Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास २ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

२ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

२ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

आपलं बाळ वाढताना पाहणे म्हणजे अगदी आनंददायी अनुभव असतो. पालक म्हणून बाळाच्या विकासाची प्रक्रियेवर लक्ष ठेवणे हे आवडू शकते. तथापि, प्रत्येक मूल हे वेगळे असते आणि विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पोहोचण्यासाठी विशिष्ठ वेळ घेते. पालक म्हणून आपण एक लक्षात घेतले पाहिजे की विकासाचा एखादा टप्पा पार करणे म्हणजे काही तुमच्या बाळाने भाग घेतलेली शर्यत नव्हे. थोडं आधी किंवा थोडं नंतर तुमचे बाळ सुद्धा विकासाचे सर्व टप्पे पार पडणार आहे. तथापि ह्या लेखामध्ये, आपण २ महिन्यांच्या बाळामध्ये आढळणारे विकासाचे सामान्यपणे आढळणारे टप्पे बघणार आहोत.

हालचाल कौशल्य

वयाच्या २ ऱ्या महिन्यात तुमच्या बाळाची खालील हालचाल कौशल्ये विकसित होत असतात

  • मान आणि डोक्याचे चांगले संतुलन राहते: तुमचे बाळ आता आधीपेक्षा चांगली मान धरू लागेल.
  • हालचालींमध्ये समन्वय वाढेल: तुमच्या बाळामध्ये सहज आणि समन्वय असलेल्या हालचाली वाढतील. पाठीवर झोपवल्यानंतर तुमचे बाळ हात आणि पाय किंचित पुढे सरकवू लागेल.
  • पकड घट्ट होईल: तुमच्या बाळाची पकड घट्ट होईल आणि हात पकडलेला हात सोडवून सुद्धा घेऊ शकते आणि टाटा करू शकते.
  • लाळ गळणे: तुमच्या बाळाच्या लाळेच्या ग्रंथ कार्यरत होतील आणि बाळाची लाळ गळू लागेल. लाळ गाळण्याचा दात येण्याशी संबंध असतो आणि तुमचे बाळ ४ महिन्याचे होईपर्यंत असे होते.

संवेदनांसंबंधीच्या विकासाचे टप्पे

खाली काही संवेदना विषयक विकासाचे टप्पे आहेत जे तुम्ही तुमच्या २ महिन्यांच्या बाळामध्ये बघू शकता.

  • ऐकण्याची क्रिया सुधारणे: तुमचे बाळ नीट ऐकू लागते आणि तुमच्या व तुमच्या पतीच्या आवाजातील फरक त्याच्या लक्षात येऊ लागतो. तसेच तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की तुमचे बाळ तुमच्या आवाजाला प्रतिसाद देऊ लागते आणि जिथून आवाज येतो तिथे वळून बघू लागते. ओळखीचे आवाज ऐकल्यावर बाळाला छान वाटू लागते. तुम्ही जितके जास्त गाणे गाऊ न बाळाशी बोलू लागत तितके जास्त बाळ प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देऊ लागते.
  • दृष्टी सुधारते: २ महिन्याच्या बाळाच्या विकासाचा टप्पा म्हणजे दृष्टी सुधारणे. तुमच्या बाळाला ६० सेंमी अंतरावरचे दिसू लागते म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाच्या जवळ चेहरा नेल्यास बाळ तुम्हाला ओळखू लागते. तुमच्या असेही लक्षात येईल की बाळ काही रंगांना आणि आकाराला प्रतिसाद देते. विरोधी रांगांमधला फरक बाळाला कळू लागला आहे जसे की पंधरा आणि काळा.
  • स्पर्शाला प्रतिसाद देणे: तुमचे बाळ मऊ स्पर्शाला प्रतिसाद देण्यास शिकेल आणि तुम्ही बाळाला मिठी मारली किंवा खेळवले तर बाळाला छान वाटते.
  • स्पर्शाची संवेदना वाढते: तुमचे बाळ खेळण्यांचा पोत ओळखण्यासाठी खेळणी चावेल आणि बाळाला आता कठीण आणि मऊ ह्यामधील फरक कळू लागेल.

संज्ञानात्मक (Cognitive) विकासाचे टप्पे

  • तुमचे बाळ हसू लागते: वयाच्या ह्या टप्प्यावर तुमचे बाळ हसू लागते. तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाशी बोलता किंवा तुमचा चेहरा हास्यास्पद करता तेव्हा बाळ तुमच्या कडे बघून हसू लागेल
  • माणसांचे चेहरे बाळाला चांगले समजू लागतील: तुमच्या बाळाला माणसांच्या चेहऱ्याविषयी चांगली समज येईल आणि काही अंतरावरून बाळ ओळखीचे चेहरे ओळखू लागेल. बाळाबरोबर पिकबू हा खेळ खेळल्यास बाळामध्ये वस्तूंच्या स्थायित्वाविषयीची संकल्पनेला सुरुवात होईल.
  • बाळाला कंटाळा आल्याची भावना बाळ दाखवू शकेल: विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण बाळ त्याला कंटाळा आला किंवा एखादी क्रिया निरास वाटली तर चिडचिड करू लागेल. आणि बाळाला कुठल्या तरी क्रियेत गुंतवून ठेवा हा तुमच्यासाठी संदेश असेल.
  • आजूबाजूंच्या वस्तूंचे निरीक्षण करायला बाळाला आवडेल: बाळ २ महिन्यांचे असताना तुम्चाला लक्षात येईल की बाळ नवीन वस्तूंविषयी खूप उत्सुक असेल. बाळ नवीन खेळण्यांचे डोळ्यांनी निरीक्षण करू लागेल आणि नंतर त्यांना स्पर्श करून किंवा चावून त्याविषयी जास्त समजून घेऊ लागेल. तुम्ही रंगीबेरंगी गोष्टींच्या पुस्तकांमधून बाळासाठी गोष्टी वाचू शकता. संगीत लावून ठेवणे ही सुद्धा समन्वय कौशल्य विकसित होण्यासाठी चांगली कल्पना आहे.

बोलण्याचा विकासाचा टप्पा

बोलण्याचा विकासाचा टप्पा

तुमच्या २ महिन्याच्या बाळाच्या तोंडातून गोड असे आवाज येऊ लागतील. ह्या आवाजांचा तसा काही अर्थ लागत नसला तरी तुम्ही बाळाशी सतत बोलत राहिले पाहिजे कारण त्यामुळे बाळाला पहिले काही शब्द बोलायला मदत होईल.

खालील काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करून पहिल्या पाहिजेत:

  • तुमच्या बाळासोबत तुम्ही सुद्धा बाळ जे बोलते ते बोलत रहा उदा: बाबा, दादा, पापा वगैरे
  • हळू हळू बोला म्हणजे बाळाला तुमच्या तोंडाच्या हालचाली लक्षात येतील आणि जे शब्द बोलता ते तो काळजीपूर्वक ऐकू शकेल.
  • बाळाशी खूप संवाद साधा म्हणजे बाळाला कसे ऐकावे आणि कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजेल बाळाची भाषा समजली असे दाखवा आणि बाळाला प्रतिसाद द्या
  • बाळाच्या तोंडावर जसे भाव असतात तसेच दाखवून बाळाला नीट संवाद साधण्यास मदत करा

काळजी केव्हा करावी?

काही पालक बाळाच्या विकासाच्या टप्प्यांची खूप काळजी करतात आणि सगळं ठीक तर आहे ना हे जाणून घेण्यासाठी खूप वेळा डॉक्टरांकडे जातात. जशी मोठी माणसे वेगळी असतात तसेच प्रत्येक छोटे मूल वेगळे असते. तथापि जर तुमच्या बाळामध्ये असे लक्षण आढळले तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका.

  • जर बाळ तोंडाजवळ हात नेत नसेल तर
  • जर बाळ मोठ्या आवाजाला प्रतिक्रिया देत नसेल तर
  • जर बाळ त्याच्या डोळ्यांनी वस्तूंचे निरीक्षण करत नसेल तर
  • जर बाळ लोकांकडे बघून हसत नसेल किंवा तोंडाने प्रतिक्रिया देत नसेल तर
  • जर पोटावर झोपवल्यानंतर सुद्धा बाळ मान धरत नसेल तर

तुमच्या बाळाला २ महिन्यांचा विकासाचा टप्पा पार करण्यासाठी मदतीसाठी काही टिप्स

खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुमच्या बाळाला वरील टप्पे गाठण्यासाठी मदत करतील :

  • तुमच्या बाळाला पोटावर झोपण्यास मदत करा. त्यामुळे बाळाला डोके आणि मानेचा संतुलन करण्यासाठी आणि हालचालीसाठी मदत करतील
  • जर तुम्ही स्तनपान करत असाल तर तुम्ही आणखी व्हिटॅमिन डी ड्रॉप्स ची मदत घेऊ शकता त्यामुळे तुमच्या बाळाच्या हाडांचा आणि दातांचा चांगला विकास होईल
  • तुमच्या बाळाच्या लसीकरणाच्या टप्प्याशी संलग्न राहा
  • तुमच्या बाळाला दुसऱ्या महिन्याच्या चेकअप साठी घेऊन जा
  • ह्या लेखामध्ये आपण सामान्यपणे २ महिन्यांच्या बाळामध्ये आढळणाऱ्या टप्प्यांची चर्चा केली आहे
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article