Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांमधील कुपोषण: कारणे, लक्षणे आणि उपचार

मुलांमधील कुपोषण: कारणे, लक्षणे आणि उपचार

मुलांमधील कुपोषण: कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळाच्या वाढीसाठी चांगले पोषण महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पोषक आहार महत्वाचा असतो परंतु गर्भधारणा झाल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यत पोषणमूल्यांनी समृद्ध आहाराला खूप महत्व असते. कारण गर्भधारणा झाल्यापासून, जन्मानंतरची सुरुवातीची वर्षे बाळाच्या मेंदूच्या आणि इतर महत्वाच्या अवयवांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मुलाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. हा आहार जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, चरबी आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या पोषक घटकांनी समृद्ध असला पाहिजे. ह्या लेखामध्ये मुलांमधील कुपोषण, त्याची कारणे, चिन्हे, परिणाम तसेच हे कुपोषण पालक कसे रोखू शकतात आणि त्यास कसे सामोरे जाऊ शकतात ह्याची माहिती दिलेली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

कुपोषण म्हणजे काय?

जेव्हा मुलांना महत्वाच्या अवयवांच्या विकासासाठी आवश्यक ते पोषण, खनिजे आणि कॅलरीज मिळत नाहीत तेव्हा त्यास कुपोषण असे म्हणतात. आपल्या मुलास रोगमुक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठी पोषक घटक महत्वाचे आहेत. पुरेशा पोषणाच्या अभावामुळे मुलांना शारीरिक आणि वर्तन विषयक असे दोन्ही प्रकारचे विकार होऊ शकतात. कुपोषण आणि उपासमार जरी एकमेकांशी संबंधित असले तरीसुद्धा ते एक सारखे नाहीत. पोट रिकामे असताना भूक लागते, तर कुपोषण म्हणजे पुरेशा पोषक घटकांचा अभाव असणे होय. पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे मुले कुपोषणाला बळी पडू शकतात. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते आणि दीर्घ आजार होतात.

मुलांमधील कुपोषणाचे प्रकार

कुपोषण हे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे कारण आहे. दरवर्षी खूप मुले कुपोषित राहतात. कुपोषणाचे परिणाम विनाशकारी, दूरगामी असू शकतात. मुलांची वाढ खुंटणे, मानसिक मंदपणा, पचनमार्गाचा संसर्ग, अशक्तपणा आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कुपोषण केवळ पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होत नाहीत तर त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे सुद्धा कुपोषण होते आणि म्हणूनच मुलांचे पोषण नीट होण्यासाठी निरोगी संतुलित आहार घेणे फार महत्वाचे आहे

कुपोषणाचे प्रकार

आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांच्या अपुऱ्या सेवनाने कुपोषण होते. कुपोषणाचे चार प्रकार आहेत.

. कमी वजन

मुलांचे वजन उंचीनुसार वाढत नाही आणि मुलाचे वजन कमी राहते. अशा प्रकारच्या कुपोषणास इंग्रजीमध्ये ग्रोथ फेल्युअर मालनुट्रिशन असे म्हणतात. बाळाचे पोषण, आहाराद्वारे सुधारल्यास ही कमतरता सुधारता येते, परंतु उंचीमधील कमतरता दूर करणे कठीण आहे.

. वाढ आणि विकास नीट न होणे (स्टंटिंग)

दीर्घकालीन कुपोषण म्हणूनही ओळखले जाते, गरोदरपणात आईचे आरोग्य चांगले नसल्यामुळे मुलामध्ये स्टंटिंगची स्थिती जन्मापूर्वी सुरू होते. ह्या स्थितीमध्ये मुलाची असामान्य आणि असमान वाढ होते. स्टंटिंग च्या समस्येचे दीर्घकालीन परिणाम होतात. बाळाची वाढ नीट न होण्यामागील मुख्य कारणे म्हणजे स्तनपान नीट नसणे , शरीराला पोषक तत्वांचा अपुरा पुरवठा आणि सतत होणारा संसर्ग ही आहेत. स्टंटिंग धोकादायक आहे कारण विशिष्ट वयानंतर त्यामध्ये बदल होत नाहीत. म्हणूनच, गर्भवती स्त्रियांनी गरोदरपणात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आणि जन्मानंतर बाळाची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

. सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता

कुपोषण म्हणजे शरीरामध्ये ए, बी, सी आणि डी सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी असणे होय. तसेच शरीरामध्ये कॅल्शिअम, आयोडीन, जस्त आणि सेलेनियम ह्या सूक्ष्म घटकांची कमतरता होते. शरीरात दीर्घकाळ पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे सूक्ष्म पोषक घटक कमी असतात. यापैकी प्रत्येक पोषक घटक हा शरीरातील महत्वाच्या अवयवांच्या विकास आणि कार्यामध्ये मदत करतो. ह्या घटकांची कमतरता झाल्यास अवयवांची वाढ नीट न होणे, अशक्तपणा, मेंदूचा विकास नीट न होणे, थायरॉईडचे कार्य बिघडणे, मुडदूस, कमकुवत प्रतिकारशक्ती, मज्जातंतूचा ऱ्हास, दृष्टी नीट नसणे आणि हाडांचा विकास नीट न होणे इत्यादी समस्या आढळतात.

. तीव्र कुपोषण

तीव्र कुपोषण ही अचानक आणि तीव्र वजन कमी होण्याची परिस्थिती आहे. तीन प्रकारचे कुपोषण होते:

. क्वाशिओर्कर: या अवस्थेत, पोषण नसलेले मूल भोपळ्यासारखे दिसते कारण पाय आणि पावलांमध्ये द्रव धारण करून ठेवलेले असते

. मॅरास्मस: शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी शरीरातील चरबी आणि उतींचा तीव्र ऱ्हास झाल्यामुळे या प्रकारचे कुपोषण होते. यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणेची क्रिया आणि शरीरातील अंतर्गत प्रक्रिया मंद होतात.

. म्येरस्मिक क्वाशिओर्कर: हे मॅरास्मस आणि क्वाशिओर्कर दोन्हीचे मिश्रण आहे. ह्यामध्ये सूज आढळते.

म्येरस्मिक क्वाशिओर्कर

कुपोषित बाळाचे योग्य निदान आणि कुपोषणाच्या समस्येवर आवश्यक उपाययोजना करणे महत्वाचे आहे. त्यामुळे कुपोषणाचे दीर्घकालीन आणि प्रतिकूल परिणाम टाळण्यास मदत होते.

मुलांमध्ये कुपोषणाची कारणे

अत्यावश्यक पोषक घटकांच्या कमतरतेमुळे किंवा त्याचा जास्त वापर केल्याने कुपोषण होऊ शकते. शरीरात पोषक घटकांची योग्य पातळी राखण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. खालील कारणांमुळे तुमच्या मुलामध्ये कुपोषण होऊ शकते.

  • आहार योग्य नसणे: पुरेसे अन्न सेवन न केल्याने आवश्यक पोषक घटकांची कमतरता होते, परिणामी मुलाचे कुपोषण होऊ शकते. ज्या आहारामध्ये पचनास कठीण आणि हानिकारक अन्नपदार्थांचा समावेश असतो अश्या आहारामुळे भूक मारली जाते आणि त्यामुळे कुपोषण होते.
  • अनियमित आहार: योग्य वेळी आणि नियमित अंतराने अन्न न घेतल्याने अपचन आणि कुपोषण होऊ शकते.
  • पचनाचे विकार: काही मुलांना पचनाचे विकार असू शकतात उदा: क्रोहोन डिसीज. हि समस्या असल्यास, निरोगी अन्न खाल्ले तरीही शरीराची पोषकद्रव्ये शोषण्याची क्षमता मर्यादित असते.
  • स्तनपानाचा अभाव: नवजात बाळाला स्तनपान देणे खूप महत्वाचे आहे कारण आईचे दूध बाळाला महत्वाचे पोषक घटक पुरवते. हे पोषक घटक मुलाच्या विकासासाठी महत्वाचे असतात. स्तनपानाच्या अभावामुळे बाळाचे कुपोषण होऊ शकते.
  • रोग: शारीरिक आजार असलेली मुले कुपोषणास बळी पडतात. त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते आणि त्यांच्या खाण्याच्या सवयीवर लक्ष ठेवणे सुद्धा गरजेचे असते.
  • शारीरिक हालचालींचा अभाव: पुरेशी शारीरिक हालचाल नसल्यास पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे सुद्धा कुपोषणाची समस्या उद्भवते.

