In this Article
लसूण हा स्वयंपाकातील एक लोकप्रिय घटक आहे. लसणामुळे कुठल्याही पदार्थाची चव वाढते. पदार्थात लसूण घातला नाही तर त्याला तितकीशी चव येत नाही. लसणाचे औषधी मूल्य खूप जास्त आहे. तुमच्या आजीने तुम्हाला लसणाच्या औषधी गुणधर्मांबद्दल सांगितलेच असेल. सर्दी खोकल्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसणाचा कसा उपयोग होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. अर्थातच, लसणाचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत, परंतु लसूण बाळासाठी चांगला आहे का? बर्याच नवीन मातांना त्यांच्या बाळाला लसूण देण्याबाबत खात्री नसते. म्हणून, तुम्ही तुमच्या बाळाला लसूण देऊ शकता की नाही हे ठरविण्यात मदत करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे. लसूण लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का आणि तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात लसूण कधी समाविष्ट करू शकता ह्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे.
लसूण लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का?
लसूण बाळाला सुरक्षित पद्धतीने खायला दिल्यास काहीही नुकसान होत नाही. लसणाची ऍलर्जी होऊ शकते परंतु लसणाची ऍलर्जी झालेल्या घटना अतिशय दुर्मिळ आहेत. लसणाची तीव्र आणि तिखट चव तुमच्या बाळासाठी थोडी जास्त होऊ शकते म्हणून सुरुवातीला फक्त थोड्या प्रमाणात लसूण वापरणे चांगले असते.
बाळाच्या आहारात लसणाचा समावेश कधी करावा?
तुमच्या बाळाच्या आहारात लसणाचा समावेश करण्यासाठी विशिष्ट अशी कोणती वेळ नाही. बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर काही माता बाळाच्या आहारात लसणाचा समावेश करू शकतात. तर काही जणी एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ वाट बघू शेतात. बाळ १०–११ महिन्यांचे झाल्यावर डॉक्टर सहसा कोणत्याही प्रकारचे घन पदार्थ आणि विशेषत: लसणासारख्या तीव्र पदार्थांची ओळख करून देण्याची शिफारस करतात.
लसणाचे पौष्टिक मूल्य
लसणामध्ये कुठले घटक आहेत ते माहिती करून घेऊया कारण लसणात असलेले घटक लसणाला पौष्टिक बनवतात. १०० ग्रॅम लसणामध्ये, खालील घटक असतात.
घटक | प्रमाण |
फायबर | २.१ ग्रॅम |
कर्बोदके | ३३.१ ग्रॅम |
प्रथिने | ६.४ ग्रॅम |
कॅलरीज | १४९ |
सोडियम | १७ मिग्रॅ |
लोह | १.७ मिग्रॅ |
Source: http://nutritiondata.self.com/facts/vegetables-and-vegetable-products/2446/2
लहान मुलांसाठी लसणीचे आरोग्यविषयक फायदे काय आहेत?
लसणाच्या असंख्य फायद्यांमुळे बरेच लोक बाळाच्या आहारात लसणाचा समावेश करतात. हे फायदे दीर्घकाळ टिकणारे असू शकतात.
१. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
लसणामुळे शरीरातील पेशी, इओसिनोफिल, डेंड्रिटिक पेशी, नैसर्गिक संरक्षण पेशी आणि लिम्फोसाइट्स यांना उत्तेजित होऊन बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय, लसणामुळे सायटोकाइन स्त्राव उत्तेजित होतो त्यामुळे चयापचय सुधारते आणि लठ्ठपणा टाळला जातो.
२. कर्करोगाचा धोका कमी होतो
जेव्हा लसूण बारीक करून दिला जातो तेव्हा लसणामध्ये असलेले गुणधर्म एखाद्या व्यक्तीला बॅक्टेरिया, विषाणू आणि ऑक्सिडंट्सपासून वाचवतात कारण त्यामध्ये ऑर्गोसल्फर संयुगे जास्त प्रमाणात असतात. हे सर्व घटक एकत्रितपणे रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करण्यासाठी कार्य करतात त्यामुळे बाळाचे तोंड, पोट आणि मूत्रपिंडासारख्या विविध प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण होते.
३. हृदयाचे आरोग्य नियंत्रणात ठेवते
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे संकलन लहानपणापासून सुरू होते त्यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी सुरुवातीपासूनच नियंत्रणात ठेवली पाहिजे. लसूण रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो तसेच भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
४. आतड्यातील जंतांविरुद्ध लढा
कृमी अन्नाद्वारे बाळाच्या पोटात आणि आतड्यात प्रवेश करू शकतात किंवा त्यांची अंडी आतड्यात वाढू शकतात त्यामुळे संक्रमण आणि इतर रोग होतात. ह्या जंतांचा नाश करण्यासाठी लसूण हा एक उत्तम उपाय आहे.
५. सूक्ष्मजीव संक्रमण आणि सर्दीपासून संरक्षण करते
आतड्यांमध्ये चांगले तसेच वाईट जिवाणू दोन्ही असतात. संसर्गाशी लढण्यासाठी कोणतेही औषध सामान्यत: कुठलाही फरक न करता सर्व जीवाणू नष्ट करते. परंतु, लसणामध्ये फायटोकेमिकल्स असतात. हे फोटोकेमिकल्स केवळ हानिकारक जीवाणू काढून टाकण्यास मदत करतात. शिवाय, ते बाळाला बरे करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराला मदत करतात. हवामानातील बदल आणि अत्यंत तीव्र हवामानामुळे बाळांना सर्दी आणि खोकला होऊ शकतो. खोकला आणि सर्दीवर उपचार करण्यासाठी लसूण खूप प्रभावी आहे. लसणातील तेले श्वसनमार्गाला सामान्य पातळीवर आणण्याचे काम करतात, तर प्रतिजैविक गुणधर्म हा आजार निर्माण करणारे विषाणू आणि जिवाणूंशी लढा देतात.
लहान मुलांसाठी लसूण किती सुरक्षित आहे?
बाळाला लसणाची ओळख करून देताना ती काळजीपूर्वक करा. कोणत्याही नवीन खाद्यपदार्थाप्रमाणे, बाळाच्या आहारात लसणाचा समावेश करताना ऍलर्जीची शक्यता तपासून पाहणे आवश्यक आहे. म्हणून, सर्वात आधी लसणाची फक्त एक लहान पाकळी द्या. जर काही दिवस कोणतीही समस्या दिसत नसेल, तर तुम्ही बाळाला पुन्हा एखादी लसणाची पाकळी देऊ शकता किंवा हळू हळू थोडा अधिक लसूण देऊ शकता, परंतु मोठी माणसे खातात तेवढा लसूण बाळाला देऊ नका.
बाळाला लसूण देताना करावयाच्या उपाययोजना
लसूण कोणत्याही स्वरूपात बाळाला देण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. बाळाला लसूण देण्यापूर्वी तुम्ही खालील गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
१. योग्य लसूण निवडा
स्वच्छ, पांढरी आणि रसाळ अशी लसणाची पाकळी घ्या. स्वयंपाक करताना लसूण तुमच्या बाळाच्या अन्नात घाला. कच्च्या स्वरूपात देणे टाळा.
२. लसणाची तीव्र चव नियंत्रित करा
जर तुमच्या बाळाला लसणाचा वास किंवा चव ह्याची प्रतिकूल प्रतिक्रिया येत असेल, तर सुरुवातीला काही वेळा त्यामध्ये थोडी साखर घाला. खूप जास्त लसूण बाळाला देऊ नका.
लहान बाळांसाठी लसूण असलेली स्वादिष्ट पाककृती
बाळाने एकदा घन पदार्थ घेण्यास सुरुवात केली की लसूण तुम्ही बाळाच्या आहाराचा एक भाग बनवू शकता. बाळाच्या आहारात लसणाचा समावेश करण्यासाठी काही मार्ग खाली दिलेले आहेत.
१. लसूण रोटी
बाळ एक वर्षांचे झाल्यानंतरच त्याला लसूण रोटी द्या. त्याआधी देऊ नका. त्यामुळे त्याला चव समजेल आणि तो लसूण रोटीचा आनंद घेऊ शकेल.
साहित्य
- कोथिंबीर
- लोणी
- रोटी
- लसूण
कृती
- लसणाची पाकळी ठेचून घ्या. एका भांड्यात धणे आणि बटर तसेच हा ठेचलेला लसूण ठेवा.
- हे सर्व एकत्र करून मिश्रण रोटीवर घाला.
- आता ही रोटी जोपर्यंत ते चव येत नाही तोपर्यंत एका तव्यावर उच्च तापमानावर सुमारे १० मिनिटे भाजून घ्या.
२. भारतीय रस्सम
ही पाककृती उच्च पौष्टिक मूल्यामुळे ओळखली जाते
साहित्य
- तेल
- मीठ
- जिरे
- पाणी
- काळी मिरी
- लसूण
- टोमॅटो
कृती
- एका कढईत काळे मिरे, लसूण आणि जिरे थोडे तेल घालून परतून घ्या आणि बाजूला ठेवा.
- पाणी आणि टोमॅटो सुमारे ८ मिनिटे उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या.
- टोमॅटोचे साल वेगळे करण्यासाठी सर्व साहित्य व्यवस्थित मॅश करा आणि गाळून घ्या. त्यामध्ये तळलेले पदार्थ टाका आणि सूपच्या स्वरूपात किंवा भातासोबत तुमच्या बाळाला द्या.
३. चिकन लसूण सूप
रात्रीच्या जेवणाच्या वेळी तुमच्या बाळाला चिकन लसूण सूप द्या.
साहित्य
- मीठ
- मिरी
- कांदा
- पाणी
- लसूण
- आले
- चिकन, बोनलेस
कृती
- सर्व साहित्य प्रेशर कुकरमध्ये ठेवा. साधारण मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. नंतर, गॅस कमी करा आणि आणखी १५ मिनिटे शिजू द्या.
- सूप गाळणीने गाळून घ्या आणि गरम असतानाच तुमच्या बाळाला घेऊ द्या.
कोणतेही पौष्टिक अन्न जेव्हा योग्य प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा त्याचे फायदे मिळतात. लसणाचेही Bतसेच आहे, जेव्हा ते योग्य स्वरूपात बाळाला दिले जाईल तेव्हा तुमच्या बाळाला त्याचा उत्तम फायदा होईल.
आणखी वाचा:
बाळांसाठी आरारूट: बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी एक उत्तम पदार्थ
बाळांसाठी धान्य (बाजरी) – प्रकार, आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती