Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३६ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३६ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण –  ३६  वा आठवडा

व्वा! तुम्ही करून दाखवलंत. तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती आहात आणि तुम्ही तुमच्या बाळांना पोटात जवळजवळ ९ महिने वाढवत आहात! वैद्यकीय दृष्ट्या विचार केला तर ही अवस्था अद्यापही अकाली अवस्था समजली जाते. परंतु बाळांचा जन्म आता केव्हाही होऊ शकेल ह्या विचारांनी गर्भवती आई आता आनंदित होऊ शकेल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत सावधगिरी आणि तयारी दर्शवल्यामुळे तुमचा उत्साह आता नक्कीच वाढेल.

प्रसूतीची तारीख जवळ आल्यामुळे त्यासोबत चिंतासुद्धा वाटू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. डॉक्टरांच्या शिफारसीनुसार वागणे हे शक्य तितक्या चांगल्या मार्गाने पुढे जाण्यासाठी उत्तम असते. परंतु, गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्याबद्दल सर्व काही जाणून घेणे हा देखील तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या लेखात, गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्यात तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाळांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी आपण चर्चा करणार आहोत.

३६ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमच्या गरोदरपणाच्या ३६व्या आठवड्यात, गर्भाशयातील तुमच्या लहान बाळांकडे ह्या अवस्थेत वाढण्यास पुरेसा वेळ मिळतो ज्यामुळे त्यांचे शरीर प्रभावीपणे स्वत: ची काळजी घेऊ शकेल. आतापर्यंत त्यांची कार्यपद्धती स्पष्टपणे दिसून येईल.

बाळांना बाहेरच्या जीवनास मदत करणारी एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया म्हणजे श्वास घेणे. आतापर्यंत तुमच्या बाळांची फुफ्फुसे पूर्णपणे परिपक्व होतील. म्हणूनच, जर ह्या क्षणी बाळांचा जन्म झाला तर त्यांना श्वास घेण्यास वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता भासणार नाही.

बाळांच्या शरीरावरचे केस सामान्यत: या आठवड्यात नाहीसे होतात आणि व्हर्नीक्ससह एकत्र होत ते एक जाड पांढऱ्या रंगाचे आवरण तयार करतात.

बाळ गर्भजल श्वासाद्वारे आत घेते आणि गर्भाशयात शोषणाची क्रिया करण्यास बाळ सक्षम असल्याने काही प्रमाणात केस आणि व्हर्निक्स चा भाग शरीरात जातो. हेच आत एकत्रित होते आणि मेकोनियम तयार करते आणि ते बहुतेक नवजात बाळांचे पहिले शौच बनते.

शोषणाची क्रिया बाळे आता शिकली आहेत. शिवाय, बाळांच्या हिरड्या आता घट्ट आणि टणक झाल्या आहेत त्यामुळे बाळे आता स्तनांना योग्यरीत्या लॅच होतात आणि योग्यरीत्या दूध पितात. बाळांचे दात हिरड्यांखाली विकसित झालेले आहेत आणि बाळाच्या जन्मानंतर येत्या काही महिन्यांमध्ये ते दिसू लागतील.

३६ व्या आठवड्यात बाळांची वाढ

रक्ताभिसरण, रोगप्रतिकारक शक्तीचे बचावात्मक स्वरुप, द्रव्यांवर होणारी प्रक्रिया आणि मूत्रपिंडांद्वारे त्यांना बाहेर काढून टाकणे, यकृतद्वारे विशिष्ट एन्झाईम्सचे स्राव यासारख्या बऱ्याच महत्त्वपूर्ण प्रक्रिया एका चांगल्या टप्प्यावर पोहोचलेल्या आहेत. म्हणूनच गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळांना घरी नेण्यापूर्वी काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असते जेणेकरून त्यांचे आयुष्य आनंदाने जगायला सुरुवात होते.

३६ आठवड्यांच्या बाळांचा आकार

आपल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या वाढीबद्दल चिंता करण्याचे कारण नाही कारण मुख्य म्हणजे त्यांचे वजन वाढलेले आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसते.

बाळांच्या डोक्यापासून पायापर्यंतची लांबी जवळजवळ ४४४५ सेंटीमीटर इतकी आहे आणि प्रत्येक बाळाचे वजन अंदाजे २. ४ ते २. ५ किलोग्रॅम आहे, तुम्ही तुमच्या बाळांना जन्म देण्यास उत्सुक आहात!

वर दिलेली माहिती ३६ व्या आठवड्यात तुमची बाळे कोणत्या परिस्थितीतून जात आहेत ह्याविषयी आहे. त्याचप्रमाणे, तुमच्या शरीरात देखील काही बदल घडून येत आहेत. चला त्यांच्यावर एक नजर टाकूया.

३६ व्या आठवड्यात सामान्यपणे आढळणारे बदल

तुम्ही तुमच्या गरोदरपणाचे जवळजवळ ९ महिने पूर्ण केले असल्याने, आपल्या शरीरात या सर्व महिन्यांमध्ये खरोखरच प्रत्येक संभाव्य बदल दिसलेला असेल. यापैकी काही कदाचित या आठवड्यात उद्भवू शकतात, जे प्रसूती सूचित करू शकतात.

  • ३६ व्या आठवड्यात गर्भवती असलेल्या स्त्रियांना आत्मविश्वासाने फिरण्यास खूप त्रास होतो. त्यांचे शरीर आता एक अत्यंत विचित्र स्थिती अनुभवत असते. क्वचितच एकाच वेळी इतके वजन शरीराने पेलले असेल. विशेषत: जुळी किंवा एकाधिक बाळे पोटात सताना, पोटाचा आकार खूपच मोठा असेल. पायऱ्या चढताना किंवा असमान पृष्ठभागावर चालत असताना त्यामुळे तुमच्या दृष्टीक्षेपावर मर्यादा येऊ शकतील. अस्थिबंधन सैल झाल्याने आणि सांध्याच्या संरेखनात बदल होऊन देखील मदत होत नाही. अद्याप संप्रेरक सामान्य पातळीवर परत येणे बाकी आहे आणि तुमच्या पायांवर सूज आल्याने तुमचे संतुलन आणखी कमी होईल. तुम्ही हालचाल करत असताना योग्य खबरदारी आणि सावकाश हालचाली केल्यास तुम्ही सुरक्षित राहू शकता.
  • तुमच्या शरीराच्या वाढत्या आकाराचा आणि वजनाचा आणखी एक परिणाम म्हणजे विविध प्रकारच्या होणाऱ्या वेदना ज्यामुळे तुम्हाला शरीराच्या प्रत्येक भागाची जाणीव होते. गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यावर जेव्हा शरीर प्रसूतीची तयारी करत असते तेव्हा ह्या वेदना आणखी वाढतात. त्यामागील मुख्य कारण म्हणजे ओटीपोटाच्या जोडांसह आपल्या श्रोणिमधील विविध क्षेत्रांचे समायोजन हे आहे. रेलॅक्सीन नावाचे संप्रेरक यासंदर्भात महत्वाची भूमिका बजावते कारण त्यामुळे त्या भागाला विश्रांती मिळते आणि म्हणून प्रसूतीदरम्यान बाळांना जन्मकालव्यातून जाणे सुलभ होते. सांधे सैल झाले आहेत आणि आपल्या वजनाला ते सामर्थ्य आणि पाठिंबा देऊ शकत नाहीत, त्यामुळे पाठ आणि कुल्ल्यांवर खूप ताण येतो व त्यामुळे अस्वस्थता आणि वेदना होतात.

३६ व्या आठवड्यात सामान्यपणे आढळणारे बदल

  • गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्यात बहुतेक गर्भवती स्त्रिया आपल्या योनीतून येणाऱ्या स्रावाबद्दल अत्यंत चिंता करतात. बाळाला सुरक्षित ठेवण्याविषयी तुमचे शरीर अत्यंत सावधगिरी बाळगून, निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रयत्नात योनीतून बाहेर पडणाऱ्या स्रावाची वारंवारिता व प्रमाण वाढवू शकते आणि जेव्हा बाळ जन्मकालव्यातून पुढे सरकते तेव्हा त्यांना निरोगी ठेवते. हा स्त्राव सामान्यत: दुधाचा रंगाचा किंवा रंगहीन असला तरी, गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यावर तो तपकिरी किंवा गुलाबी रंगाचा आणि पूर्वीपेक्षा दाट होऊ शकतो. तथापि, जर स्त्राव नेहमीच्यापेक्षा अगदी विचित्र वाटला तर म्युकस प्लग विलग झाला आहे हे दर्शवू शकते आणि हे प्रसूती सुरु झाल्याचे लक्षण असते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्यातील लक्षणे

एकदा तुम्ही गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केल्यावर बहुतेक लक्षणे या आठवड्यात अधिक तीव्र दिसतील. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते आणि यातून पुढे जाण्यासाठी धैर्य महत्त्वपूर्ण आहे. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३६ आठवड्यांच्या गर्भवती असताना खालील लक्षणे तुम्ही अनुभवू शकता.

  • या आठवड्यातअसलेले एक स्वागतार्ह लक्षण म्हणजे होणारी आई आता पुन्हा सामान्य माणसाप्रमाणे संपूर्ण श्वास घेऊ शकते. गर्भाशयाच्या खालच्या भागात बाळांची हालचाल सुरु होते आणि बाळे त्याद्वारे प्रसूतीची तयारी करतात. ह्या प्रक्रियेस इंग्रजीमध्ये लायटनिंग असे म्हणतात. बाळे खाली सरकल्यामुळे गर्भाशयाच्या वरच्या भागातील जागा रिकामी होते. एकदा हे झाल्यानंतर फुप्फुसे आणि डायफ्रॅम खरंच मोकळा श्वास घेऊ लागतात. ते आधीसारखे आकुंचन आणि प्रसारण पावतात त्यामुळे तुम्ही सहजपणे दीर्घ श्वास घेऊ शकता.
  • बाळे खाली सरकल्यामुळे तुमचा श्वासोच्छवास सुरळीत झालेला असला तरी पचनसंस्था आता बिघडते. बाळांचे सगळे वजन आणि दाब आता पचनसंस्थेवर येऊ लातो त्यामुळे अस्वस्थता येऊन त्यामुळे बद्धकोष्ठता, जळजळ आणि अपचन ह्यासारखे त्रास होतात.
  • या आठवड्यात झोप कदाचित एखाद्या लांब हरवलेल्या मित्रासारखी देखील असेल. तुम्ही तुमचे मन शांत करण्याचा आणि आपल्या सर्व चिंताग्रस्त विचारांपासून मुक्त राहण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही तुमच्या शरीरासाठी सोप्या वाटणाऱ्या झोपेच्या स्थिती समायोजित करू शकता. एवढे सगळे करूनही तुम्हाला झोप लागण्याची समस्या उद्भवू शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३६ वा आठवडा पोटाचा आकार

ह्या आठवड्यात तुमच्या पोटाचा आकार सर्वात जास्त गोलाकार झालेला आहे. एकाधिक बाळे असलेल्या स्त्रियांमध्ये हा आकार खूप जास्त असतो, तर काही अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये पोटाचा आकार लहान असतो. तथापि, जोपर्यंत बाळांनी वाढीचे सर्व टप्पे साध्य केले आहेत तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३६ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

ह्या आठवड्यात केलेला अल्ट्रासाऊंड फक्त ह्या आठवड्यात प्रसूती होणार आहे की नाही हे पाहण्यासाठी केला जाईल. बाळांचे स्थान आणि स्थिती ह्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावते. कोणतीही चुकीची स्थिती सुरुवातीला तंत्रज्ञानाने सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणत्याही प्रलंबित चाचण्या आणि तपासण्या सुद्धा करून घेतल्या जातील.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३६ वा आठवडा आहार

तुमचा गरोदरपणाचा कालावधी लवकरच पूर्ण होणार आहे. तथापि, आहारातील फोलिक ऍसिड, लोह, कॅल्शियम, जस्त आणि व्हिटॅमिन सी सारख्या आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे कारण बाळाच्या विकासासाठी त्याची मदत होते. बाळांची वाढ सुद्धा होत आहे त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल असा साधा आहार घेणे हि एक चांगली निवड असू शकेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा ३६ वा आठवडा गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

तुमचा गरोदरपणाचा कालावधी जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही प्रसूतीच्या तयारीत आहात. तुमची प्रसूतीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत.

हे करा

  • तुमची नैसर्गिक किंवा सिझेरियन प्रसूती होत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला.
  • तुमची दवाखान्यात न्यायची बॅग तपासून पहा आणि तुमच्या पतीला सुद्धा ती बॅग पुन्हा एकदा तपासून पाहण्यास सांगा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा ३६ वा आठवडा - गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

काय टाळावे?

  • हलके फिरायला जाणे किंवा तलावामध्ये पोहणे टाळू नका
  • तुमच्या स्तनांना आधार हवा असतो त्यामुळे झोपताना ब्रा काढून टाकणे टाळा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा ३६ वा आठवडा कुठल्या गोष्टी तुम्ही खरेदी करणे आवश्यक आहे?

तुम्ही आधीच तुमच्यासाठी आणि बाळासाठी आवश्यक खरेदी केलेली असेल. तथापि, बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला आणि तुमच्या पतीला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची यादी इथे देत आहोत.

  • तुमच्या पतीसाठी रात्री घालण्यासाठीचे आणि अतिरिक्त कपडे.
  • तुमच्या पतीसाठी एक सोपा डिजिटल स्टॉपवॉच.
  • अतिरिक्त डायपर आणि टिश्यू, हे सतत लागणार आहेत
  • जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे कपडे, दुपटी, टोप्या, मिटेन्स, मोजे इ.
  • ब्रेस्ट पंप.
  • सॅनिटरी नॅपकिन्स.
  • गर्भवती आईसाठी अतिरिक्त आरामदायक गाऊन / झगे.
  • नर्सिंग ब्रा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३६ आठड्यांच्या गर्भवती असलेल्या स्त्रिया आता प्रसूतीच्या लक्षणांची वाट पहात असतात. तुमचे गरोदरपणाचे ९ महिने पूर्ण झालेले आहेत आणि तुमची बाळे देखील बाहेरच्या जगात येण्यासाठी उत्सुक असतील. तुमची प्रसूती तुमच्या दोघांसाठी सर्वोत्तम बनवण्यासाठी विश्वास आणि धैर्य बाळगा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article