Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३२ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३२ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३२ वा आठवडा

जर तुम्ही जुळ्या बाळांसह ३२ आठवड्यांच्या गर्भवती असाल तर खरोखरच हा साजरा करण्याचा क्षण आहे जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्याची तुलना एका बाळासह गरोदर असतानाच्या ४० व्या आठवड्यासोबत केली जाऊ शकते. पोट आणि गर्भाशयाचे आकार एकमेकांसारखेच असल्याने एकट्या बाळाची आणि जुळ्या मुलांची वाढ आतापर्यंत समान आहे. तथापि आता गोष्टी बदलणार आहेत. गर्भाशयातील जागा आता बाळांसाठी कमी पडणार आहे आणि छोटी बाळे आता बाहेरच्या जगात येण्यास आणि स्वतःचे स्वतः राहण्यास उत्सुक आहेत.

३२ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमच्या पोटात वाढणाऱ्या एकाधिक बाळांचा विकास होत आहे आणि पुढचे काही दिवस तो होत राहील. एकट्या बाळाच्या वाढीशी तुलना केल्यास त्यांच्या वाढीचा दर थोडासा कमी होईल, परंतु अजूनही काही विकासात्मक प्रक्रिया घडतील.

मुख्यतः बाळाच्या शरीरात चरबी वाढेल आणि आकारात वाढ होत राहील. बाळाचे शरीर आणि अवयव जे आतापर्यंत फक्त हाडांचा सापळा होते ते आता भरले जाईल आणि जसजशी बाळाच्या विकासात प्रगती होईल तसे बाळ नवजात बाळासारखे दिसू लागेल. बाळांचे डोके मोठे असल्याकारणाने ही तुलना केली जाते.

तुम्ही तुमच्या बाळांच्या हालचालींचा मागोवा घेत असल्यास, तुम्हाला काळजी वाटू शकेल अशा घटना काही वेळा घडू शकतात. कारण बाळांचे पाय मारणे किंवा इतर हालचाली नेहमीसारख्या नसू शकतात. आहे हे संपूर्णतः सामान्य आहे. प्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे जुळ्या किंवा तिळ्या बाळांच्या हालचाली मंदावतात. गर्भाशयात असणाऱ्या कमी जागेमुळे बाळांना हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा उरत नाही. काहीवेळेला बाळे जेव्हा स्थिती बदलतात तेव्हा तुम्हाला फडफड जाणवू शकते.

त्यांच्या मुख्य अंतर्गत अवयवांची परिपक्वता या आठवड्यात देखील वेगाने पुढे जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे मूत्राशय शारीरिक द्रवपदार्थांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात करते आणि लघवीच्या रूपात ते बाहेर टाकले जाते. शरीराच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूनी बाळाचा मेंदू असंख्य सिग्नल द्वारे उत्तेजित केला जातो, त्यामुळे गर्भाशयात असताना बाळांना वारंवार स्वप्ने पडतात. आपल्या शरीराचे प्रत्येक कार्य सुरळीत सुरु आहे हे सुनिश्चित करण्यासाठी ह्या सर्व प्रक्रिया महत्वाच्या आहेत.

ह्या आठवड्यात बहुतेक बाळांच्या शरीरावरील केसांची हलकी लव गळून पडते. तसेच तुमच्या बाळांच्या डोक्यावर दाट केस असू शकतात तर काही बाळांच्या बाबतील हे केस विरळ असू शकतात. केसांचा विकास हा आनुवंशिक असू शकतो. केसांव्यतिरिक्त कवटीचा विकास देखील ह्या टप्प्यावर जवळजवळ पूर्ण झालेला असतो. परंतु अजूनही कवटी पूर्णतः टणक झालेली नसते. कवटीची हाडे अजूनही पूर्णपणे एकत्रित झालेली नसतात. जन्माच्या वेळी बाळाला जन्मकालव्यातून सहजपणे पुढे सरकता यावे म्हणून ही हाडे मऊ राहतात. शरीरातील बाकीची हाडे आवश्यक प्रमाणात कडक होतात.

बाळांचा आकार केवढा असतो?

तुम्ही स्वतः एक मोठा कंद किंवा रताळे किंवा स्क्वॅश धरल्याची कल्पना करा. तुमच्या गर्भाशयात तुमची लहान बाळे अगदी एवढीच मोठी आहेत. तुम्ही जेव्हा गर्भधारणेच्या ३२ व्या आठवड्यात पोहोचता तेव्हा जुळी किंवा एकाधिक बाळे जन्माला आल्यावर जशी दिसतील तशीच असतात. जेव्हा बाळांची उंची डोक्यापासून पायापर्यंत मोजली जाते तेव्हा ती अंदाजे ४० ते ४१ सेंटीमीटर असते आणि प्रत्येक बाळाचे वजन १. ४ ते १. ५ किलोग्रॅम पर्यंत असते. जन्माच्या वेळी प्रत्येक बाळाचे वजन अंदाजे अर्धा किलो असेल.

बाळांचा आकार केवढा असतो?

सामान्य शारीरिक बदल

तुमच्या शरीरात होणारे अंतर्बाह्य बदल हे तुमचे शरीर बाळांना जन्म देण्यास तयार असल्याचे तसेच बाळांच्या जन्मानंतर काळजी घेण्यास तयार असल्याचे दर्शवतात.

  • आईचे शरीर बाळाच्या जन्माची तयारी करीत असताना बाळे सुद्धा प्रसूतीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करीत असतात. हा बदल लक्षात येण्यासाठी तुमच्या पोटाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. जर तुमच्याकडे आधीच्या महिन्यांचे फोटो असतील तर तुम्ही तुमच्या आताच्या फोटोंशी त्याची तुलना करू शकता. बरीच बाळे ह्या आठवड्यात त्यांची स्थिती समायोजित करतील आणि जन्मकालव्याच्या तोंडावर डोके खाली असलेली स्थिती निश्चित करतील. ह्यामुळे गर्भाशय खालच्या बाजूस जड होईल आणि त्यामुळे पोटाचा आकार पेअरच्या आकाराचा होईल. (खालच्या बाजूने गोल होईल) वेगाने आणि गहन श्वास घेण्याच्या दृष्टीने तुमच्या शरीरात होणारा हा लक्षणीय बदल आहे आणि तो बाहेरून दृश्यमान आहे.
  • गरोदरपणात त्वचेचा गडदपणा वाढतो. त्वचेच्या यादृच्छिक ठिकाणी असलेल्या काळ्या डागांपासून, आपल्या पोटावर असलेल्या गडद रेषापर्यंत, आपल्या स्तनांनाही दुसऱ्या तिमाहीत गडद होण्यास सामोरे जावे लागते. स्तनपानाच्या वेळी बाळाला सहजपणे दिसण्यात मदत करण्यासाठी स्तनाग्रे आणि स्तनाग्रांभोवतीचा गोलाकार भाग सुद्धा गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात गडद होतो. स्तनांचा आकार आता वाढत नाही परंतु स्तनांमधून गळती पूर्वीसारखीच होते.
  • योनीमार्गातून घट्ट आणि दुधासारख्या पांढऱ्या रंगाचा स्त्राव होऊ शकतो. ह्यामुळे योनीमार्ग साफ राहण्यास मदत होते तसेच चांगले बॅक्टरीया वाढण्यास सुद्धा मदत होते. परंतु जर हा स्त्राव पातळ पाण्यासारखा असेल तर गर्भजल पिशवी फुटल्याचे ते लक्षण असू शकते.

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या बाळांसह गरोदरपणाची लक्षणे मागील दोन आठवड्यांपूर्वी होती तशीच असतील.

  • अचानकपणे केव्हाही कळा येण्याची प्रवृत्ती वाढू शकते, त्यामुळे बाळाचा जन्म आता अचानक केव्हाही होऊ शकतो असे तुम्हाला वाटू शकते. बाळाचा आकार जसजसा वाढतो तसे शरीर प्रसूती प्रक्रियेसाठी स्वतःला तयार करीत असते. सराव कळाचे मुख्य लक्षण म्हणजे तुम्ही शरीराची स्थिती बदलल्यावर त्या नाहीशा होतात. शरीराची स्थिती बदलल्यानंतर सुद्धा कळा येत राहिल्यास आणि वेदनांची तीव्रता वाढलेली असल्यास ते अकाली प्रसुतीचे लक्षण असू शकते.
  • गर्भाशयाचा वाढत आकार आणि बाळांच्या वजनामुळे पचनसंस्थेवर दाब येतो आणि त्यामुळे अपचन होते तसेच त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता जास्त असते. बाळे जेव्हा त्यांची स्थिती बदलतात तेव्हा त्याची तीव्रता आणखी वाढते कारण त्यामुळे पोटावर आणखी जास्त दाब पडतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपण ३२ वा आठवडा पोटाचा आकार

आपल्या गर्भाशयात पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात गर्भजल असणे सुरू होते. त्यामुळे पूर्वीपेक्षा बाळाच्या हालचालीसाठी कुशनींग कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला त्या पूर्वीपेक्षा जास्त तपशीलवार जाणवू लागतात.

बाळे गर्भाशयातच आपली स्थिती बदलू लागल्यामुळे पोट आणखी खाली सरकू लागते.

जुळ्या बाळांसह गरोदरपण ३२ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

बरेच डॉक्टर प्रत्येक आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास सुरवात करतात. ३२ आठवड्यांमध्ये ब्रीच जुळे होण्याची शक्यता बरीच असते आणि शक्य तितक्या आधीच ती शोधणे आवश्यक आहे. जर आपली प्रसूती तारीख जवळ असेल आणि स्कॅनने प्रसूतीसाठी एक आदर्श नसलेली स्थिती दर्शविली तर आपले डॉक्टर कदाचित बाळाला त्यांची स्थिती बदलण्यास भाग पाडतील अशा पद्धती अवलंबू शकतात. तथापि, आजकाल हा सराव केला जात नाही.

काय खावे?

जरी ह्या काळात तुमचे वजन लक्षणीयरित्या वाढलेले असले तरी सुद्धा तुम्ही तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करू नये हे आवश्यक आहे. तुमचे वजन जास्त असल्यास आहारातील निर्बंधांचा सल्ला दिला जाऊ शकतो, परंतु कमीत कमी ह्या आठवड्यासाठी तुम्ही आहारात मांसाचा समावेश करणे चांगले.

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

३२ व्या आठवड्यात आपल्या गरोदरपणाची काळजी घेण्यासाठी फक्त काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे:

हे करा

  • आरोग्य विमा प्रदात्यांशी संपर्क साधून पुन्हा एकदा सर्व अटी तपासून पहा.
  • आपल्या मुलांशी वारंवार बोला.

काय टाळावे?

  • प्रसूतीची तारीख जवळ आलेली असताना जड जेवण घेणे टाळा.
  • आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या वेदनांसाठी हर्बल औषधे घेण्यापासून दूर रहा.

३२ व्या आठवड्यात जन्माला येणारी बाळे

अकाली बाळे जन्माला येण्याच्या अनेक घटना आहेत. सुदैवाने,३२ व्या आठवड्यांत जन्मलेल्या जुळ्या बाळांचा अस्तित्व दर खूपच चांगला आहे, कारण त्यांनी गरोदरपणाचे जवळ जवळ ८ महिने पूर्ण केलेले आहेत. तथापि, गुंतागुंत होण्याचा धोका असतो, म्हणूनच अकाली जुळ्या मुलांसाठी प्री टर्म निओनेटल केअर युनिटस वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर काही मुदतपूर्व कळा सुरु झाल्या आणि बाळांना प्रसूतीसाठी योग्य स्थान नसेल तर काही डॉक्टर सिझेरियन प्रसूती करतात.

आपल्याला काय खरेदी करणे आवश्यक आहे?

आतापासून काही आठवड्यांत तुमचे गरोदरपण हा भूतकाळ झालेला असेल. त्यामुळे तुम्ही खालील गोष्टींची खरेदी करा.

  • बाळांचा अल्ट्रासाऊंड फोटो ठेवण्यासाठी एक चित्र फ्रेम बनविणे.
  • आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यांचे फोटो काढण्यासाठी डिजिटल कॅमेरा.

३२ व्या आठवड्यांत, तुमची जुळी बाळे अगदी थोडी विकासाची चिन्हे दर्शवू शकतात कारण लवकरच ती ह्या जगात प्रवेश करणार आहेत. काही आठवड्यांमध्ये तुम्ही बाळांना जन्म देणार आहात आणि त्याची शारीरिक आणि मानसिक तयारी तुम्ही गरोदरपणाच्या ह्या आठवड्यांमध्ये करणे आवश्यक आहे. बाळांचा गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात अकाली जन्म होणे हे फार काही असामान्य नाही आणि त्यासाठी डॉक्टर आधीच तयार असतात. त्यामुळे त्याविषयी चिंता करण्याची गरज नाही कारण तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला तयार करू शकता.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article