अन्न आणि पोषण

2 वर्षांच्या बाळासाठी आहार तक्ता

तुमच्या बाळाची वाढ होत असताना त्याच्या खाण्याच्या सवयी झपाट्याने बदलत असतात. पहिल्या दोन वर्षांत, तुमच्या बाळाला दात येण्यास सुरुवात होते.  आता तुमच्या बाळाने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केलेली असेल आणि थोड्या फार प्रमाणात त्याने कुटुंबातील सदस्यांसोबत जेवण्यास सुरुवात केलेली असेल. तुमच्या बाळाला निरोगी आहाराच्या सवयी कशा लावायच्या तसेच त्याच्या आहारात चांगल्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश कसा करायचा याविषयीचा एक आहार तक्ता आणि पाककृती इथे दिलेल्या आहेत.

तुमच्या लहान बाळाच्या जेवणाच्या वेळा कशा बदलतात?

तुमच्या बाळाला दात येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली असेल. ह्या वयाची मुले जेवताना त्रास देतात. दीड वर्षाची (18 महिने), लहान मुले स्वतः चमच्याने खाण्यास सुरुवात करतात. 24 महिन्यांचे झाल्यावर तुमचे मूल मोठ्या माणसांसोबत जेऊ लागेल.

तुमच्या लहान मुलाला खाण्याच्या चांगल्या सवयी लागण्यासाठी काही उपाय

लहान मुलाने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला खाण्याच्या चांगल्या सवयी लावता येतील. ह्याच काळात पालकांनी मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

2 वर्षाच्या बाळासाठी अन्न

आपल्याला संतुलित आहार आवश्यक असला तरी, मुलांच्या वाढीस मदत करणारे पोषण आवश्यक आहे.

1. दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही आणि पनीरमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते. जर तुमचे मूल लैक्टोज असहिष्णु असेल तर, कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी त्याला नट्स  आणि कडधान्ये यांसारख्या इतर स्तोत्रांमधून कॅल्शियम घ्यावे लागेल.

2. चिकन

चिकन आणि इतर मांसाहारी पदार्थांमध्ये सहज शोषले जाणारे लोह आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात. लोह रक्तातील हिमोग्लोबिनला शक्ती देण्यास मदत करते आणि त्यामुळे ऍनिमिया टाळला जातो. शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये आढळणारे लोह शरीराला शोषून घेणे कठीण असते आणि म्हणूनच, आवश्यक प्रमाणात लोह मिळण्यासाठी तुमच्या मुलाला किमान दुप्पट प्रमाणात चिकनचे सेवन करावे लागेल.

3. मासे

मासे हे इसेन्शिअल फॅटी ऍसिडस् (इएफए) चा चांगला स्रोत आहे. इसेन्शिअल फॅटी ऍसिड्स रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली मजबूत करतात. शाकाहारींना योग्य इएफए स्त्रोतांची आवश्यकता असेल, कारण ते शरीरात तयार होत नाही आणि केवळ बाहेरून मिळू शकते.

4. पौष्टिक तेले

फ्लेक्ससीड, अक्रोड, सोयाबीन आणि इतर नट्स मध्ये आणि त्यांच्या तेलात योग्य प्रमाणात इएफए आणि खनिजे असतात.

5. गाजर

गाजर हे व्हिटॅमिन ए चा समृद्ध स्त्रोत आहेत. पालक आणि इतर भाज्यांमध्ये देखील व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते. तुमच्या मुलाच्या आहारात विविध जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ए दृष्टी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

6. लिंबूवर्गीय फळे

लिंबू आणि संत्री यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वीसारखे गंभीर आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन सी हिरड्या आणि रक्तवाहिन्या मजबूत करण्यास आणि जखमांपासून बरे होण्यास मदत करते. पेरू, आंबा, केळी, टोमॅटो आणि पालक इत्यादींमध्ये देखील व्हिटॅमिन सी असते.

7. सूर्यप्रकाश

हे अन्न नसले तरीसुद्धा शरीर ते शोषून घेते. बाळाच्या वाढीमध्ये सूर्यप्रकाशाची अविभाज्य भूमिका लक्षात घेऊन ह्या यादीत सूर्यप्रकाशाचा समावेश करण्यात आला आहे. सूर्यप्रकाशापासून आपल्याला मिळणारा महत्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन डी. मुलाची चांगली वाढ होण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी असलेले अन्न म्हणजे मासे आणि दुग्धजन्य पदार्थ होय.

8. केळी

मॅग्नेशियम आणि पोटॅशियम, हृदयाच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या स्थितीसाठी आवश्यक घटक आहेत आणि हे घटक केळ्यामध्ये आढळतात. हे फायदेशीर फळ तृणधान्ये आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट करा जेणेकरून ते मुख्य अन्न बनवा.

2-वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता / वेळापत्रक

न्याहारी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
रविवार पोहे/ भाज्या घालून केलेला उपमा, स्प्राउट्स/ शेंगदाणे आणि दूध/ दही एक कप दूध आणि फळे डाळीची आमटी किंवा दही भात पनीरचे कटलेट दुधासह आलू मटर आणि मिस्सी रोटी
सोमवार भाज्या घालून केलेला डोसा किंवा मुगाच्या डाळीचे धिरडे आणि दही हंगामी फळे मिक्स व्हेजिटेबल करी आणि पोळी फ्रूट मिल्कशेक तळलेल्या सोया सोबत पोळी
मंगळवार एग रोल रोटी किंवा अंडे भात भाज्यांचे सूप किंवा फळे व्हेज बिर्याणी काकडीसोबत उकडलेले कॉर्न किंवा उकडलेले शेंगदाणे + फळे दह्यासोबत व्हेजिटेबल खिचडी
बुधवारी इडली आणि सांबार बदाम/ मनुका आलू पराठा दही फळे भातासोबत उकडलेले चिकन
गुरुवारी सुकामेवा घातलेली नाचणीची लापशी फळे दह्यासोबत चणा डाळ खिचडी दही/दुधासोबत उपमा 2 कटलेटसह भाज्यांचे  सूप (शाकाहारी किंवा मांसाहारी)
शुक्रवार दुधात शिजवलेले ओट्स फ्रूट स्मूदी किंवा कस्टर्ड छोल्याची भाजी आणि पोळ्या ओट्स खिचडी भात आणि सांबार
शनिवार व्हेजिटेबल पराठा फळे आणि सुकामेवा पनीर पुलाव ऑम्लेट किंवा चीज-चपाती रोल व्हेजिटेबल पुलाव आणि दही

2 वर्षाच्या बाळासाठी घरगुती अन्नपदार्थ

येथे अन्नपदार्थांच्या काही निवडक पाककृती आहेत. ह्या पाककृती कदाचित तुम्हाला जास्त परिचित नसतील

1. मुगाच्या डाळीचे धिरडे

तुमच्या दिवसाची पॉवर पॅक सुरुवात!
साहित्य: कृती:
 1. मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
 2. पाणी काढून टाका आणि पुरेसे पाणी घालून बारीक करा.  डोसा पिठासारखी घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
 3. पिठात मसाले घाला आणि चांगले एकत्र करून घ्या.
 4. मसाला आणि चिमूटभर हिंग घालून पुन्हा मिक्स करा.
 5. हे पीठ 15-20 मिनिटे तसेच राहू द्या.
 6. एका नॉन-स्टिक पॅनमध्ये लोणी गरम करा आणि डोसा तयार करण्यासाठी पीठ पसरून घ्या.

2. नारळाची चटणी

डोसे आणि इडलीसोबत खाण्यासाठी चटणी!
साहित्य: कृती:
 1. मसाला सोडून सर्व साहित्य एकत्र मिसळा.
 2. मिश्रण करताना पाणी आणि मीठ (चवीनुसार) घाला.
 3. कढईत गरम केलेल्या तेलाच्या काही थेंबांमध्ये मसाला परतून घ्या.
 4. मसाल्यात बारीक केलेली चटणी घाला आणि गॅस बंद करा. इडली किंवा डोसा यासोबत ही चटणी  सर्व्ह करा.

3. चना डाळ खिचडी

अगदी कमी मसाला वापरून डाळीचा नैसर्गिक स्वाद असणारी रेसिपी
साहित्य: कृती:
 1. खिचडी तयार करण्यापूर्वी तांदूळ 30मिनिटे भिजत ठेवा
 2. खिचडी तयार करण्यापूर्वी डाळ 4-5 तास भिजत ठेवावी. (जर तुमच्याकडे इतका जास्त वेळ नसेल, तर तुम्ही ती डाळ सुमारे 30 मिनिटे गरम पाण्यात भिजवू शकता)
 3. प्रेशर कुकरमध्ये 1टेबलस्पून तेल गरम करून त्यात मसाला घाला
 4. स्वच्छ धुतलेली डाळ घाला. चवीनुसार मीठ घालून ढवळा
 5. 1 कप पाणी घाला आणि प्रेशर कुकर मध्ये 6 मिनिटे शिजवा किंवा 2 शिट्ट्या करून घ्या
 6. प्रेशर कुकर थंड झाल्यावर त्यात तांदूळ घालून १ किंवा २ शिट्ट्या करून घ्या

4. पनीर कटलेट

पनीर साध्या व्हेजिटेबल कटलेट मध्ये प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण वाढवते. त्यामुळे कटलेट देखील मऊ होते.
साहित्य: कृती:
 1. हिरवी मिरची, लसूण आणि आले कापून त्याची पेस्ट करून घ्या
 2. भाज्या सोलून चिरून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये 2कप पाण्यात 4 शिट्ट्या होई पर्यंत शिजवा
 3. थंड झाल्यावर पाणी काढून टाका आणि शिजवलेल्या भाज्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या
 4. भाज्या मॅश करा, पेस्ट आणि मसाला घाला आणि चांगले एकत्र करून घ्या
 5. पनीर घाला (पनीर बारीक केलेले किंवा किसलेले असावे)
 6. 3चमचे तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा चांगले एकत्र करून घ्या
 7. मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून घ्या आणि पॅटीजचा आकार द्या
 8. पॅटीजला रवा लावून आणि उथळ पॅनमध्ये दोन्ही बाजू सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. केचप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा

5. सोया चंक्स फ्राय

ही एक चविष्ट आणि पौष्टिक डिश आहे  तसेच ही डिश बनवायला सोपी आहे. पोळी आणि भातासोबत ही डिश छान लागते.
साहित्य: कृती: 1. साधारण 20मिनिटे सोया गरम पाण्यात घालून ठेवा 2. कढईत तेल घालून कांदे त्यामध्ये परतून घ्या 3. कांदा सोनेरी-तपकिरी झाला की त्यामध्ये लसूण आणि आले घाला 4. हिरवी मिरची आणि नंतर टोमॅटो घाला 5. मिश्रण शिजल्यावर त्यात मसाला घालून मिक्स करा. गॅस बंद करा 6. आता, सोयाचे तुकडे काढून टाका (चाळणीच्या साहाय्याने ते चांगले निथळण्यासाठी तुम्हाला ते पिळून घ्यावेलागतील) 7. मिश्रणात सोयाचे तुकडे घाला आणि पुन्हा शिजवण्यास सुरुवात करा 8. चवीनुसार मीठ घाला आणि पॅनमधील सामग्री पूर्णपणे मिसळा जेणेकरून सोयाच्या तुकडयांना मसाला चांगला लागेल (तिखटपणासाठी तुम्ही यात थोडा लिंबाचा रस देखील घालू शकता). 9. सोयाचे तुकडे तपकिरी होईपर्यंत पॅनमध्ये शिजवा. 10. गॅस बंद करा आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. गरमागरम सर्व्ह करा

आहारविषयक टिप्स

अस्वीकरण

ताजे आणि प्रिझर्व्हेटिव्ह नसलेले पौष्टिक अन्न खाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते असे अनेकांना वाटते. परंतु सवय झाल्यावर तो त्रास वाटत नाही! तुमच्या मुलाच्या आहारात वेगवेगळ्या ताज्या फळांचा समावेश करा, त्यामुळे चवीत बदल होईल आणि तो जेवण करण्यास त्रास देणार नाही. आणखी वाचा:  २१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती २२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved