In this Article
- २९ व्या आठवड्यात बाळाची वाढ
- बाळांचा आकार केवढा आहे?
- सामान्य शारीरिक बदल
- जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २९ व्या आठवड्यातील लक्षणे
- जुळ्या बाळांसह गरोदरपण – २९ वा आठवडा – पोटाचा आकार
- जुळ्या बाळांसह गरोदरपण – २९ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
- काय खावे?
- गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
- तुम्हाला काय खरेदी करणे आवश्यक आहे?
जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह २९ आठवड्यांच्या गर्भवती असाल तेव्हा बाळाचा विकास ही सर्वात गंभीर गोष्ट असेल आणि त्याविषयी तुम्ही आणि तुमचे डॉक्टर चिंतीत असाल. ह्या टप्प्यावर, तुमच्या बाळांना अस्मितेची ओळख निर्माण होण्यास सुरुवात होईल आणि बाळाचे वर्तन फक्त तुम्हीच समजू शकता अशा प्रकारे बाळ वागेल. उदा: बाळ कधी आणि कसे हालचाल करते किंवा पाय मारते हे फक्त तुम्हीच समजू शकता. तसेच ह्याव्यतिरिक्त कुटुंबासाठी आणि तुमच्या बाळांच्या आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या पुढील काही आठवड्यात संपवल्या पाहिजेत कारण पुढील काही महिन्यांमध्ये तुम्ही काम करून स्वतःला ताणतणावात ठेऊ नये.
२९ व्या आठवड्यात बाळाची वाढ
तुमच्या बाळाची वाढ मंदावेल, परंतु हे केवळ त्यांची लांबी आणि आकाराच्या बाबतीत लागू होते. २९ व्या आठवड्यापासून बाळाच्या वाढीचा वेग जरी मंदावलेला असला तरी सुद्धा त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढत राहते. बाळाचे वजन जवळजवळ तिप्पट वाढते आणि त्यामुळे तुमच्या पाठीवर त्याचा ताण येऊ शकतो.
बाळांच्या त्वचेवर असलेले केस आता गळून पडतील. त्यांच्या त्वचेला झाकणारा व्हर्नीक्सचा थर पातळ होण्यास सुरवात होईल, कारण त्यांच्या त्वचेवर चरबीचा थर साठू लागतो आणि तो त्वचेला सुरक्षित ठेवतो. जर तुमच्या लहान बाळांच्या जन्मानंतर केसांचे लहानसे अवशेष शिल्लक असतील तर ते देखील बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यात नष्ट होतील.
तुमच्या बाळांच्या हालचालींमध्ये आता एक नवीन उत्साह असेल. बाळाच्या आजूबाजूला आता गर्भजल असते आणि त्यांच्या हालचालींसाठी ते एक नैसर्गिक माध्यम असते. बाळाचे पाय मारणे, स्ट्रेचेस, अंगठा चोखणे, ऍक्रोबॅटीक्स आणि इतर क्रिया खूप वाढतील. ह्या सर्व क्रिया बाळाच्या विकासासाठी खूप गरजेच्या आहेत आणि त्यामुळे बाळाचा विकास कसा होत आहे ह्याची आईला कल्पना येऊ शकेल. तुमचे बाळ ठराविक वेळेला हालचाल करते हे तुम्हाला माहिती असते. बाळ ठीक आहे ह्याची तुम्हाला खात्री पटते आणि जर तुम्हाला काही चुकीचे वाटले तर तुम्ही लगेच त्याविषयी काळजी घेऊ शकता.
बाळांचा आकार केवढा आहे?
गरोदरपणाचा हा टप्पा बाळांच्या शारीरिक गुणधर्मांपेक्षा बाळांच्या वजनावर अधिक लक्ष केंद्रित करतो. जेव्हा त्यांचा आकार किंवा लांबी पाहतो तेव्हा ते आधीच्या आठवड्याएवढेच म्हणजेच ३८ ते ३९ सेंटीमीटरच्या आसपास असेल. तथापि, त्यांचे वजन जवळजवळ एक किलोग्रॅम पेक्षा जास्त असते.
सामान्य शारीरिक बदल
जेव्हा जुळी किंवा एकाधिक बाळे होण्याची अपेक्षा असते तेव्हा गर्भवती स्त्रीच्या शरीरात बदल होतात. काही बदल कदाचित आपणास त्रास देऊ शकतात, तर काहींचा तीव्र परिणाम होऊ शकतो.
- गरोदरपणात बद्धकोष्ठता होणे सामान्य आहे आणि तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या तिसर्या तिमाहीत देखील त्याचा अनुभव घ्याल. केवळ त्याचा सामना करणे अवघड नाही तर त्यामुळे त्रास देखील होऊ शकतो कारण तुमच्या गरोदरपणाचा मौल्यवान काळ बाथरूम मध्ये घालवायचा नसतो. येथे दोन गोष्टी एकत्र काम करतात: पहिली म्हणजे रिलॅक्सिन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन हॉर्मोन्स शरीराला आराम देतात आणि दुसरे म्हणजे, गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे आतड्यांची स्थिती बदलते. आतडी शिथिल होतात आणि त्यामधील सामग्री बाहेर काढणे कठीण होते त्यामुळे बद्धकोष्ठता होते. ह्यावर उपाय म्हणून तुम्ही खूप पाणी पयायले पाहिजे तसेच तंतुमय पदार्थ युक्त आहार घेणे जरुरीचे आहे.
- शरीरातील विविध बदलांचा परिणाम म्हणून बद्धकोष्ठता होत नाही. परंतु सत्य हे आहे की ते अप्रत्यक्षपणे त्या सर्व कारणांशी संबंधित आहेत ज्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. पचनसंस्थेतील बिघाडामुळे मल बाहेर जाण्यासाठी बऱ्याच स्त्रियांना जोर द्यावा लागतो. ह्या वाढीव ताणांमुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्तस्त्राव होतो. याव्यतिरिक्त, रक्ताभिसरण आधीच वाढलेले असते आणि शरीराच्या खालच्या भागात रक्त प्रवाहित होते. त्यामुळे ते हेमोरॉइड्सस होण्यास कारणीभूत ठरू शकते. बद्धकोष्ठतेवर प्रभावीपणे उपचार केल्यास त्यावर लक्ष ठेवता येते.
- स्नायू शिथिल झाल्यामुळे आतडे पूर्वीच्या सामर्थ्याने कार्य करू शकत नाहीत. या विश्रांतीमुळे शरीरातील लहान स्नायूंवर देखील परिणाम होतो जे पदार्थांना उलट दिशेने परत वाहण्यास प्रतिबंध करतात. सर्वात जास्त परिणाम हा पोट आणि अन्ननलिका विभक्त करणाऱ्या झडपेवर होतो. ही झडप सैल झाली की पोटातील सामग्री घशात येण्याचा मार्ग शोधू लागते. पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढेल त्यामुळे घशात जळजळ होऊ शकते. आहारावर नियंत्रण ठेवून खाण्याच्या वेळा पाळल्यास हा त्रास कमी होऊ शकतो पण त्यावर पूर्ण उपाय नाही.
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २९ व्या आठवड्यातील लक्षणे
वजन वाढवण्याव्यतिरिक्त, गरोदरपणाची इतर लक्षणे ह्या आठवड्यात पुन्हा दिसू लागतील.
- आपल्या पोटावरची त्वचा कोरडी होण्याची आणि त्यास सर्वत्र खाज सुटण्याची प्रवृत्ती अधिक तीव्र होईल, परंतु तुम्ही नाराज होऊ नका. तशीच भावना होणे स्वाभाविक आहे कारण वाढत्या बाळांमुळे तुमची त्वचा ताणली जाऊन पातळ होते. आणि ही पातळ झालेली त्वचा खूप संवेदनशील असल्यामुळे त्वचेला जळजळ होऊन खाज सुटू शकते. खाजवल्यामुळे लाल रंगाच्या खुणा त्वचेवर राहू शकतात आणि गरोदरपणानंतर सुद्धा त्या तशाच राहू शकतात. म्हणून स्वतःला आरामदायक स्थितीत ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर वापरा.
- तुमच्या शरीराच्या खालच्या भागावर ताण येईल. गरोदरपणाच्या २९ व्या आठवड्यापर्यंत तुमच्या पाठीवर खूप दबाव येईल. कारण पोटाच्या वाढणाऱ्या आकाराला ती आधार देत असते. वजनातील बदल आणि सांध्यांमधील ताकद सुद्धा बदलल्यामुळे तुमचे पाय आणि कुल्ले तुमचे संतुलन आणि पावित्रा नीट राखण्यासाठी संघर्ष करतात. संप्रेरकांमधील बदलांमुळे तुमचे अस्थिबंध सुद्धा सैल होतील. शरीराच्या इतर भागात सुद्धा अयोग्य दबाव असेल.
- जेव्हा तुम्ही ह्या बदलांचा स्वीकार करत थोडे शांत होता आणि आराम करता तेव्हा तुमचे भरलेले मूत्राशय तुम्हाला झोपेतून जागे करेल आणि तुमचे बाथरूम म्हणजे तुमचे दुसरे घर होईल.
जुळ्या बाळांसह गरोदरपण – २९ वा आठवडा – पोटाचा आकार
तुमच्या पोटाचा आकार वाढेल आणि तुम्हाला खाज सुटण्याची तीव्र इच्छा होईल. तुमचे पोट खूप मोठे होईल आणि त्यामुळे तुमची बाळे छान वाढत आहेत ह्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. लहान बाळांच्या उचकीमुळे ओटीपोटाकडील भागात थोडी अस्वस्थता जाणवेल. तुमचे गर्भाशय खूप वाढल्यामुळे तुमच्या तुमच्या पोटाच्या वरचा भाग शोधण्यासाठी तुम्ही नाभीच्या वरच्या भागाला स्पर्श करू शकता.
जुळ्या बाळांसह गरोदरपण – २९ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
एखाद्या गोष्टीची लवकर तपासणी करणे आवश्यक असल्यास तुमचे डॉक्टर २९ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड करण्यास सांगू शकतात. तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांचे शरीर आता वेगाने विकसित होईल आणि वाढणाऱ्या मेंदूला सामावून घेण्यासाठी डोक्याचा आकार वाढेल.
काय खावे?
बाळांना त्यांच्या अबाधित वाढीसाठी संतुलित आणि योग्य आहाराची आवश्यकता असते. काहीही हानिकारक सेवन केल्याने त्याचा थेट परिणाम बाळांवर होतो. त्यामुळे तुम्ही काय खात आहात ह्यावर लक्ष ठेवा. ह्या आठवड्यात आपला आहार कॅल्शियम आणि प्रथिने समृद्ध असावा. आपल्या हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि तृणधान्ये ह्यांचा आहारात समावेश करा. बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी तंतुमय फळे खा.
गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
पुढील आठवड्यात स्वत: ला तयार करा आणि खालील टिप्सद्वारे निरोगी आणि शांत रहा:
हे करा
- प्रसूती रजा घेतलेली नसल्यास ती घ्या. घरी आपल्या वेळेचा आनंद घ्या.
- प्रसूतीनंतर तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तूंची बॅग तयार ठेवा.
काय टाळावे?
- भाजलेले किंवा कमी शिजवलेले मांस खाणे टाळा
- खूप जास्त उन्हात जाऊ नका कारण ते तुमच्या बाळांसाठी हानिकारक ठरू शकते.
तुम्हाला काय खरेदी करणे आवश्यक आहे?
तुमच्या बाळाचे काही महिन्यात आगमन होणार आहे तुम्हाला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी तुम्ही घेऊ शकता.
- जलद वापरण्यासाठी बेबी वाईप्स
- नेल कटर्स आणि थर्मोमीटर
- तुमच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स
तुम्ही जुळ्या किंवा तिळ्या बाळांसह २९ आठवड्यांच्या गर्भवती आहात याची काळजी घ्या. लवकरच तुम्ही बाळाला जवळ घेणार आहात आणि तुमचे कुटुंब पूर्ण होणार आहे. तुमचे बाळ तुमच्याकडे प्रेमाने बघून लवकरच तुम्हाला आई म्हणून हाक मारणार आहे!