गर्भारपण

सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार

जर एखाद्या गर्भवती महिलेला काही वैद्यकीय समस्या असतील किंवा नैसर्गिक प्रसूतीसाठी बाळ योग्य स्थितीत नसेल तर बहुतेक डॉक्टर बाळाला जन्म देण्यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करतात. सी-सेक्शन मुळे बाळ सुरक्षित राहते परंतु, बऱ्याच स्त्रियांना सी-सेक्शन नंतर कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासोबतच टाके दुखत असतात आणि नेहेमीच्या शस्त्रक्रियेच्या वेदना सुद्धा असतातच. जरी ह्या वेदना बाळाच्या जन्मामुळे आणि गरोदरपण संपत असताना शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे असल्या, तरी सुद्धा त्यामागे काही वैद्यकीय कारणे सुद्धा असू शकतात.

सीझेरियन प्रसूतीनंतर पाठदुखीचे कारण काय असते ?

सिझेरिअन प्रसूतीसाठी भूल दिली जाते. त्यासाठी स्त्रीच्या मणक्यामध्ये हे भुलीचे इंजेक्शन दिले जाते. पाठीचा कणा आणि सभोवतालचा भाग अत्यंत संवेदनशील असतो. स्नायू आखडल्यामुळे सुद्धा वेदना होऊ शकतात परंतु असे होणे दुर्मिळ आहे. इंजेक्शनमुळे सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडची थोड्या प्रमाणात गळती देखील होते. यामुळे डोकेदुखी आणि मानेकडील भागात वेदना होतात, विशेषत: बाळाची आई बसली किंवा उभी राहिली तर ह्या वेदना जास्त जाणवतात. झोपल्यावर वेदना कमी होतात. त्याला इंग्रजीमध्ये 'पोस्ट स्पायनल हेडेक' असे म्हणतात.

सी-सेक्शन डिलिव्हरीनंतर पाठदुखी कधी होते?

सिझेरिअन प्रसूतीनंतर भूल उतरल्यावर लगेच पाठदुखीचा त्रास जाणवू लागतो. साधारपणे ३-६ तासांनंतरच ते जाणवू लागते. इंजेक्शन दिलेला भाग दुखू लागतो. डोकेदुखी आणि मानेचा त्रास प्रसूतीनंतर १२ तासांनी सुरु होतो. शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे ७ दिवस हा त्रास होऊ शकतो.

सी-सेक्शननंतर किती काळ पाठदुखी राहते?

सी-सेक्शनची वैद्यकीय प्रक्रिया व्यवस्थित झालेली असल्यास, पाठीत दिलेल्या भुलीच्या इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना नाहीश्या होण्यासाठी दोन दिवस ते एक आठवडा इतका कालावधी लागू शकतो. काही वेळा ह्या वेदना काही आठवडे ते महिनाभरापर्यंत राहू शकतात. इंजेक्शनमुळे मणक्याच्या भागातील स्नायू आखडले गेल्यामुळे वेदना होऊ शकतात. काही वेळेला, डोकेदुखी आणि मानेचे दुखणे सहनशक्तीच्या पलीकडे जाते. अशावेळी डॉक्टर तुमच्या शरीरातून रक्त काढून घेऊन भूल दिलेल्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे ते सोडतात. त्यामुळे तात्काळ वेदना कमी होण्यास मदत होते.

सिझेरिअन नंतर पाठदुखीचा त्रास नक्की कुठे होतो?

जेव्हा एखाद्या स्त्रीची सिझेरिअन प्रसूती करणे आवश्यक असते तेव्हा त्यासाठी भुलीचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेकशन मणक्यामध्ये पाठीच्या खालच्या भागात दिले जाते. त्यामुळेच भूल उतरल्यानंतर पाठीत तीव्र वेदना जाणवू शकतात. मणक्यातील द्रव गळती झाल्यामुळे डोकेदुखी आणि मानेत वेदना होऊ शकतात.

सी- सेक्शन नंतरच्या पाठदुखीचा सामना कसा करावा?

पाठीत होणाऱ्या वेदनांमुळे अस्वस्थता येते आणि डोकेदुखी व मानेचे दुखणे सुद्धा वाढते. त्यासोबतच नवजात बाळाला स्तनपान देण्याचे आव्हान असते. तसेच तुमचे शरीर सुद्धा बरे होत असते. ह्या सगळ्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या स्त्रीला नैसर्गिकरित्या पाठदुखीला  सामोरे कसे जावे हे जाणून घ्यायचे असते कारण औषध घेणे हा त्यावर उपाय असू शकत नाही.

१. गरम पाण्याने अंघोळ

ही म्हण कदाचित खरी आहे. बऱ्याच समस्यांवर गरम पाण्याने अंघोळ केल्यास फरक पडतो. पाठदुखीवर त्याचा लक्षणीयरीत्या फायदा होतो. आंघोळीच्या पाण्यात मीठ घालण्याने सुद्धा फायदा होतो. त्यामुळे पाठीचे दुखणे कमी होते आणि तुम्हाला अगदी सहज तरतरीत वाटते.

२. साधे व्यायाम

प्रसूतीच्या आधी आणि नंतर आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल होत असल्यामुळे वेदना देखील तीव्र होतात. काही व्यायाम आपल्या शरीरास बळकटी आणू शकतात. 'पिलेट्स' नावाचा व्यायाम ह्या संदर्भात करण्यास सांगितला जातो कारण हा व्यायाम प्रकार थेट पोटाच्या स्नायूंवर कार्य करतो. परंतु हा व्यायाम करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण काही वेळा टाक्यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आणखी गुंतागुंत वाढू शकते. साधे योग व्यायाम किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे शरीराला आराम मिळू शकतो.

३. योग्य प्रकारे झोपणे

योग्य प्रकारे झोपल्याने तुमची पाठदुखीपासून सुटका होऊ शकते.  तुमची गादी खूप मऊ नसून टणक आहे  हे सुनिश्चित करा. काही गाद्यांच्या आत फोम असतो किंवा हवेने त्या फुगवल्या जातात,  अशा गाद्या आपल्या शरीराच्या आकारास अनुकूल असतात. कोणत्या गाद्या आरोग्यासाठी योग्य असतात आणि त्यापासून आराम मिळतो हे जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोला.

४. गरम आणि थंड

गरम पाण्याने किंवा बर्फाने शेकल्यास प्रभावित भागातील स्नायू शिथिल होण्यास आणि रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. आपल्यास मदत करण्यासाठी साधे हीटिंग पॅड आणि बर्फाचा एक पॅक वापरा.

५. सजलीकरण (हायड्रेशन)

भरपूर पाणी प्यायल्याने डोकेदुखीच्या वेदना कमी होतात आणि वेगवान पुनर्प्राप्ती होते.

डॉक्टरांना कधी फोन करावा?

सी-सेक्शन नंतर पाठीचा त्रास बर्‍यापैकी सामान्य आहे आणि लवकरच तो कमी होतो. तथापि, काही प्रकरणांमध्ये, इतर लक्षणे किंवा वेदना वाढू शकतात. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असते  तेव्हा  एखाद्या डॉक्टरांना भेट द्या.

१. वेदना वाढल्यावर

वेदना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, इतर काही समस्या नाहीत ह्याची खात्री करण्यासाठी डॉक्टरकडे जा. जर वेदना कमी झाली तर चिंतेचे कारण नाही.

२. वेदना सहन होत नसतील तर

तुम्हाला वेदना सहन होत नसतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील इतर बाबींमध्ये अडथळा येऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर त्यामागील मूलभूत कारणाचे निदान करू शकतात आणि तुम्ही वेदना मुक्त होऊ शकता.

३. ताप येत असेल तर

ताप येणे हे संसर्गाचे लक्षण असू शकते, ज्याचे त्वरित निदान करून त्यावर उपचार केले पाहिजेत. काही ऍलर्जी असल्याचे सुद्धा ते लक्षण आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी डॉक्टर शक्य तितक्या लवकर या संसर्गावर उपचार करू शकतात.

४. तुमचे पाय बधिर होत असतील तर

जर तुमच्या एका किंवा दोन्ही पायांना कोणत्याही क्षणी सुन्न वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवावे. विशिष्ट कालावधी नंतर तुम्हाला अस्वस्थता वाटत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. सी-सेक्शन नंतरच्या समस्या काही वेळा त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे तुम्हाला बाळाची काळजी घेण्यावर तसेच त्यास स्तनपान देण्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. नैसर्गिक उपचारांचा वापर करणे आणि वेदना खूप वाढल्यास ब्लड पॅचेसचा वापर केल्याने लवकर आराम मिळण्यास मदत होते. तसेच तुम्हाला तुमच्या आईपणाच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. आणखी वाचा: प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी प्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved