In this Article
लोणी कढवून तूप तयार केले जाते . तुपाला एकप्रकारचा उग्र वास असतो. लोण्यातील सर्व पाण्याची वाफ होईपर्यंत लोणी उकळून घेतल्यावर, दुधातील घनपदार्थ वेगळे होतात. हे घनपदार्थ काहीवेळ उकळवत सुगंध ठेवल्यास सुगंध येतो आणि खमंग चव येते. तूप हा पोषणाचा चांगला स्रोत आहे आणि बाळाच्या आहारात त्यांचा समावेश केल्याने बाळांसाठी तूप हे अत्यंत फायदेशीर आहे.
तूपाचे पौष्टिक मूल्य
- तूप हे ओमेगा – ३ आणि ओमेगा – ९ सारख्या फॅटी ऍसिड्सने समृद्ध आहे.
- तूपामध्ये ए, डी, ई आणि के ही जीवनसत्वे असतात. तुपातील व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी हाडांच्या विकासासाठी आवश्यक असते, कारण ते कॅल्शियम उत्पादनास मदत करते.
- एक चमचाभर तूपामध्ये १०८ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए असते. आणि ते दररोज शिफारस केलेल्या डोसच्या १२–१५% असते.
- तूप हे त्याच्या अँटी–मायक्रोबियल, अँटिऑक्सिडंट आणि दाहक–विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म हानिकारक मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.
- तूप पचनास मदत करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती व दृष्टी सुधारण्यासाठी ओळखले जाते.
- अभ्यासानुसार असे आढळले आहे कि (कार्सिनोजेन्स ही रसायने कर्करोगास कारणीभूत असतात) तूप हे शरीरातून कार्सिनोजेन्स काढून टाकण्यास देखील मदत करू शकते. तूप यकृतातील एन्झाईम्सची क्रिया कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते. ही क्रिया असे कार्सिनोजेन्स सक्रिय करण्यासाठी जबाबदार असते.
- अभ्यासातून असेही दिसून आले आहे की तूप शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) चे स्तर कमी करण्यास मदत करू शकते.
- तुपामध्ये डीएचए असते, हे डीएचए मेंदूच्या विकासात मदत करते आणि स्मरणशक्ती सुधारते.
- तुपामध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात आणि अशा प्रकारे, आईच्या दुधापासून मुक्त झाल्यानंतर बाळांचे वजन वाढण्यास त्यामुळे मदत होते.
तुमच्या बाळाच्या आहारात तूप कधी समाविष्ट करावे?
बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर बाळाच्या आहारात तूपाचा समावेश केला जाऊ शकतो. बाळाच्या डाळ खिचडी मध्ये तूपाचे काही थेंब घालून तुम्ही बाळाला तूप देण्यास सुरुवात करू शकता. बाळाची वाढ होत असताना तुम्ही हळूहळू हे प्रमाण वाढवू शकता. परंतु, एका चमच्यापेक्षा जास्त तूपाचा समावेश तुम्ही बाळाच्या आहारात करू नका. इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणेच तुम्ही तूपाचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
तुम्ही तुमच्या बाळाला किती तूप देऊ शकता?
तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तूप खूप फायदेशीर आहे. परंतु, दररोज मर्यादित प्रमाणात तूप सेवन करणे महत्वाचे आहे. जास्त तूपामुळे पचनाच्या समस्या, भूक न लागणे आणि वजनात वाढ होऊ शकते. खाली दिलेला तक्ता हा तूपाचे प्रमाण आणि तुमच्या बाळाच्या वयासाठी योग्य असलेल्या सर्व्हिंगची संख्या दर्शवते.
तुमच्या बाळाला किती तूप द्यावे?
बाळाचे वय | तुपाचे प्रमाण |
प्रतिदिन सर्विंग्सची संख्या
|
६ महिने | १/२ टीस्पून | २ |
८ महिने | ३/४ ते १ चमचे | २ |
१० महिने | १ ते १ १/४ चमचे | ३ |
१ वर्ष | १ ते १ १/२ चमचे | ३ |
२ वर्षे | ११/२ ते २ चमचे | ३ |
तुमच्या मुलाच्या आहारात तूपाचा समावेश कसा करावा?
तुमच्या बाळाच्या आहारात तूपाचा विविध प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. तुम्ही बाळाच्या डाळ किंवा खिचडीमध्ये तूपाचे काही थेंब टाकून सुरुवात करू शकता. तुम्ही बाळाच्या भाजीच्या प्युरीमध्ये किंवा मॅश केलेल्या बटाट्यातही तूप घालू शकता. बाळाच्या लापशीमध्ये तूपाचे काही थेंब देखील घालता येतात. लहान मुलांसाठी तुम्ही चपात्या किंवा पराठ्यांवर लोण्याऐवजी तूप लावू शकता. स्वयंपाकाच्या तेलाऐवजी तूपही कमी प्रमाणात वापरता येते. तुम्ही ब्रेडवर नेहमीच्या सॉल्टेड बटरऐवजी तूप वापरू शकता.
लहान मुलांसाठी तुपाचे फायदे
तूपाचे माफक प्रमाणात सेवन लहान मुलांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या लहान बाळासाठी तूप फायदेशीर आहे कि नाही ह्याचा जर तुम्ही विचार करीत असाल तर लहान मुलांसाठी तूपाचे कुठले फायदे आहेत ह्याची यादी खाली दिलेली आहे.
- वजन वाढण्यास मदत होते: तुपामध्ये हेल्दी फॅट्स आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात. आईचे दूध सोडल्यानंतर वजन वाढविण्यात तुपामुळे मदत होऊ शकते.
- हाडे मजबूत करण्यास मदत करते: तूपामध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे उत्पादन वाढण्यास मदत होते. हाडांच्या मजबूत विकासासाठी तूप आवश्यक आहे.
- रोगप्रतिकारशक्ती सुधारते: तूप त्याच्या अँटी–मायक्रोबियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते. संक्रमण, खोकला आणि सर्दीविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी तूपाची मदत होते.
- पचनास मदत करते: तूपामध्ये ब्युटीरिक ऍसिड नावाचे शॉर्ट–चेन फॅटी ऍसिड असते आणि ते जळजळ कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. तूप पोटातील आम्ल स्राव देखील उत्तेजित करते, आणि ते अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी मदत करते.
- तुपामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात: तूपामध्ये कॅल्शियम असते. हे कॅल्शिअम हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये असंख्य जीवनसत्त्वे आणि डीएचए देखील आहेत – हे एकत्रितपणे डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर आहेत. अशा प्रकारे, तूप तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले ठेऊ शकते.
- कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यास मदत होऊ शकते: लहान मुलांमध्ये कोरड्या खोकल्यावर मिरपूड आणि तुपाच्या मिश्रणाने उपाय केला जाऊ शकतो. हे करण्यासाठी, दोन चमचे तूप गरम करा आणि त्यात ३–४ मिरे घाला. हलकेच परतून घ्या आणि गॅस बंद करा. हे मिश्रण नंतर चाळून घ्या आणि लहान मुलांना तूप आणि मिऱ्याचे मिश्रण द्या.
- एक्झिमा वर उपचारासाठी वापरले जाते: लहान मुलांमध्ये एक्झिमा आणि खाज सुटलेल्या त्वचेवर उपचार करण्यासाठी तूप वापरले जाऊ शकते. प्रभावित भागाला ओलसर ठेवण्यासाठी फक्त थोडे तूप लावा. तूप जळजळ कमी करते आणि अँटी–मायक्रोबियल एजंट म्हणून कार्य करते तसेच तूप संक्रमण आणि एक्झिमचा प्रसार रोखते.
- थायरॉईड कार्य नियंत्रित करते: तूपामध्ये आयोडीन असते, आणि ते थायरॉईड ग्रंथीच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असते.
बाळाला जास्त तूप देणे धोक्याचे आहे का?
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असू शकतो आणि हेच तुपाच्या बाबतीत सुद्धा लागू होते. मध्यम प्रमाणात तूपाचे सेवन करणे चांगले असते. मात्र, तुपाच्या अतिसेवनाने शरीरात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अपचन आणि भूक कमी होते. तूपात फॅट्स आणि कॅलरीज जास्त असल्याने तूपाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास लठ्ठपणा आणि हृदयविकार होऊ शकतो. म्हणूनच, लहान मुलांसाठी तुपाचा वापर दररोज १ किंवा ११/२ चमचे इतका मर्यादित करणे महत्वाचे आहे.
वाढत्या बाळासाठी तूप मर्यादित प्रमाणात घेतल्यास त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. जेव्हा बाळांचे स्तनपान सोडवले जाते तेव्हा त्यांचे वजन कमी होऊ लागते. बाळांना तूप दिल्याने त्यांना त्यांच्या वयानुसार योग्य वजन वाढण्यास आणि राखण्यास मदत होते. तूपामध्ये कॅलरीज सुद्धा जास्त प्रमाणात असतात. नुकत्याच चालायला लागलेल्या मुलांना खूप ऊर्जा लागते आणि म्हणूनच लहान मुलांना तूप खायला दिले जाऊ शकते. परंतु, आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
आणखी वाचा:
बाळांसाठी लसूण – फायदे आणि रेसिपीज
बाळांसाठी डाळीचे पाणी (वरणाचे पाणी) : फायदे आणि पाककृती