गर्भारपण

सिझेरीयन प्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती काळ वाट पहावी?

सी- सेक्शन झाल्यावर तुम्हाला, बाळाच्या काळजीविषयीच्या प्रश्नांव्यतिरिक्त आणि एक प्रश्न पडेल आणि – तो म्हणजे “मी माझ्या लैंगिक आयुष्याला केंव्हा आणि कशी सुरुवात करू शकते?” - तुमच्या अगदी ओठावर हा प्रश्न असेल. ह्या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुमचे शरीर आणि मन तयार असल्याची आधी खात्री करा. तुमच्या पतीला तुमच्या चिंता आणि भावनांची जाणीव असणे देखील महत्त्वाचे आहे. साहजिकच, तुमच्यापुढे खूप आव्हाने असतील तसेच तुम्हाला 'पहिल्यांदा' वाटली होती तशी भीती देखील वाटू शकेल.

सिझेरियन प्रसूती नंतरची पुनर्प्राप्ती

सी-सेक्शननंतर, जखम पूर्णपणे बरी होण्यासाठी सुमारे सहा आठवडे लागतील आणि प्रसूतीनंतर बरेच आठवडे शरीराचा तो भाग नाजूक असेल. बर्‍याच स्त्रियांना शस्त्रक्रियेच्या जागी सुन्नपणा आणि मुंग्या येणे जाणवते, परंतु ते अगदी सामान्य आहे. जोपर्यंत उलट्या किंवा तापासारखी लक्षणे दिसत नाहीत, तोपर्यंत जरी अस्वस्थ वाटत असेल तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. शस्त्रक्रियेच्या जागी कोणताही रक्तस्त्राव, स्त्राव किंवा वेदना जाणवल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांना कळवावे.

सी-सेक्शन नंतर तुम्ही कधी संभोग करू शकता?

सी-सेक्शननंतर सेक्ससाठी किती वेळ वाट पाहायची असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर येथे काही तथ्ये आहेत. ह्या तथ्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. सामान्य प्रसूतीच्या बाबतीत,तुमचे गर्भाशय पूर्ववत होण्यासाठी किमान सहा आठवडे लागतील. परंतु, ज्यांचे सी सेक्शन झालेले आहे त्यांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागेल. तुमचे शरीर स्वतःच्या गतीने बरे होईल, म्हणूनच तुमच्या शरीराला आवश्यक प्रमाणात विश्रांती देणे आणि बरे होण्यासाठी काळजी घेणे चांगले. बहुतेक स्त्रियांना त्यांच्या पतीसोबत पुन्हा  लैंगिक संबंध सुरू करण्यासाठी सी-सेक्शन प्रसूतीनंतर सुमारे सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो.

सिझेरिअन प्रसूतीनंतर लैंगिक संबंध ठेवताना काय अपेक्षित आहे?

सिझेरियन नंतरचे लैंगिक संबंध आधीपेक्षा खूप वेगळे वाटतील.  बाळाच्या जन्मानंतर तुमच्या योनीवर थेट परिणाम झालेला नसल्यामुळे, प्रक्रियेनंतर ६ आठवडे थांबणे का आवश्यक आहे असा प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या पतीला पडू शकतो. परंतु सी-सेक्शनमधून पुनर्प्राप्ती एका क्षणात होत नाही आणि पोटाकडील संपूर्ण भाग खूप नाजूक झालेला असतो. तुमच्या मनातील कोणतीही भीती तुम्हाला तुमच्या पतीला सांगावी लागेल. बाळाच्या जन्मानंतर तुम्ही लैंगिक संबंधांमध्ये सहभागी होण्याबद्दल चिंताग्रस्त होऊ शकता, परंतु ते सामान्य आहे. तुम्हाला शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या संभोगासाठी तयार व्हावे लागेल, त्यामुळे वेळ घ्या. संभोगापूर्वी रोमँटिक बोलणे, मूड सेट करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  मसाज किंवा अगदी मिठी मारणे यांसारख्या फोरप्लेमध्ये गुंतल्यास तुम्हाला बरे वाटण्यास खूप मदत होऊ शकते. तुम्हाला जर पोस्ट-सिझेरियन सेक्स दरम्यान असामान्य वेदना किंवा अत्यंत अस्वस्थता जाणवत असेल तर तुमच्या पतीशी आणि डॉक्टरांशी बोला.

कुठल्या लैंगिक स्थिती (सेक्स पोझीशन्स) तुम्ही टाळल्या पाहिजेत?

तुमच्या डॉक्टरांनी सी-सेक्शननंतर लैंगिक संबंध ठेवण्याची सूचना दिल्यावर, त्यापूर्वी तुम्ही खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मिशनरी पोझिशन तुम्ही टाळली पाहिजे कारण त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी खूप दबाव येऊ शकतो आणि यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या ओटीपोटावरील शस्त्रक्रियेच्या भागाचा  कोणताही थेट संपर्क टाळायचा असेल, तर संभोग करताना बाजूने किंवा मागून लिंगप्रवेशाची स्थिती वापरा. शस्त्रक्रिया केलेल्या भागावर दाब पडू नये म्हणून वूमन-ऑन-टॉप स्थितीची देखील शिफारस केली जाते. कोणत्याही सेक्स पोझिशनचा प्रयत्न करताना तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता येत असल्यास तुमच्या पतीला तसे सांगा. ह्या काळात तुम्ही यापूर्वी कधीही न केलेल्या कोणत्याही नवीन सेक्स पोझिशन करण्याचा  प्रयत्न करू नका.

सिझेरियन प्रसूतीनंतर लैंगिक संबंधांसाठी काही उपयुक्त टिप्स

सी-सेक्शन नंतर लैंगिक संबंधांबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे. तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल किंवा त्यामुळे होणाऱ्या वेदनांबद्दल तुम्हाला खरोखर काळजी वाटत असेल. तसेच, एक गृहितक आहे की सिझेरियन प्रसूतीमुळे योनिमार्गाला सामान्य प्रसूतीच्या कोणत्याही परिणामापासून मुक्तता मिळते. पण हे फक्त एक मिथक आहे - सत्य हे आहे की, सी-सेक्शन असतानाही तुमची योनी बर्‍याच गोष्टींशी संबंधित आहे. बर्‍याचदा, योनीमार्गे प्रसूती होत नाही तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत सी-सेक्शन केले जाते. म्हणजेच शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या योनीमार्गावर थोडासा दबाव टाकला असण्याची शक्यता असते आणि त्याचा योनीवर परिणाम होतो. तसेच, बाळाच्या जन्मानंतर हार्मोनल बदलांमुळे योनिमार्गात कोरडेपणा देखील जाणवू शकतो. तर, तुमचा अनुभव सुलभ करण्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

गर्भनिरोधक विसरू नका!

तुमची मासिक पाळी अद्याप सुरू झाली नसली तरी ओव्यूलेशन होत असेल आणि म्हणूनच, गर्भनिरोधक पद्धतींचा विचार करणे फार महत्वाचे आहे. प्रसूतीनंतरच्या तुमच्या डॉक्टरांच्या भेटीदरम्यान गर्भधारणेची शक्यता रोखण्यासाठी सर्वोत्तम गर्भनिरोधकांबद्दल बोला. ह्या संवेदनशील समस्येला सामोरे जाताना तुम्हाला खूप संयमाची आवश्यकता असेल आणि त्यास विनोदाची झालर असल्यास ते उपयुक्त ठरेल. तुमचे लैंगिक जीवन सामान्य होण्याआधी सुरुवातीला अस्वस्थता येईल. सी- सेक्शन प्रसूतीनंतरच्या लैंगिक संबंधांनंतर कोणत्याही असामान्य वेदना किंवा रक्तस्त्राव झाल्यास वेळेवर सल्ला किंवा मदत घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. आणखी वाचा: प्रसूतीनंतर होणारी सांधेदुखी प्रसूतीनंतरची मालिश
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved