In this Article
बाळाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची वाढ आणि विकास समजून घेणे महत्वाचे असते. बाळाची वाढ कशी होते हे समजून घेण्याने, त्याचाच वयाच्या इतर मुलांशी तुलना करता येते आणि बाळाची वाढ नॉर्मल होते आहे ना हे पडताळून पाहता येते. तसेच त्यामुळे तुम्ही मार्गात येणारे कुठलेही आव्हान पेलण्यास तयार होत असता.
बाळाची वाढ
बाळाच्या आयुष्यातील प्रत्येक आठवड्यागणिक बाळाचे शरीर, हालचाल आणि शक्ती ह्यामध्ये लक्षणीय वाढ होते. बाळाची ह्या वयातील वाढ लक्षात घेता, खालील गोष्टींची मापे लक्षात घेतली पाहिजेत
- डोक्याचा परीघ
- वजन
- उंची
- सांध्यांची हालचाल
बाळाचा विकास
बाळाच्या वाढीचा सर्वात लक्षणीय भाग म्हणजे बाळाची समाजात मिसळण्याची गरज होय. ह्या वयात बाळाची आजूबाजूच्या वातावरणाप्रतीची जागरूकता वाढते आणि बाळ इतर मुले आणि मोठी माणसे ह्यांच्याशी संवाद साधू लागते. ह्याच कालावधीत बाळ तुम्हाला आणि बाळाच्या बाबाना ओळखू लागते. आपली काळजी घेणाऱ्या ह्या व्यक्ती आहेत हे बाळास समजते. बाळाच्या वाढीसाठी लक्षात घ्यावात अशा गोष्टी म्हणजे बाळाचा आहार, बाळाला भरवण्याच्या वेळा, झोप, वेगवेगळे क्रिया कलाप आणि बाळाचे आरोग्य इत्यादी. तुमच्या बाळाचे वैद्य तुम्हाला बाळाची दर महिन्याला वाढ कशी होते आहे हे समजण्यासाठी विकासाचे टप्पे देतील. जरी बाळाने विकासाचे टप्पे वेळेत पार केले नाहीत तरीही काळजीचे काही कारण नाही प्रत्येक बाळाचा विकासाचा वेग वेगळा असतो.
-
२० आठवड्यांच्या बाळाचा विकास
ह्या आठवड्यात लक्षात येण्याजोगा महत्वाचा विकासाचा टप्पा म्हणजे बाळ माणसांना ओळखू लागते. बाळाच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर बाळाला तुम्ही कोण आहात हे समजू लागते त्यामुळे तुमचा नुसता आवाज जरी ऐकला तरी बाळ हसू लागते.
-
२१ आठवड्यांच्या बाळाचा विकास
हा आठवडा तुमच्या बाळासाठी महत्वाचा आहे. बाळ एका बाजूला वळण्याचा प्रयत्न करेल. बाळ बडबड सुद्धा जास्त करू लागेल आणि हळूहळू आजूबाजूच्या आवाजावर आधारित बाळ हात पाय हलवू लागेल, ही शक्यता तुमचा किंवा तुमच्या पतीचा आवाज ऐकल्यावर जास्त आहे.
-
२२ आठवड्यांच्या बाळाचा विकास
ह्या आठवड्यात बाळाचा विकास हा खूप रोमांचक असतो कारण बाळाची मानेपासून पावलापर्यंत शक्ती वाढते. ह्या कालावधीतच बाळाला पोटावर झोपवल्यावर बाळ शरीराचा वरचा भाग उचलून धरते.
-
२३ आठवड्यांच्या बाळाचा विकास
बाळाच्या शारीरिक विकासासाठी हा महत्वाचा आठवडा आहे. ह्या कालावधीत तुमचे बाळ कुठल्याही आधाराशिवाय बसू शकेल. तुमच्या बाळाच्या स्नायूंची हालचाल समन्वित (coordinated) होईल आणि बाळ ह्या कालावधीत खूप जास्त बडबड करू लागेल.
तुमच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांवर लक्ष ठेवल्याने तुम्हाला त्याची योग्य ती काळजी घेता येईल आणि बाळ विकासाचे टप्पे गाठेल. काही कारणास्तव जर बाळाने हे विकासाचे टप्पे योग्य कालावधीत गाठले नाही तर ते बाळाच्या विकासातील त्रुटीचे लक्षण आहे आणि त्यावर काम करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे.
बाळाचे आरोग्य
बाळाचा विकास न होणे हे बाळाचे आरोग्य नॉर्मल नसल्याचे महत्वाचे लक्षण आहे. त्यामुळे ह्या काळात बाळाच्या शारीरिक क्रियांवर लक्ष ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. बाळ कमी शारीरिक हालचाल करत असेल तर त्यावर लक्ष ठेवा. जर तसे असेल तर काहीतरी गडबड असल्याचे ते लक्षण आहे. ५ महिन्यांचे बाळ हात वारंवार हलवण्याचा प्रयत्न करते आणि आजूबाजूला येणाऱ्या आवाजाची नक्कल करते. बाळाने सुद्धा तसा गोंगाट किंवा आवाज काढणे अपेक्षित आहे.
तुम्ही तुमच्या बाळावर लक्ष ठेवा आणि ते नेहमीपेक्षा जास्त रडत नाहीये ना ह्याकडे लक्ष द्या. काहीतरी गडबड आहे हे तुम्हाला सांगण्याचा बाळाचा तो एक मार्ग आहे. जरी ह्या वयाची बाळे सारखी रडत असली तरी जर त्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले तर काही तरी असामान्य असल्याचे ते लक्षण आहे.
जर काही असामान्य आढळले तर ते तपासून पाहण्यासाठी म्हणजेच बाळाला ताप तर नाही ना हे बघण्यासाठी बाळासाठीचा थर्मामिटर घरी आणून ठेवणे चांगले. तुमच्या डॉक्टरांचा फोन नंबर लवकर सापडेल असा ठेवा म्हणजे अपॉइंटमेंट घेणे सोपे जाईल. ह्या वयात बाळ निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाचे लसीकरणाचे वेळापत्रक होय. बाळाचे लसीकरण वेळेवर करा आणि प्रत्येक लसीकरणाची वेळ आणि त्याचे कार्य तुम्हाला माहित आहे ह्याची खात्री करून घ्या.
तुम्ही पण घ्यायच्या लसीकरणाच्या वेळांकडे दुर्लक्ष करू नका. खोकल्यासारख्या परिस्थीचा सामना करण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. तुमच्या डॉक्टरांशी बोलून ह्या काळात कुठले लसीकरण घेतले पाहिजे ह्याविषयी माहिती घ्या.
बाळाच्या विकासाचे टप्पे – ५ महिने
ह्या वयात वेगवेगळे क्रियाकलाप आहेत ज्यांचा तुम्ही विकासाचे निर्देशक म्हणून वापर करू शकता. इथे पाच महिन्यांच्या बाळासाठी काही क्रियाकलाप दिले आहेत जे तुम्ही बाळाच्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी वापरू शकता.
- खाली बसणे: ह्या वयात तुमचे बाळ खेळकर असते. ह्या वयात बाळांविषयी सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे बाळ स्वतःचे स्वतः बसू लागते आणि तो बाळाच्या विकासासाठी सर्वात महत्वाचा विकासाचा टप्पा आहे.
- पालथे पडणे: ह्या काळातील बाळाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी एका बाजूने पालथे पडणे. ज्या बाजूने बाळ पालथे पडते ते महत्वाचे असते अशा काही गैरसमजुती असतात. बाळाने पालथे पडणे हे सर्वात महत्वाचे आहे.
- पकड: अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाची पकड विकसित होत आहे. तुमचे बाळ गोष्टी हातात पकडण्याचा प्रयत्न करेल आणि बाळाचे त्यावर खूप नियंत्रण असेल आणि पकड घट्ट असणे म्हणजे बाळाची शक्ती वाढत असल्याचे लक्षण आहे.
- चव ओळखू लागते: सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे बाळाला भरवताना बाळाला चव कळू लागते. त्यामुळे बाळाला आवडी निवडी विकसित होतात. बाळाला काय आवडते हे तुमच्या लक्षात येऊ लागेल. बाळ अन्न जेव्हा थुंकू लागते तेव्हा ते बाळाच्या विकासाचे लक्षण आहे.
- आवाज ओळखण्याची क्षमता: ह्या काळात तुमच्या बाळाची श्रवणक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. जर तुमच्या बाळाने हा विकासाचा टप्पा गाठायचा ठरवला असेल तर तुम्ही बाळाशी खेळत असताना बाळ खेळात किती मग्न राहते ह्यावर लक्ष ठेवा. जर बाळाने तुमच्या आवाजाला, किंवा आजूबाजूच्या आवाजाला किंवा इतरांच्या आवाजाला सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद दिला तर ते चांगले लक्षण असते.
वर्तणूक
बाळाच्या विकासाच्या कालावधीत तुम्ही बाळासोबत असणे महत्वच आहे. ह्याच कालावधीत बाळाच्या विकासासाठी शैक्षणिक खेळणी किंवा उत्पादने विकणारी माध्यमे सुद्धा असतील. ह्या काळात बाळाची वाढ नैसर्गिकरित्या होत असते आणि जी खेळणी बाळाच्या ओळखीची सुद्धा नसतात त्यामुळे बाळाची वाढ झटपट होणार नाही. तुमच्या बाळाचा विकास होण्यासाठी तुम्ही बाळासोबत वेळ घालवला पाहिजे, त्याच्यासोबत खेळले पाहिजे. ह्या वयात तुमचे बाळ तुमच्याशी किंवा एखाद्या खेळ्ण्याशी संलग्न होईल. हे चांगले लक्षण आहे कारण त्यामुळे बाळाची भावनिक संवेदनशीलता आणि भावनिक विकास चांगला होतो. ह्या कालावधीत काही गोष्टींचा धोका लक्षात ठेवला पाहिजे जसे की टेडी बेअर्स, ब्लँकेट्स आणि उशा इत्यादी. ह्या गोष्टी बाळासाठी हानिकारक आहेत कारण त्यामुळे बाळाचे तोंड झाकले जाऊन बाळ गुदमरण्याची शक्यता असते. परंतु काही वेळा त्यांचा बाळाला बिछान्यात आरामदायक पद्धतीने ठेवण्यास फायदा होतो.
५ महिन्यांच्या बाळासाठी क्रियाकलाप
बाळाची वाढ होण्यासाठी खाली काही खेळ दिले आहेत ते तुम्ही बाळासोबत खेळू शकता ज्यामुळे बाळाची वाढ चांगली होईल.
- डोळ्यांनी बघणे: बाळाभोवतीचे सगळे विश्व बाळासाठी आश्चर्याने भरलेले असते. बाळासाठी एखादा उडणारा पक्षी किंवा कारचा आवाज ऐकणे किंवा बघणे हे खूप नवीन असते. तुम्ही ह्याच गोष्टीचा फायदा करून घेऊन बाळासोबत खेळून तुम्ही बाळाची दृष्टीची संवेदना विकसित करू शकता. कुठलेही बाळाला बघायला आवडेल असे आणि रोमांचक वाटेल असे खेळणे निवडा. बाळापासून ते एक फूट अंतरावर ठेवा आणि ते वेगवेळ्या दिशांना फिरवा. बाळाचे डोळे फक्त खेळण्यावर राहतील अशा पद्धतीने ही क्रिया करा.
- बाळाला वरती उचलून धरणे: ही क्रिया तुमच्याइतकीच तुमचे बाळ सुद्धा एन्जॉय करेल. ह्या क्रियेत तुमच्या बाळाला दर १०–१५ सेकंदांनी वरती उचलून धरा. असे केल्याने तुमच्या बाळाला दिशेची जाणीव होईल आणि अंतराळ संकल्पना विकसित होईल. असे केल्याने बाळाची स्पर्शाची जाणीव आणि संतुलन विकसित होते.
- ट्रेजर बॉक्स: बाळाचे लक्ष वेधून घेतील अशी खेळणी आणि वस्तू असलेला बॉक्स बाळासमोर ठेवा. मोठी, मऊ खेळणी निवडा म्हणजे बाळाच्या घशात अडकण्याचा धोका राहणार नाही. ह्यामुळे त्यांचेहालचाल कौशल्य विकसित होईल कारण ह्या कालावधीत वस्तूंवर तितकीशी पकड नसते. त्यामुळे ह्या मजेदार क्रियांमुळे बाळांना वस्तू सहजतेने नीट धरण्यास मदत होते आणि ती धरताना त्यावर किती दाब दिला पाहिजे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येते.
५ महिन्यांच्या बाळाची काळजी
ह्या काळात तुमच्या बाळाची काळजी घेणे महत्वाचे आहे. म्हणजे बाळाच्या वाढीला मदत होतील अशा क्रिया केल्या पाहिजेत. बाळाच्या विकासाच्या ह्या टप्प्यावर बाळाची काळजी घेण्यासाठी काही मार्ग आहेत ते खालीलप्रमाणे:
- बाळाच्या झोपेच्या जागी कुठलेही अडथळे नसावेत
- बाळाशी बोलत रहा. तुमच्याशी बोलण्यात किंवा खेळण्यात बाळाला व्यस्त ठेवा
- बाळांना गडद रंगांच्या खेळण्यांशी खेळू द्या, त्यामुळे बाळाला रंग ओळखता येईल आणि त्यांच्या मनाला चेतना मिळेल.
- बाळासाठी वाचन करा. तुमचे बाळ जितका जास्त तुमचा आवाज ऐकेल तितके त्याचसाठी चांगले आहे. बाळासाठी जास्तीत जास्त गडद रंगांची चित्रे असलेली पुस्तके वाचा आणि त्यामुळे बाळाला उत्तेजना मिळेल.
बाळाच्या विकासाच्या गरजा जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला
बाळाला भरवणे
तुमच्या बाळाच्या विकासाच्या गरजा ह्या टप्प्यावर भागवण्यासाठी चांगले पोषण महत्वाचे आहे. जरी बाळ आता बेबी फूड खात असेल तरी डॉक्टरांना विचारून हळूहळू संयमितरित्या घनपदार्थ बाळाला देण्यास सुरुवात करा. ५ व्या महिन्यात तुमच्या बाळाच्या पोषणाचा प्राथमिक स्रोत हा स्तनपान असला पाहिजे. तुम्ही थोड्या प्रमाणात वरचे अन्न बाळाला देऊ शकता. लक्षात ठेवा ह्या कालावधीदरम्यान तुमच्या बाळाला भूक लागलेली समजेल. किंवा नुसता आराम हवा आहे का हे सुद्धा बाळाला कळू लागेल. बाळाला भरवण्याचे चक्र थोडेसे आरामदायक ठेवा. त्यामुळे बाळाला भरवण्याची वेळ आणि झोपेचे वेळ ह्यामध्ये बाळाला वेळ मिळेल. बाळाच्या वजनाचा तक्ता तयार करा आणि प्रत्येक महिन्याला बाळाच्या शारीरिक विकासाची नोंद ठेवा,त्यामुळे बाळ कुपोषित राहणार नाही ह्याची खात्री करा.
झोप
ह्या कालावधीत तुमचे बाळ झोपेत एका कुशीवर वळेल. तुम्ही ह्यावर लक्ष ठेवा आणि शक्य होईल तेव्हा बाळाला पाठीवर झोपवा. बाळाला झोपवताना गुंडाळून झोपवा, त्यामुळे बाळ पोटावर झोपणार नाही. बाळाला पोटावर झोपवल्याने बाळाला धोका असतो आणि बाळ गुदमरण्याची शक्यता असते.
लक्षात ठेवा, जर बाळ एकाच बाजूने कुशीवर वळत असेल तर बाळाला गुंडाळा, जर बाळ दोन्ही बाजूने वळत असेल तर तसे करणे टाळा. तसेच बाळाला पाठीवर झोपवा. तुम्ही तुमच्या बाळाला सुरक्षितरित्या कसे झोपवले पाहिजे ह्याविषयी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणे हे अतिशय महत्वाचे आहे. बाळाची झोपण्याची जागा, बाळाचा चेहरा झाकला जाईल अशा गोष्टींपासून दूर ठेवा.
पालकांसाठी टिप्स
तुमच्या बाळाचा विकास होण्यासाठी काही टिप्स
- शांत राहून वैद्यकीय सल्ल्याचे पालन करा.
- बाळाच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद ठेवण्यासाठी वही ठेवा.
- लसीकरणाची नोंद ठेवा.
- तुमच्या बाळाशी खेळा, बाळाशी जितके बोलता येईल तितके बोला.
- स्वतःला निरोगी ठेवा. जर तुम्ही निरोगी नसाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे तुम्हाला अशक्य आहे
- तुम्ही नीट जेवण करत आहात ना ह्याकडे लक्ष ठेवा. तुमचे बाळ स्तनपान घेत आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जे खात आहेत त्यामुळे बाळाला आणि तुम्हाला पोषण मिळेलसल्ल्याचे पालन करा.
हे लक्षात ठेवा की विकासाचे हे सगळे टप्पे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि तुमचे बाळ स्वतःच्या एका विशिष्ट वेगाने वाढत असते. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही बाळाच्या गरजा, विकासाचे टप्पे आणि काळजी घेण्याच्या पद्धती ह्याविषयी सविस्तर बोला. हे महत्वाचे आहे की तुम्ही ह्याविषयी तुमच्या पतीसोबत आणि बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे.