Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) दर-महिन्याला-होणारा-बाळाचा-विकास १९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

१९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

१९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे लहान मूल आता १९ महिन्यांचे आहे! त्याची वाढ आणि विकास पाहून तुम्ही खूप भारावून गेलेला आहात. वयाच्या १९ व्या महिन्यात, तो चालतो आहे, धावतो आहे आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांवर चढत आहे. तो दररोज दिसणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतर लोकांना ओळखू लागलेला आहे आणि आता त्याला बरेच शब्द माहित आहेत. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो आता नवनवीन गोष्टी करून बघण्याचा प्रयत्न करीत आहे. तो एखाद्या नवीन खेळण्यांमध्ये सहज रमू शकतो किंवा दुसरे एखादे नवीन खेळणे मिळाले कि त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. एखाद्या गोष्टीने लगेच कंटाळून जाणे हे ह्या वयाच्या मुलांचे वैशिष्ट्य आहे.

व्हिडिओ: तुमच्या १९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या बाळाची विनोदबुद्धी आता विकसित होऊ लागेल. जेव्हा तुम्ही एखादे गाणे म्हणता किंवा विनोदी चेहरा करता तेव्हा तुमच्या लहान मुलाला त्यातील मजा समजते. पण त्याचा राग काही कमी होणार नाही. १९ महिन्यांच्या बाळाच्या विकासाचे टप्पे पाहू या.

१९ महिन्यांच्या लहान मुलाचा विकास

१९ महिन्यांच्या वयात, तुमचे मूल अनेक क्रियाकलाप करू शकेल आणि त्याच्या सभोवतालच्या जगाबद्दल त्याला बरेच काही समजू शकेल. त्याला जितके शब्द बोलता येतात त्याहीपेक्षा जास्त शब्द तो समजू शकेल आणि तो स्वतःचे स्वतः चमच्याने खाऊ लागेल.

बर्‍याच वेळा, मुलाला त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीत काहीतरी चुकीचे आहे हे देखील लक्षात येईल. उदाहरणार्थ, जर त्याच्या बाहुलीला डोळा किंवा कान नसेल तर त्याच्या ते लक्षात येईल.

तुमच्या मुलाच्या वाढीच्या वेगानुसार तो बरेच काही करू शकेल. तो स्वतःचे हात धुवून कोरडे करू करतो. तसेच त्याला बाथरूमला कधी जायचे हे सुद्धा तो सांगू शकेल. त्याला माहित असलेले शब्द वापरून, तो पुस्तकांमध्ये बघत असलेल्या गोष्टी दाखवू शकतो.

आपल्या मुलाने त्याच्या वाढीच्या विविध पैलूंमध्ये किती प्रगती केली असेल ह्याचा तपशीलवार विचार करूया.

शारीरिक विकास

तुमच्या १९ वर्षाच्या मुलाने १९ महिन्यात वाढीचे किती टप्पे पार केलेले आहेत ते खालीलप्रमाणे.

 • तो कुठल्याही मदतीशिवाय वेगवेगळ्या दिशांना धावू शकेल. तो कदाचित मागे, कडेकडेने चालू शकतो आणि स्वतःहून पायऱ्या चढू शकतो
 • त्याची धावणे अधिक उत्साही असेल आणि तसे करताना तो पडू शकतो
 • जरी आता तो धावू शकत असला तरीसुद्धा त्याच्या हालचालींवर त्याचे पूर्ण नियंत्रण नसते. अंतराचा अंदाज घेणे तो नंतर शिकेल, परंतु बहुतेक वेळा कुठे तरी टक्कर होण्याआधी तुमचे लहान मूल थांबू शकत नाही.

ही परिस्थिती लक्षात घेता, आपल्या मुलाला धावण्यासाठी किंवा वेगाने चालण्यासाठी सुरक्षित जागा असल्याची खात्री करा. त्याला स्वत:ला दुखापत होऊ नये ह्यासाठी तुम्हाला कॉफी टेबल आणि फर्निचरच्या कडांना पॅड लावावे लागतील. फायरप्लेस आणि इतर धोकादायक जागा सुद्धा झाकल्या पाहिजेत. तुमचे बाळ अतिउत्साहामुळे पायऱ्यांवरून खाली पडणार नाही ह्याकडे लक्ष द्या.

 • तुमच्या १९ महिन्यांच्या बाळाचे वजन पहिल्या वर्षी जितके लवकर वाढले होते तितके आता वाढणार नाही
 • ह्या वयात त्याचे एखादी गोष्ट पकडण्याचे कौशल्यही बऱ्यापैकी विकसित झालेले असेल. तो कंटेनरमधील खेळणी पकडेल आणि पुन्हा त्यात टाकू लागेल आणि एकावर एक ब्लॉक ठेऊ शकेल
 • त्याच्यासाठी योग्य खेळणी विकत घेऊन तुम्ही त्याला त्याच्या बोटांचा अधिक वापर करण्यास प्रोत्साहित करू शकता, त्यामुळे त्याचे कौशल्य सुधारू शकते

शारीरिक विकास

सामाजिक आणि भावनिक विकास

भावनिक वाढीबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या बाळाची येत्या काही महिन्यात खूप भावनिक वाढ होईल. त्याला तुम्हाला सतत मदत करण्याची इच्छा होईल ही त्याच्या बाबतीतली सर्वात मोठी गोष्ट तुमच्या लक्षात येईल.

 • तुम्ही काही करत असाल तर तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. काही महिने तुमचे उत्सुकतेने निरीक्षण केल्यानंतर ह्या क्रियाकलापांबद्दल तो बरेच काही शिकेल आणि क्रियाकलापांदरम्यान तुमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असेल
 • जर त्याने तुम्हाला कपड्यांच्या घड्या घालताना पाहिले किंवा कार धुताना पाहिले तर त्याला सुद्धा ते करायचे असते
 • काम करण्याच्या त्याच्या क्षमतेपेक्षा त्याचा उत्साह खूप जास्त असतो. तरीही, आपण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याला गुंतवून ठेवण्याचा मार्ग शोधला पाहिजे

त्याला कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तो तुम्हाला मदत करण्यास तयार असेल तेव्हा तुम्ही त्याचे लाड देखील करू शकता. तुम्ही त्याला साधे, निरुपद्रवी क्रियाकलाप करायला लावू शकता, जसे की गाडी धुताना नळी धरून ठेवणे इत्यादी.

 • जरी आता त्याची केंद्रबिंदू बनण्याची इच्छा काही महिन्यांत कमी झाली असली तरी आता आणि नंतर ती इच्छा पुन्हा निर्माण होऊ शकेल
 • जेव्हा तो तुमचे लक्ष वेधून घेतो तेव्हा त्याला रागावू नका कारण भविष्यात त्यामुळे त्याला निराशा येऊ शकते
 • जर तुम्ही दुसर्‍या बाळाची अपेक्षा करत असाल तर तुमच्या मोठ्या मुलासाठी ही परिस्थिती कठीण होते. म्हणून, त्याच्या भावंडाच्या आगमनासाठी त्याला तयार करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता
 • तुमच्या मोठ्या मुलाला बाळाचे कपडे घडी करायला लावा आणि त्याला त्याच्या वस्तूंच्या प्रतिमा दाखवा. त्याला सांगा की त्याच्याबाळाला लवकरच त्यांची गरज भासेल. तुम्ही त्याला एक छोटीशी बाहुली सुद्धा देऊ शकता जेणेकरून तो बाळावर प्रेम करण्यास शिकेल

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

१९ महिन्यांच्या बाळाच्या संज्ञात्मक आणि भाषाविषयक विकासाविषयी जाणून घेऊ

 • तुमच्या मुलाकडे दहा ते पन्नास शब्दांचा शब्दसंग्रह असू शकतो
 • क्रियापदे वापरून त्याला साधी वाक्ये तयार करता येतील. सर्वनामांचा वापर करून, तो त्याचे विचार तुम्हाला सांगू शकेल
 • अन्वेषण करणे हा त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे आणि तो त्याच्या सभोवतालच्या विविध वस्तूंचे आकार आणि इतर भौतिक वैशिष्ट्ये समजून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करेल. एक सॉर्टींग बॉक्स त्याच्यासाठी एक उत्तम खेळणे बनेल. ह्या बॉक्स मध्ये वस्तू जागच्या जागी ठेवायच्या असतात.

त्याला आणखी विकसित करण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही त्याला पुस्तकांवरील विविध प्रतिमा दाखवू शकता. साधी वाक्ये आणि शब्द वापरून त्यांचे वर्णन करू शकता. तसेच, त्याला रंगांसाठीचे शब्द समजावण्याचा प्रयत्न करू शकता.

वागणूक

या वयात, तुमचे मूल अधिक स्वतंत्र आणि आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणून, तुम्ही त्याला काहीही सांगितलं तरी तो चांगला प्रतिसाद देणार नाही. त्याऐवजी, तुम्ही अधिक मैत्रीपूर्ण प्रतिसादासाठी प्रयत्न करू शकता. तुम्हाला काय हवे आहे ते त्याला समजावून सांगा आणि कोणत्या प्रकारचे वर्तन स्वीकारले जाणार नाही हे त्याला समजावून सांगा.

आपल्या मुलाशी कठोर होऊ नका आणि त्याचा विकास होत आहे हे समजून घ्या. तुम्ही तुमच्या मुलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असलात तरीही तुम्हाला राग येणार नाही ह्याची खात्री करा. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता हे त्याला कळू द्या.

अन्न आणि पोषण

ह्या वयात आपल्या मुलासमोर कुठलाही पदार्थ मांडला तरी सुद्धा तो साशंक असतो त्यामुळे बाळाला कुठलाही पदार्थ देण्याआधी त्याने तो आधी पाहिलेला आहे ह्याची खात्री करा. ह्या वयात अर्ध्या तासात त्याचा खाण्यातील रस कमी होईल. म्हणून, जेवणाच्या वेळा २० मिनिटांपर्यंत मर्यादित करा आणि हलका नाश्ता घेण्याची वेळ सुमारे दहा मिनिटांपर्यंत मर्यादित करा.

अन्न आणि पोषण

जर तुमचे बाळ अजूनही मोठ्या प्रमाणात स्तनपान करत असेल, तर कदाचित त्याला जेवणाच्या वेळी जास्त भूक लागणार नाही आणि लोहासारखी खनिजे त्याला पुरेशा प्रमाणात मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या १९ महिन्यांच्या बाळाच्या आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून त्याची निरोगी वाढ होईल.

झोप

तुमच्या मुलाला दिवसातून सुमारे १२ ते १४ तासांची झोप मिळते याची खात्री करा, कारण बाळांची वाढ झोपेत चांगली होते. त्याचे झोपेचे वेळापत्रक अनियमित नसावे. त्याच्या झोपेत सतत व्यत्यय येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पॉटी ट्रेनिंगची तयारी

तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मुलाचे डायपर ओले झाल्यास तो अस्वस्थ होईल. म्हणजेच त्याला डायपर मुळे अस्वस्थता येते त्यामुळे तुम्ही त्याचे ह्या वयात पॉटी ट्रेनिंग सुरु करू शकता. त्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया काळजीपूर्वक आणि धीराने केली पाहिजे.

खेळ आणि उपक्रम

१९ महिन्यांच्या बाळासाठी काही क्रियाकलाप आहेत त्याचे कौशल्य वाढण्यासाठी ते बाळाकडून करून घेतले पाहिजेत.

 • बाळ उठल्यापासून त्याचा विकास होईल अशा क्रियाकलापांमध्ये त्याला व्यस्त ठेवा. बॉक्स आणि किचन सेट ह्यासारख्या साध्या खेळण्यांमध्ये बाळ खूप वेळ गुंतून राहू शकते, तसेच त्याच्या संज्ञानात्मक आणि मानसिक क्षमतांचा त्यामुळे विकास होईल
 • त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवा, कारण बराच वेळ त्याचा आवाज आला नाही तर तो नक्कीच काहीतरी उदयोग करत असेल
 • त्याला त्याचे वाक्य पूर्ण करण्यास प्रोत्साहित करातुम्ही पुस्तकावरील प्रतिमेकडे एखादे बोट दाखवून त्याला प्रोत्साहित करू शकता आणि शेवटी विराम द्या जेणेकरून तो संबंधित शब्दाने वाक्य पूर्ण करेल

पालकांसाठी टिप्स

 • आपल्या मुलाच्या आहारात भरपूर द्रव आणि तंतुमय पदार्थ देऊन कधीही बद्धकोष्ठता होणार नाही ह्याची काळजी घ्या
 • तुम्ही त्याला फिरण्यासाठी ट्रायसायकल किंवा वॉकर देऊ शकता, कारण शारीरिक हालचालींमुळे त्याला त्याच्या पायाच्या स्नायूंमध्ये समन्वय साधण्यास मदत होईल तसेच त्याची भूक देखील वाढेल
 • त्याला वयोमानानुसार खेळणी द्या, कारण त्याला जे मिळेल ते चघळण्याची किंवा चावण्याची सवय असेल
 • क्रियाकलापांना प्रतिबंध करण्यासाठी बाळाच्या सभोवतालचा परिसर चाईल्ड प्रूफ करा

पालकांसाठी टिप्स

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुमचे बाळ ह्या अवस्थेत अत्यंत सक्रिय असते त्यामुळे अपघात होऊ शकतात. जर तुम्हाला बाळामध्ये काही असामान्य वाटले किंवा तुमचे बाळ कोणत्याही कारणाशिवाय दीर्घकाळ रडताना दिसले, तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. आपल्या मातृप्रवृत्तीवर विश्वास ठेवण्याचे लक्षात ठेवा. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा सुरक्षित राहणे केव्हाही चांगले आहे, त्यामुळे तुम्हाला थोडीशी शंका असली तरीही खात्री करण्यासाठी डॉक्टरांना भेट द्या.

ह्या वयात तुमचे मूल अधिक स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे जास्त लक्ष ठेवावे लागेल. नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण तो काय करत आहे ह्याची तुम्हाला खात्री नसते. ह्या वयात तुमच्या मुलाच्या पहिल्या आठवणी तयार होऊ शकतात, त्यामुळे भरपूर विनोद करा आणि तुमच्या बाळासोबत भरपूर फोटो काढा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article