पाच वर्षांखालील मुलांमध्ये कुपोषणाची इतर कारणे म्हणजे अकाली जन्म, खूप जास्त प्रमाणात उलट्या होणे किंवा अतिसार,जन्मतः हृदयामध्ये दोष आढळणे आणि इतर दीर्घकालीन आजारांचा समावेश होतो.

मुलांमधील कुपोषणाची चिन्हे आणि लक्षणे

लहान बाळे आणि मुलांमध्ये कुपोषणाची चिन्हे आणि लक्षणे मुलाच्या पोषणातील कमतरतेवर अवलंबून असतात. कुपोषणाची काही चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे

  • थकवा
  • चिडचिड
  • कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे संसर्गाची शक्यता वाढते
  • कोरडी आणि खवले असलेली त्वचा
  • वाढ खुंटणे
  • फुगलेले पोट
  • जखमा, संसर्ग आणि आजारातून बरे होण्यास बराच वेळ लागणे
  • स्नायूंचे प्रमाण कमी होणे
  • वर्तन आणि बौद्धिक विकास मंदावणे
  • मानसिक कार्यामध्ये बिघाड आणि पचनाच्या समस्या

मुलांमधील कुपोषणाचे निदान

जीवघेणा परिणाम टाळण्यासाठी कुपोषणाचे वेळेवर निदान करणे फार महत्वाचे आहे. कुपोषण युनिव्हर्सल स्क्रीनिंग टूल, हे साधन एखाद्या व्यक्तीला कुपोषणाचा धोका आहे की नाही हे ओळखण्यासाठी आणि वृद्ध व्यक्तींमधील कुपोषणाचे निदान करण्यासाठी मदत करते. मुलांच्या बाबतीत, डॉक्टर त्यांची उंची आणि वजन तपासतात आणि त्याच वयोगटातील मुलांच्या आदर्श वजन आणि उंचीशी तुलना करतात.

मुले कुपोषित आहेत की नाही हे बघण्यासाठी प्रक्रिया

  • दंडाच्या व्यासाचे मापन: जर मुलाच्या हाताच्या वरच्या भागाचा हाताचा घेर ११० मिमी पेक्षा कमी असेल तर ते तुमच्या मुलामध्ये कुपोषणाचे स्पष्ट संकेत आहे
  • रक्ताच्या चाचण्या: रक्ताच्या विशिष्ट चाचण्या, जसे की रक्तपेशींची संख्या, रक्तातील ग्लुकोज, रक्तातील प्रथिने किंवा अल्ब्युमिनची पातळी आणि इतर नियमित रक्त चाचण्यांद्वारे मूल कुपोषित आहे का ह्याचे निदान करता येते
  • इतर चाचण्या: डॉक्टर इतर चाचण्या देखील लिहून देतात उदा: थायरॉईडची चाचणी, कॅल्शियम, जस्त आणि जीवनसत्त्वे इत्यादींची पातळी दर्शवणाऱ्या चाचण्या इत्यादी. ह्या सर्व चाचण्या मुलांमधील कुपोषणाची स्थिती दर्शवण्यास मदत करतात

मुलांवर होणारे कुपोषणाचे परिणाम

जर कुपोषणाच्या स्थितीचे वेळीच निदान केले गेले नाही आणि त्यावर उपचार केले नाहीत तर त्याचा मुलांवर दीर्घकालीन आणि विनाशकारी परिणाम होऊ शकतो. बालपणात कुपोषणाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत

  • स्टंटिंग: मुलांमध्ये कुपोषणाचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम म्हणजे स्टंटिंग. कुपोषणामुळे मुलाची सामान्य वाढ होण्याची क्षमता, मुलाची उंची आणि वजनावर मर्यादा येऊ शकते. खुंटलेली वाढ कायमची आणि अपरिवर्तनीय असू शकते
  • मॅरास्मस: ह्यामध्ये प्रथिनांकडून मिळणाऱ्या ऊर्जेची कमतरता असते आणि त्यामुळे कुपोषण होऊ शकते. मॅरास्मसला ऊर्जेची कमतरता असलेला आजार म्हणून देखील ओळखले जाते. ह्यामध्ये गंभीररीत्या वजन कमी होणे, पातळ आणि कागदासारखी त्वचा, केस गळणे, उदासीनता आणि थकवा इत्यादी लक्षणे दिसून येतात.
  • क्वाशिओर्कार: हा देखील प्रथिनांची ऊर्जा कमी असल्याचा परिणाम आहे. पुरळ, पाणी टिकून राहणे, ठिसूळ केस आणि फुगलेले पोट ही या स्थितीची काही लक्षणे आहेत. उपचार न केल्यास, या स्थितीमुळे मूल कोमा मध्ये जाऊन मृत्यू होऊ शकतो.

मुलांमध्ये कुपोषणामुळे अशक्तपणा, कमकुवत हाडे, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, स्कर्वी किंवा अवयव निकामी होणे ही लक्षणे दिसतात. कुठल्या पोषक घटकांची कमतरता आहे त्यानुसार ही लक्षणे बदलतात.

मुलांमधील कुपोषणावर उपचार

कुपोषणावर उपचार करण्यासाठी, सर्वात आधी मूळ कारण ओळखणे महत्वाचे आहे. एकदा मूळ कारण लक्षात आले की, डॉक्टर आहार योजनेत विशिष्ट बदल सुचवतील जेणेकरून पूरक आहार आणि योग्य प्रमाणात अन्नपदार्थांचा समावेश केला जाईल. वेळीच उपाययोजना केल्यास कुपोषणाचे अनेक दुष्परिणाम सुधारले जाऊ शकतात आणि उलट केले जाऊ शकतात. मुलांमध्ये कुपोषणावर उपचार करण्याचे काही मार्ग येथे आहेत.

. घरगुती उपचार

कुपोषणाच्या सुरुवातीच्या काळात, योग्य काळजी घ्यावी. मुलाला पोषक घटकांनी समृद्ध असा आहार दिल्या या स्थितीतून सावरण्यास मदत होईल. कुपोषणातून सावरण्यासाठी काही घरगुती उपचारांमध्ये खालील उपचारांचा समावेश होतो.

  • नियमित अंतराने पौष्टिक आहाराचे सेवन करणे
  • आपल्या मुलाला संतुलित आहार देणे
  • डॉक्टरांनी सुचवलेल्या आहार योजनेचे पालन
  • दररोज १.५ लिटरपेक्षा जास्त पाणी पिणे

. औषधोपचार

कुपोषणाची तीव्रता आणि कारणे ह्यानुसार, डॉक्टर या स्थितीतून बरे होण्यासाठी आवश्यक उपाय सुचवतील. त्यापैकी काही उपाय खालीलप्रमाणे

  • मुलासाठी औषधे आणि पूरक आहार
  • जी मुले स्वतः खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी फीडिंग ट्यूबचा वापर
  • गंभीर कुपोषित मुलांची काळजी आणि सतत देखरेख

मुलांमध्ये कुपोषण कसे टाळावे?

मुलांमध्ये कुपोषणाचे सर्वात सामान्य कारण पोषक घटकांचे अपुरे सेवन आणि व्यायामाचा अभाव हे आहे. मुलांमध्ये कुपोषण रोखण्यासाठी, पालकांनी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:

  • बाळांना पुरेसे आईचे दूध मिळते आहे ना ह्याची खात्री करा
  • स्तनपानाच्या कोणत्याही समस्येवर त्वरित उपचार केले पाहिजेत किंवा बाळाला फॉर्मुला दूध दिले पाहिजे
  • पोषक आहाराद्वारे मुलाला पोषक तत्वांचे योग्य संतुलन मिळते आहे ह्याची खात्री करा
  • मूल शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्याची खात्री करा

आपले मूल निरोगी आहे हे सुनिश्चित करण्यासाठी, आपण त्याच्या आहारात महत्त्वपूर्ण पोषक घटक समाविष्ट करणे आवश्यक आहे. हे पोषक घटक जाणून घेण्यासाठी आणि मुलांमधील कुपोषण तुम्ही कसे रोखू शकता ह्याची माहिती खाली दिलेली आहे.

कुपोषण रोखण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण पोषक तत्वे

आपल्या मुलाच्या आहारात कुपोषण टाळण्यासाठी खालील पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे:

  • कर्बोदके
  • प्रथिने
  • लोह
  • जीवनसत्त्वे
  • चरबी
  • कॅल्शियम

कुपोषण रोखण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण पोषक तत्वे

लहान मुलांचे कुपोषण रोखण्यास मदत करणारे पदार्थ

  • फळे आणि भाज्या
  • दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज आणि दही
  • तांदूळ, बटाटा, तृणधान्ये आणि स्टार्च सारखे इतर खाद्यपदार्थ
  • मांस, मासे, अंडी, बीन्स आणि प्रथिने समृद्ध असलेले पदार्थ
  • चरबी तेल, नट, बिया

कुपोषण टाळण्यासाठी आपल्याला आपल्या मुलाच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक असलेले पदार्थ आता आपल्याला माहित आहेत. आपल्या मुलाला दररोज योग्य प्रमाणात पोषण मिळते आहे ह्याची खात्री करण्यासाठी त्याच्या दैनंदिन पौष्टिक गरजा पाहूया.

मुलांच्या दैनंदिन पौष्टिक गरजा

मुलांच्या दैनंदिन पौष्टिक गरजा खालीलप्रमाणे आहेत.

  1. फळे आणि भाज्या प्रत्येक दिवशी दोन वेळा
  2. संपूर्ण धान्य अन्नपदार्थांची दररोज चार सर्व्हिंग्ज, जसे की बकव्हीट, ब्राऊन ब्रेड किंवा मल्टी ग्रेन ब्रेड
  3. ग्लास भरून दुधाच्या तीन सर्व्हिंग्ज. चीज, पुडिंग्ज, दही हे काही पर्याय असू शकतात
  4. अंडी, मासे आणि मसूर यासारख्या प्रथिनेयुक्त अन्नाचे दोन सर्व्हिंग्ज
  5. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पूरक औषधे घेणे

निवडक पदार्थ खाणारे माझे मूल कुपोषित राहू शकते का?

निवडक पदार्थ खाणारी मुले कुपोषित राहू शकतात हे एक मिथक आहे. जरी मुलं चोखंदळ असली तरीसुद्धा त्यांना आवश्यक असणारी पोषणमूल्ये पुरेशा प्रमाणात मिळतात. जोपर्यंत अन्नपदार्थांचा एक विशिष्ट गट पूर्णपणे दुर्लक्षित केला जात नाही तोपर्यंत आपल्या मुलाला पुरेसे पोषक घटक मिळतील. पालकांनी पौष्टिक पदार्थांचे योग्य मिश्रण तयार केले पाहिजे आणि फास्ट फूडचा वापर मर्यादित ठेवला पाहिजे.

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवून आणि साध्या आहाराचे पालन करून मुलांमधले कुपोषण टाळता येऊ शकते. जर मुलाला कुपोषणाचा त्रास होत असेल तर त्या मागचे कारण शोधणे महत्वाचे आहे आणि नुकसान टाळण्यासाठी त्यावर त्वरित दीर्घकालीन उपाय शोधणे गरजेचे आहे.

आणखी वाचा:

मुलांच्या शौचाद्वारे रक्त पडणे – कारणे आणि उपचार
मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article