Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ४०वा आठवडा

गर्भधारणा: ४०वा आठवडा

गर्भधारणा: ४०वा आठवडा

सर्वात आधी ४०व्या आठवड्यांपर्यंचा प्रवास तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन! कारण लवकरच तुमची आणि तुमच्या बाळाची भेट होणार आहे! बऱ्याच गर्भवती महिला सावधगिरी बाळगतात. गरोदरपणाविषयी बरीच माहिती वाचून ठेवतात आणि बाळाच्या आगमनासाठी स्वतःला तयार करतात.  आम्ही सुद्धा इथे तुमच्यासाठी गर्भारपणाच्या ४०व्या आठवड्याविषयी माहिती घेऊन आलो आहोत!

गर्भारपणाच्या ४०व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या बाळाचा तुमच्या गर्भात लक्षणीय विकास होत आहे, त्यापैकी विकासाचे प्रमुख टप्पे खालीलप्रमाणे:

 • चरबीचा थर: बाळाच्या शरीराचा १५% भाग हा चरबीयुक्त असून बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यास मदत होते.
 • केस आणि नखांची वाढ: ४०व्या आठवड्यात, बाळाची नखे आणि केसांची वाढ होतंच राहते आणि ती अधिकाधिक स्पष्ट होत जाते.
 • विकसित फुप्फुसे: फुप्फुसे संपूर्णत विकसित झाल्याने बाहेरच्या जगात श्वास घेण्यासाठी अनुकूल आहेत.
 • प्रतिपिंडाचा (Antibodies) साठा: नाळेद्वारे बाळाला अँटीबॉडीजचा पुरवठा केला जाईल त्यामुळे,बाळाला पहिल्या सहा महिन्यात संसर्गाचा सामना करता येईल.
 • दृष्टी सुधारते: बाळाची दृष्टी अंधुक असते आणि एका इंचाच्या अंतरावर असलेल्या गोष्टींवरच फक्त ती केंद्रित होऊ शकते.
 • वर नमूद केलेल्या गोष्टींसोबतच बाळामध्ये काही लक्षणीय बदल होतात उदा: जनन मार्गातून बाळ सहज पुढे सरकावे म्हणून, डोक्याची हाडे अजूनपर्यंत संपूर्णतः जुळलेली नसतात.

तसेच बाळाचे शरीर यशस्वीरीत्या बिलिरुबिनचे विघटन करते आणि नाळेद्वारे इतर टाकाऊ पदार्थांसोबत बाहेर टाकले जाते. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा नाळ कापली जाते आणि नंतर बाळाचे शरीर बिलिरुबिन मुक्त होते. ह्या प्रक्रियेला काही दिवस लागतात. काही वेळा ते बाळाच्या शरीरात साठते आणि बाळाला जन्मतःच कावीळ होऊ शकते. बाळाला सूर्यप्रकाशात ठेवल्याने ती कमी होते.

बाळाचा आकार केवढा असतो?

४० आठवड्यांच्या बाळाचे वजन २.७ किलो ते ४ किलो इतके असते आणि लांबी २९ इंच ते २२ इंच च्या दरम्यान असते. (बरीचशी बाळे जन्मतः छोटी किंवा मोठी कशीही असली तरी निरोगी वाढतात). तुमचे बाळ आता कालिंगडाएवढे आहे.

शरीरात होणारे बदल

गर्भाला सामावून घेऊन त्याचे नीट पोषण होण्यासाठी गर्भधारणेदरम्यान तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. हे माहित असणे महत्वाचे ठरेल की प्रसूतीच्या वेळी तुमची गर्भजल पिशवी फुटणार नाही. किंबहुना खूप कमी गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत तसे होते. जरी गर्भजल पिशवीचे आवरण फाटले तरीसुद्धा हळूहळू गर्भजल ओघळू लागेल किंवा त्याचा छोटा प्रवाह येईल.

४०व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भवती महिलांमध्ये खालील लक्षणे आढळतील

१. पायांमध्ये पेटके येणे

गर्भधारणेच्या ह्या टप्प्यावर बाळ खाली श्रोणी मध्ये सरकते, त्यामुळे त्या भागामध्ये अस्वस्थता जाणवते. ४०व्या आठवड्यात हे खूप सामान्य आहे.

२. झोप न येणे (Insomnia)

चिंतेमुळे तुम्हाला जरी झोप लागली नाही तरी हरकत नाही. तुम्ही पुस्तके वाचणे किंवा रोजनिशी लिहिणे ह्यामध्ये वेळ घालवू शकता. तसेच तुम्ही भरपूर विश्रांती सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे.

३. थकवा

तुमची झोप व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला थकवा येणे स्वाभाविक आहे. म्हणून तुम्ही स्वतःसाठी थोडा शांत वेळ आरामात घालवा.

४. कळा

आता पर्यंत सराव कळा (Braxton -Hicks ) तुम्ही अनुभवल्या असतील, परंतु आता येणाऱ्या कळा सराव कळा नसतील. त्यामुळे कळांवर बारकाईने लक्ष ठेवा. जर दोन कळांमधील वेळ अगदीच कमी असेल तर तुम्ही तुमच्या प्रसूतीच्या सुरवातीच्या टप्प्यावर आहात.

प्रसूतीची कुठली लक्षणे दिसून येतात?

४०व्या आठवड्यात, कदाचित प्रसूतीची कुठलीच लक्षणे दिसणार नाहीत. परंतु, ती लवकरच दिसू लागतील.

१. वारंवार आणि वेगाने येणाऱ्या कळा

जेव्हा येणाऱ्या कळांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा त्या ठराविक वेळाने नियमित येत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

२. गर्भजल गळणे किंवा गर्भजल पिशवी फुटणे

गर्भजल गळत असेल किंवा गर्भजल पिशवी फाटली असेल तर तुम्ही ते तपासून पाहू शकता. तुम्ही गर्भजल आणि नॉर्मल स्त्राव ह्यामधील फरक सहज ओळखू शकता. नेहमी होणारा स्त्राव थांबतो परंतु गर्भजलाचा प्रवाह हा थांबत नाही.

गर्भारपणाच्या ४० व्या आठवड्यात प्रसूती प्रेरित करणे

प्रसूती प्रेरित करण्याचे मार्ग खालीलप्रमाणे

१. गर्भाशयाचे आवरण

डॉक्टर्स गर्भाशयाच्या मुखातून आत बोटे घालून गर्भाशयाचे आवरण साफ करतात. ह्यामुळे prostaglandins ची निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ पडते आणि त्यामुळे प्रसूती प्रेरित होते. ह्या पद्धतीमुळे थोडी अस्वस्थता वाटू शकते.

२. औषधांनी गर्भाशयाचे मुख उघडणे

डॉक्टर्स औषधांचा वापर करून प्रसूती प्रेरित करू शकतात. prostaglandin नावाचे औषध त्यासाठी वापरले जाते. हे औषध तोंडाद्वारे घेतले जाते किंवा योनीमार्गात घातले जाते.

३. गर्भजल पिशवी फाडून प्रसूती प्रेरित करणे

तुमचे डॉक्टर्स गर्भजल पिशवी फाडून प्रसूतीची सुरुवात करू शकतात. ह्या प्रक्रियेला ‘Amniotomy’ असे म्हणतात. तुमचे डॉक्टर अगदी पातळ प्लास्टिकचे हुक वापरून गर्भजल पिशवी फोडू शकतात. जेव्हा बाळाचे डोके खाली सरकलेले असते किंवा गर्भाशयाचे तोंड थोडे उघडलेले असते तेव्हाच ही प्रक्रिया केली जाते. काही गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भजल पिशवी फुटल्यानंतर काही तासांनी प्रसूती कळा सुरु होतात. तथापि प्रत्येक स्त्रीसाठी हा कालावधी वेगळा असू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे.

४. पिटोसिन

हे कृत्रिम संप्रेरक प्रसूती प्रेरित करते किंवा कळा तीव्र करते.

गर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यात पोटाचा आकार

प्रसूतीची तारीख उलटून गेल्यावर सुद्धा तुमची प्रसूती झाली नाही तर इंग्रजी मध्ये त्यास ‘post -term pregnancy’ असे म्हणतात. बाळाचा जन्म आता केव्हाही होऊ शकतो किंवा अजून २ आठवडे सुद्धा लागू शकतात.

गर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यातील सोनोग्राफी

डॉक्टरांना बाळाची फुप्फुसे विकसित झाली आहेत किंवा नाही हे ह्या आठवड्यातील सोनोग्राफी मध्ये समजते. बाळाची हालचाल समजण्यासाठी तसेच आकुंचन पावताना हृदयाच्या ठोक्यांचा दर जाणून घेण्यासाठी ‘Non stress test’ केली जाते. बाळ आता बाहेरच्या जगात चांगले जगू शकणार आहे असे लक्षात आल्यावर प्रसूती प्रेरित केली जाऊ शकते.

आहार कसा असावा?

गर्भधारणेच्या ४०व्या आठवड्यात आईने कुठले पदार्थ खावेत ह्याची खाली यादी दिली आहे.

 • टोस्ट: शक्यतोवर टोस्ट सपकच ठेवा, त्यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल आणि पचनसंस्थेवर ताण सुद्धा येणार नाही.
 • पास्ता: पास्ता खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे भरपूर प्रमाणात कर्बोदके मिळतात त्यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या श्रमासाठी उर्जा राहते.
 • जेल-ओ किंवा ऍपलसॉस: अगदी पट्कन खाता येण्याजोगे हे पदार्थ असून त्यापासून उर्जा सुद्धा मिळते.
 • पॉपसिकल: ह्यामुळे सजलीत (hyadrated) राहण्यास मदत होते, आणि त्यापासून ऊर्जा मिळते. जर हे फळांपासून बनवलेले असतील तर त्यापासून व्हिटॅमिन्स सुद्धा मिळतात.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भवती आईसाठी काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तिला आरामदायक वाटण्यास मदत होईल.

हे करा

 • स्तनाग्रांना उत्तेजित करा: स्तनाग्रांना उत्तेजित केल्यास oxytocin ह्या संप्रेरकाची निर्मिती होते, त्यामुले गर्भाशय संकुचन पावते. परंतु असे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका.
 • चालणे: चालण्याने बाळ खाली म्हणजेच जनन मार्गाकडे सरकते त्यामुळे प्रसूती प्रेरित होण्यास मदत होते. प्रसूती कळा येत असताना चालल्याने गर्भवती स्त्रीला खूप अस्वस्थता वाटू शकते.
 • मसालेदार पदार्थ: मसालेदार पदार्थ खाल्ल्याने प्रसूती लवकर होते असे कुठेही सिद्ध झालेले नाही परंतु तुम्ही लसूण आणि जिरे असलेले पदार्थ खाऊन प्रयत्न करून बघू शकता.
 • शारीरिक संबंध: ह्यामुळे प्रसूती लवकर होण्यास मदत होते तसेच तुमच्या साथीदारासोबतचा बंध अधिक घट्ट होतो.

हे करू नका

 • धूम्रपान: जरी तुम्ही धूम्रपान करत नसाल तरी सुद्धा तुमच्या आसपासचे कुणी धूम्रपान करीत असेल तर तुमच्या पोटातील बाळाला श्वसनाचे विकार होऊ शकतात.
 • कॅफेन: कॅफेन मुळे झोप लागत नाही (Insomnia) तसेच बाळाला मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

बाळाच्या जन्माच्या आधी काही गोष्टीत आईकडे असल्या पाहिजेत त्याची यादी खालील प्रमाणे

 • नॅपी
 • अल्कोहोल नसलेले सॅनिटायझर्स
 • क्रिब मधील गादी साठी, मऊ आणि वॉटरप्रूफ पॅड्स
 • निपल शिल्ड्स
 • चोखणी(Pacifier), बाटल्या आणि वाईप्स
 • स्तनपानाच्या वेळी वापरायचे मलम

आता बाळाचं आगमन कुठल्याही क्षणी होऊ शकते, तासाठी प्रसूतीच्या लक्षणांकडे लक्ष द्या. तसेच पुरेशी व्यवस्था करून ठेवा त्यामुळे हॉस्पिटलला जाताना धावपळ होणार नाही.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३९वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ४१वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article