काळजी

लहान मुलांच्या श्वासास दुर्गंधी येणे

प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या चांगल्या आरोयासाठी स्वच्छतेचे महत्व समजते. श्वासाच्या दुर्गंधीमुळे लहान मुलांना लोकांमध्ये मिसळताना विचित्र वाटू शकते. तोंडाला दुर्गंधी येणे हे एखाद्या रोगाचे लक्षण सुद्धा असू शकते. काहीवेळा, त्यामागे काही वैद्यकीय समस्या आहे की अस्वच्छतेमुळे तोंडास दुर्गंधी येते ह्यापैकी अचूक कारण समजणे हे पालकांसाठी आव्हानात्मक असू शकते. हॅलिटोसिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे. ही समस्या असल्यास श्वासास दुर्गंधी येते आणि जीईआरडी (गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज) सारख्या साध्या पचनाच्या समस्यांपासून ते मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या गंभीर समस्यांपर्यंत अनेक वेगवेगळ्या आजारांचे ते लक्षण देखील आहे. मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी या स्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त, हॅलिटोसिसचा भावनिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.  परिणामी तीव्र नैराश्य, चिंता आणि अनेक कॉम्प्लेक्स यासारख्या समस्या उद्भवतात. या संभाव्य धोकादायक समस्येशी लढण्याची पहिली पायरी म्हणजे समस्या नीट समजून घेणे.

व्हिडिओ: मुलांमध्ये श्वासाची दुर्गंधी - कारणे आणि उपाय

https://youtu.be/DxXpeNxSG68

श्वासाची दुर्गंधी (हॅलिटोसिस) म्हणजे काय?

हॅलिटोसिस म्हणजे श्वासास दुर्गंधी येणे हे खूप सामान्य आहे. एखाद्या मूळ कारणामुळे श्वासास सतत दुर्गंधी येते. सामान्यतः तुमच्या मुलाच्या तोंडात असलेल्या जिवाणूंमुळे श्वासास दुर्गंधी येते. दातांची नीट स्वच्छता न राखणे, खाण्याच्या अयोग्य सवयी किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे असे होऊ शकते. लहान मुलांना प्रौढांपेक्षा जास्त श्वासाची दुर्गंधी येत असल्याने त्यास अनेकदा हॅलिटोसिस समजले जाते. श्वासाची दुर्गंधी असणा-या मुलास समाजात वावरताना विचित्र वाटू शकते आणि म्हणूनच, त्याच्या दातांची योग्य काळजी कशी घ्यावी हे जाणून घेतले पाहिजे.

श्वासाच्या दुर्गंधीची कारणे काय आहेत?

लहान मुलांमधील श्वासाच्या दुर्गंधीची सर्वात सामान्य कारणे येथे आहेत:

लहान मुलांमध्ये श्वासाची दुर्गंधी निर्माण करणारी वैद्यकीय परिस्थिती

काहीवेळा जर कुठली वैद्यकीय समस्या असेल तरी सुद्धा श्वासास दुर्गंधी येऊ शकते आणि त्याचा तुमच्या मुलाला त्रास होऊ शकतो. यात खालील गोष्टींचा समावेश होतो: जर दीर्घकाळ तोंडाला दुर्गंधी येत असेल तर त्यावर वैद्यकीय सल्ला घेणे आहे. जितक्या लवकर तुमच्या मुलाला वैद्यकीय मदत मिळेल तितक्या लवकर ही समस्या दूर होईल.

तोंडाला दुर्गंधी येण्याची (हॅलिटोसिस) सामान्य चिन्हे

दात, जीभ आणि तोंडाची चांगली स्वच्छता राखून सुद्धा श्वासास दुर्गंधी येत असेल तर त्यामागे वेगळे कारण देखील असू शकते. सारख्या इतर परिस्थितींकडे लक्ष द्या.

मुलांच्या श्वासास तीव्र दुर्गंधी येणे म्हणजे काय?

मुलांमध्ये श्वासाची तीव्र दुर्गंधी येणे किंवा हॅलिटोसिस हे विविध रोगांचे लक्षण आहे. कान, नाक किंवा घसा इत्यादींच्या समस्येमुळे असे होऊ शकते. श्वासास तीव्र दुर्गंधी येणे ह्यास आवर्ती दुर्गंधी (म्हणजेच पुनःपुन्हा श्वासास दुर्गंधी येणे) असेही म्हणतात. दुर्गंधीमुळे मुलाच्या सामाजिक वर्तनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.परंतु,  आपल्या मुलाशी बोलणे आणि तोंडाची स्वच्छता नीट राखण्यास प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे.

निदान

मुलांमधील श्वासाच्या दुर्गंधीच्या समस्येचे योग्य निदान करण्यासाठी डोके आणि मानेची तपासणी तसेच तोंड व दातांची तपासणी केली जाते. तुमचे डॉक्टर श्वासातील कोणतेही सल्फाइड वायू शोधण्यासाठी हॅलिमीटर नावाचे उपकरण वापरू शकतात. जवळजवळ ९० टक्के प्रकरणांमध्ये, तोंडाची दुर्गंधी किंवा हॅलिटोसिस तोंडाची नीट स्वच्छता न राखल्यामुळे उद्भवते. तोंडाची स्वच्छता नीट न राखल्यास दातांमध्ये पोकळी आणि इतर दंत समस्या सुद्धा उद्भवतात.

वैद्यकीय उपचार

श्वासाची दुर्गंधी येण्याची कारणे वेगवेगळी असल्याने, ह्या आजाराचे उपचार कारणावर अवलंबून असतात.

मुलांच्या श्वासाच्या दुर्गंधीवर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय

तुमच्या मुलामध्ये असलेली श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू  शकता. येथे काही उपाय दिलेले आहेत:
डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांसोबत हे घरगुती उपचार करणे गरजेचे आहे. हे उपाय करत असताना तुमच्या मुलाने तोंडाची चांगली स्वच्छता राखली आहे ह्याकडे सुद्धा लक्ष द्या.

तुमच्या मुलामध्ये आढळणारी श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी काही टिप्स

  बहुतेकवेळा तोंडाची स्वच्छता नीट न राखल्यामुळे मुलांमध्ये श्वासाच्या दुर्गंधीची समस्या उद्भवते, आपण आपल्या मुलास त्याच्या दातांची चांगली काळजी कशी घ्यावी हे शिकवले पाहिजे. मौखिक आरोग्य राखण्याच्या बाबतीत मुले सहसा गोंधळलेली असतात. त्याबद्दल त्यांच्याशी बोला आणि तोंडाच्या स्वच्छतेचे महत्व त्यांना समजावून सांगा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. ब्रश केल्यानंतरही माझ्या मुलाच्या श्वासास दुर्गंधी येते. असे का?

बहुतेक मुलांना प्रभावीपणे दात कसे घासायचे हे माहित नसते. त्यांनी कमीतकमी २ मिनिटे ब्रश करणे आणि तोंडाच्या सर्व भागांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जीभ साफ न केल्याने श्वासास दुर्गंधी येऊ शकते.

२. प्रौढांपेक्षा लहान मुलांना श्वासाच्या दुर्गंधीचा जास्त त्रास का होतो?

मुले प्रौढांपेक्षा जास्त वेळ झोपतात. यामुळे तोंडातील जिवाणू जास्त काळ तयार होऊ शकतात. मुले जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ देखील खातात. ह्या दोन्ही घटकांचा एकत्रितपणे परिणाम होऊन श्वासास दुर्गंधी येऊ शकते.

३. मुलांमधील शवसाच्या दुर्गंधीचा मधुमेहाशी संबंध आहे का?

हे नेहमीच खरे नसते. होय, हॅलिटोसिसचा संबंध मधुमेहाशी जोडला गेला आहे,  अचूक निदानासाठी योग्य वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक आहे. दात आणि तोंडाची स्वच्छता प्रत्येकासाठी खूप महत्वाची आहे. विशेषतः आपल्या वाढत्या मुलासाठी ती अधिक महत्वाची आहे. मौखिक आरोग्य राखण्यासाठी चांगली दिनचर्या असणे महत्वाचे आहे. तुमच्या मुलास चांगल्या दातांच्या डॉक्टरांना दाखवा. ते तुमच्या मुलास दातांची स्वच्छता कशी राखावी हे सांगतील. त्यानंतर तुम्ही त्याला त्याच्या नित्यक्रमानुसार घरी मदत करू शकता. बहुतेक वेळा, तोंडाची स्वच्छता नीट न राखल्यामुळे मुलांमध्ये श्वासाच्या दुर्गंधीची समस्या उद्भवते. आणखी वाचा: मुलांच्या डोक्यातील उवांसाठी घरगुती उपाय लहान मुलांच्या दातांसाठी ब्रेसेस – प्रकार, काळजीविषयक टिप्स आणि किंमत
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved