In this Article
साबुदाणा हा बर्याचदा त्यामधील पिष्टमय पदार्थ आणि मर्यादित पोषक घटकांमुळे एक आरोग्यदायी पर्याय मानला जात नाही. परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये असलेले पिष्टमय पदार्थ आणि कर्बोदके हे शुद्ध आहेत, त्यामुळे ते मुलांसाठी उत्तम आहेत. साबुदाणा पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहे आणि बाळाच्या शारीरिक विकासात तो मदत करतो.
साबुदाणा म्हणजे काय?
टॅपिओकाच्या मुळांमधून पिष्टमय पदार्थ काढले जातात आणि त्यावर जोरदार दाब देऊन मोत्यासारखे दाणे पडले जातात हे मोती साबुदाणा म्हणून लोकप्रिय आहेत.
तुम्ही बाळांना साबुदाणा देऊ शकता का?
टॅपिओका मध्ये पौष्टिक गुणधर्म नाहीत हे सर्वज्ञात आहे. साबुदाणा म्हणजे टॅपिओकामधून काढलेले पिष्टमय पदार्थ आहेत, याचा अर्थ असा की त्यामध्ये पोषणमूल्ये फारच कमी असतात. तथापि, हा पिष्टमय पदार्थांचा सर्वात शुद्ध प्रकार आहे आणि म्हणूनच तो कर्बोदकांच्या एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. “साबुदाणा मुलांसाठी चांगला आहे का?” असा तुम्ही विचार करीत असल्यास त्याचे उत्तर आहे. “होय, तो आहे!” जरी त्याचे पौष्टिक गुणधर्म कमी असले तरी सुद्धा त्याच्या साध्या स्वरूपामुळे, बाळाला साबुदाणा आहार म्हणून दिला जाऊ शकतो
बाळांसाठी साबुदाण्याचे फायदे
साबुदाणा बाळाच्या विकासासाठी फायदेशीर आहे आणि बाळाच्या जन्माच्या सहा महिन्यांनंतर मुख्य आहाराचा तो एक भाग मानला जाऊ शकतो. साबुदाणा खालीलप्रमाणे मदत करतो:
१. स्नायूंची वाढ
साबुदाण्यात कमी प्रमाणात प्रोटीन असते. शाकाहारी प्रथिनांचा तो हा एक नैसर्गिक स्रोत आहे.
२. हाडांचा विकास
साबुदाणामध्ये कॅल्शियमही आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांत बाळाला कॅल्शिअमची आवश्यकता असते, कारण त्या काळात बाळ अद्याप आपल्या शरीराची शक्ती वापरण्यास शिकत असते. बाळाच्या नियमित आहारामध्ये साबुदाण्याचा समावेश केल्यास बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आवश्यक कॅल्शियम मिळण्यास मदत होते.
३. रक्ताभिसरण
साबुदाणामध्ये पोटॅशियमची पातळी जास्त आहे आणि म्हणूनच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीच्या कामात मदत करते. बाळाने दररोज साबुदाण्याचे सेवन केल्यास रक्त प्रवाह आणि रक्त परिसंचरण याची काळजी घेतली जाते.
४. वजन वाढणे
पिष्टमय पदार्थ आणि कर्बोदकांनी समृद्ध असलेला साबुदाणा बाळाला चांगली चरबी आणि स्नायू मिळविण्यात मदत करते. जर बाळाचे वजन कमी आहे असे तुम्हाला वाटले, तर तुम्ही साबुदाणा त्याच्या मुख्य आहाराचा एक भाग बनवण्याचा विचार केला पाहिजे.
५. नियमित पचन
साबुदाणा हा स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सचा शुद्ध (प्रक्रिया न केलेला) प्रकार आहे. म्हणूनच, तो पचायला सोपा आहे तसेच पाचक प्रणालीसाठी देखील चांगला आहे. जर एखाद्या बाळाला बद्धकोष्ठता असेल तर त्याला साबुदाणे खायला द्या, म्हणजे त्याला आराम पडेल.
६. शारीरिक तापमान नियमन
साबुदाण्याचा बाळाच्या शरीरावर थंड प्रभाव देखील असतो. साबुदाणा अशा प्रकारे, बाळाचे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते जेणेकरून बाळाचे शरीर गरम होऊन बाळ अस्वस्थ होणार नाही.
७. उपासमार दूर ठेवते
साबुदाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण इतके जास्त आहे की त्यामुळे थकवा दूर होतो आणि उर्जा पातळी वाढते साबुदाणा सहज पचवता येतो, परंतु त्याचे विघटन हळूहळू होते, म्हणून दिवसातून एकदा खाल्ल्यास भूक लागत नाही
आपल्या बाळासाठी स्वादिष्ट साबुदाणा पाककृती
साबुदाणा विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, परंतु आपल्याला मुलांसाठी खाद्य रेसेपी सोपी ठेवण्याची आवश्यकता आहे. बाळांसाठी तीन लोकप्रिय साबुदाणा पाककृती येथे देत आहेत.
- साबुदाण्यासारखा नवीन आहार बाळाला देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- ऍलर्जिक प्रतिक्रिया आढळल्यास बाळाला साबुदाणा खायला देऊ नका.
- या पाककृतींमध्ये वापरलेले आईचे दूध, फॉर्मुला, गाईचे दूध किंवा दुग्धशाळेचे असू शकते (केवळ बाळ दुग्धशाळेचे दूध पिण्यास पुरेसे मोठे असल्यास).
- १२ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी गोड पदार्थ म्हणून मध देऊ नका.
साबुदाणा तयार करणे:
- साबुदाण्याचे दाणे धान्यांप्रमाणे धुवावे लागतील.
- एकतर तुम्ही ते रात्रभर भिजवू शकता किंवा धुतलेले दाणे अर्धपारदर्शक होईपर्यंत उकळवा.
- साबुदाणा शिजवण्यापूर्वी कोणत्याही पध्दती अनिवार्य आहेत.
१. बाळांसाठी साबुदाणा खीर रेसिपी
साहित्य
- १/२ कप साबुदाणा
- १ कप दूध
- १/२ चमचा गूळ
- १/४ टीस्पून वेलची
- १ टीस्पून तूप (पर्यायी)
- १ टीस्पून मनुका
- पाणी
कसे बनवावे?
- साबुदाणा धुवून भिजवा.
- कढईत थोडे दूध उकळवा.
- थोड्या पाण्यासहीत उकळत्या दुधात साबुदाणा घाला. जळून जाऊ नये म्हणून ज्योत कमी ठेवा.
- त्याची चव वाढवण्यासाठी वेलची, मनुका, तूप आणि गूळ घाला. जास्तीत जास्त सात ते दहा मिनिटे शिजवा.
२. बाळांसाठी साबुदाणा खिचडी
साहित्य
- १/४ कप साबुदाणा
- १ छोटा उकडलेला आणि चिरलेला बटाटा
- १ लहान उकडलेले आणि चिरलेली गाजर
- १/२ टीस्पून जिरे
- एक चिमूटभर हिंग
- १/२ चमचे तूप
कसे बनवावे?
- साबुदाणा धुवून भिजवा.
- कढईत तूप गरम करून त्यात जिरे घाला.
- त्यांना फोडणी द्या आणि नंतर हिंग घाला.
- एक मिनिटानंतर बटाटे आणि गाजर घाला आणि २–३ मिनिटे परतून घ्या.
- शेवटी, अर्धपारदर्शक साबुदाणा घाला आणि काही मिनिटे परता.
- बाळासाठी जर ते खूप कोरडे होत असेल तर थोडेसे पाणी घाला.
३. साबुदाणा पेज
साहित्य
- १/४ कप साबुदाणा
- १ टीस्पून तूप
कसे बनवावे
- रात्री साबुदाणा धुवून भिजवा.
- पाणी काढून टाका.
- भांड्यात दोन कप पाणी गरम करून उकळी आणा.
- साबुदाणा घाला आणि अर्धपारदर्शक होईपर्यंत शिजवा.
- मिश्रण जाड वाटल्यास थोडे पाणी घाला.
- साबुदाणा थंड होऊ द्या.
- हे मिश्रण सुसंगत होईपर्यंत मॅश करा.
- आवश्यक वाटल्यास ह्या मिश्रणाची तुम्ही प्युरी देखील करू शकता
- तूप घालून सर्व्ह करा.
आपल्या आवडीनुसार मोजमाप बदलू शकते. जेव्हा मुलांसाठी काहीतरी खायला करण्याची वेळ येते तेव्हा कठोर आणि वेगवान नियम नसतात. तरीसुद्धा, लक्षात ठेवा साबुदाणा सहजपणे पाणी शोषून घेतो, म्हणून जास्तवेळ गॅसवर ठेवू नका. कोमट असताना किंवा खोलीच्या तपमानावर सर्व्ह करावे.
बाळासाठी नवीन पदार्थ सुरु करण्यासाठी साबुदाणा हा चांगला पर्याय आहे. तुमच्या बाळाला जर साबुदाणा आवडत असेल तर तुम्ही साबुदाण्याच्या वेगवेगळ्या पाककृती शोधू शकता.
आणखी वाचा:
तुमच्या बाळाला डाळिंब कसे द्याल?
बाळांना नारळ पाणी देणे सुरक्षित आहे का