आरोग्य

लहान मुलांमध्ये आढळणारा टाईप वन (ज्युवेनाईल) मधुमेह

आजकाल मधुमेह हा एक अतिशय सामान्य आजार आहे परंतु जेव्हा एखाद्या मुलास टाइप 1 मधुमेहाचे निदान होते तेव्हा पालकांचे संपूर्ण जग कोलमडते आणि ते खालील प्रश्नांची उत्तरे शोधतात: डायबेटीस मेलीटस हा सहसा "मधुमेह" म्हणून ओळखला जातो - ही वैद्यकीय समस्या असल्यास शरीरातील साखरेची पातळी वाढलेली असते. मधुमेहाचे प्रकार खालीलप्रमाणे असतात.

टाइप 1 मधुमेह म्हणजे काय?

आपल्या शरीरातील साखरेची पातळी स्वादुपिंडाद्वारे नियंत्रित केली जाते, ज्याचा मुख्य उद्देश इन्सुलिन स्राव करणे हा आहे. इन्सुलिन हे संप्रेरक ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करते. ग्लुकोज आपल्या दैनंदिन क्रियाकलापांसाठी ऊर्जा निर्माण करते परंतु अतिरिक्त ग्लुकोजमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात आणि त्याला मधुमेह असे म्हणतात. स्वादुपिंडाद्वारे कमी प्रमाणात इंश्युलीन तयार होत असेल तर टाईप १ मधुमेह होतो. इन्सुलिन जर तयार होत नसेल तर शरीर साखर (आपल्या अन्नातील) खंडित करू शकत नाही आणि साखर रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी इष्टतम पातळीपेक्षा वर जाते, आणि धोका निर्माण होतो. कधी कधी जन्मानंतर बाळांमध्ये ही स्थिती आढळते. ह्या आरोग्याच्या समस्येस स्वयंप्रतिकार रोग म्हणून देखील वर्गीकृत केले गेलेले आहे कारण ह्यामध्ये आपल्या शरीराची संरक्षण यंत्रणा निरोगी पेशी नष्ट करत असते. वेळीच योग्य काळजी आणि वैद्यकीय मदत घेतली नाही तर ही समस्या  दीर्घ कालावधीसाठी एक गंभीर समस्या बनू शकते आणि इतर अवयवांना देखील नुकसान पोहोचवू शकते. या प्रकारच्या मधुमेहाला “लहान मुलांमध्ये होणारा जुवेनाईल डायबिटीज”, “लहान मुलांना होणारा इन्शुलिन डिपेंडन्ट डायबिटीज मेलिटस”, “लहान मुलांमध्ये आढळणारा ब्रिटल डायबिटीज ” आणि “लहान मुलांना होणारा साखरेचा मधुमेह” असेही संबोधले जाते.

टाइप 1 मधुमेहाची कारणे काय आहेत?

संशोधकांनी मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या या स्थितीची काही कारणे ओळखली आहेत. हे बहुधा व्हायरल इन्फेक्शन असू शकते, आणि शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीशी तडजोड करते किंवा ह्यामागे आनुवंशिक कारणे देखील असू शकतात. परंतु, या स्थितीमागचे नेमके कारण अद्याप माहिती नाही. इंसुलिन वाहून नेणाऱ्या विशेष बीटा पेशी (स्वादुपिंडात निर्माण झालेल्या) प्रतिपिंडांमुळे नष्ट होतात हे त्यामागचे एकमेव ज्ञात कारण आहे. खरं तर , या पेशींनी केवळ अस्वास्थ्यकर/विदेशी पेशी नष्ट केल्या पाहिजेत.

लक्षणे काय आहेत?

सावध राहून मुलांमध्ये खालील लक्षणे आढळतात का ह्याकडे लक्ष द्या

मुलांमध्ये टाइप 1 मधुमेहाचे निदान कसे केले जाते?

वारंवार लघवीला जाणे, जास्त पाणी आणि जास्त खाण्याची तीव्र इच्छा इत्यादी लक्षणे आढळतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की ही लक्षणे सातत्याने आढळत आहे तर वैद्यकीय सल्ला घेणे जरुरीचे आहे. निदानाची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर रक्त चाचण्या आणि मूत्र चाचण्या सुचवतील. तुम्ही घरी ग्लुकोज मीटर वापरू नका असा सल्ला दिला जातो कारण त्यावर रिडींग चुकीचे येऊ शकते. तसेच, HbA1c चाचणी घेणे चांगले आहे, त्यामध्ये मागील 3 महिन्यांची सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवली जाते. साखरेच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टरांकडे नियमित जाणे आवश्यक आहे

प्रकार 1 मधुमेह होण्यामागील जोखीम घटक कोणते आहेत?

संशोधन डेटा आम्हाला दर्शवितो की टाइप 1 मधुमेहाचे सर्वात संभाव्य जोखीम घटक खालीलपणाने आहेत:

१. अनुवांशिक पूर्वस्थिती

जर जीन मार्कर टाइप 1 मधुमेहाशी जोडलेले असेल, तर तुम्हाला टाइप 1 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. क्रोमोसोम 6 हे मार्कर आहे आणि ते टाइप 1 मधुमेहाशी जोडलेले आहे. एचएलए (ह्युमन ल्युकोसाइट अँटीजेन) कॉम्प्लेक्स या प्रकारच्या मधुमेहाशी जोडलेले आढळतात आणि जर हे कॉम्प्लेक्स अनेक स्रोतांपासून तयार होत असेल तर तुम्हाला टाइप 1 मधुमेहाचा धोका वाढतो.

२. विषाणू संसर्ग

जर्मन गोवर, कॉक्ससॅकी आणि गालगुंड यांसारखे विषाणू, टाइप 1 मधुमेहाला चालना देतात. हे विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात आणि शरीराला स्वतःच्या विरोधात लढायला लावतात आणि त्यामुळे स्वयंप्रतिकारक रोग होऊ शकतात.

३. आनुवंशिकता घटक

कौटुंबिक इतिहास खूप महत्वाची भूमिका बजावतो. जर दोन्ही पालकांना टाइप 1 मधुमेह असेल, तर त्यांच्या मुलास हा मधुमेह होण्याची अधिक शक्यता असते. शिवाय, असे आढळून आले आहे की आई किंवा इतर भावंडांच्या तुलनेत, वडिलांना जर टाइप 1 मधुमेह असेक तर मुलांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

४. भौगोलिक स्थाने

आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. उबदार देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना टाइप 1 मधुमेह होण्याचा धोका कमी असतो कारण विषाणूजन्य संसर्गाची शक्यता कमी असते. उबदार देशांपेक्षा थंड देशांमध्ये टाइप 1 मधुमेहाची प्रकरणे जास्त आहेत.

५. इतर स्वयंप्रतिकार रोग

काही स्वयंप्रतिकार रोग जसे की ग्रेव्हस रोग आणि मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये टाइप 1 मधुमेह सह-अस्तित्वात असण्याचा धोका वाढतो कारण त्यांच्यामध्ये समान जीन मार्कर एचएलए आहे  आणि त्याचा परिमाण होतो.

लहान मुलांमध्ये टाइप 1 मधुमेहाची गुंतागुंत

टाइप 1 मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. त्याचे बारकाईने निरीक्षण आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. योग्यरित्या व्यवस्थापित न केल्यास, त्यामुळे गुंतागुत निर्माण होऊ शकते. हा आजार लहान मुलांमध्ये कधी अल्पकालीन तर कधी दीर्घकाळासाठी राहू शकतो.

अल्पकालीन गुंतागुंत

खालील काही अल्पकालीन समस्या आहेत. १. हायपोग्लाइसेमिया टाइप 1 मधुमेह हा इंसुलिनवर अवलंबून असलेला मधुमेह आहे. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक जेवणापूर्वी नियमित इन्सुलिन इंजेक्शन्स घेणे आवश्यक आहे. जर इंसुलिनचा डोस जास्त दिला गेला तर ती व्यक्ती हायपोग्लाइसेमिक अवस्थेत जाते, याचा अर्थ शरीरात साखर/ग्लुकोज खूप कमी असते. या स्थितीमुळे रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो आणि त्वरित उपचार न केल्यास ती व्यक्ती कोमात जाऊ शकते. हायपोग्लाइसेमियाची खालील काही लक्षणे आहेत: ह्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर लहान मुलांना इन्शुलिन देऊ नये. अशा वेळी मुलाला रुग्णालयात न्यावे. हायपोग्लाइसेमिया ३ टप्प्यात होऊ शकतो: सौम्य, मध्यम आणि गंभीर. शरीराच्या इतर अवयवांना जास्त नुकसान न होता सौम्य आणि मध्यम अवस्थांवर सहज उपचार करता येतात. गंभीर हायपोग्लाइसेमियामध्ये, इतर अवयवांना झालेली हानी पूर्ववत करता येत नाही. रक्तातील ग्लुकोजच्या वरच्या आणि खालच्या मर्यादा प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न असतात, काही मुले ६०-७० च्या ग्लुकोज रीडिंगसह अगदी ठीक असू शकतात परंतु काही मुले हायपोग्लाइसेमिक होऊ शकतात. आपल्या मुलाची ग्लुकोजची पातळी जाणून घेणे गरजेचे असते तसेच अशा घटनांसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला जातो. साखरयुक्त पेये, ग्लुकोजच्या गोळ्या आणि शरीरात झटपट साखर सोडणाऱ्या खाण्यायोग्य पदार्थांचा साठा करण्यास सांगितला जातो. जेव्हा गरज असेल तेव्हा तुमच्या मुलाच्या शरीराला साखर मिळण्यासाठी डॉक्टर गोळ्या लिहून देतील. रात्री जेव्हा मूल झोपते तेव्हा त्याच्या साखरेच्या पातळीत चढ-उतार होतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणापूर्वी तुम्ही त्याला इन्सुलिनचा योग्य डोस देणे महत्त्वाचे आहे. या स्थितीला इंग्रजीमध्ये 'नाईटटाइम हायपोग्लाइसेमिया' असे म्हणतात. २. डायबेटिक केटोआसिडोसिस (डीकेए) जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता असते तेव्हा शरीरातील ग्लुकोजची कमतरता भरून काढण्यासाठी शरीर चरबी जाळून टाकते. जेव्हा शरीरातील चरबीचे विघटन होते तेव्हा केटोन्स तयार होतात. शरीरात जास्त प्रमाणात केटोन्स तयार झाल्यास रक्त अम्लीय होऊ शकते आणि त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. डीकेएची चिन्हे आणि लक्षणे ह्यामध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो. तुमच्या मुलाला केटोअसिडोसिस आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी घरच्या घरी चाचण्या केल्या जाऊ शकतात अशाच काही सोप्या चाचण्या इथे दिलेल्या आहेत. घरातील ग्लुकोज मीटर वापरून मुलाची ग्लुकोजची पातळी तपासा. जर मूल्य २५० मिग्रॅ /डीएल पेक्षा जास्त असेल, तर मुलाला डीकेए असण्याची शक्यता आहे. फार्मेसमध्ये केटोन स्ट्रिप्स उपलब्ध आहेत, याचा उपयोग मुलाच्या लघवीतील केटोन्स तपासण्यासाठी केला जातो. जर ही पट्टी गडद जांभळ्या रंगाची झाली, तर मुलामध्ये खूप जास्त केटोन्स आहेत असे सूचित होते  आणि कदाचित त्याला डीकेए असण्याची शक्यता असते. मुलाला डीकेए असल्याची खात्री झाल्यानंतर, उपचारासाठी ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. डीकेए ही गंभीर स्थिती आहे आणि उशीर न करता त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.

दीर्घकालीन आरोग्यविषयक गुंतागुंत

काही कालावधीत साखरेचे प्रमाण योग्यरित्या नियंत्रित केले नाही तर गंभीर दीर्घकालीन गुंतागुंत होऊ शकते. १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ साखरेची पातळी नियंत्रित न राहिल्यास अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. रक्तवाहिन्यांनावर परिणाम होतो. लहान रक्तवाहिन्यांना झालेले नुकसान हे 'मायक्रोव्हस्कुलर कॉम्प्लिकेशन' म्हणून ओळखले जाते. मोठ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान 'मॅक्रोव्हस्क्युलर कॉम्प्लिकेशन'  म्हणून ओळखले जाते. 1. मायक्रोव्हस्कुलर कॉम्प्लिकेशन रक्तवाहिन्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त वाहून नेतात. जेव्हा ह्या रक्तवाहिन्या खराब होतात तेव्हा त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवर होतो उदा: डोळे, मूत्रपिंड आणि यकृत इत्यादी. कालांतराने, नसा देखील खराब होतात आणि या स्थितीला ‘डायबेटिक न्यूरोपॅथी’ म्हणतात. मायक्रोव्हस्कुलर कॉम्प्लिकेशन्स असलेल्या रुग्णांच्या सर्वात सामान्यपणे आढळणाऱ्या तक्रारी खाली दिलेल्या आहेत 2. मॅक्रोव्हस्कुलर कॉम्प्लिकेशन्स जेव्हा मोठ्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो तेव्हा त्याचे रूपांतर हृदयाच्या गंभीर आजारांमध्ये  होते. मोठ्या रक्तवाहिन्यांना झालेल्या नुकसानीमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होतो आणि त्यामुळे  हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने साखरेच्या पातळीचे व्यवस्थापन करावे तसेच या गुंतागुंतीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आणि हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी निरोगी आहाराचे पालन करावे.

उपचार

टाइप 1 मधुमेहावरील उपचार ही एक सतत चालू असलेली प्रक्रिया आहे. हा आयुष्यभराचा आजार आहे आणि त्यामुळे संयम आणि चिकाटी असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा आजार व्यवस्थापित करणे कठीण आहे असे वाटू शकते. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला मदत करण्यासाठी डॉक्टरांची एक चांगली टीम, एक बालरोगतज्ञ, एक आहारतज्ञ आणि एक मधुमेह तज्ञ आवश्यक आहेत.

१. रक्तातील साखरेचे निरीक्षण किंवा कॅन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम)

टाईप १ मधुमेहाची काही गुंतागुंत गंभीर आणि जीवघेणी असल्याने,  धोक्याच्या सूचनांची वाट न पाहता सतत साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी हवे आहे. रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी त्वचेखाली बारीक सुई घालून सीजीएम केले जाते. हे फक्त नियमित ग्लुकोज निरीक्षण पद्धतींना पूरक असे साधन आहे आणि ते फारसे अचूक  नसते.

२. इन्सुलिन थेरपी

टाइप १ मधुमेहाच्या उपचारात इन्सुलिन प्रशासन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलाच्या गरजेनुसार डॉक्टर इन्सुलिनचे मिश्रण देऊ शकतात
खालील विविध प्रकारचे इन्सुलिन उपलब्ध आहेतः

३. इन्सुलिन वितरणासाठी पर्याय

आवश्यकतेनुसार एखाद्या व्यक्तीला इन्सुलिन देण्याचे विविध मार्ग आहेत:

४. इतर औषधे

जेव्हा मूल आजारी असते, तेव्हा कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी प्रमाणात करते आणि त्यांना इन्सुलिनच्या कमी डोसची आवश्यकता असू शकते. आजारपणात ही संप्रेरके मुलामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढवतात आणि त्यामुळे इतर औषधांसोबत इन्सुलिन घेण्यापूर्वी साखरेच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

५. निरोगी खाणे

मधुमेहाचा आहार कंटाळवाणा असतो आणि ह्या आहाराचे पालन लहान मुलांना करायला लावणे कठीण असते. मुलांवर कठोर आहाराची अंमलबजावणी करण्यासाठी पालकांना खूप त्रास होतो परंतु आहारतज्ञ तुमच्या मुलासाठी निरोगी आणि चवदार जेवणाचे पर्याय सुचवून तुमचे काम खूप सोपे करू शकतात. टाइप 1 मधुमेह असलेल्या मुलास पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. ह्या आहारामध्ये फळे, भाज्या, धान्ये आणि उच्च फायबर इत्यादींचा समावेश असतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे कार्बोहायड्रेट आणि चरबीचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. डॉक्टरांच्या परवानगीने अधूनमधून साखर आणि मिठाईचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

६. शारीरिक क्रियाकलाप

तुमच्या मुलाला खेळण्यापासून किंवा इतर कोणताही शारीरिक व्यायाम करण्यापासून दूर करू नका. फक्त खेळादरम्यान किंवा नंतर रक्तातील साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे कारण व्यायामामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. आपण त्यानुसार इन्सुलिनचा डोस समायोजित करणे आवश्यक आहे. मुलाच्या जीवनशैलीत नियमित व्यायामाचा समावेश करणे ही एक चांगली सवय आहे.

७. भावनिक आरोग्य

टाईप १ मधुमेह हा एक सततचा आजार आहे आणि त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो. त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळे वाटते कारण त्यांना योग्य आहार घ्यावा लागतो  आणि नियमितपणे इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. तुमच्या मुलाचा समावेश एखाद्या सपोर्ट ग्रुप मध्ये करणे चांगले कारण ते टाइप 1 मधुमेह असलेल्या इतर मुलांना तो भेटू शकेल. चिडचिड होणे हे साखर कमी झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे जेव्हा तुमचे मूल वाईट वागते तेव्हा कदाचित त्याला साखरेची गरज असते हे समजून घेणे आवश्यक असते. काही मुले उदासीनतेची लक्षणे देखील दर्शवतात. जर तुमच्या मुलाचा वारंवार मूड बदलत असेल आणि एकटे राहत असेल तर मुलाच्या मानसिक संघर्षावर काम करण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या मधुमेही सल्लागाराची भेट घ्यावी लागेल. घरातील सामान्य जीवनशैली बदलल्यास मुलाला सकारात्मक राहण्यास आणि उदासीनता कमी होण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या मुलांना शिक्षित करा जेणेकरून ते कमी ताणतणावांसह त्यांच्या मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास तयार होतील.

टाइप 1 मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि उपकरणे

रुग्णांचे जीवन सुलभ करण्यासाठी बऱ्याच फार्मास्युटिकल कंपन्यांनी उपकरणे विकसित केली आहेत (तंत्रज्ञान देखील). काही उपकरणे, कदाचित त्यांच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असतील:

टाइप 1 मधुमेह असलेल्या मुलास कशी मदत करावी?

टाईप 1 मधुमेहाचे व्यवस्थापन करणे कठीण असू शकते परंतु तुम्ही तुमच्या मुलाला स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवणे आवश्यक आहे. मुलाशी बोलणे आणि त्यांना त्यांची चिंता व्यक्त करण्याची परवानगी दिल्याने काही मानसिक अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते. खालील टिप्स मुलास मदत करू शकतात

लहान मुलांमध्ये आढळणारा टाइप 1 मधुमेह टाळता येऊ शकतो का?

टाइप 1 मधुमेहासाठी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय नाहीत. याला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी जीवनशैली आणि टाइप 1 मधुमेहाशी संबंधित अनुवांशिक मार्करची चाचणी करणे.

मुलांमध्ये मधुमेहाचे इतर प्रकार कोणते आहेत?

मधुमेहाचे इतर प्रकार देखील आहेत, जसे की:

1. मुलांमध्ये आढळणारा टाइप 2 मधुमेह

टाईप 2 मधुमेहामध्ये शरीरात तयार होणारे इन्सुलिन शरीर वापरण्यास असमर्थ असते. आहाराचे नियमन करून आणि सक्रिय राहून ही स्थिती सहजपणे नियंत्रित केली जाऊ शकते. खूप कमी वेळा, मुलांना इन्सुलिन इंजेक्शनची आवश्यकता असू शकते.

2. मुलांमध्ये आढळणारा गेस्टेशनल मधुमेह

गेस्टेशनल मधुमेह असलेल्या मातांच्या पोटी जन्मलेल्या बाळांना नंतरच्या आयुष्यात गेस्टेशनल मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. जेव्हा अशा प्रकारचा मधुमेह आईमध्ये उपचार न तसाच राहतो, तेव्हा मुलाची चयापचय क्रिया सुद्धा बदलते. त्यांना मधुमेह किंवा लठ्ठपणा होण्याचा धोका जास्त असतो. ही एक उपचार करण्यायोग्य स्थिती आहे आणि एखादे चांगले  डॉक्टर लक्षणे लवकर ओळखतात आणि त्यावर उपचार करतात.

तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून कधी मदत घ्यावी?

शंका असल्यास, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे, विशेषतः  जर तुमच्या मुलाला मधुमेह होण्याची चिंता आणि भीती तुम्हाला गोंधळून टाकू शकते. परंतु, योग्य काळजी आणि ज्ञानाने, ही समस्या योग्य प्रकारे व्यवस्थापित केली जाऊ शकते आणखी वाचा: मुलांना होणाऱ्या डोकेदुखीचा सामना कसा करावा मुलांमधील कुपोषण: कारणे, लक्षणे आणि उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved