अन्य

गरोदरपणात अंडी खाणे

गरोदरपणात स्त्रीच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्याचा थेट परिणाम बाळाच्या विकासावर होतो. पौष्टिक आहार घेणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. अंड्यामध्ये प्रथिने आणि इतर पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. आहारात समावेश करण्यासाठी अंडी हा उत्तम पर्याय आहे. तथापि, गर्भवती महिलांसाठी अंडे खाणे सुरक्षित आहे काय? गरोदरपणात अंडी खाण्याचे फायदे तसेच त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे जाणून घेऊयात.

गरोदर स्त्री अंडी खाऊ शकते का?

" गरोदरपणात अंडी खाणे योग्य आहे का?"अनेक गरोदर स्त्रियांना असा प्रश्न पडत असेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. मात्र अंडी खाण्याआधी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अंड्यांमध्ये खनिजद्रव्ये, जीवनसत्वे आणि चांगली चरबी असते. गरोदरपणात अंडी खाल्ल्याने आईला आणि बाळाला आवश्यक पोषणमूल्यांचा पुरवठा होतो. गरोदरपणात कच्ची किंवा न उकडलेली अंडी खाण्यापेक्षा उकडलेली अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे अंड्यांमधील हानिकारक जिवाणू नष्ट होऊ शकतात. अंडी खरेदी करताना ती फ्रेश असल्याची खात्री करा, त्यासाठी पॅक केल्याची तारीख पडताळून पहा. अंडी घेताना स्वच्छ ठिकाणाहूनच खरेदी करा.

अंडी खाण्याचे फायदे

अंडी पोषक मूल्यांनी भरलेली असतात आणि आवश्यक पौष्टिक पदार्थांचा समृद्ध स्त्रोत असतात. खाली नमूद केलेले मुद्दे गर्भधारणेदरम्यान अंडी खाण्याचे महत्त्व अधोरेखित करतात

. प्रथिनांचे जास्त प्रमाण

प्रथिने म्हणजे पेशींचे बिल्डिंग ब्लॉक्स समजले जातात आणि बाळाच्या विकासात मदत करतात. योग्य प्रमाणात अंडी खाल्याने बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेली प्रथिने मिळतात.

. मेंदूचा विकास

अंड्यांमध्ये कोलिन असते आणि ते मेंदूच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्वाचे असते. स्पिना बायफिडा आणि अनेनसिफली ह्या रोगांपासून बाळाचे संरक्षण होते.

. ऊर्जेचा चांगला स्रोत

एका अंड्यापासून ७० कॅलरीज मिळतात. बाळाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असणारी ऊर्जा ह्यातून मिळते.

. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते

अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. परंतु स्त्रियांनी फक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ला पाहिजे. जर आधीच कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर गरोदरपणात पिवळा बलक खाणे टाळावे.

. , डी, , के ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात

अंड्यांमध्ये ही चार फॅट सोल्युबल व्हीटॅमीन्स असतात. विशेषकरून व्हिटॅमिन ए हे लागणारे पोषकमूल्य आहे. ते गरोदरपणात बाळाच्या वाढीस आणि विकासास मदत करते. ह्यामध्ये फुप्फुसे, किडनी, हृदय आणि इतर अवयवांचा समावेश होतो.

. इतर पोषणमूल्ये

अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झियाझानथिन नावाची अँटीऑक्सडान्टस असतात आणि ही अँटिऑक्सिडंट्स डोळे आणि चांगली दृष्टी ह्यासाठी आवश्यक असतात. तसेच, अंड्यांमुळे व्हिटॅमिन डी.व्हिटॅमिन बी १२ तसेच व्हिटॅमिन ब २ सुद्धा मिळते.

गरोदरपणात अंडी खाण्याचे धोके

गरोदर स्त्रीसाठी अंडी म्हणजे पोषकमूल्यांचा समृद्ध स्रोत आहेत योग्य काळजी न घेता गरोदरपणात अंडी खाल्ली तर त्याचे धोके सुद्धा आहेत.

. साल्मोनेला विषबाधा

कच्च्या आणि न शिजवलेल्या अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचे जिवाणू असतात. ह्या जिवाणूंमुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते आणि त्यामुळे उलट्या, जुलाब, ताप, डोकेदुखी, पोटदुखी आणि निर्जलीकरण होऊ शकते. काही वेळा ही लक्षणे गंभीर असतात आणि त्यामुळे अकाली प्रसूती किंवा गर्भपात सुद्धा होऊ शकतो. ह्या स्थितीला सालमोनेला पॉयझनिंग असे म्हणतात.

. इतर धोके

ज्या स्त्रियांमध्ये आधी कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते अशा स्त्रियांमध्ये अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. अंडी खाल्ल्याने स्किन रॅश, नाक चोंदणे, पित्ताच्या गाठी इत्यादी त्रास होऊ शकतात.

गर्भवती स्त्री किती अंडी खाऊ शकते?

कोलेस्टेरॉलची पातळी किती आहे त्यानुसार दिवसाला एक किंवा दोन अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. एका अंड्यामध्ये साधारणपणे १८५ मिग्रॅ कोलेस्टेरॉल असते आणि शरीराला दिवसाला ३०० मिग्रॅ कोलेस्टेरॉलची गरज असते. जर कोलेस्टेरॉलचे प्रमाण शरीरात आधीच जास्त असेल तर दररोज एक अंडे खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. दररोज किती अंडी खावीत हे तुमच्या आहारातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर सुद्धा अवलंबून असते. महिन्याला २० अंड्यांपेक्षा कमी अंडी खाणे हे सर्वात सुरक्षित मानले जाते. बऱ्याच डॉक्टरांच्या मते गरोदर स्त्रियांनी फक्त अंड्याच्या पांढरा भाग खाणे चांगले.

चांगली अंडी कशी निवडून घ्यावीत?

अंडी निवडताना ती स्वच्छ जागेत ठेवली आहेत ना ते आधी पहा. बऱ्याच देशांमध्ये अंडी खाण्यायोग्य आणि जिवाणूविरहित असल्याचा सर्टिफिकेशन मार्क असतो. इतर अन्नपदार्थ खरेदी करताना सुद्धा अंडे असलेले खाद्यपदार्थ टाळा कारण त्यामध्ये घातलेल्या अंड्यांचा स्रोत तुम्हाला माहिती नसतो.अंडी साठवून ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता?अंडी सालमोनेला विरहीत राहण्यासाठी त्यांना नीट साठवून ठेवणे महत्वाचे आहे.

अंडी कशी शिजवावीत?

गरोदरपणात सुद्धा अंडे शिजवण्याची पद्दत आपण नेहमी करतो तशीच असते. ह्यामध्ये मूळ उद्धेश साल्मोनेला हा जिवाणू शिजवण्याच्या प्रक्रियेत मारला जातो हा आहे.
अंडे शिजवण्यासाठी, अंडे पाच ते सात मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्या. किंवा तुम्ही अंडे दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकता. अंड्याचा बलक पूर्णपणे घट्ट झाला पाहिजे. ह्या प्रक्रियेला साधारणपणे ५ मिनिटे लागतात. अंडे असलेले अन्नपदार्थ खाताना विशेष काळजी घेतली पाहिजे तसेच तो पदार्थ घरीच केलेला असला पाहिजे.

अंडी किती काळापर्यंत टिकतात?

अंडे घातल्यापासून ते २८ दिवसांच्या आत खाल्ले पाहिजे. उकडलेली अंडी उकडल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये खाल्ली पाहिजेत. अंडी घातलेले अन्नपदार्थ ताबडतोब खाल्ले पाहिजेत.

अंडी खाताना जिवाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी काही सूचना

अगदी सहज उपलब्ध असलेला प्रथिनांचा स्रोत म्हणजेच अंडी हा गरोदरपणातील आहारात समावेश करण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. वरील मुद्द्यांचा विचार करून अंड्यांचा तुमच्या जेवणात समावेश करा आणि पौष्टिकता वाढवा.आणखी वाचा:निरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ गरोदरपणात खाऊ नयेत असे २४ अन्नपदार्थ
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved