Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळाचे एका बाजूला डोके हलवणे सामान्य आहे का?

बाळाचे एका बाजूला डोके हलवणे सामान्य आहे का?

बाळाचे एका बाजूला डोके हलवणे  सामान्य आहे का?

तुमचे बाळ पहिल्या वर्षात बरेच विकासाचे टप्पे गाठत असते. प्रतिक्षिप्त क्रिया आणि मोटर कौशल्यांशी संबंधित विकासाचे अनेक टप्पे असतात – जसे की बाळाचे पहिले स्मितहास्य, पहिल्यांदा बोट चोखणे, पहिल्यांदा पाय उचलणे  इत्यादी. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला डोके हलवताना पाहता तेव्हा ते तुमच्यासाठी चिंतेचे कारण असू शकते. इतक्या लहान वयात बाळ डोके कसे हलवू लागला आहे असे तुम्हाला वाटेल. बऱ्याच वेळा, बाळ एक महिन्यांचे होईपर्यंत स्वतःहून थोडीशी मान फिरवू शकेल. जसजशी बाळाची वाढ होईल तसे त्याची मोटार कौशल्ये वाढतील आणि त्याच्या मानेभोवतालचे स्नायू त्याला डोके हलवण्यास मदत करू शकतील.

व्हिडिओ: बाळ डोके एका बाजूनेच हलवते – कारणे आणि तुम्ही त्याविषयी केव्हा काळजी केली पाहिजे?

बाळ 9 महिन्यांचे झाल्यावर ते आपले डोके एका बाजूने हलवू लागते. बरेच वेळा हे सामान्य असले तरी, काहीवेळा तो न्यूरोलॉजिकल किंवा विकासात्मक विकार असू शकतो. या लेखात लहान मुले डोके का हलवतात आणि ते चिंतेचे कारण केव्हा असते? आणि असेल तर त्या सामान्य कारणांची सूची इथे दिलेली आहे.

लहान मुले त्यांचे डोके एका बाजूला का हलवतात?

जेव्हा तुमचे बाळ डोके हलवते तेव्हा ते फक्त खेळकरपणा आणि संवादाचे लक्षण असते. जर बाळाची वाढ सामान्यपणे होत असेल तर बाळ एक वर्षाचे होईपर्यंत ‘होय’ किंवा ‘नाही’ असे संकेत देण्यासाठी डोके हलवू शकेल. बहुतेकदा, बाळ त्याच्या आयुष्याच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये, हालचाली दाखवण्यास सुरुवात करते कारण बाळ त्याच्या स्नायूंवर हालचाली ठेवण्यास शिकू लागते. एक पालक ह्या  नात्याने, तुमचे बाळ अचानक डोके हलवताना दिसल्यास तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल. जर तुम्हाला 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाचे बाळं डोकं हलवताना दिसले, तर ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे असे सूचित होते. बाळाच्या डोके हलवण्यामागे संवाद साधणे हे केवळ एकमेव कारण नाही. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. लहान बाळे डोके का हलवतात याची काही कारणे पाहूया आणि कोणती कारणे चिंतेचे कारणे असू शकतात ते सुद्धा पाहू:

लहान मुले त्यांचे डोके एका बाजूला का हलवतात

1. त्याच्या शरीरावर नियंत्रण ठेवणे

बहुतेक बाळे त्यांच्या शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी डोके हलवू लागतात. त्यांचे स्नायू विकसित होत असतात. बाळे त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या शरीराबद्दल अधिक माहिती मिळते. म्हणून जर तुमचे लहान बाळ डोके हलवण्याचा प्रयत्न करीत असेल तर घाबरू नका.  त्याचे शरीर कसे कार्य करते हे पाहण्यासाठी तो फक्त शिकत आहे आणि चाचणी घेत आहे.

2. थकव्याचे लक्षण

झोपेत असताना तुमच्या बाळाला त्याचे डोके एका बाजूने हलवताना कधी पाहिले आहे का? त्यामागे थकवा हे एक कारण असू शकते. बाळ थकल्यावर, झोपी जाण्यासाठी डॉके हलवते. सतत हालचालींमुळे चक्कर येते आणि काही मिनिटांतच बाळाची झोप उडते. त्यामुळे तुमचे बाळ झोपताना डोके हलवत असेल, तर ती झोप येण्यासाठी वापरलेली युक्ती असू शकते.

3. कानाचा संसर्ग

तुमच्या बाळाच्या कानात संसर्ग झाल्यावर किंवा त्याच्या हिरड्या दुखावल्या गेल्यास थोडे बरे वाटावे म्हणून बाळ डोके हलवू शकते. दात काढताना लहान मुलांनी डोके एका बाजूने हलवणे सामान्य आहे. बाळ डोके हलवत असताना जर बाळाला ताप आला आहे, सर्दी झाली आहे किंवा दात येत आहेत असे तुम्हाला वाटले, तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य आहे.

4. स्तनपान करताना स्तनांना तोंड लावताना

बहुतेक बाळे स्तनपान करताना स्तनांना लॅच होत असताना डोके हलवतात. एकदा का त्यांना नित्यक्रमाची सवय झाली की ते उत्साहात डोके हलवू शकतात. आपल्या बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या तीन महिन्यांत बाळाच्या मानेला आधार देणे योग्य आहे. असे केल्याने बाळाला स्नायूंच्या प्रतिक्षिप्त क्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. आणि बाळ सहजपणे लॅच करायला शिकू शकेल.

5. खेळताना डोके हलवणे

लहान मुले खेळताना डोके हलवतात. बाळाला त्याच्या पोटावर किंवा पाठीवर झोपवलेले असताना तो डोके हलवताना दिसेल. डोके हलवण्याची क्रिया बाळ इतरांकडून शिकते. 6-8 महिन्यांत तुमचे बाळ घरातील त्याच्या भावंडांच्या वागणुकीची नक्कल करताना आढळेल.

6. बाळ डोके किती हलवू शकते ह्याची स्वतः चाचणी घेते

लहान मुले थोडी धाडसी असतात. जेव्हा बाळ 5-6 महिन्यांचे असते, तेव्हा ते त्याचे डोके किंवा शरीर हलवू लागते. तुमचे बाळ जेव्हा खूप डोके हलवते तेव्हा ते तुमच्यासाठी थोडेसे भितीदायक वाटू शकते, हे अगदी सामान्य आहे कारण तुमचे बाळ आता बसण्याचा प्रयत्न करत असते आणि बाळाचे मान हलवणे त्याचे लक्षण आहे. अशा प्रकारचे बाळाचे वर्तन हे फक्त काही मिनीटांसाठीच असते.

7. एपिलेप्सी

एपिलेप्सी दरम्यान लहान मुलांमध्ये मायोक्लोनिक हेड जर्क किंवा स्पॅम दिसू शकतात. हे लहान झटके आहेत. अशा प्रकारचे झटके येण्याचा,  शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळें  बाळे डोके हलवू शकतात. मायोक्लोनिक झटके सहसा अचानक येतात आणि ते जबरदस्त असतात. अश्या प्रकारचे झटके येणे हे अनेक दिवस होऊ शकते. तसेच दिवसातून अनेक वेळा होऊ शकते. असे झाल्यास ते गंभीर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दर्शवत असते. पालकांनी असे वर्तन लक्षात येताच बालरोगतज्ञांकडून तपासून घेतले पाहिजे.

8. न्यूरोलॉजिकल समस्या

बाळाचे वारंवार डोके हलणे हे न्यूरोलॉजिकल समस्या देखील सूचित करू शकते. विशेषत: जर बाळाला त्याचे डोके हलवण्यावर नियंत्रण ठेवता येत नसेल किंवा त्यासोबत इतर काही लक्षणे दिसत असतील तर ते चिंतेचे कारण असू शकते. डोके हलवणार्‍या बाळांचा विकास देखील सहसा सामान्य नसतो. अश्या बाळांना हालचाल करताना किंवा बोलताना त्रास जाणवू शकतो.

9. बाळांचे थरथर कापणे

लहान बाळे थरथर कापणे अत्यंत दुर्मिळ आहे. परंतु, क्वचित प्रसंगी, हे उत्स्फूर्तपणे होऊ शकते आणि बाळे थरथर कापू शकतात. जेव्हा अश्या हालचाली डोक्यापर्यंत जातात तेव्हा बाळ डोके हलवू शकते.

हे ऑटिझमचे लक्षण आहे का?

वारंवार हालचाल करणे, डोके हलवणे आणि इतर काही लक्षणांमुळे तुमचे बाळ ऑटिझम स्पेक्ट्रम वर आहे असे तुम्हाला वाटू शकते. साधारणपणे, जेव्हा तुमचे बाळ त्याचे डोके एका बाजूने हलवते तेव्हा ते ऑटिझमचे लक्षण नसते. परंतु, काही लक्षणे सामान्य वाटत नाहीत अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे असते. तुमचे बाळ 18 महिन्यांचे झाल्यावर हे वर्तणुकीचे विचित्र नमुने अनेकदा दिसून येतात. ऑटिस्टिक नसलेली बहुतेक मुले 3 वर्षांची होईपर्यंत त्यांच्यामध्ये असे वर्तन दिसून येते. खालील चिन्हे स्पेक्ट्रमवर असलेल्या बाळांमध्ये दिसू शकतात.

1. सामाजिक संवादाचा अभाव

आईवडील किंवा भावंडांशी संवाद न साधणारी बाळे, त्यांच्या नावाला किंवा आवाजाला प्रतिसाद देत नाहीत. अशी बाळे नुसती टक लावून बघत असतात. हसण्यात रस दाखवत नाहीत किंवा प्रतिसाद देत नाहीत. त्यांना वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज भासू शकते.

2. नीट संवाद साधता न येणे

एक पूर्णपणे निरोगी मूल संवाद साधण्यासाठी हाताच्या हालचालींचा वापर चांगला करेल. बहुतेक 7-8 महिन्यांची बाळे गोष्टींकडे बोटे दाखवतात आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठी आवाज देखील काढतात. ऑटिझम असलेल्या बाळांना हावभावांचा योग्यरित्या वापर करता येणार नाही आणि त्यांच्या आवाजाची गुणवत्ता तितकीशी चांगली नसते.

3. मुख्य कौशल्ये चांगली नसणे

ऑटिझम असणा-या बालकांचा विकास होत असताना त्यांची भाषा कौशल्ये आणि आकलन कौशल्ये कमी असतील. ते लोकांसोबत डोळ्यात डोळे घालून बघणार नाहीत आणि क्वचितच इतरांशी संवाद साधतील. ही लक्षणे साधारणपणे 9 ते 12 महिन्यांच्या दरम्यान दिसून येतात.

4. वारंवार तशीच वर्तणूक किंवा हालचाली

ऑटिझम असलेल्या बाळांमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यांची वागणूक काहीशी विचित्र असते. जेव्हा तुमच्या बाळामध्ये अशी लक्षणे दिसतात तेव्हा ते चिंतेचे कारण असावे.

5. भिंतीवर डोके मारणे

जर तुमचे बाळ भिंतीवर किंवा क्रिबवर डोके आपटत असेल,  तर तुमच्यासाठी नक्कीच ते काळजी करण्याचे कारण आहे. चिंतेच्या क्षणी बाळ बराच काळ हिंसकपणे डोके हलवू शकतो.

6. काही विकासात्मक टप्पे न आढळणे

जर तुमचे बाळ त्याच्या वयानुसार विकासाचे टप्पे वेळेवर गाठत नसेल, तर तो ऑटिझम स्पेक्ट्रमवर असू शकतो.

आपल्या बाळाला डोके हलवण्यापासून कसे थांबवायचे?

सतत डोके हलवल्याने तुमच्या बाळाला चक्कर येऊ शकते. तुमच्या बाळाचे डोके हलवणे थांबवण्यासाठी खालील टिप्सचे अनुसरण करा:

1. लक्ष देऊ नका

जेव्हा तो आपले डोके हलवतो तेव्हा लक्ष देऊ नका आणि कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका जेणेकरून  त्याला पुढे असे करण्यास उत्तेजन मिळेल.

2. वारंवारता आणि कालावधीचा मागोवा घ्या

तुमचे बाळ ज्याच्यासाठी डोके हलवते तो क्षण आणि कालावधी ह्यावर लक्ष ठेवा. बाळाची डोक्याची हालचाल सतत आणि पुनःपुन्हा होत आहे का हे पहा. जर तुम्ही लक्ष देण्याची गरज असेल तर अशा वेळी दुर्लक्ष करू नका.

3. वातावरण बदला

काहीवेळा, बाळाच्या सभोवतालच्या वातावरणातील काही ट्रिगर्समुळे बाळ डोके हलवायला सुरुवात करते. ज्या वातावरणात तुमचे मूल ही क्रिया सर्वात जास्त करत आहे असे तुमच्या लक्षात येते त्या वातावरणात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. जर त्याचा उपयोग होत नसेल तर बाळाला शांत आणि तणावमुक्त ठिकाणी घेऊन जाणे चांगले.

4. आरामदायी तंत्र वापरून पहा

तुमच्या बाळाच्या प्रतिक्षिप्त क्रियांना शांत करण्यासाठी सुखदायक तेलाच्या मसाजने त्याच्या स्नायूंना आराम द्या

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तुमचे बाळ सतत डोके हलवत असेल आणि त्यासोबत खालील चिन्हे आणि लक्षणे दिसून येत असतील तर, अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

  • बाळ पालक किंवा भावंडांशी जास्त संवाद साधत नसेल तर
  • बाळ योग्य रित्या डोळ्यांशी संपर्क साधत नसेल आणि डोळ्यांच्या असामान्य हालचाली होत असतील तर
  • डोके भिंतीवर आपटल्याने जखमा झाल्या असतील तर
  • बाळ चिंताग्रस्त असते तेव्हा स्वतःचे खूप डोके हलवत असेल तर
  • स्वतःला दुखावण्याची इच्छा दर्शवत असेल तर
  • ध्वनी आणि आवाजांना खराब प्रतिसाद देत असेल तर
  • वयाची 2 वर्षे ओलांडल्यानंतरही या प्रकारचे असामान्य वर्तन दिसून येत असेल तर

लहान मुले जेव्हा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अनेकदा विचित्र गोष्टी करत असतात. जेव्हा त्यांना खूप झोप आलेली असते तेव्हा लहान मुले भिंतीवर डोके आपटताना अनेकदा दिसतात, स्वतःच्या किंवा तुमच्या केसांशी खेळतात, कान, पोट किंवा खाजगी भागावर मारतात. तुमच्या बाळाचे डोके एका बाजूने वेगाने हलवणे हे विचित्र नाही आणि ते सामान्य आहे. परंतु सुरक्षित राहणे चांगले. जर तुमच्या लक्षात आले की तुमचे लहान मूल डोके एका बाजूला हलवत आहे. तुमचे बाळ अधूनमधून डोके एका बाजूला झुकवत असेल आणि वर नमूद केलेली इतर लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. किवां तुमचे लहान बाळ त्याला जोपर्यंत काहीतरी नवीन करायला मिळत नाही तोपर्यंत थोड्या काळासाठी एका बाजूला डोके हलवण्यासारखी आणखी एक मजेदार गोष्ट करत आहे!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article