मोठी मुले (५-८ वर्षे)

मुलांनी रात्री झोपेत अंथरूण ओले करणे (नॉक्टर्नल एन्युरेसिस)

रात्री अंथरुणात शू करणे ही समस्या लहान मुलांमध्ये आढळते. इंग्रजीमध्ये ह्यास 'नॉक्टर्नल एन्युरेसिस' असे म्हणतात. ही समस्या असल्यास लहान मुले झोपेत शू करतात. पालक म्हणून तुम्ही जास्त घाबरण्याची गरज नाही. ही एक सामान्य घटना आहे. योग्य काळजी घेऊन आणि प्रेमाने हाताळली जाऊ शकते.

नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा बेडवेटिंग म्हणजेच अंथरुणात लघवी करणे म्हणजे काय?

नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा अंथरुण ओले करणे, म्हणजेच झोपेत लघवी करणे होय. असे होण्यामागे कोणतीही भावनिक समस्या किंवा कोणताही शारीरिक आजार नसतो. ५ ते १०% अंथरूण ओले करण्याच्या समस्यांमागे विशिष्ट वैद्यकीय कारण असू शकते. परंतु, त्यामागे वैद्यकीय इतिहास असू शकतो. ही समस्या असणाऱ्या मुलांच्या पालकांना सुद्धा त्यांच्या लहानपणी ही समस्या असल्याची शक्यता असू शकते. मूल पाच वर्षे किंवा थोडे मोठे असल्याशिवाय अनेक पालक किंवा डॉक्टर सुद्धा निदानासाठी ह्याचा विचार करत नाहीत. एन्युरेसिस ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रासदायक ठरू शकते. मुलामध्ये नॉक्टर्नल एन्युरेसिस ही समस्या असल्यास काही वेळा ते कुठल्या तरी आजाराचे लक्षण असू शकते. नॉक्टर्नल एन्युरेसिसची मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

मुलांमध्ये नॉक्टर्नल एन्युरेसिस किती सामान्य आहे?

मुलांनी अंथरुणात शू करणे ही एक सामान्य समस्या आहे. सुमारे ७% मुलांमध्ये आणि ३% मुलींमध्ये ही समस्या आढळते. ही मुले साधारणतः पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाची असतात. वयाच्या १० व्या वर्षी ही संख्या पुरुषांमध्ये ३% आणि मुलींमध्ये २% पर्यंत खाली घसरते. मुलांमध्ये बहुतेक वेळा त्यांच्या किशोरवयीन वर्षांमध्ये ही समस्या वाढलेली दिसते आणि सुमारे १% मुले आणि मुलींना १८ व्या वर्षी हा विकार होतो.

अंथरूण ओले करण्याचे प्रकार

नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा बेड वेटिंगचे दोन प्रकार आहेत -

1. प्राथमिक नॉक्टर्नल एन्युरेसिस (पीएनइ)

अंथरुण ओले करणे ही सर्वात सामान्य समस्या आहे. जन्मल्यापासून ६ महिन्यांपर्यंत लहान मुले अंथरुणात शू करत असतात. हे वारंवार होते आणि त्याचा लहान मुलांवर परिणाम होतो. पुढे जाऊन हे प्राथमिक नॉक्टर्नल एन्युरेसिस मध्ये विभागले जाऊ शकते. प्राथमिक नॉक्टर्नल एन्युरेसिस फक्त रात्री उद्भवते आणि दैनंदिन एन्युरेसिस हे दिवसा उद्भवते. ह्यामध्ये निकड, वारंवारता किंवा दिवसा अंथरूण ओले होणे इत्यादी लक्षणे आढळतात. हा एक विकासात्मक विलंब आहे आणि तो कालानुरूप बरा होऊ शकतो. आहारामुळे मुलांमधील एन्युरेसिसवर परिणाम होऊ शकतो.

2. दुय्यम नॉक्टर्नल एन्युरेसिस (एसएनई)

आधी कमीत कमी ६ महिने कधीही झोपेत लघवी न करणाऱ्या मुलाकडून झोपेत अनैच्छिकपणे लघवी होते. मूत्राशयाच्या संसर्गामुळे असे होऊ शकते.

अंथरुण ओले होण्याची कारणे

नॉक्टर्नल एन्युरेसिसची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1. प्रायमरी बेडवेटिंग

ह्यामध्ये लहान मुलाचे झोपेत मूत्राशयावर नियंत्रण नसते, त्यामागे खालील कारणे असू शकतात.

2. सेकेंडरी बेडवेटिंग

आधी किमान १२ महिने झोपेत शू न केलेल्या मुलाने झोपेत शू केल्यास तो सेकेंडरी बेडवेटिंगचा प्रकार असू शकतो. मुलाच्या वयाच्या वाढीसह त्याचे प्रमाण वाढते. त्यामागे खालील करणे असू शकतात.

नॉक्टर्नल एन्युरेसिस होण्यामागील जोखीम घटक

1. प्रायमरी बेडवेटिंग

प्रायमरी बेडवेटींग हे मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्रत्येक वर्षी १५% मुले ह्या समस्येतून बरी होतात.

2. सेकेंडरी बेडवेटिंग

निदान

ह्या समस्येचे योग्य निदान होण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मूल अंथरूण ओले करणे कधी थांबवते असा विचार जर तुम्ही करत असाल, तर सात वर्षांची सुमारे ९०% मुले स्वतःच अंथरुण ओले करणे थांबवतात. बहुतेक डॉक्टर सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर नियमितपणे उपाय सुचवत नाहीत. झोपेत लघवीला लागली आहे हे मुलांना शिकवणे हा पॉटी प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा असतो. म्हणून, शिकण्याच्या प्रक्रियेत मुले झोपेच्या वेळी अंथरूण ओले करतात.

मुलांच्या अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर उपचार

1. मुलाची वाढ होत असताना त्याने अंथरुणात शू कारणे सामान्य आहे. लहान मुलांच्या ह्या समस्येवर खाली काही उपाय दिलेले आहेत ते तुम्ही वापरून पाहू शकता. 2. मुलांसाठी बेडवेटिंग अलार्म देखील आहेत आणि उपयुक्त ठरू शकतात. 3. मुलांना मूत्राशयाचा व्यायाम (स्नायू बळकट करणे आणि मूत्राशय स्ट्रेचिंग) शिकवल्याने लघवी बाहेर पडण्यावर नियंत्रण ठेवता येते आणि मूत्राशयाची क्षमता वाढू शकते. मुलांनी पेल्विक स्नायूंना सुमारे पाच-दहा सेकंद घट्ट करावे आणि नंतर पाच सेकंद आराम द्यावा. हा व्यायाम दिवसातून तीन वेळा केला पाहिजे. जेव्हा मुलांना लघवीला लागते तेव्हा तुम्ही त्यांना  वॉशरूममध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्यास मुलाला दिवसा अंथरुण ओले करणे टाळण्यास आणि रात्रीच्या वेळी वारंवारिता कमी करण्यास मदत होईल. मूत्राशयाला जास्त प्रमाणात लघवी ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. 4. जर तुमच्या मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुमचे डॉक्टर स्टूल सॉफ्टनरची शिफारस करू शकतात. 5. काहीवेळा, अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर उपचार म्हणून शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. 6. वर्तणुकीशी संबंधित उपचार जेव्हा काम करत नाहीत तेव्हा ह्या समस्येवर उपचार करण्यासाठी खालील औषधे वापरली जातात 7. जेव्हा अंथरुण ओले जाण्याचे कारण मूत्रमार्गात संक्रमण असते तेव्हा तोंडावाटे घेता येतील अशी प्रतिजैविके लिहून दिली जातात, जसे की -

मुलांच्या झोपेत अंथरूण ओले करण्याच्या समस्येसाठी जीवनशैलीतील बदल

झोपेत अंथरुणात शू कारण्याची समस्या कमी करण्यासाठी जीवनशैलीत खालीलप्रमाणे बदल केल्यास त्याची मदत होऊ शकते:

मुलांच्या अंथरूण ओले करण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

खाली काही असे काही सोपे आणि नैसर्गिक उपाय दिलेले आहेत. ह्या घटकांचा मुलाच्या रोजच्या आहारात समावेश केला जाऊ शकतो.
एक चमचा आवळ्याचा गर घेऊन त्यामध्ये चिमूटभर काळी मिरी मिसळूनही बाळाला देऊ शकता. वर नमूद केलेली सर्व औषधे, जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपचार हे नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा अंथरूण ओले करण्याची समस्या कमी करण्यास मदत करण्यासाठी उपयोगी ठरतात.

अंथरुण ओले करण्याच्या समस्येबद्दल काही तथ्ये

अंथरुण ओले करण्याच्या समस्येबद्दल येथे काही तथ्ये आहेत त्याची तुम्हाला मदत होऊ शकते. अंथरूण ओले करणाऱ्या मुलाचे पालक गोंधळलेले आणि निराश होऊ शकतात. म्हणून, आपण आपल्या बालरोगतज्ञांशी या समस्येवर चर्चा करणे आणि आपल्या मुलाला सुद्धा ह्या चर्चेत सामावून घेणे महत्वाचे आहे. आपल्याला कुटुंबाचा पाठिंबा आहे ही भावना मुलामध्ये निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे उपचारांना त्याच्याकडून चांगला प्रतिसाद मिळण्यास मदत होते. आणखी वाचा: लहान मुलांना रात्रीचा घाम येणे मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved