प्रत्येक संस्कृतीच्या स्वतःच्या अश्या पौराणिक कथा असतात – ह्या कथांमध्ये वीर पात्रे, पौराणिक प्राणी, देव, प्रगत तंत्रज्ञान आणि विलक्षण स्थाने यांचा समावेश असतो. ह्या कथांचे खरेपण कितपत आहे हे जरी माहिती नसले, तरी, एक माणूस म्हणून ह्या कथांविषयी आपल्याला अविश्वसनीय आकर्षण आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये मोठ्या आणि प्राचीन कथांचा समावेश आहे. ह्या कथा उत्तेजक, मनोरंजक आहेत आणि ह्या कथांमधून नैतिक शिकवण मिळते.
पौराणिक कथांमधून मुले काय शिकतात?
पौराणिक कथा मुलांना नैतिक मूल्ये शिकवतात. येथे काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या मुलांनी पौराणिक कथांमधून आत्मसात केल्या आहेत.
१. चांगले विरुद्ध वाईट
पौराणिक कथा मुलांना चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते, प्रत्येक वेळी चांगल्या कृतींचे महत्त्व सांगते. चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो हे देखील ह्या कथांद्वारे सिद्ध होते.
२. कल्पनाशक्तीला प्रोत्साहन
प्रगत तंत्रज्ञान, गूढ प्राणी आणि चित्तथरारक प्रतिमा असलेल्या पौराणिक कथांचे स्वतःचे असे एक जग आहे. कथेत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची कल्पना लहान मुलांचे मन करत असते आणि मुलांचे मन इकडे तिकडे धावू लागते. तुमच्याकडे सर्जनशील मन असेल तर काहीही अशक्य नाही हेही ह्या कथांमधून समजते.
३. मुले संस्कृतीशी जोडली जातात
भारतीय संस्कृतीत वारंवार दिसणारे सण आणि रितीरिवाज यांचे महत्त्व आहे. मुले त्यांचे अर्थ ह्या पौराणिक कथांद्वारे शिकतात. गोष्टी दिसतात तशा का आहेत हे मुलांना ह्या कथांद्वारे समजते. तसेच ह्या कथा मुलांची जिज्ञासा पूर्ण करतात आणि त्यांचे मन गुंतवून ठेवतात.
४. मुले आदर द्यायला शिकतात
आदर आणि शिस्त हे खूप महत्वाचे गुण आहेत. पौराणिक कथा लहान मुलांना त्यांचे वडील, शिक्षक आणि समवयस्कांचा आदर करण्यास शिकवतात. त्यामुळे मुलांना शिस्त लागते.
५. प्रेमाची शक्ती दर्शवतात
पौराणिक कथा मुलांना शिकवते की प्रेम सर्वांवर विजय मिळवते मग ते प्रेम कुटुंब, शिक्षक, देव यांच्यापैकी कुणावरही असो. सर्व शक्यतांविरुद्ध, आपल्या आवडत्या लोकांप्रती खरे राहण्यापेक्षा दुसरे काहीही नाही.
तुमच्या मुलांना वाचण्यासाठी सर्वोत्तम पौराणिक कथा
तुमच्या मुलांना पौराणिक कथांशी ओळख करून दिल्याने त्यांना त्यांची संस्कृती, श्रद्धा, भाषा आणि नैतिक श्रद्धा याविषयी शिकण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या मुलांना या कथा सांगून त्यांच्यासोबत काही गोड आठवणी देखील तयार करू शकता, त्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती तर विकसित होईलच पण भाषिक क्षमता वाढेल आणि चांगले संस्कारही होतील. येथे मुलांसाठी दहा हिंदू पौराणिक कथा दिलेल्या आहेत. ह्यामध्ये १० भिन्न पौराणिक पात्रे, त्यांचे क्लेश आणि त्यांच्याकडून शिकता येणारे धडे तपशीलवार आहेत.
१. एकलव्याचे समर्पण
एकलव्य हा एक तरुण मुलगा होता आणि तो त्याच्या टोळीसोबत जंगलात राहात होता. जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धारी बनणे हे त्याचे जीवनातील ध्येय होते. परंतु, जेव्हा त्याने द्रोणाचार्यांना त्यांचा विद्यार्थी होण्याबद्दल विचारले, तेव्हा त्याला नकार देण्यात आला. असे असूनही, एकलव्याने द्रोणाचार्यांची मूर्ती तयार केली आणि तो त्यामध्ये अविश्वसनीयपणे कुशल होईपर्यंत त्याने सराव केला, जेव्हा द्रोणाचार्यांसोबत त्याचा सामना झाला तेव्हा त्यांना त्याच्या कर्तृत्वाबद्दल कळले. तेव्हा त्याला भीती वाटली की एक आदिवासी मुलगा त्याचा सर्वोत्तम विद्यार्थी अर्जुनाला मागे टाकेल. त्यांच्याकडे शिकण्यासाठी एकलव्याने स्वतःच्या उजव्या अंगठ्याचा त्याग करावा अशी मागणी त्यांनी केली. काहीही न बोलता एकलव्याने ताबडतोब त्याचा उजवा अंगठा कापून त्यांना दिला आणि त्यामुळे तो जगातील सर्वोत्तम धनुर्धर होऊ शकला नाही.
नैतिक शिकवण:
ह्या पौराणिक कथेतून तुमचे मूल शिक्षक आणि प्रशिक्षकांबद्दल आदर आणि समर्पण शिकेल, तसेच कठोर परिश्रम करायला शिकेल.
२. सूरदासांची भक्ती
सूरदास हे श्रीकृष्णाच्या महान भक्तांपैकी एक होते. त्यांचे कृष्णावर इतके प्रेम होते की त्यांनी श्रीकृष्णची एक लाखाहून अधिक भक्तिगीते लिहिली. कथेनुसार सूरदास हा आंधळा होता. एकदा राधा जेव्हा त्याच्या मागे जात होती तेव्हा त्याने एकदा राधेचे पैंजण हिसकावून घेतले होते, ते परत करण्यास सांगितले असता, त्याने नकार दिला. तो आंधळा असल्याने तिची ओळख पटवू शकत नाही, असे त्याने नकार देताना सांगितले. यावेळी, कृष्णाने त्याला दृष्टी देऊन आशीर्वाद दिला, त्यानंतर सूरदासांनी कृष्णाला पुन्हा दृष्टी काढून घेण्याची विनंती केली. कारण विचारले असता, त्याने सांगितले की त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले आहे, आणि आता जगात पाहण्यासारखे दुसरे काही नाही.
नैतिक शिकवण:
ही कथा तुमच्या मुलाला निरपेक्ष प्रेम आणि भक्ती करायला शिकवते
३. अभिमन्यूचे धैर्य
कुरुक्षेत्र युद्धातील अभिमन्यू हा एक महान योद्धा होता. त्याची आई, सुभद्रा, अभिमन्यूच्या वेळी गरोदर असताना, त्याचे वडील अर्जुन यांनी तिला चक्रव्यूह युद्धनिर्मितीचे तंत्र सांगितले. अभिमन्यू गर्भापासूनच संपूर्ण तंत्र शिकला, परंतु अर्जनाने चक्रव्यूहातून कसे सुटावे हे सांगण्यापूर्वीच अभिमन्यू झोपी गेला. युद्धादरम्यान, अभिमन्यू कौरव सैन्याने तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकला होता. पळून कसे जायचे हे जरी तो शिकला नसला तरी त्याने आपल्या आई-वडिलांसाठी आणि कुटुंबासाठी लढत प्राण सोडले.
नैतिक शिकवण:
अभिमन्यूचे बलिदान तुमच्या मुलाला कुटुंब, शौर्य, प्रतिष्ठा आणि प्रेमाबद्दल निष्ठा शिकवेल.
४. रामाची प्रामाणिकता
रामायण म्हणजेच महाविष्णूच्या सहावा अवतार, श्रीरामाच्या कथांचे वर्णन करणारे महाकाव्य, सर्वांना माहीत आहे. रामायणात, रामाला आपले राज्य सोडून आपला भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनवासात जाण्यास भाग पाडले जाते. आपल्या वनवासाच्या शेवटी, लंकेचा राजा रावण, श्रीरामांच्या पत्नीचे अपहरण करतो आणि ओलीस ठेवतो. सर्व भयंकर संकटांना तोंड देत, श्रीराम हे रावण आणि त्याच्या प्रचंड सैन्याशी लढले आणि त्यांच्या पत्नीला वाचवून रावणाचा पराभव करण्यात यशस्वी झाले. .
नैतिक शिकवण:
या कथेची नैतिकता म्हणजे दोन भाऊ आणि पती-पत्नी यांच्यातील बंध ही आहे. ही कथा तुमच्या मुलाला मैत्री, सचोटी आणि प्रेम याबद्दल शिकवेल.
५. दुर्गेची ताकद
जेव्हा असुर-राजा महिषासुर देवांचा राजा इंद्राचा पराभव करून स्वर्गात त्याचे स्थान घेतो, तेव्हा सर्व देवतांच्या एकत्रित दैवी शक्तींमधून महान देवी श्रीदुर्गा तयार होते. त्यानंतर ती महिषासुराशी लढते आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा पराभव करते, जगाला वाचवते.
नैतिक शिकवण:
श्रीदुर्गेकडून लहान मुलामुलींना शिकता येते की स्त्रियांमध्ये देखील खूप धैर्य, सामर्थ्य आणि धार्मिकता असते.
६. प्रल्हादाचा विश्वास
हिरण्यकशिपू या राक्षसाचा पुत्र प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. परंतु, त्याच्या गर्विष्ठ वडिलांनी विष्णूचा द्वेष केला, ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे तो स्वतःलाच खरा देव मानत होता. त्याने अनेक पद्धतींनी प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु विष्णूने प्रल्हादला नेहमीच वाचवले. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मारण्याचा शेवटचा प्रयत्न केल्यानंतर, विष्णूने नरसिंहाचा अवतार घेऊन त्याला ठार मारले.
नैतिक शिकवण:
ही कथा मुलांना श्रद्धा, भक्ती आणि संयम या मूल्यांबद्दल शिकवते.
७. अर्जुनाची एकाग्रता
पांडव तरुण असताना त्यांनी गुरु द्रोणाचार्यांकडून हातून प्रशिक्षण घेतले. द्रोणाचार्यांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची होती, म्हणून त्यांनी एका खेळण्यातील पक्ष्याला झाडावर अडकवले आणि त्या सर्वांना पक्षाच्या डोळ्यावर नेम धरण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी सगळ्यांना काय दिसते आहे असे विचारले तेव्हा, पांडवांनी वेगवेगळी उत्तरे दिली, उदा: पक्षी, पाने, झाड इत्यादी, आणि सर्व जण चुकले. फक्त अर्जुनाने सांगितले की, त्याला पक्ष्याच्या डोळ्याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. प्रसन्न होऊन द्रोणाचार्यानी अर्जुनाला धनुष्यबाण मारण्यास सांगितले. अर्जुनाच्या बाणाने पक्ष्याच्या डोळ्याला अचूक भेदले.
नैतिक शिकवण:
ही कथा म्हणजे एकाग्रता आणि दृढनिश्चयाची आहे. मुलांना नेमके काय हवे आहे हे जाणून घेणे आणि त्या दिशेने कार्य करणे हे ह्या कथेद्वारे समजते. ह्या कथेमुळे त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल.
८. सीतेची ताकद
राम आणि सीता अयोध्येला परतल्यानंतर, राजा आणि राणीचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्यांनी एक समृद्ध राज्य सुरू केले. परंतु, सीता दुसर्या पुरुषाबरोबर म्हणजेच रावणासोबत राहिली होती अशी अफवा पसरली (जरी ती तिच्या इच्छेविरुद्ध होती). या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपल्या प्रजेचा अखंड विश्वास मिळवण्यासाठी, रामाने सीतेला वनात धाडले, तिथे ती ऋषी वाल्मिकींसोबत राहिली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि एकटीने वाढवले.
नैतिक शिकवण:
अशा प्रतिकूल परिस्थितीतही स्त्रिया कशा प्रकारे शूर आणि स्वतंत्र राहू शकतात हे ही कथा स्पष्ट करते.
९. श्रावणाची निष्ठा
श्रावण हा गरीब किशोरवयीन मुलगा होता. भारतातील सर्व धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रेत त्याच्या पालकांना घेऊन जात असे. ते म्हातारे आणि आंधळे असल्याने तो त्यांना दोन टोपल्या खांद्यावर टाकून घेऊन जात होता. अयोध्येचे जंगल ओलांडताना श्रावणाला राजकुमार दशरथाने मारलेला बाण लागला आणि त्याचा मृत्यू झाला. मरणासन्न श्वास घेऊनही तो दशरथाला त्याच्या तहानलेल्या आई-वडिलांना पाणी घेऊन जाण्याची विनंती करतो.
नैतिक शिकवण:
श्रावण म्हणजे दयाळूपणा आणि निष्ठेचे मूर्त स्वरूप. ही कथा तुमच्या मुलांमध्ये करुणेचा गुण रुजवेल आणि आई-वडिलांची काळजी घेण्यास मदत करेल.
१०. मंदोदरीचा संयम
मंदोदरी ही रावणाची पत्नी होती. त्याने दुष्कृत्ये आणि क्रूरता केली. तिने तिला न्याय्य आणि सन्माननीय असल्याचे पटवून देण्यासाठी अनेक दिवस घालवले. जरी रावणाने तिचे ऐकले नाही तरीही तिने त्याला सीतेला मुक्त करण्यास सांगितले,
नैतिक शिकवण:
जरी तुमच्या प्रिय व्यक्तींनी कितीही चुका केल्या तरीही ही कथा तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत धीर धरायला शिकवते. एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांच्या कृतींना नाही तर त्या व्यक्तीला आधार देणे.
भारतीय पौराणिक कथा ही राजकारण, नैतिकता, तत्त्वज्ञान, पालकत्व, प्रेम, युद्ध आणि धर्म ह्या सर्व धाग्यांनी गुंफलेली असते. या प्रेरणादायी कथा शेकडो वर्षांपासून अनेकांना प्रेरणा देत आहेत. तुमच्या मुलाला दयाळू आणि एक चांगली व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले अनेक सद्गुण आणि नैतिकता ह्या कथा शिकवतील. कला हे एक अत्यंत उपयुक्त माध्यम आहे. ह्या माध्यमाद्वारे मूल त्याच्या गुणांना उजाळा देत जग समजून घेऊ शकते. आकर्षक क्राफ्ट किट्सद्वारे मुलाच्या या विकासाला प्रोत्साहन द्या – अशा प्रकारे, तुमचे मूल स्वतःची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता कंटाळवाण्या नसलेल्या मार्गाने वाढवू शकते.
आणखी वाचा:
मुलांसाठी उत्तम नैतिक लघुकथा
लहान मुलांसाठी तात्पर्यासहित श्रीकृष्णाच्या बालकथा