Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) दर-महिन्याला-होणारा-बाळाचा-विकास २१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे बाळ दोन वर्षांचे होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. तरीही त्याने विकासाचे अनेक टप्पे पार केले असतील आणि अनेक नवीन कौशल्ये विकसित केली असतील. तो अधिक आत्मविश्वासाने चालत असेल, धावत असेल, घरभर फिरत सुद्धा असेल. तो कदाचित त्याची खेळणी सहजतेने ढकलत असेल आणि ओढत असेल, जास्त प्रयत्न न करता पायऱ्या चढत असेल. किंबहुना, आतापर्यंत त्याने गिर्यारोहणाच्या कलेमध्ये प्राविण्य मिळवलेले असेल, म्हणजे तो टेबलटॉप, काउंटर, खुर्च्या इत्यादींवरून त्याला पाहिजे असलेल्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकत असेल.

व्हिडिओ: २१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२१ महिन्यांच्या मुलामध्ये भरपूर ऊर्जा असते. ह्या सततच्या हालचालीमुळे तुमच्या चिमुकल्याचे स्नायू बळकट होतात, त्याची संज्ञानात्मक आणि मोटर कौशल्ये विकसित होतात, त्याचे मन सजग होते आणि नंतर त्याला दिवसाच्या शेवटी शांतपणे झोप लागते! ह्या काळात त्याचे आक्रमक वर्तन हे चावणे, मारणे या स्वरूपातही प्रकट होऊ शकते. परंतु बहुतेक लहान मुले मोठी झाल्यावर त्यांच्या अश्या वर्तणुकीत वाढ होते.

२१ महिन्यांच्या लहान मुलांचा विकास

प्रत्येक मूल एक व्यक्ती आहे आणि त्याच्या विकासाचे विविध टप्पे असू शकतात. काही मुले काही टप्पे लवकर पार करू शकतात तर काहींना वेळ लागतो. प्रत्येक मुलाला त्याच्या स्वत: च्या वेळेनुसार आणि गतीनुसार त्याच्या प्रगतीचा तक्ता तयार करण्याची परवानगी देणे चांगले आहे. जर पालकांना वाटत असेल की त्यांच्या २१ महिन्यांच्या बाळाने विकासाचे काही टप्पे गाठलेले नाहीत तर त्यांनी विनाकारण काळजी करू नये किंवा घाई करू नये.

शारीरिक विकास

ह्या टप्प्यावर तुमच्या लहान मुलाला दररोज वेगवेगळी शारीरिक आव्हाने आवडतील. तुमचे लहान मूल त्याच्या शारीरिक क्षमतांचा शोध घेईल आणि नवीन नवीन साहसे करेल. शक्यतो आपल्या घराला त्याच्या साहसी खेळाचे मैदान मानतो तेव्हा तुमची धावपळ होऊ शकते. २१ महिन्यांच्या मुलाचे विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे:

 • तुमचे लहान मूल सर्वत्र आत्मविश्वासाने फिरत असेल आणि धावत असेल
 • तो तुमच्या घरातील फर्निचर इकडे तिकडे ढकलत असेल किंवा जास्त अडचणीशिवाय त्याभोवती खेळत असेल
 • वेगवेगळ्या पृष्ठभागावर चढून मग सहजतेने तो खाली उतरेल
 • तो कदाचित जास्त मदतीशिवाय पायऱ्या चढू आणि उतरू शकेल
 • तुमचा लहान मुलगा देखील स्वतःचा समतोल राखण्यास शिकत असेल आणि तोल न गमावता वाकणे आणि पुन्हा उभे राहणे यासारख्या गोष्टी चांगल्या प्रकारे करणे शिकत असेल
 • तो उलटे चालू शकतो, चेंडू उडवू शकतो, चेंडूला लाथ मारू शकतो आणि घराच्या सोप्या कामात तुम्हाला मदत करू शकतो

सामाजिक आणि भावनिक विकास

लहान मुले स्वतःचे एक जग तयार करू शकतात आणि त्यांना सर्व गोष्टी त्यांच्या मानाप्रमाणेच व्हाव्यात असे वाटत असते. ते लक्ष वेधून घेतात आणि त्यांचे वागणे काही वेळेला अस्वस्थ करणारे आणि अनियंत्रित सुद्धा असू शकतो. २१ महिन्यांच्या लहान मुलाचा सामाजिक आणि भावनिक विकास खालीलप्रमाणे असू शकतो:

 • तुमच्या लहान मुलाचा आत्मविश्वास वाढू शकतो. जर तुम्ही त्याला एखाद्याच्या सहवासात सोडले तर तो आता तुमच्याशिवाय थोडा अधिक आरामदायक राहू शकेल
 • बहुतेक लहान मुले स्वतःला मीकिंवा त्यांच्या स्वतःच्या नावाने संबोधू लागतात
 • तुमचे लहान मूल त्याची खेळणी किंवा वस्तू इतरांसोबत शेअर करण्यास इच्छुक असू शकते. तो इतरांबद्दल अधिक जागरूक होऊ शकतो
 • जर तुम्ही त्याला फोटोंचा अल्बम दाखवत असाल तर तुमचे लहान मूल त्याच्या ओळखीचे चेहरे ओळखू लागेल
 • तुमच्या लहान मुलाची सक्रिय कल्पनाशक्ती, त्याच्यामध्ये काही प्रमाणात भीती निर्माण करू शकते उदा: पाणी किंवा कीटकांची भीती.
 • लहान मुलांना अशा परिस्थितीत त्यांचे स्वातंत्र्य हवे असते त्यामुळे अनेकदा त्यांना राग येतो.

सामाजिक आणि भावनिक विकास

संज्ञानात्मक आणि भाषिक विकास

तुमच्या लहान मुलाची भाषा कौशल्ये सुधारत असल्याने त्याला स्वतःहून इतरांशी संवाद साधताना आत्मविश्वास वाटू लागतो. इतर काही संज्ञानात्मक आणि भाषाविषयक विकासात्मक टप्पे हे खालीलप्रमाणे असू शकतात:

 • तुमचे लहान मूल त्याच्या शरीराच्या अनेक भागांची नावे सांगू शकते
 • त्याला कागदावर किंवा भिंतींवर रंगानी रेघोट्या ओढायला आवडेल
 • त्याच्या संवेदनांच्या वाढत्या जाणीवेमुळे त्याला विविध गोष्टींचा वास, चव, देखावा आणि आवाज याविषयी उत्सुकता निर्माण होऊ शकते
 • तुमचे लहान मूल आता धीराने बसून चित्रांचे पुस्तक पाहू शकते किंवा जिगसॉ पझलचे काही तुकडे स्वतःचे स्वतः बसवू शकते, कारण त्याचे विचार आणि तर्क कौशल्ये विकसित होत आहेत.
 • तो साध्या सूचना समजू शकतो आणि सोपी वाक्ये बोलू शकतो आणि लहान वाक्ये बनवण्यासाठी त्यांचा वापरू करू शकतो

वागणूक

लहान मुले सहसा प्रौढांचे अनुकरण करतात. तुम्ही स्वतः चांगले वागून तुमच्या मुलास चांगले वागण्यासाठी मदत करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या मुलाने धन्यवादआणि कृपयाम्हणायचे असेल तर त्याच्याशी आणि इतर लोकांशी बोलताना तुम्ही ते शब्द वापरा. तुमच्या लहान मुलाला सूचना देताना नकारात्मकपेक्षा सकारात्मक गोष्टींचा अधिक वापर करा. उदाहरणार्थ, “कुत्र्याला मारू नका” असे म्हणण्याऐवजी “कुत्र्याला हळूवारपणे स्पर्श करा” असे म्हणा.

तुम्ही तुमच्या घरासाठी काही नियम निश्चित करू शकता. तुमचे लहान मूल सर्व नियमांचे पालन करू शकत नाही. त्याची सतत त्याला आठवण करून द्या. आपल्या मुलाच्या चांगल्या वागणुकीला बक्षीस देणे हा नेहमीच चांगला मार्ग आहे. अशी कृती त्याला चांगले वर्तन करण्यास प्रोत्साहित करू शकते.

लहान मुलांचे टेंपर टँट्रम्स

२१ महिन्यांची अनेक लहान मुलांमध्ये अनेकदा तीव्र मूड स्विंग, रागाची भावना, वारंवार आक्रमक वर्तन आढळून येते. विशेषतः जर त्यांच्या अश्या वागण्याला मोठ्या माणसांकडून प्रतिसाद मिळत असेल तर असे वर्तन जास्त जाणवते. ते त्यांच्या इच्छेनुसार काम करण्यास पुरेसे समर्थ आहेत की नाही हे तपासून बघण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. अशा परिस्थितीत, शांत राहणे महत्वाचे आहे आणि त्याच्या अश्या वागणुकीमुळे त्याला रागावण्याऐवजी त्यास सकारात्मक वागणूक देण्याचा विचार करा. उदाहरणार्थ, मोठ्या आवाजात बोलण्याऐवजी त्याचाशी शांतपणे बोला. जेव्हा शांतपणे बोलले जाते तेव्हा तुमचे लहान मूल ऐकेल अशी अपेक्षा असते. तुमच्या लहान मुलाला त्याच्या रागाच्या आणि निराशेच्या भावनेतून बाहेर पाडण्यासाठी थोडा वेळ द्या. कधीकधी त्याला एखादी मिठी मारल्यास त्यामुळे चमत्कार होऊ शकतो. काही मुलांना विचलित करण्यासाठी मनोरंजक खेळणी किंवा क्रियाकलाप ह्यासारख्या गोष्टींची आवश्यकता भासू शकते. जर तुमचा लहान मुलगा इतर लोकांसमोर गोंधळ घालत असेल तर त्याला शांत ठिकाणी घेऊन जा आणि तो शांत होईपर्यंत त्याचा राग निघून जाण्यासाठी त्याला वेळ द्या.

अन्न आणि पोषण

जर तुमचे २१ महिन्यांचे बाळ अजूनही बाटलीचे दूध घेत असेल तर तुम्ही त्याचे दूध सोडवण्यासाठी पावले उचलण्याचा विचार करू शकता. हा बदल तुम्ही हळू हळू करत आहात ना ह्याची खात्री करा. तुम्हाला तुमच्या लहान मुलाला रोज दूध पिण्यासाठी सिपर द्यायला आवडेल.

अन्न आणि पोषण

२१ महिन्यांच्या बाळाच्या आहारात सर्व प्रकारच्या निरोगी भाज्या आणि फळांचा समावेश असावा. पण मुले जेवण करायला त्रास देतात. त्यांना जेवणासाठी जबरदस्ती करू नका. कारण त्यामुळे त्यांना जेवणाबद्दल तिटकारा निर्माण होईल. तुम्ही जेवणाच्या तयारीत त्यांना सहभागी करून घेऊन त्यांना त्याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकता. त्यांना जेवण वाढताना सुद्धा कल्पनाशक्तीचा वापर केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. लहान मुलांमध्ये काही विशिष्ट अन्नपदार्थांची आवड निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची कमी प्रमाणात ओळख करून देण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या लहान मुलाला सुरुवातीला काही चाखून पाहण्यास आवडत नसेल तरी सुद्धा त्यांना ते देत राहा कारण नंतर तो ते अन्नपदार्थ स्वीकारेल.

झोप

तुमच्या लहान मुलाला आता दिवसा कमी झोप लागेल. तो कदाचित दिवसभरात फक्त एकदा किंवा दोनदाच झोपू शकतो. त्याची बहुतेक झोप आता रात्रीच होऊ शकते. झोपेच्या वेळी झोपी जाण्यासाठी तुमचे लहान मूल काही प्रमाणात आता प्रतिकार दर्शवू शकते. तथापि, आपल्या लहान मुलासाठी झोपण्याच्या वेळेची दिनचर्या तयार करणे आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे त्याने ती पाळणे महत्वाचे आहे. झोपेच्या वेळी तुमच्या लहान मुलाला वेगळे होण्याची चिंता जाणवू शकते आणि त्यामुळे त्यांच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. शिवाय, काही या वयाच्या लहान मुलांमध्ये झोप कमी होते. रात्रीचे चांगली झोप घेणारे तुमचे लहान मूल आता रात्रीचे सारखे उठू लागते. तुमच्या लहान मुलाच्या कल्पक मनामध्ये अंधार, राक्षसांची भीती यांसारख्या काही प्रकारच्या भीती निर्माण होऊ शकतात.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या लहान मुलाने त्याच्या वयानुसार खेळ खेळले पाहिजेत. हे केवळ त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नाही तर विकासाच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे. २१ महिन्यांच्या बाळाच्या खेळण्यांमध्ये फोन, ट्रेन, रेसिंग कार, खेळण्यातील खाद्यपदार्थ, तो सहज हाताळू शकणारी खेळणी उदा: खेळण्याचे ब्लॉक्स, प्लास्टिकच्या विटा आणि इमारती, बॉल, ट्रायसायकल, झायलोफोन सारखी ऍक्शन खेळणी यांचा समावेश असू शकतो. तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी मिनी क्लाइंबिंग फ्रेम्स आणू शकता किंवा फक्त काही उश्या एकावर एक अशा रचून ठेवू शकता किंवा त्याच्यासाठी अडथळ्यांचा कोर्स तयार करू शकता आणि त्याला मजा करू द्या. तुमच्या लहान मुलाला हावभाव करत गाणे गाणे, क्रेयॉन सोबत खेळणे, बोटांनी खेळणे पुरेसे मनोरंजक वाटू शकते.

पालकांसाठी टिप्स

मुलाच्या आरोग्य आणि विकासाबद्दल पालकांसाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत:

 • तुमच्या लहान मुलास होणारी कोणतीही हानी टाळण्यासाठी तुमचे घर चाइल्डप्रूफ करणे आणि संभाव्य धोके काढून टाकणे महत्त्वाचे आहे
 • दात किडण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्याला नियमितपणे दात घासण्यास प्रोत्साहित करा
 • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे पालक आपल्या लहान मुलांशी बोबडेपणाने न बोलता स्पष्टपणे आणि वारंवार बोलतात ते त्यांच्या मुलांचा शब्दसंग्रह विकसित करण्यास मदत करतात आणि तसेच मुले स्पष्टपणे बोलण्यास सुद्धा मदत होते
 • तुमच्या लहान मुलासाठी त्याच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा ह्याविषयी एक दिनचर्या तयार करा
 • आपल्या मुलास पोहणे शिकवण्यासाठी ही चांगली वेळ आहे.

पालकांसाठी टिप्स

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

जेव्हा तुमच्या मुलाच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या अंतःप्रेरणेचे पालन करणे नेहमीच शहाणपणाचे असते. काहीतरी गडबड आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर मार्गदर्शनासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुमचे लहान मूल खाण्यास त्रास देत असेल तर तुम्ही आहारतज्ञांचा सल्ला घेऊ शकता. काही लहान मुले उशिरा बोलू लागतात. परंतु २१ महिन्यांच्या मुलाने न बोलणे ही एक चिंताजनक परिस्थिती आहे. स्पीच पॅथॉलॉजिस्टकडून तपासणी करणे आवश्यक आहे.

तुमचे २१ महिन्यांचे लहान मूल विकसित होत असताना ते ह्या प्रक्रियेत विविध गोष्टींचा शोध घेण्यास उत्सुक असते. खासकरून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला आक्रमक वर्णन करताना बघता तेव्हा त्याला भरपूर प्रेम आणि पाठिंबा द्या. तुमच्या बाळासोबत ह्या टप्प्याचा आनंद घ्या. तुम्हाला तुमचे बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल!

मागील आठवडा: २० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
पुढील आठवडा: २२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article