Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) खेळ आणि क्रियाकलाप मुलांसोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी ८ कल्पना

मुलांसोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी ८ कल्पना

मुलांसोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी ८ कल्पना

मैय्या मोरी, मैं नहीं माखन खायो…” ह्या गाण्याचे पुसटसे स्वर तुम्हाला ऐकू येताहेत का? होय, कारण लवकरच, जन्माष्टमी म्हणजेच बाळकृष्णाचा वाढदिवस येत्या १४ ऑगस्टला साजरा होणार आहे! जर तुमचा बाळ स्वयंपाकघरात लुडबुड करत असेल, भिंती रंगवत असेल आणि स्वतःचे कपडे ओले करत असेल तर त्या बाललिलांकडे पहा आणि जन्माष्टमीच्या तयारीला लागा!

हिंदू दिनदर्शिकेतील एक प्रमुख सण म्हणजे जन्माष्टमी हा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, हे मोहन किंवा श्रीकृष्णाविषयीचे आकर्षण आहे. हा उत्सव तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत साजरा करण्याजोगा आहे. तुमचे बाळ दररोज रोमांचक साहसे करण्याची कुठलीही संधी सोडत नाही. अगदी गोकुळातील बाळकृष्णासारखेच!

मुलांसाठी कृष्णा जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यासाठी ५ कल्पना

जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यासाठी ह्या ५ कल्पना छान आहेत आणि त्या तुमच्यासाठी संस्मरणीय बनतील.

. पूजा कक्ष सजवण्यासाठी त्यांना मदत करा

मुलांना चमकदार रंग आणि त्यांच्या सर्जनशीलताला चालना देणारी कोणतीही गोष्ट आवडते. त्यांना कृष्णासाठी पाळणा किंवा सिंहासन तयार करण्यास सांगा. फुले, चंदन व फुलांच्या हारांनी फुलांच्या माळांनी सजावट करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांची मदत का घेऊ नये? तुमच्या मुलाला, कृष्णाला रंगीबेरंगी पोशाख आणि दागिने घालायला आवडेल. कृष्णची सजावट बासरीने परिपूर्ण होईल. श्रीकृष्णाच्या मागे ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना मातीच्या गाई तयार करण्यास सांगा आणि गवत घालण्यास सुद्धा त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता.

. त्यांना एक थरारक महाभारत कथा सांगा

ज्ञानी, खट्याळ आणि मोहक कृष्णाशिवाय महाभारत कसे असेल? त्याच्या साहसी कथा उत्सुकतेने भरलेल्या आहेत. साहसी बाळकृष्णाने पुतना राक्षसिणीचा केलेला वध, कालिया मर्दन, कुरुक्षेत्रावर शूर योद्धा अर्जुनाच्या रथाचे केलेले सारथ्य ह्या सगळ्या कृष्णाच्या साहसी कथा आहेत. ह्या कथा आपल्या मुलांना मंत्रमुग्ध करतील (आणि भारतीय पौराणिक कथा देखील त्यांना समजतील)

. छानसा मोर काढण्यात त्यांना मदत करा

कृष्णाचा विचार केला की सुंदरसे मोरपीस लगेच मनात येते. एकदा श्रीकृष्ण बासरी वाजवत असताना त्या सुरांमुळे मोर आनंदाने नाचू लागले. तेव्हा मोरांच्या राजाने श्रीकृष्णाला मोरपीस भेट दिले. ही आख्यायिका बाजूला ठेवून, मोर काढून तो रंगवणे देखील मजेदार असू शकते. आपल्या ह्या छोट्या कलाकारांना हे चित्र वॉटर कलर्सने किंवा बोटांच्या ठश्यानी रंगवण्यास मार्गदर्शन करा. तुमची मुले कृष्णा किंवा राधा ह्यांचा वेष परिधान करून त्यांच्या कलाकृतीसह उभे राहू शकतात.

छानसा मोर काढण्यात त्यांना मदत करा

. जन्माष्टमीसाठी खास पदार्थ

कोणताही भारतीय सण विशेष पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. जर आपण जन्माष्टमीचा उपवास केला असेल तर मुलांना आवडणारे उपवासाचे काही खास खाद्यपदार्थ करण्याचा विचार करा. साबुदाणा वडा, जिरे घालून केलेला बटाटा, शेवयांची खीर आणि काकडीची कोशिंबीरी हे पदार्थ तुम्ही करू शकता. तसेच श्रीखंड, मिल्क शेक आणि कलाकंद बनवा. कृष्णाला लोणी, तूप आणि दूध ह्या सर्व गोष्टी आवडत होत्या. “गोविंदा आला रेह्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर हे पदार्थ संपताना पहा!

. आजूबाजूला साजरा होणारा उत्सव पहा

जन्माष्टमी साजरी केली जाते अशा भागात जर तुम्ही राहात असाल तर तिथे आधीच दिव्याची रोषणाई केलेली असेल. मथुरा, वृंदावन आणि द्वारका ह्या भागात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रम आणि दही हंडी लोकप्रिय आहेत. दक्षिण भारतातही हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. बाहेर पडा आणि आपल्या कुटुंबासह सजावट पहा. तुम्हाला आठवणीत साठवता येण्याजोगे बरेच क्षण असतील.

मुलांसमवेत जन्माष्टमी साजरे करण्याचे अनेक मार्ग आहेत. यावर्षी मुलांसोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करा आणि त्यासाठी थोडे विशेष प्रयत्न करा. सणाच्या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र येते. आणि त्यात घरातला गोपाळकृष्ण आनंदी असेल तर सगळे घर दुप्पट आनंदी होते!

६. दहीहंडी सजवा

दहीहंडी ही जन्माष्टमीशी संबंधित सर्वात लोकप्रिय परंपरा आहे. ह्या दिवशी लोक  फुलं, मणी किंवा खडूच्या मदतीने दह्याचे भांडे  सुंदरपणे सजवतात.  तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून आणि त्यांना खूप सूचना न देता दह्याचे भांडे सजवण्यासाठी सांगू शकता. त्यांच्या अतिशय सर्जनशील बाजू पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

७. कृष्ण किंवा राधासारखे कपडे घाला

आपल्या लहान मुलांना लहान कृष्ण किंवा राधा म्हणून सजवून उत्सवाचा उत्साह वाढवा. तुम्ही त्यांना दोन देवतांच्या जीवनाशी संबंधित कृतीसाठी देखील तयार करू शकता. त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक कपडे आणि दागिने घालायला लावा. जन्माष्टमीची गाणी लावा आणि तुमच्या मुलांना नाचू द्या.

८. राधा-कृष्ण नृत्य

राधा आणि कृष्णाच्या प्रेमकथांनी प्रेरित असलेले नृत्य मुले शिकू शकतील अश्या कार्यक्रमाचे आयोजन करा. त्यांना आकर्षक हालचाली शिकवा. असे केल्याने मुलांमधील सर्जनशीलता वाढेल.

मुलांसमवेत जन्माष्टमी साजरे करण्याचे अनेक मार्ग आहेत. यावर्षी मुलांसोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करा आणि त्यासाठी थोडे विशेष प्रयत्न करा. सणाच्या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र येते. आणि त्यात घरातला गोपाळकृष्ण आनंदी असेल तर सगळे घर दुप्पट आनंदी होते!

आणखी वाचा:

लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article