Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: २३वा आठवडा

गर्भधारणा: २३वा आठवडा

गर्भधारणा: २३वा आठवडा

तंत्रज्ञानातील विकासामुळे तुमच्या पोटातील बाळाच्या विकासावर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे, तसेच तुमच्या बाळाच्या विकासातील प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करता येतो. सामान्यपणे गर्भारपणाचा कालावधी ४० आठवडे इतका असतो आणि ३ तिमाहींमध्ये तो विभाजित होतो. २३वा आठवडा दुसऱ्या तिमाहीमध्ये येतो आणि हा काळ तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी महत्वाचा आहे.

२३व्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या प्रवासाच्या मध्यावर आला आहात. गर्भावस्थेच्या ह्या टप्प्यावर, गर्भाची वेगाने वाढ होत असते तसेच त्याचे महत्वाचे अवयव विकसित होत असतात, त्यामुळे आईच्या शरीरात आणि संप्रेरकांच्या पातळीमध्ये लक्षणीय बदल होत असतात. जसजशी बाळाची वाढ होते तसे आपले पोट स्पष्ट दिसू लागते  आणि तुमच्या बाळाच्या पोटातील हालचालींचा अनुभव सुद्धा तुम्ही घेता.

गर्भारपणाच्या २३व्या आठवड्यातील तुमचे बाळ

२३व्या आठवड्यात तुमच्या बाळाचे वजन लक्षणीय रित्या वाढू लागते. ह्या टप्प्यावर बाळाची त्वचा सुरकुतलेली असते. २३ व्या आठवड्यात, फुप्फुसातील रक्तवाहिन्या श्वसनास मदत होण्यासाठी विकसित होत असतात तसेच पुढच्या काही आठवड्यांमध्ये मेंदूच्या कोट्यवधी पेशी विकसित होतील. हालचालींची संवेदना सुद्धा बाळामध्ये विकसित होईल आणि तुम्ही हालचाल केलेली बाळाला समजेल.

बाळाचा आकार केवढा असतो?

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ साधारणपणे ११ इंच लांब असते आणि बाळाचे वजन एक पौंडापेक्षा जास्त असते. गर्भावस्थेच्या २३व्या आठवड्यातील बाळाचा आकार आंब्याएवढा असतो. तुमच्या बाळाची वाढ खूप वेगाने होत असते आणि बाळाचे वजन पुढच्या ४ आठवड्यांमध्ये दुप्पट होते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या काळात गरोदर स्त्रीच्या शरीरात लक्षणीय बदल होत असतात. बाळंतपणाची तारीख जशी जवळ येऊ लागते तसे हे बदल आणखी स्पष्ट होऊ लागतात. गर्भारपणाच्या २३व्या आठवड्यात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल कारण तुमच्या पोटाचा आकार वाढलेला असेल आणि तुमचा गुरुत्वाकर्षण केंद्र बदल होत आहे. तुमची बेंबी दाबली गेली असल्यास, ती सुद्धा वर येऊ शकते. योनीमार्गातून पांढरा किंवा पिवळसर स्त्राव येऊ शकतो. तुमच्या बाळाच्या वाढलेल्या वजनामुळे तुमची पावले सुजतील आणि तुमचे गुडघेसुद्धा दुखू शकतील. तुमच्या पायांच्या टाचा आणि हाताचे तळवे लाल होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला उष्णतेमुळे रॅशेस होतील आणि किंवा त्वचेवर चामखीळ होऊ शकतात.

गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसू लागतात आणि तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बेंबीच्या मध्यभागापासून एक गडद रेषा दिसेल. तिला इंग्रजीमध्ये linea nigra असे म्हणतात. ही रेषा बेंबी पासून खाली ओटीपोटाच्याही खालपर्यंत गेलेली दिसते. गर्भारपणातील संप्रेरकांच्या बदलांमुळे ही रेषा उमटते. काही स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर सुद्धा म्हणजेच नाक, गाल, डोळे आणि कपाळावर सुद्धा डाग दिसतात.

२३व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

दुसऱ्या तिमाहीतली लक्षणे पहिल्या तिमाहीपेक्षा वेगळी असतात. पहिल्या तिमाहीत प्रामुख्याने मळमळ आणि थकवा जाणवतो आणि दुसऱ्या तिमाहीत खालील लक्षणे दिसतात.

पायाचे घोटे तसेच पावलांना सूज येणे: तुमच्या वाढलेल्या वजनामुळे पायाच्या घोट्याना आणि पावलांना सूज येते. ह्यावर उपाय म्हणजे जितके शक्य होईल तितके पाय वर ठेवणे, नियमित चालणे आणि भरपूर पाणी पिणे. जर अचानक पायांना खूप सूज आली तर ते प्रीकॅलॅम्पसिया (Preeclampsia) चे लक्षण असू शकते, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे ही एक गर्भारपणातील गुंतागुंत आहे.

पाठदुखी: २३ आठवड्यांच्या गरोदर स्त्रियांमध्ये पाठदुखी सामान्य आहे कारण वाढणारे बाळाचा दाब पाठीच्या मणक्यावर पढतो आणि त्यामुळे पाठीच्या स्नायूंवर दाब पडतो. नियमित व्यायाम केल्यास दुखणे कमी होते.

सराव कळा (Braxton Hicks contractions): प्रसुतीकळांच्या खूप आधी ह्या कळा येण्यास सुरुवात होते, आणि ह्याचा अनुभव तिसऱ्या तिमाही दरम्यान येतो. तुमच्या गर्भाशयाचे स्नायू ३० ते ५० सेकंदात आवळले जातात आणि ही स्थिती २ मिनिटांपर्यंत राहू शकते. स्थिती बदलत राहा आणि आरामदायक राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.

हिरड्यांना सूज येणे व रक्त येणे: गर्भारपणातील संप्रेरके रक्तप्रवाह वाढण्यास कारणीभूत असतात त्यामुळे हिरड्यांना सूज येते आणि रक्तप्रवाह वाढतो. जर हिरड्या नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील असतील तर तुम्ही मऊ दातांचं टूथब्रश वापरू शकता.

वारंवार लघवीला होणे: गर्भारपणातील सर्वात सामान्यपणे आढळणारे लक्षण म्हणजे वारंवार लघवीला होणे, आणि ह्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला लघवीला पळावे लागेल.

घोरणे आणि नाक चोंदणे: इस्ट्रोजेन च्या वाढत्या पातळीमुळे तुमच्या नाकाच्या रक्तवाहिन्यांना सूज आल्यामुळे असे होते.

गर्भधारणेच्या २३व्या आठवड्यात पोटाचा आकार

२३व्या आठवड्यात तुमच्या पोटाचा घेर २१ ते २५ सेंमी इतका असतो. ह्या टप्प्यावर तुमच्या वजनातील वाढ १२-१५ पौंड इतकी असते, परंतु जर तुम्हाला जुळी मुले होणार असतील तर वजनातील वाढ कमीत कमी २३ पौंड इतकी असते.

गर्भधारणेच्या २३व्या आठवड्यातील सोनोग्राफी

२३व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड मध्ये तुमच्या बाळाची वाढ आणि विकास किती झाला हे कळते. २३व्या आठवड्यात, गर्भाचा चेहरा पूर्णतः विकसित झालेला असतो आणि बाळाच्या छातीवर छोटी स्तनाग्रे सुद्धा दिसू लागतात. बाळ तुमच्या हृदयाचे ठोके ऐकू शकते आणि कुत्रांच्या भुंकण्याचा आवाज तसेच कारच्या हॉर्नचा आवाज सुद्धा बाळाला ऐकू येत असतो.

आहार कसा असावा?

बाळाचे वजन झपाट्याने वाढत आहे आणि बाळाचे महत्वाचे अवयव विकसित होत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या बाळाला तुमच्याद्वारे पोषण मिळत आहे ना ह्याची खात्री केली पाहिजे. ज्या अन्नपदार्थांचे तुम्ही सेवन करत आहेत त्यामध्ये आवश्यक असणारी पोषणमुळे जसे की व्हिटॅमिन्स, प्रथिने, कॅल्शिअम, लोह असले पाहिजेत. तसेच पोषक नसलेले अन्नपदार्थ जसे की चरबीयुक्त तसेच साखर आणि मीठ असलेले पदार्थ टाळले पाहिजेत. दुग्धजन्य अन्नपदार्थ, सुकामेवा, मासे, अंजीर तसेच हिरव्या पालेभाज्या, सीरिअल्स हे गर्भारपणाच्या २३व्या आठवड्याचा भाग असला पाहिजे कारण ते लोह, कॅल्शिअम आणि तुमच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या पोषणमूल्यांचा स्रोत असतात.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

तुमच्या गर्भारपणाच्या मध्यावर तुम्हाला खूप उत्साही किंवा उदास वाटेल, शरीरातील बदलांबरोबरच चिंतेमुळे ताण वाढेल. अशा परिस्थितीत, शांत राहून स्वतःची काळजी घेणे चांगले. ज्या क्रियांनी ताण वाढतो अशा गोष्टी करणे टाळा  आणि तुमच्या दिनक्रमात मग्न राहा ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल जसे की व्यायाम, योग आणि मेडिटेशन इत्यादी.  इथे कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नयेत त्याची यादी दिली आहे, त्यामुळे तुमच्या ह्या प्रवासास मदत होईल.

हे करा

  • आरोग्यपूर्ण आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि सजलीत रहा.
  • दररोज पाणी प्या आणि योग व मेडिटेशनचा सराव करा.
  • कार मधून प्रवास करताना तुम्ही सीट बेल्ट नीट लावला आहे ना ह्याची खात्री करा.
  • तुमची नियमित आरोग्य तपासणी टाळू नका.
  • पुरेशी झोप घ्या.

हे करू नका

  • खूप जास्त हालचाल करू नका.
  • ज्या पदार्थांमुळे निर्जलीकरण होते जसे की तळलेले पदार्थ, कॉफी, गोड पेये असे पदार्थ टाळा.
  • गर्भारपणात जे अन्नपदार्थ खायला प्रतिबंधित असतात उदा: कच्चे मांस, मासे आणि उच्च प्रमाणात पारा असलेले मासे (किंग मॅकेरेल, स्वोर्ड वगैरे),कच्ची अंडी, पाश्चराईस न केलेले दूध इत्यादी. ते खाणे टाळा.
  • ज्या क्रियांनी तुम्हाला ताण येतो आणि थकवा जाणवतो त्या टाळल्या पाहिजेत.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

दुसऱ्या तिमाही मध्ये तुमचे पोट वाढत आहे आणि आयुष्यामध्ये महत्वपूर्ण घडत आहेत.

इथे काही गोष्टींची यादी दिली आहे त्या गोष्टी तुम्ही आणून ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला पुढील काळात होणाऱ्या विकासाचा सामना करता येईल.

गरोदरपणातील कपडे: तुमच्या पोटाचा घेर वाढत असल्याने तुम्हाला आरामदायी कपडे तुमच्या कपाटामध्ये आणून ठेवले पाहिजेत. कारण तुमचे वजन वाढणार आहे आणि त्याबरोबरच शरीराचा आकार सुद्धा वाढणार आहे.

झोपताना लागणाऱ्या काही गोष्टी: हे महत्वाचे आहे की तुम्हाला ह्या टप्प्यावर चांगली झोप लागली पाहिजे, त्यासाठी आरामदायी उशा, गाणी ऐकण्यासाठी इअर प्लग आणि डोळ्यांसाठी मास्क जे झोपताना जवळ ठेवता येतील.

गर्भारपणाची पुस्तके: तुम्हाला तुमच्या गर्भारपणाच्या काळात, त्याविषयीच्या पुस्तकांची मदत होऊ शकते. गर्भारपणाविषयीची पुस्तके, तसेच बाळाची काळजी कशी घ्यावी इत्यादी विषयीची पुस्तके वाचत रहा.

तुम्ही तुमच्या नवजात बाळासाठी सुद्धा कपडे, कपडे बदलण्यासाठी टेबल, क्रिब आणि गादी, बाळाचा बिछाना आणि इतर लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करू शकता.

लक्षात ठेवा की आधी तयारी करून ठेवल्यास आणि योग्य काळजी घेतल्यास तुमचे गर्भारपण ताणविरहित जाईल.

मागील आठवडा: गर्भधारणा: २२वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: २४वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article