आपल्या बाळाच्या आयुष्यातला आणखी एक पहिला क्षण टिपण्यासाठी सज्ज व्हा आणि तो म्हणजे बाळाची पहिली अंघोळ. होय, प्रत्येक पहिल्या क्षणासारखाच हा सुद्धा एक खास क्षण आहे आणि तो रेकॉर्ड करणे खरंच खास असते. संशोधकांचे म्हणणे आहे की आंघोळीची वेळ ही आपल्या बाळाशी बंध निर्माण करण्याची वेळ असेल. म्हणूनच, ह्या काळात आपण तणावमुक्त असणे महत्वाचे आहे. बर्याच नवीन पालकांना अशी भीती असते की बाळाला स्पंज आंघोळ कशी द्यावी हे माहित नसल्यामुळे काही चूक तर होणार नाही ना! आपल्या बाळाला एक चांगले आणि आरामदायक स्पंज बाथ कसे द्यावे याबद्दल आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा हा एक सविस्तर मार्गदर्शक लेख आहे.
बाळाच्या स्पंजबाथची तयारी
नवजात शिशु फार काही गलिच्छ होत नाही आणि त्याला दररोज टब बाथची आवश्यकता नसते. आपल्या बाळाला स्पंज बाथ दिल्यामुळे टब बाथमध्ये बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी आपल्याला बाळाला हाताळण्यास थोडा वेळ मिळतो. स्पंज बाथपूर्वी तुम्ही काही मूलभूत तयारी केली पाहिजे. ती पुढीलप्रमाणे:
- सर्वप्रथम आपले हात स्वच्छ धुवा. सुरुवात करण्यापूर्वी बाळाच्या आंघोळीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू गोळा करा: आपल्या बाळाला ठेवण्यासाठी मोठा टॉवेल, सुगंधी नसलेले वाइप्स, एक सौम्य बेबी क्लीन्सर, ओला कापूस, स्वच्छ वॉशक्लॉथ किंवा ओलसर स्पंज, कपड्यांचा नवीन सेट, आणि एक नॅपी. साबण किंवा सुगंधी वाइप्स टाळा कारण ते आपल्या बाळाच्या त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकतात.
- स्पंज किंवा वॉशक्लॉथ भिजवण्यासाठी गरम पाणी तयार ठेवा.
- स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी स्वतंत्र वॉश क्लॉथ ठेवा. पायांसाठी एक, दुसरा हातांसाठी, एक शरीरासाठी आणि एक डोक्यासाठी असे वेगवेगळे वॉशक्लॉथ ठेवा.
- सोयीस्कर वेळ आणि ठिकाण निवडा. आपल्या बाळास आंघोळ करण्यासाठी आपण निवडलेल्या खोलीचे एसी, कुलर किंवा फॅन बंद करा. खोली उबदार असावी.
आता, आपण आपल्या बाळाला स्पंज– बाथ देण्यासाठी तयार आहात. हे करत असताना आपल्या हातात पुरेसा वेळ आहे याची खात्री करा. आधी नमूद केल्याप्रमाणे, आंघोळ घालण्याची ही वेळ पालक आणि बाळामध्ये बंध निर्माण करते
आपल्या बाळाला स्पंज बाथ देण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:
तयार होताना:
प्रथम, आपल्या बाळाला स्पंज बाथ देण्यासाठी सोयीस्कर वेळ निवडा. काही माता सकाळी उठून अंघोळ घालण्यास प्राधान्य देतात कारण तेव्हा बाळ जागे आणि सक्रिय असते तर काहीजण संध्याकाळची वेळ पसंत करतात, कारण आंघोळ घातल्याने बाळ शांत राहू शकते. नंतर, बाथरूम, पलंग किंवा टेबल इत्यादी सारखे सपाट पृष्ठभाग असलेली खोली निवडा आणि तो सपाट पृष्ठभाग जाड टॉवेलने झाकून टाका. खोलीचे तापमान तपासून पहा आणि ते ७५–डिग्री फॅरेनहाइट (२३–२४ डिग्री सेल्सिअस) वर सेट करा, लक्षात ठेवा बाळांना लवकर थंडी वाजते. शेवटी, स्पंज बाथ दरम्यान आणि नंतर आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक गोष्टी एकत्र करा.
तयार होणे म्हणजे बाळाला स्पंजबाथ देण्यापूर्वी त्याच्याशी बोलण्यात थोडा वेळ घालवणे. तसेच, बाळाशी बंध निर्माण होण्यासाठीची ही वेळ असते. आंघोळ करण्यापूर्वी आपल्या बाळाचे कपडे काढून त्याला टॉवेलमध्ये लपेटून घ्या. डायपर असुद्या म्हणजे बाळाला स्वच्छ करत असताना बाळाला शू झाली तर ती सगळीकडे पसरणार नाही.
डोळ्याजवळील भाग स्वच्छ करा
कोमट पाण्यात कापसाचा गोळा ओला करा. मग, आपल्या लहान मुलाचे डोके धरून डोळ्याकडील भाग हळूवारपणे स्वच्छ करा. डोळ्याच्या कोपऱ्यातून बाहेरच्या दिशेने पुसण्यास सुरवात करा. प्रत्येक डोळ्यासाठी नवीन कॉटन बॉल वापरा. कॉटन बॉल्स आपल्या बाळाच्या डोळ्यांसाठी सुरक्षित असतात. डोळा स्वतः धुणे टाळा आणि जर डोळ्यात कोरडे श्लेष्मा नसेल तर आपल्याला डोळ्याच्या आसपासचा भाग देखील धुवावा लागणार नाही.
चेहरा धुवा
मऊ वॉशक्लॉथ घ्या, कोमट पाण्यात बुडवा, अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि आपल्या बाळाचे तोंड, नाक आणि चेहऱ्याचे इतर भाग हळूवारपणे पुसून काढा. कानाच्या मागील भागाखाली, हनुवटीच्या खाली आणि गळ्याच्या भागाकडील सुरकुत्यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. स्वच्छ केल्यावर, चेहरा आणि मान टिपून कोरडी करा.
केस धुवा
आपल्या मुलाचे मऊ केस धुणे हे स्पंज बाथचा एक आवश्यक भाग आहे. बाळाला टॉवेलमध्ये लपेटून घ्या आणि आपला हात त्याच्या /तिच्या पाठीखाली आणि डोक्याखाली ठेवा. मग दुसर्या हाताने ओला वॉशक्लॉथ घ्या आणि डोके हळू पण योग्य प्रकारे पुसून काढा. त्वचेचा कोणताही त्रास टाळण्यासाठी ह्या टप्प्यावर साबण आधारित शैम्पू वापरणे टाळा.
शरीर धुवा
आपल्या बाळाचे शरीर धुण्यासाठी साबण–विरहीत बेबी क्लीन्सर वापरा. टॉवेलच्या कोपऱ्याने बाळाचे डोके झाकून ठेवा. उर्वरित शरीरावरुन टॉवेल बाजूला करा आणि डायपर देखील काढा. वॉशक्लॉथ ओले करा आणि बाळाचे शरीर मानेपासून पासून कंबरेपर्यंत पुसून काढा. खांदे आणि हात पुसा. सगळे पुसून झाल्यावर बाळाला कोरडे टाका. आता, आपल्या बाळाच्या शरीरावरचा भाग झाकून घ्या आणि नवीन, ओल्या वॉशक्लॉथने पाय, पावले आणि बोटे पुसण्यास सुरवात करा. स्वच्छ, कोमट पाण्याने शेवटी डायपर एरिया स्वच्छ करा. मुलगा आणि मुलगी दोघांसाठी डायपर एरिया पुसण्यासाठी फ्रंट टू बॅक मोशनचा वापर करा

ओल्या वॉशक्लॉथने बाळाला पुसल्यानंतर, बाळाला टिपून कोरडे करा. आपल्या बाळाच्या त्वचेवर जास्त ओलावा त्वचेला त्रास देऊ शकतो.
नाळेसंबंधी काळजी
नाभी स्वच्छ करण्यापूर्वी बाळाला डायपर आणि टी–शर्ट घाला. नाभीजवळील जागा स्वच्छ करण्यासाठी कॉटनचा बॉल वापरा. नाळेचा भाग व्यवस्थित साफ करणे महत्वाचे आहे कारण बेस जितक्या लवकर कोरडा होईल तितक्या लवकर कॉर्ड पडेल.
तसेच, संसर्ग होण्याची शक्यता टाळण्यासाठी डायपरने कधीही नाभी झाकू नका. तो भाग कोरडा व स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे
मॉइश्चरायझिंग
आपल्या नवजात बाळाचे स्पंजबाथ मॉइश्चरायझेशन शिवाय अपूर्ण राहील. बाळाची त्वचा नितळ, मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी आंघोळीनंतर सौम्य मॉश्चरायझर वापरा.
बाळाची त्वचा मऊ आणि लवचिक राहणे आवश्यक आहे. आंघोळीनंतर लावण्यासाठी मॉइश्चरायझिंग लोशन जवळच ठेवा. सौम्य लोशन निवडणे चांगले.
कपडे
बाळासाठी सुती कपडे निवडा. बाळ दिवसभर खाली पाठीवर झोपून वेळ घालवत असल्याने, मागे बटणे किंवा चेन असलेले कपडे निवडू नका. आंघोळ झाल्यावर बाळाला गुंडाळण्यासाठी एक ब्लँकेट तयार असणे देखील महत्वाचे आहे.
नेहमीच्या टबबाथ च्या तुलनेत बाळाला स्पंजबाथ करणे सोपे असते. तसेच, आपण बाळाच्या शरीराच्या प्रत्येक भागाला मिळणार्या पाण्याचे प्रमाण नियमित करू शकता. नाभीजवळचा भाग कोरडा ठेवण्यास हे उपयोगी ठरू शकते. तुम्ही आणि तुमच्या छोट्या देवदूतामध्ये बाळाच्या आंघोळीदरम्यान निर्माण होणाऱ्या आनंदबंधासाठी शुभेच्छा!
आणखी वाचा:
 
 


 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
				    		 
                                         
                                         
                                         
                                         
                                         
                                     
                                         
                                         
                                        