टॉडलर (१-३ वर्षे)

२३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे लहान बाळ आता दोन वर्षांचे झाले आहे आणि तुमचे मूल आता प्रत्येक दिवसागणिक अधिकाधिक स्वतंत्र होत आहे. ह्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण जाईल. तुमच्या २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास ह्याबद्दल तुम्ही विचार करत आहात का? जर ह्याचे उत्तर 'हो' असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या २३ महिन्याच्या मुलाच्या वाढीबद्दल आणि विकासाबद्दल तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे असेल त्याबद्दल आम्ही पुढील लेखात चर्चा करणार आहोत.

व्हिडिओ: तुमच्या २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

https://youtu.be/Kcg43DO9qCc

२३ महिन्यांच्या मुलाचा विकास

तुमचे मूल पुढे मोठा टप्पा गाठणार आहे आणि लवकरच त्याचा दुसरा वाढदिवस येणार आहे. तुमच्या लक्षात येईल की तुमचे मूल आता छोट्या छोट्या गोष्टींना विरोध करू लागले आहे आणि थोडे बंडखोर झाले आहे. नक्की काय चुकते आहे ह्या विचारात पालक पडतील. येथे समस्या तुमच्या पालकत्वाची नसून तुमचे बाळ विकासाच्या ज्या टप्प्यात आहे त्याबाबतची आहे. तुमचे मूल कोणत्याही गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ शकते आणि गडबड करू शकते. काही वेळातच तुमचे मूल शांत होईल. पालक म्हणून शांत राहणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमचे मूल तुमच्याकडून खूप शिकत आहे. तुम्ही मुलाचा राग आणि स्वभावाच्या समस्यांवर कशी प्रतिक्रिया देता हे देखील महत्वाचे आहे. ह्या टप्प्यावर आपल्या मुलाच्या स्वभावाच्या समस्यांशी सामना करणे पालकांसाठी त्रासदायक असू शकते. तुम्ही शांतता राखणे फार महत्वाचे आहे. येथे २३ महिन्यांच्या मुलाचे विकासाचे काही टप्पे दिलेले आहेत. हे टप्पे तुमचे मूल वेळेत पार करेल.

शारीरिक विकास

तुमच्या मुलाची जन्मानंतरच्या पहिल्या वर्षी खूप वेगाने वाढ होते आणि फक्त पहिल्या वर्षी तुमच्या मुलाचे वजन त्याच्या जन्माच्या वजनाच्या दुप्पट असू शकते. तथापि, तुमच्या २३ महिन्यांच्या मुलाचे वजन केवळ ३ ते ५ पौंडांनी वाढू शकते. येथे तुमच्या मुलाचे इतर काही शारीरिक बदल दिलेले आहेत. ह्या टप्प्यावर तुमच्या मुलाचा शारीरिक विकास कसा होत आहे हे जाणून घ्या:

सामाजिक आणि भावनिक विकास

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळामध्ये अनेक सामाजिक आणि भावनिक कौशल्ये विकसित होत आहेत. तुमच्या मुलाने आत्मसात केलेली काही कौशल्ये येथे दिलेली आहेत.

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

येथे काही संज्ञानात्मक आणि भाषा कौशल्ये आहेत. ह्या वयापर्यंत ही कौशल्ये तुमच्या मुलामध्ये विकसित होऊ शकतात.

वागणूक

तुमचे मूल सतत सक्रिय असते आणि ते दिवसभर धावत असते. तुमचे मूल जन्मापासून सगळ्या गोष्टींचा सराव करत असते तसेच मोटर कौशल्यांच्या बाबतीत करते. तुम्ही तुमच्या मुलाला शांत बसवू शकत नाही कारण ह्या वयात तो सतत इकडे तिकडे धावत असतो. खरेदी, स्वयंपाक किंवा साफसफाई यासारखी दैनंदिन कामे करणे तुम्हाला अशक्य वाटू शकते. काही महिन्यांपूर्वी तुम्ही हीच कामे तुमच्या बाळासोबत आरामात करू शकत होतात. ह्याचे कारण असे की आता तुम्ही तुमच्या मुलाला एका जागी जास्त वेळ थांबवू शकत नाही. तुमचे लहान मूल इकडे तिकडे पळत राहील. तुमच्या मुलाला त्याच्या नवीन स्वातंत्र्याचा आणि कौशल्यांचा आनंद मिळतो.

काही मुले छोट्या जंपिंग-जॅकसारखे वागतात. तर इतर काही मुले तुम्हाला चिकटून राहतील आणि त्यांना सतत तुम्ही हवे असता. ह्या वयातील लहान मुलांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे हे समजत नाही. साधा व्हॅक्यूम क्लिनर किंवा ग्राइंडरचा आवाज सुद्धा त्यांना घाबरवू शकतो. तुम्हाला ही भीती थोडी अतार्किक वाटू शकते परंतु तुम्ही तुमच्या बाळाबद्दल सहानुभूती दाखवा आणि त्याला शांत करा. तुमच्या २३ महिन्यांच्या मुलाचे बोलणे आणि शब्दसंग्रह मर्यादित आहेत परंतु त्याची कल्पनाशक्ती खूप आहे हे तुम्हाला हे समजले पाहिजे. तुम्ही त्याची भीती समजून घेण्यात त्याला मदत केली पाहिजे. तुमचे २३ महिन्यांचे मूल जास्त बोलत नसेल किंवा पाच शब्दांपेक्षा कमी शब्द बोलत असेल तर त्यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

अन्न आणि पोषण

तुमच्या वाढत्या चिमुकल्यासाठी दररोज पोषक आहाराची आवश्यकता असते. तुमच्या मुलाला खायला घालणे तुम्हाला खूप कठीण वाटत असले तरी सुद्धा ह्या टप्प्यावर तुमच्या मुलाने योग्य प्रकारे खाणे महत्वाचे आहे. तुमच्या मुलाला कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जेवायला बसवावे. त्याला जेवणाची घाई असू शकते आणि त्याला वाट पाहणे आवडणार नाही. परंतु तरीही, लहान वयातच कुटुंबातील सदस्यांसोबत जेवण्याची सवय लावणे ही चांगली कल्पना आहे. जर तुमचे मूल गडबड करू लागले किंवा त्याला त्याच्या जेवणात स्वारस्य वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भरवणे थांबवा. त्याला जबरदस्तीने खायला घालणे चांगले नाही कारण त्यामुळे त्याला जेवणाचा कंटाळा येऊ शकतो. तुमच्या मुलाला वेगवेगळे अन्नपदार्थ देऊन पहा कारण त्याला त्याच अन्नपदार्थांचा खूप लवकर कंटाळा येऊ शकतो. त्याला दिवसातून तीनदा जेवण द्या आणि दोन ते तीन वेळा स्नॅक्स खायला देण्याचा प्रयत्न करा. बहुतेक मुलांना दूध प्यायला आवडते. कदाचित त्यांच्या बहुतेक कॅल्शियमच्या गरजा फक्त दुधापासूनच पूर्ण होतात. परंतु, जर तुमच्या मुलाला दूध आवडत नसेल तर तुम्ही त्याला दही, चीज किंवा सोया दूध देण्याचा प्रयत्न करू शकता. कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही काटे नसलेले मासे आणि इतर हिरव्या पालेभाज्या त्याला देण्याचा प्रयत्न करू शकता.

झोप

तुमचे मूल सतत इकडे तिकडे धावत असते आणि त्यामुळे त्याला चांगली झोप मिळणे सुद्धा फार महत्वाचे आहे. ह्या वयातील बहुतेक बाळांचे झोपेचे वेळापत्रक नीट सेट झालेले असते आणि बहुतांशी बाळे रात्री आरामात झोपतात. परंतु ह्या वयातील मुलांनी रात्रीचे जागे राहणे सुद्धा खूप सामान्य आहे. जर तो उठून चुळबुळ करू लागला तर काहीही प्रतिक्रिया देऊ नका कारण तो स्वतःचे स्वतः पुन्हा झोपू शकतो परंतु काहीवेळा तुम्हाला तुमच्या मुलाला पुन्हा झोपी जाण्यासाठी मदत करावी लागेल. तुमच्या लहान मुलाचे झोपेचे वेळापत्रक पाळणे फार महत्वाचे आहे. तुमच्या मुलाला रात्री ८ ते १२ पर्यंत उत्तम झोप मिळते, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला लवकर झोपण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तुमच्या बाळासोबत रात्री उशिरा कोणतेही क्रियाकलाप करण्यापासून दूर रहा कारण यामुळे तो अस्वस्थ आणि विक्षिप्त होऊ शकतो. तसेच जिथे कुठलाही व्यत्यय येणार नाही अशी एक छान आणि आरामदायक झोपण्याची जागा तयार करा. परंतु, जर तुमचे मूल गडबड करत असेल आणि झोपत नसेल तर तुम्ही शांत रहा आणि त्याला काय त्रास देत असेल ते समजून घ्या. कुठल्यातरी विशिष्ट आजारामुळे मूल तसे करत असण्याची शक्यता असते किंवा तुमच्या मुलाला सांत्वनाची गरज असल्यामुळे तो तुमचे लक्ष वेधून घेत असतो.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या मुलासोबत मजा करण्यासाठी हा सर्वोत्तम टप्पा आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलाला अनेक खेळ आणि क्रियाकलापांमध्ये सहभागी करून घेऊ शकता. येथे आम्ही तुमच्या मुलासाठी काही मजेदार आणि रोमांचक क्रियाकलापांवर चर्चा करणार आहोत. हे खेळ तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत खेळू शकता:

पालकांसाठी टिप्स

प्रत्येक पालक आपल्या मुलांची सर्वोत्तम काळजी घेत असतो. पालकांना आणखी मदत व्हावी म्हणून आम्ही येथे काही टिप्स शेअर करणार आहोत. ह्या टिप्समुळे तुमच्या मुलाला विकासाचे टप्पे गाठण्यास मदत होईल.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्याल?

तुम्ही तुमच्या मुलाच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणे फार महत्वाचे आहे. आपले मूल विकासाचे काही टप्पे गाठण्यात मागे आहे का असा विचार पालकांच्या मनात येऊ शकतो. खालील परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक आहे -

वर नमूद केलेल्या गोष्टी तुमच्या लहान मुलामध्ये आढळत असतील तर त्याच्या विकासामध्ये काही समस्या असण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मागील आठवडा: २२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास पुढील आठवडा: २४ महिने (२ वर्षे) वयाच्या बाळाची वाढ आणि विकास

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved