस्या असल्यास त्वचा काळी पडू शकते. विशेषत: काखेभोवती आणि मानेभोवतीची त्वचा काळी होते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यास असे होते.

6. जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त वेळ लागतो

जर तुमच्या मुलाला दुखापत किंवा जखम झालेली  असेल आणि ती अद्याप बरी झालेली नसेल, तर  टाइप २ मधुमेहामुळे असे होऊ शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने बरे होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

टाईप २ मधुमेहाचा मुलाच्या शरीरावर कसा परिणाम होतो?

टाईप २ मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास किंवा त्याचे निदान न झाल्यास काही आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. टाईप २ मधुमेहामुळे निर्माण होणारी गुंतागुंत खालीलप्रमाणे आहे:

1. सामान्य गुंतागुंत

2. दीर्घकालीन जोखीम

मुलाची जसजशी वाढ होते तसतसे टाईप २ मधुमेहामुळे निर्माण होणारी गुंतागुंत अधिक वाढते.  वर नमूद केलेल्या काही समस्या आणखी वाढून गंभीर होऊ शकतात आणि त्यामुळे जीवघेणी परिस्थिती देखील उद्भवू शकते.

टाइप २ मधुमेहाचे निदान कसे केले जाते?

जर तुमच्या डॉक्टरांना तुमच्या मुलाला टाईप २ मधुमेह असल्याची शंका आली, तर तुमचे डॉक्टर तुमच्या मुलाची सखोल तपासणी करू शकतात आणि पुढील चाचण्या देखील करू शकतात.

टाइप २ मधुमेहावर उपचार कसा करावा?

मुलांसाठीचे उपचार कमी अधिक प्रमाणात प्रौढांसारखेच असतात. परंतु ही उपचारपद्धती आपल्या मुलामध्ये आढळलेल्या मधुमेहाच्या तीव्रतेनुसार आणि आरोग्यानुसार उपचारपद्धती बदलू शकते. येथे काही टिप्स दिलेल्या आहेत. डॉक्टर औषधे लिहून देताना ह्या टिप्स तुम्हाला सांगू शकतात.

1. रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करा

तुमच्या मुलाच्या रक्ताच्या साखरेच्या पातळीवर नियमित लक्ष ठेवावे लागेल. त्यासाठी तुम्हाला रक्तातील ग्लुकोज तपासण्याचे उपकरण घ्यावे लागेल.

2. तुमचे मूल पौष्टिक अन्न खात खात आहे ना तसेच तो नियमित व्यायाम करत आहे ना ह्याकडे लक्ष द्या

तुमच्या मुलाला विशेष आहार घेण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. ह्या सूचनांचे पालन त्याने केले पाहिजे तसेच त्याला वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामांबद्दल देखील सांगितले जाऊ शकते.

तुमच्या मुलाला उपयोगी होती अश्या काही टिप्स

येथे काही टिप्स दिलेल्या आहेत. ह्या टिप्स द्वारे तुम्ही तुमच्या मुलाला ही स्थिती चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकता:

टाइप  २ मधुमेह टाळण्यासाठी प्रभावी मार्ग

मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये मधुमेह टाळण्यास मदत करणाऱ्या काही टिप्स खाली दिल्या आहेत!

डॉक्टरांना कधी फोन करावा?

तुम्‍हाला तुमच्‍या लहान मुलामध्‍ये टाईप २ मधुमेहाची लक्षणे दिसली तर , तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. जर या आजाराचे निदान झाले नाही तर त्यामुळे जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. म्हणूनच, त्वरित वैद्यकीय मदत घ्या त्यामुळे मधुमेहाची लक्षणे नियंत्रित राहतील आणि नंतर आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. अर्थात, जर तुमच्या मुलाला टाइप २ मधुमेह असेल तर तुम्ही काळजीत असाल. पण काळजी करू नका. त्वरित निदान केल्यास आणि तात्काळ वैद्यकीय मदत घेतल्यास ही स्थिती नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. आणखी वाचा: मुलांना होणाऱ्या डोकेदुखीचा सामना कसा करावा मुलांमधील पिनकृमी: कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved