Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: १८वा आठवडा

गर्भधारणा: १८वा आठवडा

गर्भधारणा: १८वा आठवडा

तुम्ही आता गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीत आहात!  हा आणखी एक रोमांचकारी आणि आश्चर्यांनी भरलेला आठवडा आहे. तुम्ही ह्या आठवड्यात खूप जास्त वेळ पाठीवर झोपणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होऊन डोके हलके वाटण्याची शक्यता असते.

ह्या पुढील आठवड्यांमध्ये तुम्ही शक्यतोवर कुशीवर झोपणे चांगले. तुमच्या सगळ्या प्रणालींवर ताण येत असल्याने, हलक्या हाताने मालिश करून घेतल्याने उपयोग होऊ शकतो.

गर्भारपणाच्या १८व्या आठवड्यातील तुमचे बाळ

गर्भधारणेच्या १८व्या आठवड्यात तुमचे बाळ आता जांभई देऊ लागते. तुमचे बाळ उचक्या सुद्धा देऊ लागते आणि १८ व्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही बाळाची पोटातील हालचाल तसेच बाळाचे पाय मारणे सुद्धा अनुभवू शकाल.

१८ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची मज्जासंस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत असते. तुमच्या बाळाचे मज्जातंतू मायलिन (myelin) ने आच्छादित असतात आणि मज्जातंतूना जोडण्याचे जटिल काम ते करीत असते. तुमचे बाळ आता आवाज ऐकू शकते तसेच आवाज ओळखू सुद्धा  शकते. मेंदूतील मज्जातंतू आपल्या बाळाच्या ५ इंद्रियांमध्ये विकसित होण्यासाठी वेगाने मूलतत्त्वे तयार करीत आहेत.

बाळाचा आकार केवढा असतो?

एका शब्दात सांगायचं तर १८ आठवड्यांच्या गर्भाचा आकार भोपळी मिरची एवढा असतो. तरीही तुमच्या बाळाच्या अवयवांचा विकास झालेला असतो आणि यशस्वीरीत्या ते संपूर्ण विकसित मनुष्यप्राण्यासारखे दिसते. अंकांमध्ये सांगायचे तुमच्या बाळाचे वजन साधारणपणे १८५ -१८७ ग्रॅम्स इतके आणि लांबी ५-६ इंच इतकी असेल. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना  बाळाची हालचाल जाणवेल आणि जर तुम्ही स्कॅन केलात तर बाळाची प्रकाश आणि आवाजाप्रती संवेदनशीलता सुद्धा  जाणवेल.

शरीरात होणारे बदल

तुमच्या बाळाची वाढ वेगाने होत असल्याने, गर्भावस्थेच्या १८ व्या आठवड्यात तुम्ही तुमच्या शरीरात बदलांची अपेक्षा करू शकता. तुमच्या कमरेचा घेरामध्ये लक्षणीय बदल होईल.

तुमच्या वजनात साधारणपणे ६ किलो इतकी वाढ झाली आहे परंतु ही वाढ प्रत्येक आईसाठी वेगवेगळी असू शकते. गर्भावस्थेच्या ह्या टप्प्यावर तुमचे वजन कमी होता कामा नये.

तसेच तुमच्या पोटावर तसेच शरीराच्या इतर काही भागांवर काही स्ट्रेच मार्क सुद्धा दिसू लागतील.

१८व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भधारणेच्या १८ व्या आठवड्यात तुम्हाला काही नवीन लक्षणे दिसतील आणि काही जुनी लक्षणे सुद्धा दिसतील.

  • झोपेचा त्रास: तुम्ही ह्या आठवड्यापासून कुशीवर झोपायला सुरुवात केल्या कारणाने तुम्हाला अस्वस्थता जाणवेल आणि झोप लागण्यास अडथळे येतील.
  • स्नायूंमध्ये पेटके आणि वेदना: तुमचे शरीर बाळाला सामावून घेण्यासाठी जागा करीत आहे, तसेच तुमच्या बाळाची वेगाने वाढ होऊन बाळाचे वजन वाढल्याने तुम्हाला शरीराच्या काही भागात वेदना जाणवू शकतात.
  • सूज: तुमच्या हात आणि पायांमध्ये सूज जाणवू शकते कारण तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात द्रव्ये तयार होत आहेत.
  • नाकातून रक्त येणे: तुमच्या नाकातील रक्तवाहियांकुठल्या गोष्टींची खरेदी कराल?वर दाब वाढल्याने नाकातून रक्त येऊ शकते.
  • बाळाची हालचाल: आपले बाळ अधिक सक्रिय झाले असून तुम्हाला बाळाचे पाय मारणे चांगलेच जाणवेल.
  • लघवीला वारंवार होणे: तुम्हाला वारंवार लघवीला जावेसे वाटेल कारण गर्भाशयाचा आकार वाढल्याने त्याचा मूत्राशयावर दाब पडतो आणि वारंवर लघवीला जाण्याची भावना होते.

१८व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भधारणेच्या १८व्या आठवड्यात पोटाचा आकार

जरी गर्भारपणाची लक्षणे प्रत्येक स्त्रीची वेगवेगळी असली तरी सुद्धा गर्भारपणाच्या प्रत्येक आठवड्यात प्रत्येकीचे पोट दिसू लागते. तुमच्या बाळाची पोटात वेगाने वाढ होत असल्याने अर्थातच तुमच्या पोटाचा आकार वाढणार आहे.

वजनामध्ये अचानक वाढ  किंवा घट झाल्यास मात्र तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. ह्याव्यतिरिक्त तुमचे ओटीपोट वेगळे दिसले पाहिजे आणि पोटाचा आकार वाढायला हवा.

गर्भधारणेच्या १८व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या अल्ट्रासाऊंड दरम्यान तुम्हाला लक्षात येईल अशी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाच्या शरीराच्या स्नायूंची वाढ झालेली आहे. तुमच्या बाळाच्या वेगवेगळ्या क्रिया तुम्हाला जाणवू लागतील जसे की ठोसा मारणे, पोटात आडवेतिडवे होणे, लाथा मारणे इत्यादी.

तसेच जांभया देणे, उचक्या देणे, बोटे चोखणे इत्यादी क्रियांमध्ये सुद्धा बाळ पारंगत होताना दिसते.

आहार कसा असावा?

तुमच्या गर्भारपणाच्या संपूर्ण काळामध्ये कोणता आहार घ्यावा ह्याबाबत संभ्रम राहणार आहे आणि गर्भावस्थेचा १८ वा आठवडा सुद्धा ह्यास  अपवाद नाही. जर तुम्ही आरोग्यपूर्ण अन्नपदार्थांची निवड केलीत तर १८ व्या आठवड्यातील आहार हा सर्वात उत्तम असतो.

तुम्ही उपाशी राहू नये ह्या दृष्टीने तुम्ही तुमचा आहार योग्यरीत्या विभाजित करा. तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात प्रथिने, भाज्या, फळे, व्हिटॅमिन्स ह्यांचा समावेश करा त्यामुळे तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. चरबीयुक्त माश्यांचा तुमच्या आहारात समावेश करा कारण ते ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् चा उत्तम स्रोत आहे. फॉलीक ऍसिड असलेल्या अन्नपदार्थांचा सुद्द्धा समावेश करा.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

आतापर्यंत तुम्हाला तुमची स्वतःची आणि बाळाच्या पोषणाची काळजी कशी घ्यावी आणि सुरक्षित वातावरण कसे करावे ह्याची कल्पना आली  असेल. त्यामुळे जास्त कुरकुर न करता स्वतःची काळजी घेणे हे चांगले. परंतु जर तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखे वाटले तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा आणि तुमच्या अंतर्मनाचे ऐका.

हे करा

  • कुठल्याही परिस्थतीत सजलीत रहा, त्यामुळे तुम्हाला पेटके आणि अंगदुखीपासून आराम मिळेल.
  • सुरक्षित रहा आणि सकारात्मक विचार करा, त्यामुळे तुम्ही औदासिन्यापासून दूर राहाल.
  • व्यायाम करा कारण त्यामुळे तुम्हाला अंगदुखीपासून आराम मिळेल.
  • तुमच्या आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवा त्यामुळे तुमच्या मनःस्थितीतील बदल तुम्हाला हाताळता येतील.
  • योग आणि ध्यानधारणा करा आणि मालिश करून घ्या, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि ताजेतवाने होण्यास मदत होईल.
  • तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमित रहावी म्हणून योग्य प्रमाणात, योग्य वेळी योग्य आहार घ्या.
  • जर तुम्हाला ठीक वाटत नसेल तर मदत मागण्यास  संकोच करू नका.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

हे करू नका

  • मद्यपान करू नका त्यामुळे बाळाच्या मेंदूची वाढ योग्यरीत्या होत नाही.
  • तुम्ही उपाशी राहू नका आणि तुमच्या बाळाला सुद्धा उपाशी ठेऊ नका.
  • वैयक्तिक स्वछता राखा कारण तसे न केल्यास  संसर्गाचा धोका होऊ शकतो.
  • अस्वच्छ ठिकाणी जाऊ नका.
  • खूप जास्त व्यायाम करून थकून जाऊ नका.
  • ताणविरहित राहा.
  • तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर घ्या.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

आतापर्यंत तुमची गर्भावस्थेच्या १८ व्या आठवड्यासाठी आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यांसाठी लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करून ठेवली असेल. जर तुम्ही अजूनही खरेदी केली नसेल तर आम्ही काही टिप्स तुम्हाला देत आहोत. आरामदायक शूज खरेदीस प्राधान्य द्या कारण सूज आलेल्या पायांना आराम मिळणे गरजेचे आहे. कॉटनचे मॅटर्निटी कपडे आणून ठेवा. तुमच्यासाठी एखादी मोठी हँडबँग आणून ठेवा, कारण तुम्हाला तुमच्या काही गोष्टी ठेण्यासाठी मदत होईल. मॉइश्च्यरायझर्स आणून ठेवा कारण तुमची त्वचा कोरडी पडण्याची शक्यता आहे.

१८ वा आठवडा म्हणजे तुम्ही गर्भावस्थेच्या मध्यापर्यंत आला आहात. पाय सुजणे, झोप न लागणे हे काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात परंतु आता मॉर्निग सिकनेस इथूनपुढे तुम्हाला खूप कमी जाणवणार आहे.  आरामदायक शूज आणणे आणि खूप दमणूक होईल अशा गोष्टी टाळल्याने तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेऊ शकता, त्यामुळे तुम्हाला बरे वाटण्यास मदत होईल.

मागील आठवडा: गर्भधारणा: १७वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: १९वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article