टॉडलर (१-३ वर्षे)

तुमच्या १८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे बाळ आता १८ महिन्यांचे झाले आहे. तुम्हाला  तुमचे बाळ दिवसभर घरात इकडे तिकडे धावताना दिसेल. लहान मूल आणि पालक दोघांसाठी हा खूप गोंधळात टाकणारा काळ आहे कारण तुमच्यासाठी तो अजूनही लहान बाळ आहे. परंतु तुमचे बाळ स्वतःला स्वतंत्र समजते आणि बऱ्याच गोष्टींचा शोध घेण्यास तयार असते. तुमच्या 18 महिन्यांच्या बाळाच्या वाढीच्या आणि विकासाच्या बाबतीत काय प्रगती होते आहे ह्याविषयी आपण ह्या लेखात चर्चा करणार आहोत.

व्हिडिओ: 18 महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास (अधिक क्रियाकलाप आणि काळजीविषयक टिप्स)

https://youtu.be/3g0Y3uNUnVk

18 महिन्यांच्या लहान बाळाचा विकास

तुमच्या लक्षात आले असेल की तुमचे लहान बाळ त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षाच्या तुलनेत वेगाने वाढत नाही. बाळाची वाढ मंद गतीने होत आहे. १८ महिन्यांच्या बाळाच्या वाढीचे काही टप्पे दिलेले आहेत.

1. शारीरिक विकास

तुमच्या बाळामध्ये अनेक शारीरिक बदल होत आहेत. तुमच्या 18 महिन्यांच्या बाळाचे वजन 22.4 ते 26 पौंड (मुलांचे) आणि 20.8 ते 24.5 पौंड (मुलींचे) असू शकते.

2. सामाजिक आणि भावनिक विकास

तुमचे लहान मूल या वयात विविध भावना अनुभवत आहे. येथे काही कौशल्ये दिलेली आहेत. ही कौशल्ये  तुमच्या बाळामध्ये वयाच्या 18 महिन्यांपर्यंत विकसित होऊ शकतात.

3. संज्ञानात्मक आणि भाषा विकास

तुमच्या १८ महिन्यांच्या बाळामध्ये खालील संज्ञानात्मक आणि भाषा विकास कौशल्ये तुमच्या लक्षात येतील:

वर्तणूक

तुमचे लहान मूल या वयात अधिक जागरूक होत आहे, आणि तो कसा मार्ग काढू शकतो हे त्याला माहीत आहे. ह्या काळात तुमच्या बाळाची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असते आणि जर त्याला हवे ते मिळाले नाही  तर तो गडबड करू शकतो आणि नाराज होऊ शकतो. तुमचे लक्ष कसे वेधायचे हे देखील त्याला माहित आहे. तुम्ही अजूनही तुमच्या बाळासाठी डायपर वापरत असाल, परंतु शौचालय प्रशिक्षण सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. मोठ्या भावंडासारखे तो पॉटी सीट वर बसून बघेल.

अन्न आणि पोषण

तुमच्या लहान बाळाची वाढ होते आहे आणि त्याप्रमाणे त्याच्या पौष्टिक गरजा बदलू लागतील. तुम्ही त्याला त्याच्या बेबी सीटवर बसवू शकता जेणेकरून बाळ कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जेवण करू शकेल. जरी तुमचे बाळ स्वतःहून जास्त काही खात नसले किंवा अन्नासोबत नुसते खेळत असले तरीही, मोठे झाल्यावर स्वतःचे स्वतः कसे जेवावे हे तो शिकेल. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बसून जर तो जेवत नसेल तर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे जेवण संपल्यावर त्याचे कौतुक करा. अशा प्रकारे त्याला त्याने काय केले पाहिजे हे लक्षात येईल. तुमच्या बाळाच्या आहार योजनेत तुम्ही सर्व अन्न गट समाविष्ट केल्याची खात्री करा. या वयापर्यंत, तुमच्या बाळाला दिवसातून तीन मुख्य जेवण आणि दोन ते तीन वेळा स्नॅक्स आवश्यक असते. मेंदूच्या विकासासाठी पूर्ण चरबीयुक्त दुधाचा आहारात समावेश करण्यास सांगितले जाते. जर तुमच्या बाळाला काही खाद्यपदार्थ आवडत नसतील तर त्याला जबरदस्तीने खायला देऊ नका. पण काही दिवसांनी त्या खाद्यपदार्थाची ओळख बाळाला दुसऱ्या स्वरूपात करून द्या. जर तुमचे बाळ अजूनही बाटलीने दूध पीत असेल तर त्याला सिपिकपची सवय लावण्याची ही वेळ आहे. तसेच जर तुमचे बाळ लैक्टोज असहिष्णु असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला सोया दूध देण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. अन्नाच्या ऍलर्जींबद्दल सावधगिरी बाळगा आणि त्यामुळे तुमचे बाळ त्यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहण्यासाठी एका वेळी एक खाद्यपदार्थ बाळाला देऊन पहा.

बाळाची झोप

काही पालकांना त्यांच्या लहान मुलाला झोपायला लावणे अत्यंत कठीण वाटू शकते. ह्याचे कारण म्हणजे बाळ त्याच्या भोवतालच्या जगाचा शोध घेण्यात इतका उत्सुक असतो की झोपेला तो प्राधान्य देत नाही. तुमचे बाळ थकलेले असू शकते परंतु तरीही, झोपायला नकार देते. अशा परिस्थितीत, झोपेच्या वेळी, झोप विचलित होणाऱ्या गोष्टी दूर कराव्यात. तसेच, झोपेचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे पालन करा.  वेळापत्रकाचे पालन केल्याने दररोज कोणत्या वेळी बाळाने विश्रांती घेणे आणि झोपणे अपेक्षित आहे हे त्याला समजेल. टीव्ही लावू नका, मोठ्या आवाजात संगीत लावू नका किंवा इतर भावंडांना सुद्धा बाळाच्या झोपेच्या वेळी दूर ठेवा.
तुमच्या बाळाची झोपेची पद्धत तितकीशी वाईट नाही. तुम्ही बाळाची झोपेची पद्धत कशी समजून घेता आणि त्याची योजना करता ह्यावर बाळाची झोप अवलंबून आहे. तुमचे बाळ रात्री अंदाजे 10 ते 11 तास झोपत असेल आणि दिवसा दोन ते तीन वेळा छोटी झोप घेत असेल. तुम्ही तुमच्या बाळाच्या झोपेचे वेळापत्रक पाळा. असे केल्याने तुमच्या बाळाला वेळेवर झोपण्याची सवय लागेल.

खेळ आणि उपक्रम

या वयात तुमच्या लहान बाळाला दिवसभर खेळायचे असते. त्याला तुमच्याबरोबर, त्याच्या भावंडांशी आणि अगदी तुमच्या पाळीव प्राण्यासोबत सुद्धा खेळायचे असते. परंतु तुमचे बाळ खूप लवकर कंटाळते आणि गोंधळ घालते. तुमचे मूल आनंदी राहण्यासाठी तुम्ही त्याला कसे गुंतवून ठेवू शकता? येथे आमच्याकडे काही रोमांचक आणि मजेदार क्रियाकलाप आहेत. ते वापरून तुम्ही तुमच्या लहान मुलाला गुंतवू शकता: असे बरेच खेळ आणि क्रियाकलाप आहेत. ह्या खेळांची योजना तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत करू शकता.

पालकांसाठी टिप्स

18 महिन्यांच्या बाळाच्या पालकांसाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

वर नमूद केलेले टप्पे या वयातील लहान मुलांनी सामान्यतः साध्य केलेले असतात. प्रत्येक मुलाने समान वेळ आणि नमुना पाळला पाहिजे असे नाही. तुमच्या बाळाने हे टप्पे लवकर किंवा उशिरा गाठणे अगदी सामान्य आहे. परंतु काहीवेळा तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ खूप मागे पडले आहे, जसे की: तुम्हाला तुमच्या बाळामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे किंवा इतर कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणखी वाचा:  १७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास १९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved