टॉडलर (१-३ वर्षे)

मुलांचे शौचालय प्रशिक्षण (पॉटी ट्रेनिंग)

बाळ झाल्यानंतर सारखी वेगवेगळ्या प्रकारची साफसफाई करावी लागते आणि त्याची सुरुवात बाळाचे डायपर बदलण्यापासून होते! मुले आणि मुलींसाठी पॉटी ट्रेनिंगच्या टिप्स सारख्याच आहेत, परंतु मुलांना पॉटी सीट वापरण्याचे प्रशिक्षण देणे थोडे अधिक आव्हानात्मक आहे.

व्हिडिओ: मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग

https://youtu.be/e_Q9weibhs4

पॉटी ट्रेनिंग म्हणजे काय?

लहान मुलांना लघवी आणि मलविसर्जनासाठी शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया म्हणजे पॉटी ट्रेनिंग. लहान मुलांना डायपरची सवय असते. परंतु जसजशी मुलांची वाढ होते तसे त्यांना शौचालय वापरण्याचे प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे आणि ते योग्य वयात केले पाहिजे. पॉटी ट्रेनिंगची सुरुवात मुलांना लगेच टॉयलेटचा वापर करायला लावून होत नाही. ही प्रक्रिया हळू हळू होते. डायपर ते योग्य शौचालय वापरण्यापर्यंतच्या संपूर्ण टप्प्याला पॉटी ट्रेनिंग म्हणतात. म्हणून, ह्या लेखामध्ये मुलांचे पॉटी ट्रेनिंग कसे करावे आणि ते करत असताना काय करू नये हे स्पष्टपणे सांगितले आहे.

मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग कसे सुरू करावे?

सुरुवातीला, लहान मुलाला पॉटी ट्रेनिंग देण्यासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि असे म्हणतात की मुले  मुलींपेक्षा जास्त काळ डायपर घालतात. मुलांना सतत प्रेरणा देत राहिल्याने पॉटी ट्रेनिंग लवकर होण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या लहान मुलाला पॉटी ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी खालील काही गोष्टी लक्षात ठेवू शकता- तुमच्या मुलाला कोणत्याही त्रासाशिवाय पॉटी ट्रेनिंग करण्यासाठी त्याचे वय खूप मोठी भूमिका बजावते. जेव्हा तुमचे लहान मूल पॉटी ट्रेनिंग साठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असेल तेव्हा पालकांनी पॉटी ट्रेनिंग सुरु केले पाहिजे. काही मुले 2 वर्षांची होताच पॉटी ट्रेनिंग साठी तयार होऊ शकतात, तर काही मुले त्यांच्या तिसऱ्या वाढदिवसानंतरच तयार होऊ शकतात. 3 वर्षांचे झाल्यावर शौचालय प्रशिक्षणासाठी खूप उशीर झाल्यासारखे वाटू शकते, परंतु जर तुमचे लहान मूल तयार नसेल, तर तुम्ही त्याला ट्रेनिंग देण्याचा आग्रह धरू नये.
.तसेच, जर तुमचे लहान मूल नवीन भावंडाचे आगमन, शाळा बदल किंवा प्रवास यासारख्या इतर बदलांना सामोरे जात असेल, तर इतर कोणत्याही गोष्टीची ओळख करून देण्यापूर्वी वाट पाहणे योग्य आहे.

तुम्ही तुमच्या मुलाचे पॉटी ट्रेनिंग केव्हा सुरू करू शकता?

पॉटी ट्रेनिंग सुरू करण्यासाठी कोणत्याही तज्ञाने निश्चित वेळ सांगितलेली नाही. तुमचे मूल अंदाजे 18 महिने ते 3 वर्षांचे झाल्यानंतर तुम्ही पॉटी ट्रेनिंगची सुरुवात करू शकतात. काही मुले 4 वर्षांची झाल्यावर  पॉटी ट्रेनिंगसाठी तयार होतात. परंतु तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, आपण काही लक्षणांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

मुले पॉटी ट्रेनिंगसाठी तयार असल्याची चिन्हे

नवीन पालकांसाठी मुलांना पॉटी ट्रेनिंग करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, तज्ञांनी काही निश्चित चिन्हे सांगितलेली आहेत. तुम्ही मुलांना पॉटी प्रशिक्षित करण्याची योजना बनवण्याआधी ही लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. वर नमूद केलेली चिन्हे पालकांना मुलांसाठी पॉटी प्रशिक्षण देण्यासाठीचे वय ठरवण्यासाठी  मदत करू शकतात.

मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग टिप्स

पालक या नात्याने, बाळाला आत्मविश्वासाने प्रत्येक टप्पा गाठण्यात मदत करण्यासाठी पूर्णपणे तयार असणे महत्त्वाचे आहे. या पॉटी ट्रेनिंग टिप्स तुम्हाला तुमच्या मुलाच्या विकासाचा हा टप्पा जास्त त्रास न होता पार पाडण्यास मदत करतील. युरीन गार्डशिवाय पॉटी सीट विकत घेणे हा एक अतिरिक्त सल्ला आहे.

पॉटी ट्रेनिंग करताना काय करावे आणि काय करू नये?

वर नमूद केलेल्या पॉटी ट्रेनिंगच्या मार्गदर्शनामुळे नवीन पालकांना मुलांच्या पॉटी ट्रेनिंगबद्दल असलेल्या शंका दूर होतील. आम्ही आतापर्यंत चर्चा केलेल्या काही गोष्टींचा सारांश देण्यासाठी येथे काय करावे आणि काय करू नये हे सांगितले आहे काय करावे: काय करू नये: पालकत्व म्हणजे केकवॉक नाही. मुलांसाठीच्या पॉटी ट्रेनिंग टिप्स, ह्या लेखात तपशीलवार दिलेल्या आहेत. आम्हाला आशा आहे की तरुण पालकांना हा लेख,  संयमाची परीक्षा पाहणारा काळ पार करण्यास नक्कीच मदत करेल. आणखी वाचा:  मुलांमधील पोटदुखीसाठी प्रभावी घरगुती उपचार छोट्या मुलांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर सर्वोत्तम घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved