आपल्या बाळाचे नाक कसे स्वच्छ करावे?

बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी सोपे उपाय

आपल्याला लहानपणी एक इंग्रजी कविता होती,“Ten little fingers, ten little toes, two little eyes and one little nose. One little stuffy nose and crying the baby goes.” आणि ते अगदी खरंय, नाक चोंदलेले असेल तर बाळ चिडचिड करते. बाळाचे नाक बंद होऊन श्वास घेण्यास अडचण येते. बाळाचे नाक साफ केल्यास त्यांना चांगला श्वास घेता येईल, संसर्गाची शक्यता कमी होईल आणि शांत झोप येण्यास मदत होईल. जर आपल्या बाळाला घाम येत असेल, श्वास घेताना आवाज येत असेल, त्याला खायला घालणे अवघड होत असेल किंवा बाळ खूप चिडचिड करत असेल तर ते बाळाचे नाक बंद झाल्यामुळे हे सगळे होत असण्याची शक्यता आहे.

बाळाचे नाक स्वच्छ करण्याचे परिणामकारक मार्ग

सर्दी, फ्लू, सौम्य प्रमाणातील संसर्ग, श्लेष्मा साठून राहणे किंवा हवामानातील बदलांमुळे बाळाचे नाक चोंदले जाते. काही वेळा खूप जास्त प्रमाणात असलेला श्लेष्मा सुकून नाक बंद होते. बाळाचे नाक खरेच बंद झाले आहे की बाळाच्या नाकात काही अडकले तर नाही ना हे तुम्ही तपासून पाहू शकता.

बंद नाक मोकळे करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बाळाला शिंकायला लावून श्लेष्मा बाहेर पडू देणे हा होय. परंतु बाळ थोडे मोठे असल्यासच हे शक्य होते. छोट्या बाळांसाठी नोझ क्लिनर वापरून बंद नाक स्वच्छ आणि मोकळे करावे लागते.

सलाईन नेझल स्प्रे वापरून बाळाचे नाक स्वच्छ करणे

छोट्या बाळांचे आणि मुलांचे नाक स्वच्छ करण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे सलाईन नेझल स्प्रे हा होय. त्यामुळे श्लेष्मा पातळ होण्यास मदत होते, नाक मोकळे आणि स्वच्छ होते.

नेझल स्प्रे कसा वापराल?

 • बाळाला पाठीवर झोपवा
 • डोके थोडे मागे झुकला. बाळाचे डोके मागे राहण्यास मदत होण्यासाठी तुम्ही उशीचा वापर करू शकता
 • सलाईन नेझल सोल्युशनचे दोनतीन थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घाला. ३०४० सेकंद वाट पहा
 • जर सलाईन थोडे खाली ओघळून आले तर मऊ कापडाने किंवा टिश्यूने हलकेच पुसून घ्या
 • बाळाला आता एका कुशीवर किंवा पोटावर झोपवा आणि नाकातून शेलष्माचा निचरा होऊ द्या. आता नाक स्वच्छ पुसून घ्या.
 • नेझल स्प्रे करताना जर तो बाळाच्या तोंडावर किंवा डोळ्यात गेला तर काळजी करू नका. हळूच पुसून घ्या.

नेझल स्प्रे कसा वापराल?

बाळाच्या नाकासाठी हे सलाईन वॉटर तुम्ही घरी सुद्धा करू शकता.

 • फिल्टर केलेले स्वच्छ एक कप पाणी उकळून घ्या
 • पाणी गरम असतानाच त्यामध्ये पाव चमचा मीठ घाला
 • हे मिठाचे पाणी थंड करून घ्या
 • हे पाणी आता स्वच्छ स्प्रे बाटलीत भरून ठेवा. तुम्ही स्वच्छ ड्रॉपरचा वापर करू शकता
 • दिवसातून जसे लागेल तसे ३ ते ४ वेळा वापरा
 • तीन दिवसांनी हे मिठाचे पाणी टाकून द्या
 • तुम्ही लहान बाळांसाठी सौम्य आणि मोठ्या मुलांसाठी स्ट्रॉंग मीठाचे पाणी तयार करू शकता

रबर ब्लब सिरिंजने बाळाचे नाक स्वच्छ करणे

तुम्ही बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी ब्लब सिरिंजचा वापर करू शकता. बाळाच्या छोट्या नाकपुड्यांसाठी त्या विशेषकरून तयार केल्या जातात.

 • बाळाला उशीचा आधार देऊन बसवा
 • बाळांसाठीच्या म्युकस एक्सट्रॅक्टरच्या ब्लबमधील हवा काढून टाका
 • आता तो ब्लब तसाच दाबून ठेऊन त्याचे टोक हळूच बाळाच्या नाकपुडीत घाला, खूप आतपर्यंत जाणार नाही ह्याची काळजी घ्या
 • आता दाब कमी करून श्लेष्मा बाहेर येऊ द्या
 • श्लेष्मा असलेला ब्लब स्वच्छ करून घ्या
 • ही प्रक्रिया पुन्हा करा
 • वापर झाल्यानंतर आणि वापरण्याआधी सक्शन ब्लब स्वच्छ करून घ्या

बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी नेझल ऍस्पिरेटरचा वापर

ब्लब सिरिंजच्या तुलनेत नेझल ऍस्पिरेटर्स हे खूप परिणामकारक, सौम्य आणि वापरण्यास सहज आणि सुलभ असतात. ह्यामध्ये नोझल, मऊ आणि लांब नळीचा तुकडा आणि तोंडाने ओढण्यासाठी एक भाग (माऊथपीस) इत्यादींचा समावेश असतो. तुम्ही बॅटरीवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रॉनिक ऍस्पिरेटरची निवड करू शकता. आणि ऑनलाईन किंवा दुकानात मिळतात का हे बघू शकता.

तुमच्या बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नेझल ऍस्पिरेटरचा वापर कसा कराल:

 • बाळाला पाठीवर झोपवा
 • नेझल सलाईन सोल्युशनचे २३ थेंब नाकात टाकून नाक स्वच्छ होऊन उघडते का हे तपासून पहा
 • असे करूनही बंद नाक उघडत नसेल तर ऍस्पिरेटर वापरण्याचा विचार करा
 • ऍस्पिरेटर नीट काम करत आहे ना हे आधी बोटांच्या टोकावर तपासून पहा
 • नेझल ऍस्पिरेटरचे टोक बाळाच्या नाकपुडीत घाला आणि माऊथपीस तुमच्या तोंडात घाला
 • हळूहळू नोझल तोंडाने ओढा, आता श्लेष्मा बाळाच्या नाकातून बाहेर पडून नोझल मध्ये येईल. ही क्रिया खूप जोरात करू नका त्याने नाकाच्या टिश्यूला सूज येऊन रक्त सुद्धा येऊ शकते
 • खालच्या दिशेला तोंड करून नोझल काढून घ्या
 • नळी मध्ये असलेल्या फिल्टरमुळे कुठलेही जंतू किंवा शेलष्मा तुम्ही आत घेण्यापासून तुमचे संरक्षण होईल
 • दिवसातून हे तुम्ही दोनदा किंवा तीनदा वापरू शकता. ह्याचा जास्त वापर केल्यास नाकाच्या भित्तिकांना हानी पोहोचू शकते.
 • ऍस्पिरेटर वापरण्याच्या आधी व नंतर हात आणि ऍस्पिरेटर स्वच्छ धुवून निर्जंतुक करून घ्या.

रबर ब्लब सिरिंज आणि नेझल ऍस्पिरेटर वापरण्यासाठी काही टिप्स

बाळाच्या नाकातील श्लेष्मा काढण्यासाठी जरी ही साधने सुरक्षित असली तरी सुद्धा ती वापरताना खालील प्रकारे काळजी घेतली पाहिजे

 • बाळाच्या छोट्या नाकपुडीत बसेल असे योग्य आकाराचे टोक निवडा
 • हे साधन वापरून झाल्यावर आणि वापरण्याआधी स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यावे
 • दिवसातून फक्त २३ वेळा हे वापरावे. तसेच ह्याचा वापर सलग अनेक दिवस करू नये. बाळाचे नाक खूप दिवस बंद राहत असेल किंवा असा त्रास पुनःपुन्हा उद्भवत असेल तर तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा
 • हे साधन स्वच्छ जागेत ठेवा
 • बाळाच्या नाजूक नाकपुड्याना नुकसान होऊ नये म्हणून त्याचा वापर हळुवारपणे करा.

रबर ब्लब सिरिंज आणि नेझल ऍस्पिरेटर वापरण्यासाठी काही टिप्स

बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी इतर पद्धती

बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या नाकाच्या अवतीभोवतीच्या भाग कापसाच्या बोळ्याने किंवा गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने तुम्ही नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे. नाकाच्या आतील बाजूच्या आवरणाला हानी पोहोचू नये म्हणून नाकामध्ये काहीही घालू नका.

. झोपताना बाळाचे डोके उंचावर ठेवा

बाळाचे डोके थोडे उंचावर ठेवल्यास चोंदलेल्या नाकापासून थोडा आराम मिळतो आणि श्वासोच्छवासास मदत होते. तसेच बाळाच्या डोक्याखाली टॉवेलची गुंडाळी ठेवा. असे केल्याने झोपेच्या वेळेला बाळाला आराम मिळेल. बाळाला भरपूर विश्रांती मिळते आहे ना ह्याची खात्री करा.

. वाफ द्या

आर्द्रता आणि उबदारपणामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते. गरम पाण्याचा शॉवर बाथरूम मध्ये सोडून द्या आणि तिथे वाफ तयार होऊ द्या. नंतर तिथे बाळाला घेऊन थोडा वेळ बसा. असे केल्याने बाळाच्या नाकातील श्लेष्मा पातळ होऊन मोकळा होईल आणि बाळाचे बंद नाक मोकळे होईल. जास्त द्रवपदार्थ घेतल्याने सुद्धा मदत होईल.

. व्हेपोरायझर किंवा ह्युमिडीफायरचा वापर करा

कोरड्या हवेमुळे नाक कोरडे पडते. जर तुम्ही कोरड्या हवामानात रहात असाल तर ह्युमिडीफायर घ्या. हवेतील आर्द्रतेमुळे नाक मोकळे होण्यास मदत होईल. विशेषकरून हिवाळ्यात ह्याची जास्त मदत होते.

बऱ्याच वेळा घरच्या घरी एक किंवा दोन आठवड्यांमध्ये वरील उपाय करून नाक मोकळे करता येते.

खालील परिस्थतीत मात्र बाळाच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा

 • हे सर्व घरगुती उपाय करून सुद्धा मुलामध्ये काहीच सुधारणा होत नसेल तर
 • जर बाळाच्या नाकात काही अडकले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर
 • बाळाचे नाक खूप दिवस बंद किंवा चोंदलेले असेल तर, ह्याचे कारण ऍलर्जी किंवा परागज्वर असू शकतो

न्याझोफ्यारेंजीएल सक्शनिंग (एनपी)

हे वैद्यकीय तज्ञ, रेस्पिरेटरी थेरपिस्ट किंवा डॉक्टर करतात, आणि ते खालील परिस्थितीत केले जाते:

 • ब्लब किंवा नेझल सिरिंज ने श्लेष्मा निघत नसेल तर
 • बाळाचा श्वासोच्छवास असामान्य असेल तर
 • बाळ दूध पिताना श्वास घेऊ शकत नसेल तर

ह्या प्रक्रियेत, कोरडा श्लेष्मा ओला करण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करतात. एक पातळ निमुळती सक्शन नळी बाळाच्या नाकातून घशापर्यंत घातली जाते. त्यामुळे खोकला येऊन श्लेष्मा घशात येतो. आणि नंतर तो सक्शनने काढून टाकला जातो. नाक मोकळे झाल्यावर बाळाच्या नाकपुडीतून ट्यूब हळूच काढून घेतली जाते. ही प्रक्रिया जशी गरज भासेल तशी पुनःपुन्हा केली जाते. परंतु खूप वेळा केल्यावर नाकातून सौम्याप्रमाणत रक्त येऊ शकते किंवा नाकाच्या आतील भागाला सूज येऊ शकते. अशा वेळी निओ सकर किंवा छोटी सक्शन ट्यूब वापरतात.

बऱ्याच वेळा साधे घरगुती उपाय परिणामकारक असतात, त्यामुळे बाळाला बंद नाकापासून सुटका मिळते आणि आराम वाटतो. जर घरगुती उपचारांनी सुधारणा झाली नाही तर नेझल स्प्रे किंवा ऍस्पिरेटर वापरा. परंतु जर पुनःपुन्हा नाक बंद होत राहिले तर लवकरात लवकर बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

आणखी वाचा:

बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय
डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय