Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी प्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका

प्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका

प्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका

गरोदरपणाचा काळ हा दीर्घ आणि धकाधकीचा असू शकतो. ह्या काळात आपले शरीर बर्‍याच बदलांमधून जात असते. आपल्या शरीरास पूर्वीच्या स्थितीत परत आणण्यासाठी शरीराला मालिश करण्यासारखे दुसरे काहीही नाही. प्रसूतीनंतर मालिश केल्याने गरोदरपणात बदललेल्या स्नायू आणि ऊतींना बळकटी देण्यावर भर दिला जातो जेणेकरून तुमचे शरीर नैसर्गिक रित्या आधीसारखे बळकट होईल.

प्रसूतीनंतरची मालिश (पोस्टनेट्ल मसाज) म्हणजे काय?

प्रसूतीनंतरची मालिश (पोस्टनेट्ल मसाज) म्हणजे काय?

पोस्टनेट्ल मसाज म्हणजेच प्रसुतिनंतर शरीराचा संपूर्ण मालिश करणे होय. थोडक्यात, पारंपारिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित मसाज करणारी व्यक्ती आपल्या संपूर्ण शरीरावर पायापासून डोक्यापर्यंत मसाज करते. पारंपारिक आयुर्वेदातसुद्धा प्रसूतीनंतर आईसाठी ४० दिवस मसाजची शिफारस केली जाते. ह्या कालावधीत आई आणि मुलाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. स्थानिक औषधे आणि नैसर्गिक उपचारांसह मालिश करणे हा दिवसाच्या नित्यकर्माचा एक महत्वाचा भाग असतो.

मालिश केल्याने रक्ताभिसरण चांगले होते तसेच एन्डोरफीन ह्या संप्रेरकाची निर्मिती होते आणि त्यामुळे आरामदायक वाटण्यास मदत होते. प्रसूतीनंतर ज्या स्नायूंवर ताण पडतो अशा स्नायूंना मसाजमुळे आराम पडतो.

प्रसूतीनंतर मालिश करण्याचे १० फायदे

प्रसूतीनंतर बॉडी मसाज करण्याचे बरेच फायदे आहेत

. गर्भाशयाच्या पुनर्प्राप्तीस मदत होते

गर्भाशयाचे आकुंचन नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस मदत करते, रक्त तसेच प्रसूतीनंतरचे इतर पदार्थ काढून टाकते. प्रसूतीनंतर पोटाला मालिश केल्याने गर्भाशयाच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस मदत होते आणि बाळाच्या जन्मापूर्वी आकार आणि स्वरूप पुनर्संचयित करण्यास देखील मदत होते.

. सूज कमी होते

जड गर्भाशय आणि हार्मोनल असंतुलनांद्वारे मुख्य रक्तवाहिन्यांवरील दबाव वाढतो आणि त्यामुळे रक्ताभिसरण कमी होते ज्यामुळे पाणी शरीरात धरून ठेवले जाते आणि सांधे सूजतात. शरीराच्या मऊ ऊतकांवर काम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि अतिरीक्त द्रव आणि विष काढून टाकले जाते.

. स्तनपान सुधारते

मालिशमध्ये स्तन ऊतींना उत्तेजन देण्यासाठी विशेष तंत्रांचा समावेश आहे. हे खरं तर ऑक्सिटोसिनच्या निर्मितीस कारणीभूत ठरते ज्यामुळे मालिश चालू असतानाही आईच्या स्तनांमधून दूध सोडले जाते ह्यास लेटडाऊनरिफ्लक्सम्हणून ओळखले जाते.

. स्तनांमध्ये गाठी होण्याचा धोका कमी होतो

मालिशमुळे दुधाचा प्रवाह सुधारण्यास मदत होते, गाठी सैल होतात आणि स्तनदाह रोखण्यास मदत होते. स्तनदाह (Mastitis) म्हणजे स्तनांमधील दुग्धनलिका ब्लॉक होऊन दूध साठून राहते आणि त्यामुळे जिवाणूंचा संसर्ग होतो.

. स्थिरता, पवित्रा आणि समन्वय सुधारित करते

गरोदरपणात, मुख्य स्नायू ताणले जातात आणि अशक्त होतात. बॉडी मासमध्ये बदल झाल्यामुळे पवित्रा बदलू शकतो आणि हार्मोनल बदलांमुळे संयोजी ऊतीं सैल होतात. प्रसूतीनंतर मालिश केल्यास हा बदल उलट होऊ शकतो आणि तुमची शक्ती परत मिळवण्यासाठी तुमची मदत होऊ शकते.

. ताण कमी होतो

गरोदरपण तणावग्रस्त असू शकते आणि काही महिन्यांपर्यंत आपले शरीर बर्‍याच बदलांमधून जात असते. प्रसूतीनंतर मालिश करणे म्हणजे आपल्या शरीराला ताणतणावातून मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेला कायाकल्प होय.

. प्रसूतीनंतरच्या उदासीनतेचा सामना करण्यास मदत होते

प्रसूतीनंतर येणारी उदासीनता ही गंभीर स्थिती असू शकते. ही समस्या साधारणपणे १०१५% मातांमध्ये आढळून येते. प्रसूतीनंतर कोणत्याही स्त्रीला चिंता, तणाव आणि इतर तीव्र भावनांचा अनुभव येणे स्वाभाविक आहे. आपल्या शरीराचे ऐका आणि त्याकडे आवश्यक ते लक्ष द्या.

. सुधारण्याची गती वाढते

प्रसूतीनंतर मालिश केल्यास स्नायू बळकट होतात आणि आपल्या शरीराच्या पुनर्प्राप्तीस मदत करतात. आपल्या मुलाकडे संपूर्ण लक्ष देताना प्रसूतीच्या ताणातून मुक्त होण्यास त्यामुळे मदत होते.

. त्वचा चमकवते

मालिश केल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि ताणलेल्या ऊतींना शांत करण्यास त्यामुळे मदत होते. ह्यामुळे प्रसूतीनंतर तुमच्या त्वचेला ग्लो येतो आणि स्ट्रेच मार्क्स सुद्धा कमी होतात.

१०. गरोदरपणाच्या आधीसारखे शरीर पूर्ववत होण्यास मदत होते

गरोदरपणानंतर मसाज केल्यावर त्या विशिष्ट भागातील स्नायूंवर काम करून रक्त प्रवाह सुधारित करण्यास मदत होते. त्यामुळे पोट पूर्ववत होण्यास मदत होते. मसाज ताणलेल्या स्नायूंना मजबूत करते आणि आपले शरीर पुन्हा चैतन्यमयी होते.

तुम्ही मसाज कधी सुरू करू शकता?

ज्या स्त्रियांची सामान्य प्रसूती झाली असेल त्या रुग्णालयातून परत येताच मसाज सुरू करू शकतात. सहसा, हे प्रसूतीनंतर पहिल्या पाच दिवसातच होते. तथापि, सीसेक्शन झालेले असल्यास जखम पूर्ण बरी झाल्यानंतरच मालिश केली जाऊ शकते. त्यास सहसा एक ते दोन आठवडे लागतात. अशा परिस्थितीत मालिश सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घेणे चांगले. तसेच, जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी मालिश आदर्शपणे ४० दिवस सतत करणे आवश्यक आहे.परंतु, बऱ्याचशा नोकरदार स्त्रिया वेळेअभावी त्या करणे टाळतात.

सिझेरिअन प्रसूती झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

सिझेरिअन प्रसुतीनंतर मसाज घेण्याच्या बाबतीत, एक ते दोन आठवड्यांनंतर आणि डॉक्टरांकडून परवानगी घेतल्यानंतर सुरू करणे चांगले. कारण जखम बरी होण्याची गरज असते. त्या क्षेत्राच्या सभोवतालची त्वचा खेचण्याचा धोका असतो. मालिश सुरू केल्यानंतरही, मसाज करणाऱ्या व्यक्तीला त्या भागापासून दूर रहाण्यास सांगा आणि केवळ उर्वरित भागाची मालिश करा.

सिझेरिअन प्रसूती झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

प्रसूतीनंतर मालिश करणे आपण केव्हा टाळले पाहिजे?

मालिश करण्यास जाण्यापूर्वी आपण खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे:

  1. तुम्हाला एक्झामा किंवा रॅशेसची कोणतीही समस्या नाही ना ह्याची खात्री करा कारण मालिशमुळे ती वाढू शकते. कोणतीही संवेदनशीलता ओळखा आणि जी व्यक्ती मालिश करीत आहे त्याला सावध करा.
  2. मालिश करताना आपल्या शरीरासाठी कोणतेही तेल किंवा औषधाची निवड करताना सुद्धा हेच लागू होते. तसेच, आपल्या स्तनाग्रावर उत्पादने लागू करणे टाळा, जेणेकरून ते बाळाच्या तोंडात जाण्याचा धोका राहणार नाही.
  3. पॅराबेन्स असलेली उत्पादने वापरणे टाळा. पॅराबेन्स संप्रेरकांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतात तसेच त्यामुळे स्तन आणि इतर कर्करोग होण्याचा धोका असतो.
  4. ज्या महिलांना उच्च रक्तदाब किंवा हर्नियासारखी परिस्थिती आहे त्यांनी मसाज करणाऱ्या लोकांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे आणि मालिश केल्यामुळे ह्या समस्या वाढणार नाहीत ना ह्याची खात्री केली पाहिजे.
  5. ज्या स्त्रियांनी सतत सराव कळा (ब्रेक्सटनहिक्स) अनुभवलेल्या आहेत त्यांना देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  6. गर्भावस्थेद्वारे प्रेरित हायपरटेन्शन (पीआयएच), पूर्वीच्या किंवा सध्याच्या उच्चजोखमीच्या गर्भधारणेसारख्या परिस्थितीत मालिश करण्यापूर्वी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  7. जास्त सूज येणे किंवा अचानक गंभीर डोकेदुखी ह्यासारख्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
  8. मालिश दरम्यान मोठ्या प्रमाणात ताणलेल्या कोणत्याही स्नायूंना पुरेसे समर्थन प्रदान करणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, वजन आणि प्रसूतीच्या दबावामुळे गुदाशय स्नायू विभक्त करणारा रेखीय अल्बा जास्त प्रमाणात ताणला जाऊ शकतो. मसाज दरम्यान, अशा भागांना कसून एकत्र केले पाहिजे.

शरीराची कोणती स्थिती सुरक्षित आहे?

गर्भारपणाप्रमाणेच, प्रसूतीनंतर पोटाची मालिश करण्याची उत्कृष्ट स्थिती म्हणजे साइडलायिंगस्थिती होय. पाठीला आधार सहसा उशी वापरून दिला जातो. ओटीपोटातील भागासाठी खोल खळगा असलेली टेबल्स वापरणे टाळावे त्यामुळे शरीरावर सगळीकडे एकसारखा दाब पडत नाही.

प्रसूतीनंतरची मालिश करताना सौम्य गोलाकार हालचालींपासून क्रॅनिओसॅक्रल थेरपीसारखी सखोल तंत्रे वापरली जातात. क्रेनियोसाक्रल थेरपीमध्ये, आईला धोकादायक असलेली गंभीर डोकेदुखी कमी करण्यासाठी मान, चेहरा आणि कपाळावर लक्ष केंद्रित केले जाते. मोहरीच्या तेलापासून (उष्ण तेल) ते तीळाचे तेल (थंड तेल) मालिशसाठी वापरले जाते. नारळ, बदाम किंवा विशेष तयार आयुर्वेदिक तेलांचा सुद्धा मसाजसाठी उपयोग केला जाऊ शकतो. तथापि, तुम्हाला कुठल्याही तेलाची ऍलर्जी नसल्याचे सुनिश्चित करा. ऍक्युप्रेशर, इंडोनेशियातील जुमु मसाज, स्वीडिश मालिश इ. मालिश करण्याची वेगवेगळी तंत्रे आहेत. ‘फूट रिफ्लक्सओलॉजीचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता.

नवीन मातांना त्यांच्या शरीरावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रसवोत्तर मालिश करणे एक उत्तम साधन आहे. सर्व सावधगिरी लक्षात घेऊन डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार तुम्हाला अनुकूल असलेल्या गोष्टीची तुम्ही निवड करू शकता.

आणखी वाचा:

प्रसूतीनंतर खावेत असे २० भारतीय अन्नपदार्थ
प्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती वेळ वाट पहावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article