टॉडलर (१-३ वर्षे)

२० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे लहान मूल एक 'कॉपिंग मशीन' बनते आणि २० महिन्यांचे झाल्यावर तुम्ही केलेल्या प्रत्येक हालचालीची तसेच तुमच्या आवाजाची नक्कल करते. ते तुमचे आवडते हावभाव सुद्धा हुबेहूब साकारू लागते. हळूहळू पण स्थिरपणे, नक्कल करून, ऐकू येणारे वेगवेगळे आवाज आणि मोटर कौशल्ये आत्मसात करते.

व्हिडिओ: २० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

https://youtu.be/LJmU96kr9UM

२० महिन्यांच्या लहान मुलाचा विकास

ह्या वयातील लहान मुलांमध्ये वेगळे होण्याच्या चिंतेची काही चिन्हे दिसून येतात. तथापि, तुमच्या लहान मुलाला हळूहळू तुमच्या रोजच्या रुटीनची सवय होईल उदा: कामावर जाणे आणि संध्याकाळी घरी परतणे इत्यादी. बाहेर पडण्यापूर्वी आणि परत आल्यानंतर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करणे महत्वाचे आहे जेणेकरून त्याला सुरक्षित वाटेल आणि त्याला समजेल की घरी थोडासा शांत किंवा एकटा वेळ घालवणे त्यांच्यासाठी चांगले आहे आणि वाईट नाही.

शारीरिक विकास

२० महिन्यांच्या मुलासाठी शारीरिक विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत -

सामाजिक आणि भावनिक विकास

२० महिन्यांच्या मुलांमध्ये आढळणारे सामाजिक आणि भावनिक टप्पे आहेत

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

तुमचे लहान मूल बौद्धिक आणि भाषिक विकासाची चिन्हे दाखवण्यास सुरवात करेल. खाली २० महिन्यांच्या बाळाची चेकलिस्ट दिलेली आहे.

वागणूक

ह्या वयात तो तुमची नक्कल करू लागेल. तो त्याच्या खेळण्यातील प्राण्यांना केळी आणि स्नॅक्स खायला देण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा तुम्ही जसे बूट घालता तशी तुमची नक्कल करू शकतो. ह्या वयात तुम्ही त्याचे आदर्श आहात आणि तुमच्या कृतींचे त्याने अनुकरण केल्यास तुम्ही इतके आश्चर्यचकित होऊ नये. काही मुले अनेकदा मिठी मारण्यासाठी विचारू शकतात आणि ते सामान्य आहे. त्याच्याकडे पुरेसे लक्ष द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. काही मुले जितकी देवासारखी आणि शांत दिसतात शी ती नसतात आणि त्यांना अचानक राग येऊ शकतो. ते 'टेरिबल टू' म्हणून ओळखले जातात आणि त्याचे वर्णन खालच्या परिचछेदात केलेले आहे.

टेरिबल टू

लहान मुलांच्या 'टेरिबल टू' मधून बहुतांश पालक जात असतात. काही वेळा 'टेरिबल टू' ह्या टप्प्यातून जात असलेल्या मुलांचे वर्तन हे ठाम आणि वर्चस्वापुर्ण असते . उदाहरणार्थ, जर तुम्ही त्याला आवडणारी खेळणी विकत घेतली नाहीत किंवा तुम्ही जे खात आहात ते त्याला देण्यास नकार दिला तर तुमचे लहान मूल मध्येच रस्त्यात लोळून रडू लागेल. केवळ हट्टापायी किंवा तुमच्या पर्यादा तपासून पाहण्यासाठी तो काही गोष्टी तुम्हाला मागेल.

अन्न आणि पोषण

पालक या नात्याने, तुमच्या लहान मुलाला "नेचर डेफिसिट डिसऑर्डर" चा त्रास होणार नाही हे बघणे महत्वाचे आहे. घराबाहेर वेळ घालवणे, कॅम्पिंग आणि पिकनिकला जाणे किंवा घराबाहेर व्हेजिटेबल ग्रील करणे ह्यामुळे मूड चांगला होण्यास मदत होते तसेच शिकण्यासाठी हा एक चांगला क्रियाकलाप आहे. भाजी कशी पिकते आणि बियाणे कसे पेरलेजाते /कापणी कशी केली जाते ते त्यांना दाखवा. त्यांना शेतीची ओळख करून द्या आणि त्यांना मासे कसे पकडायचे ते शिकवा. त्यांच्या ताटात असलेले अन्नपदार्थ कुठून येतात त्याविषयीची सर्व माहिती त्यांना सांगा. त्यांना पाण्याबद्दल आणि ते चांगले आहे किंवा नाही हे देखील शिकवा. नळ चालू करणे, ताटात अन्न ठेवणे, पौष्टिक पदार्थ खाणे अश्या चांगल्या सवयी त्यांना लावा. जेणेकरून त्यांना अन्न आणि पोषणाविषयीची मूलभूत माहिती मिळेल. तुमच्या २० महिन्यांच्या मुलाला आहाराचे महत्व थोडेसे समजल्यानंतर तो खाण्यास त्रास देणार नाही.

झोप

२० महिन्यांच्या मुलाचे झोपेचे रुटीन असणे महत्वाचे आहे. तुमच्या मुलाचे झोपेचे रुटीन सुरळीत होण्यास सुरुवात होईल आणि जर ते झालेले नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायला लागा. त्याला झुलवून किंवा पाळण्यात झोपवण्याची सवय बंद करा. पांघरूण घातल्यावर आणि अंगाई गीत गाऊन कसे झोपायचे ते त्यांना शिकवा. झोपण्याआधी ३० मिनिटे त्याला टीव्ही पाहू देऊ नका. त्यामुळे त्यांच्या झोपेत अडचण येऊ शकते आणि त्यांना शांत झोप लागणे अवघड होते.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या २० महिन्यांच्या बाळासाठी काही खेळ आणि क्रियाकलाप खालीलप्रमाणे:-

पालकांसाठी टिप्स

तुमच्या लहान मुलाच्या वाढीवर आणि विकासावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही या काही टिप्स वापरू शकता.

खालील परिस्थतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

खालील गोष्टी आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

मुलाचे संगोपन करण्याचे कोणतेही निश्चित मार्ग नाहीत. प्रत्येक लहान मूल अद्वितीय आहे, आणि प्रत्येक मूल त्यांच्या स्वत: च्या गतीने वाढते. परंतु हे एक अतिशय महत्त्वाचे वय आहे कारण लक्षात आलेले कोणतेही धोक्याचे चिन्ह हे काही मोठ्या समस्येचे चिन्ह असू शकते आणि त्या समस्येचे लवकर निदान झाल्यास उपाय करणे सोपे होते. मुख्य म्हणजे सकारात्मक रहाणे, संयम बाळगणे आणि त्यांना भरपूर वेळ, प्रेम आणि पोषण देणे हे महत्वाचे आहे. निरोगी सवयी ठेवा आणि संयम आणि संतुलन राखण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या लहान मुलाचे आरोग्य चांगले होत आहे. त्याची वाढ आणि विकासाला चालना मिळू लागेल.

मागील आठवडा: १९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास पुढील आठवडा: २१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved