Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: १९वा आठवडा

गर्भधारणा: १९वा आठवडा

गर्भधारणा: १९वा आठवडा

तुम्ही स्वतःचे अभिनंदन करण्याची वेळ आहे कारण तुम्ही गर्भावस्थेचा अर्धा कालावधी यशस्वीरीत्या पार पडला आहे. ह्या आठवड्यात सुद्धा अनेक रोमांचक गोष्टी आणि आश्चर्ये आहेत. नेहमीप्रमाणेच, योग्य गोष्टी योग्य वेळेला करत राहा, नाहीतर बाळाची जन्माची वेळ येऊन ठेपेल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही.

गर्भारपणाच्या १९व्या आठवड्यातील तुमचे बाळ

असं म्हणूया की १९व्या आठवड्याच्या शेवटी तुमचं बाळ केळं किंवा आंब्याच्या आकाराचे असते. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे, पोटात असताना तुमच्या बाळाच्या त्वचेवर  ‘व्हर्निक्स कॅसिओसा’ म्हणजेच पांढरा मेणासारखा थर असतो, त्यामुळे बाळाला संरक्षण मिळते.

तुमच्या बाळाचे शरीरावर ‘लॅनुगो’ म्हणजेच नाजूक केसांची लव असते ज्याने बाळ संरक्षित असते.  बाळाच्या जन्माच्या वेळी बाळाची त्वचा सुरकुतलेली दिसते कारण संवेदनशील त्वचा गर्भजलाने संरक्षित केली जाते. नेहमीप्रमाणेच तुमच्या बाळाची वाढ ह्या आठवड्यात सुद्धा होत राहणार आहे. गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यापासून पुढे कुठले बदल अपेक्षित आहेत हे तपासून पाहण्यास विसरू नका.

बाळाचा आकार केवढा असतो?

वर सांगितल्याप्रमाणे गर्भारपणाच्या १९व्या आठवड्यात बाळाच्या आकाराची तुलना आंबा किंवा केळ्याशी केली जाऊ शकते. तुमच्या बाळाचे वजन २४०-२५० ग्रॅम्स इतके असते आणि लांबी ६-६-५ इंच इतकी असते. परंतु जर तुम्ही योग्य काळजी घेत असाल तर इथूनपुढे बाळाची वाढ झपाट्याने होते.

बाळाचा आकार केवढा असतो?

 

बाळामधील इतर बदल म्हणजे, बाळाच्या मेंदूचा संवेदनांचा भागाचा वेगाने विकास होत असतो. बाळाच्या डोक्यावर केस दिसू लागतात आणि बाळाची मूत्रपिंडे संपूर्णरीत्या कार्यरत असतात.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या १९व्या आठवड्यात जसजसे तुमच्या पोटातील तुमच्या बाळाच्या शरीरात वेगाने बदल होतात, तसे तुम्हाला सुद्धा तुमच्या शरीरात बदल जाणवतील. मॉर्निग सिकनेस किंवा मळमळ होणे बंद झालेले असल्यास तुम्हाला उत्साही आणि तरतरीत वाटेल. तुम्हाला नेहमीपेक्षा थोडे थकल्यासारखे वाटेल कारण तुमचे शरीर तुमच्या वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी अखंड कार्यरत असते.

सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमच्या स्तनांचा आकार पूर्वी पेक्षा दुप्पट होईल तसेच तुमच्या वजनात लक्षणीय वाढ झाली असेल. वजनवाढ योग्य प्रमाणात झाली पाहिजे कारण खूप जास्त किंवा खूप कमी वाढ हे हानिकारक ठरू शकते.

१९ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

नेहमीप्रमाणेच तुम्ही गर्भारपणाच्या १९ व्या आठवड्यात नवीन लक्षणांची वाट बघू शकता. नव्या लक्षणांसोबत काही जुनी लक्षणे अजूनही असतील ज्याची तुम्हाला आतापर्यंत सवय झाली असेल.

१९ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

  • गरम वाफा: (hot flashes): तुमच्या आतापर्यंतच्या गर्भावस्थेच्या कालावधीतील हे एक नवीन लक्षण आहे. तुम्हाला घाम येईल आणि तुम्हाला तुमचे शरीर गरम लागेल. तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढल्यामुळे असे होते.
  • सर्वत्र वेदना होणे आणि दुखणे: ह्यामध्ये काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, कारण तुमचे शरीर खूप वजन पेलत आहे, आणि अजून वजन पेलण्याची ताकद तुमच्यात हवी.
  • पश्चभागात वेदना होणे: अस्थिबंध (ligaments) सैल झाल्यामुळे कुल्ल्यांमध्ये वेदना होऊ शकतात.
  • पेटके: संप्रेरणांमधील बदल, वजनामधील वाढ आणि थकवा ह्यामुळे पायांमध्ये पेटके येतील.
  • चक्कर येणे: तुम्हाला डोके हलके झाल्यासारखे वाटेल किंवा चक्कर सुद्धा येऊ शकते.
  • पोटदुखी: गर्भाशयाच्या वाढीमुळे तुम्हाला पोटात दुखू शकते.

गर्भधारणेच्या १९व्या आठवड्यात पोटाचा आकार

पुरेश्या वजनवाढीनंतर तुमच्या पोटाचा आकार फक्त पोटातील वायूमुळे नाही तर, तर खरोखरीच गोलाकार झालेला दिसतो. गर्भावस्थेच्या ह्या टप्प्यावर, बऱ्याच स्त्रियांमध्ये पोटाचा आकार वाढलेला दिसून येतो. काही स्त्रियांमध्ये दिसत असलेले पोट झाकण्याची कला दिसून येते.

गर्भधारणेच्या १९व्या आठवड्यात पोटाचा आकार

सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला पोटात थोडंसं दुखल्यास ते नक्की पोटातील वायूमुळे कि बाळाच्या हालचालीमुळे हे लक्षात येणार नाही. कारण तुमचे बाळ आता पाय मारत असल्याचे तुम्हाला स्पष्ट जाणवेल आणि त्याचा सुद्धा एक विशिष्ट नमुना असेल.

गर्भधारणेच्या १९व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भारपणाच्या १९व्या आठवड्यातील सोनोग्राफी मध्ये तुम्हाला बरीच आश्चर्ये बघायला मिळतील. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या बाळाची पंचेंद्रिये विकसित होत आहेत. तुमचे बाळ आधीच प्रकाश ओळखू लागले आहे  तसेच वास, चव आणि ऐकण्याच्या चेतातंतूंवर काम करीत असते.

तुमच्या बाळाभोवती एक सुरक्षित थर असतो जो चीझ सारखा दिसतो. ह्या आवरणामुळे बाळ गर्भजलापासून सुरक्षित राहते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बाळाच्या जन्माच्या वेळी बाळाच्या संवेदनशील त्वचेवर हा पांढरा चरबीयुक्त थर पहिला असेल. बाळाचे प्रजनन अवयव सुद्धा पूर्णपणे विकसित झाले असतील.

ह्याव्यतिरिक्त तुम्हाला बाळाची हालचाल दिसेल आणि तुम्ही बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकाल. तुम्ही बाळाचे हृदय, मेंदू, पाठीचा कणा स्कॅन मध्ये पाहू शकाल.

गर्भधारणेच्या १९व्या आठवड्यातील सोनोग्राफी

आहार कसा असावा?

तुम्ही जे अन्न खाता, त्यावर बाळाचे बाळंतपणापर्यंत पोषण होत असते. गर्भावस्थेच्या १९ व्या आठवड्यात कुठले अन्नपदार्थ खावेत ह्यावर गोंधळ उडणे साहजिक आहे. तुमच्यासाठी आणि बाळासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करण्यास विसरू नका.

  • व्हिटॅमिन बी ने समृद्ध असलेले अन्नपदार्थ बाळाच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी विकासासाठी महत्वाचे असते. दूध, मांस, चीझ आणि सोया ह्यांचा तुमच्या आहारात समावेश करा.
  • उपयुक्त चरबीचा तुमच्या बाळाच्या वाढीसाठी फायदा होतो आणि त्याचा स्रोत सुकामेवा आणि बिया असतात.
  • बाळाची हाडे मजबूत होण्यासाठी तुमच्या आहारात दुधाचा समावेश करा कारण त्यामध्ये कॅल्शिअम असते.
  • हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश केल्याने ऍनिमिया चा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
  • सुकामेवा आणि बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स असतात, बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी ते महत्वाचे असतात.
  • सोयाबीन्स मध्ये प्रथिने, तंतू आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स असतात.
  • चरबीयुक्त माशांचा समावेश करण्यास विसरू नका, बाळाच्या वाढीसाठी ते चांगले असते.
  • मांसाहारी स्त्रियांसाठी लाल मांस हा प्रथिनांसाठीचा एक पर्याय आहे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स:

गर्भारपण हा आयुष्याच्या प्रवासातील एक सुंदर टप्पा आहे. तथापि स्वतःला आणि बाळाला सुरक्षित ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. खाली कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नयेत ह्याची यादी दिली आहे ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या म्हणजे बाळाच्या जन्मापर्यंतचा तुमचा प्रवास सुकर होईल.

हे करा

गर्भारपणाच्या १९ व्या आठवड्यात काय करावे ह्याची यादी खाली दिली आहे.

  • सकारात्मक आणि आनंदी राहा.
  • तुमच्या मनःस्थितीत बदल होत राहतील त्यामुळे काही मदत लागल्यास जरूर घ्या.
  • योग्य वेळी योग्य आहार घ्या.
  • भरपूर पाणी आणि ज्यूस घेऊन सजलीत व्हा.
  • अंगदुखीपासून अराम मिळण्यासाठी चांगल्या उशा आणा.
  • व्यायाम, ध्यानधारणा आणि योग करा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.
  • भरपूर आराम करा आणि झोप घ्या.

हे करा

हे करू नका

गर्भारपणाच्या १९ व्य आठवड्यात कुठल्या गोष्टी करू नयेत ह्याची यादी दिली आहे.

  • धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन टाळा.
  • अस्वच्छ ठिकाणी जाऊ नका.
  • तुम्हाला हानिकारक ठरतील असे वास, आवाज आणि प्रदूषित गोष्टी असतील तिथे जाऊ नका.
  • ताण घेऊ नका.
  • खूप जास्त किंवा खूप कमी खाऊ नका.
  • जर तुम्हाला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.
  • दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

गर्भारपणातील खरेदी लक्षपूर्वक केली पाहिजे कारण तुम्हाला जास्तीत जास्त आरामदायक राहिले पाहिजे. कॉटनच्या मॅटर्निटी कपड्यांची खरेदी करा. सैलसर कपडे घ्या जेणेकरून तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. सपाट टाचेचे चांगले बूट तसेच गर्भारपण आणि पालकत्वाविषयी पुस्तकांची खरेदी करा. तुमची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला संसर्ग लवकर होऊ शकतो त्यामुळे तोंडाची काळजी घेण्यासाठी तसेच एकूणातच स्वच्छतेसाठी लागणारी उत्पादने आणून ठेवा. नाश्त्यासाठी किंवा भूक लागली की तोंडात टाकण्यासाठी सुकामेवा, फळे, दाहे असे पदार्थ घरी आणून ठेवा, त्यामुळे आरोग्यपूर्ण आहाराची सुद्धा सवय लागेल.

अगोदरच सगळी तयारी करून ठेवा. सुरक्षित आणि निरोगी गर्भारपणासाठी नियमांचे पालन करा.

मागील आठवडा: गर्भधारणा: १८वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: २०वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article