तुमचे बाळ जेव्हा मोठे होऊन चालायला सुरुवात करते तेव्हा तुम्हाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यातील एक आव्हान म्हणजे बाळाला काय भरवावे? ह्या वयातील मुलांना प्रथिने, व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये, कर्बोदके, चरबी आणि बऱ्याच पोषणमूल्यांची गरज असते. तथापि, संतुलित आहारासाठी त्यांना दररोज काय द्यावे हे ठरवणे काही वेळा कठीण होते. खाली १ वर्षाच्या बाळासाठी साधा आहार दिला आहे ज्याची तुम्हाला ह्या टप्प्यावर मदत होईल.
१२ महिन्यांच्या मुलाला भरवण्यासाठी सोप्या मार्गदर्शक सूचना
तुमचे मूल जेव्हा एक वर्षाचे होते तेव्हा ते मोठ्या माणसांसारखे सगळे अन्नपदार्थ खाऊ लागते. तुमच्या लक्षात आले असेल की तुमचे बाळ आधीपेक्षा कमी खात आहे आणि ह्या टप्प्यावर तसे होणे अगदी नॉर्मल आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रिक्स नुसार, ह्या वयातील मुलांना उंचीमध्ये एक इंच वाढ होण्यासाठी दररोज ४० कॅलरीजची गरज आहे.
- बाळाला नवीन अन्न देताना तुमच्या कुटुंबाचा ऍलर्जीचा इतिहासाची चर्चा डॉक्टरांसोबत करा
- बाळाला बळेच भरवू नका कारण भूक लागली की मुले खातात
- दूध किंवा ज्यूस बाळाला जेवणाच्या आधी देऊ नका. जर तुम्ही बाळाला स्तनपान देत असाल तर बाळाला वारंवार स्तनपान देऊ नका. ३२ औंस दुधाचाची मर्यादा ठेवा कारण त्यामुळे बाळाला घनपदार्थ खाण्यासाठी पोटात जागा राहील
- बाळ नवीन पदार्थ खाण्यासाठी नकार देऊ शकते. परंतु तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका. बाळ तो पदार्थ स्विकारेपर्यंत बाळाला तो देत रहा
- बाळाला अजूनही घनपदार्थांची सवय झाली नसेल तर ते थोडे कुस्करून द्या, त्याची प्युरी करून देऊ नका.
खाली दिलेल्या १२ महिन्यांच्या बाळासाठीच्या तक्त्याची तुमच्या बाळाचा आहार तयार करण्यासाठी मदत होऊ शकेल
१ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता
पहिला आठवडा
न्याहारी |
दर दिवसाप्रमाणे तक्ता
- दलिया – सोमवार
- भाज्या घालून केलेला पराठा – मंगळवार
- दुधात शिजवलेले ओट्स – बुधवार
- मिक्स व्हेज डोसा – गुरुवार
- भाज्या घालून केलेलं धिरडे – शुक्रवार
- इडली/ गव्हाचा शिरा – शनिवार
- व्हेजिटेबल पोहे – रविवार
|
नाश्ता |
१ कप ज्यूस, २ वाटी फळांचे काप किंवा उकडलेले अंडे |
दुपारचे जेवण |
दुपारच्या जेवणामध्ये महत्वाची पोषणमूल्ये असलेल्या पदार्थांचा समावेश असावा
- पोळी वरणासोबत/ भात आणि भाजी ,दही – सोमवार
- साधी व्हेजिटेबल बिर्याणी आणि दही – मंगळवार
- वरण पोळी आणि हंगामी भाजी आणि दही – बुधवार
- पनीर (कॉटेज चीझ) भाजी आणि पोळी/ भात – गुरुवार
- चिकन रस्सा पोळी/भात – शुक्रवार
- मासे आमटी पोळी/भात – शनिवार
- व्हेज पुलाव आणि दही – रविवार
|
संध्याकाळचा नाश्ता |
व्हेजिटेबल सूप/ मिल्कशेक तुमच्या मुलाच्या आवडीच्या फळांपासून बनवलेले |
रात्रीचे जेवण |
रात्रीच्या जेवणासाठी पचायला हलके असे अन्न द्या
- व्हेजिटेबल खिचडी – सोमवार
- भोपळा घालून केलेली खिचडी – मंगळवार
- डोसा सांबार – बुधवार
- चिकन सूप आणि ब्रेड – गुरुवार
- छोटा व्हेजिटेबल पिझा, गव्हाच्या पिठाचा बेस वापरून – शुक्रवार
- बटाट्याचा पराठा आणि बटर – शनिवार
- भात आणि डाळ – रविवार
|
दुसरा आठवडा
न्याहारी |
- डाळीच्या पिठाचे धिरडे – सोमवार
- पनीर आणि भाज्यांचा पराठा – मंगळवार
- व्हेजिटेबल पोहे – बुधवार
- अंड्याचे सँडविच – बुधवार
- रताळ्याची खीर – गुरुवार
- रव्याचा उपमा – शुक्रवार
- रवा डोसा – शनिवार
- बटाट्याचा पराठा – रविवार
|
सकाळचा नाश्ता |
१ कप ज्यूस किंवा उकडलेले अंडे |
दुपारचे जेवण |
- सोयाची आमटी पोळी आणि दही – सोमवार
- कॉलीफ्लॉवर बटाटा रस्सा आणि पोळी, वरण आणि दही – मंगळवार
- दहीभात आणि रस्सम – बुधवार
- भात, वरण आणि घेवडा आणि दही – गुरुवार
- अंडाकरी भात – शुक्रवार
- चिकन रस्सा भात/ चपाती – शनिवार
- भात आणि मासे – रविवार
|
संध्याकाळचा नाश्ता |
भाजलेले बिट स्टिक्स/ तळलेले सफरचंद/ रवा पनीर कटलेट्स |
रात्रीचे जेवण |
- पराठा आणि पनीर भुर्जी – सोमवार
- चपाती आणि भेंडीची भाजी – मंगळवार
- व्हेजिटेबल सूप जिरा भात – बुधवार
- अंडाकरी आणि भात – गुरुवार
- डोसा आणि बटाट्याची भाजी – शुक्रवार
- मसूर डाळ खिचडी – शनिवार
- पनीर पराठा – रविवार
|
तिसरा आठवडा
न्याहारी |
- दलिया – सोमवार
- भाज्यांचा पराठा – मंगळवार
- दुधात शिजवलेले ओट्स – बुधवार
- मिक्स व्हेज डोसा – गुरुवार
- भाज्या घालून केलेले धिरडे – शुक्रवार
- इडल्या – शनिवार
- व्हेजिटेबल पोहे – रविवार
|
सकाळचा नाश्ता |
१ कप ज्यूस किंवा उकडलेले अंडे |
दुपारचे जेवण |
- वरण पोळी/ भात आणि भाजी – सोमवार
- साधी व्हेजिटेबल बिर्याणी आणि दही – मंगळवार
- वरण पोळी आणि हंगामी भाज्या आणि दही – बुधवार
- पनीर (कॉटेज चीझ) करी आणि पोळी/ भात – गुरुवार
- चिकन रस्सा आणि पोळी/भात – शुक्रवार
- माश्यांचा रस्सा आणि भात – शनिवार
- व्हेज पुलाव – रविवार
|
संध्याकाळचा नाश्ता |
व्हेजिटेबल सूप./ तुमच्या मुलाच्या आवडत्या फळाचा मिल्कशेक/ फ्रुट स्मूदी |
रात्रीचे जेवण |
- व्हेजिटेबल खिचडी – सोमवार
- भोपळ्याची खिचडी – मंगळवार
- डोसा आणि सांबार – बुधवार
- चिकन सूप आणि ब्रेड – गुरुवार
- छोटा व्हेजिटेबल पिझा, गव्हाच्या पिठाचा बेस वापरून – शुक्रवार
- बटाट्याचा पराठा आणि बटर – शनिवार
- भात आणि डाळ – रविवार
|
चौथा आठवडा
न्याहारी |
- डाळीच्या पिठाचे धिरडे – सोमवार
- पनीर किंवा भाज्या घालून केलेला पराठा – मंगळवार
- व्हेजिटेबल पोहे – बुधवार
- अंड्याचे सँडविच – बुधवार
- रताळ्याची खीर – गुरुवार
- रव्याचा उपमा – शुक्रवार
- नाचणी डोसा – शनिवार
- बटाट्याचा पराठा – रविवार
|
सकाळचा नाश्ता |
एक कप ज्यूस किंवा फळांचे काप असलेली वाटी |
|
- सोया करी आणि पोळी भात – सोमवार
- कॉलीफ्लॉवर बटाटा भाजी, पोळी, वरण आणि दही – मंगळवार
- दही भात आणि रस्सम – बुधवार
- भात, वरण, घेवड्याची भाजी आणि दही – गुरुवार
- अंडाकरी आणि भात – शुक्रवार
- चिकन रस्सा भात/पोळी – शनिवार
- मासे भात – रविवार
|
संध्याकाळचा नाश्ता |
भाजलेले बिट स्टिक्स/ सफरचंद रिंग्स/ मिक्स व्हेज फिंगर्स/ रवा पनीर कटलेट्स |
रात्रीचे जेवण |
- पनीर भुर्जी आणि पराठा – सोमवार
- पोळी आणि भेंडीची भाजी – मंगळवार
- व्हेजिटेबल सूप आणि जिरे भात – बुधवार
- भात आणि अंडाकरी – गुरुवार
- डोसा आणि बटाट्याची भाजी – शुक्रवार
- मसूर डाळ खिचडी – शनिवार
- पनीर पराठा – रविवार
|
आणखी वाचा: १३ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती