Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गरोदरपणातील भांडण आणि त्याचे तुमच्यावर तसेच तुमच्या बाळावर होणारे परिणाम

गरोदरपणातील भांडण आणि त्याचे तुमच्यावर तसेच तुमच्या बाळावर होणारे परिणाम

गरोदरपणातील भांडण आणि त्याचे तुमच्यावर तसेच तुमच्या बाळावर होणारे परिणाम

प्रत्येक जोडप्यासाठी गरोदरपणाचा अनुभव वेगळा असतो. बाळाच्या आगमनामुळे आनंद आणि उत्साह वाढतो. परंतु त्यासोबतच शारीरिक, आर्थिक आणि भावनिक ताण येऊ शकतो. तुम्ही पालक होणार आहात हे कळल्यावर तुमच्या दोघांमध्ये आणखी वाद होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. जोडप्यांमध्ये भांडणे होणे सामान्य असले तरीसुद्धा तुमच्यातील मतभेदांमुळे बाळाला हानी पोहचू शकते हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. 70 टक्के जोडप्यांना बाळाच्या जन्मानंतर त्यांच्या नाते संबंधातील गुणवत्ता कमी झाल्यासारखी वाटते. त्यामुळे कुठलाही वाद होत असेल तर तो वाद तुमची शांतता आणि ऊर्जा गमावून करणे योग्य आहे का हे स्वतःला विचारा. गरोदरपणात तुमच्या जोडीदाराशी भांडण केल्याने तुमच्या बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते ह्या लेखाद्वारे जाणून घेऊयात.

गरोदरपणातील भांडणे आणि ओरडणे ह्याचा तुमच्या बाळावर कसा परिणाम होतो?

गरोदरपणातील भांडणे आणि ओरडणे ह्याचा तुमच्या बाळावर कसा परिणाम होतो

गरोदरपणात आपल्या पतीशी भांडण केल्याने बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भांडणामुळे चिंता आणि नैराश्य येते आणि त्यामुळे तुमच्या बाळाला हानी पोहोचू शकते. गरोदरपणातील वादविवादाचा परिणाम बाळाच्या मेंदूपासून रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत होतो. भांडणाचे काही परिणाम खाली दिलेले आहेत:

1. मेंदूचा संकुचित विकास

कमीत कमी भांडा. कारण तुमच्या रागाचा परिणाम बाळाच्या मेंदूच्या वाढीवर होतो. ह्यामुळे बाळाच्या  बुद्ध्यांकावर सुद्धा परिणाम होतो. आयुष्याच्या नंतरच्या काळात बाळाच्या भावना व्यवस्थापित करण्याच्या क्षमतेवरही तुमच्या भांडणाचा परिणाम होतो. गरोदरपणात आईला खूप ताण असेल तर बाळे चिंताग्रस्त असतात.  आणि त्यांचा अमिग्डाला हा मेंदूचा भाग मोठा असतो. हा मेंदूचा भाग भयावह नकारात्मक भावनांना देण्यात येणारा प्रतिसाद नियंत्रित करतो.

2. शारीरिक विकृती

शारीरिक भांडण तुमच्या बाळाला हानी पोहोचवू शकते. ह्यामुळे बाळ मृत जन्माला येण्याचा धोका सर्वाधिक असतो. याव्यतिरिक्त, बाळाचे वजन कमी भरते, शारीरिक जखम होऊन रक्तस्त्राव होऊ शकतो.

3. रोगप्रतिकार प्रणालीवर परिणाम

भांडणानंतर वाढलेल्या ताणामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते आणि त्यामुळे भविष्यात बाळाला आजार आणि आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात.

4. शारीरिक आणि जैविक विकास

रागामुळे आपल्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो. तसेच एड्रेनालाईन आणि एपिनेफ्रिन ह्यामुळे ताण अधिक वाढतो आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे गर्भाशयातील ऑक्सिजन कमी होतो, बाळाला रक्तपुरवठा नीट होत नाही. त्यामुळे अल्सर, दमा, उच्च रक्तदाब (उच्च रक्तदाब), हृदयाच्या समस्या, डोकेदुखी, त्वचा विकार आणि पचनाच्या समस्या देखील होऊ शकतात.

5. व्यसन

अनियंत्रित राग आणि गुन्हेगारी, भावनिक तसेच शारीरिक शोषण आणि गरोदरपणातील भांडणे व इतर हिंसक वर्तन यांचा थेट संबंध आहे. भविष्यात, ह्या लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या सवयी लागतात. ह्या सवयी म्हणजे धूम्रपान, अति मद्यपान आणि अति खाणे इत्यादी होत.

गरोदरपणात जोडप्यांमध्ये भांडणे होण्याची सामान्य कारणे

प्रत्येक जोडपे वेगळे असते आणि त्यांच्या भांडणांमागची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. काही संवेदनशील विषयांमुळे पतिपत्नींमध्ये वाद होतात. गरोदरपणात जोडप्यांमध्ये खालील कारणांमुळे वाद होतात.

1. स्वार्थी असणे

एकदा तुम्ही गरोदर राहिल्यानंतर, तुमचे सर्व जग बाळाभोवती फिरते आणि ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे पतीला वेळ देता येत नाही आणि भांडण होऊ शकते. दुसरीकडे, पती कामात असू शकतो आणि त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्यासाठी तो वेळ काढू शकत नाही. हे सुद्धा भांडणाचे कारण असू शकते.

2. पैसे

जोडप्यांमध्ये भांडणे होण्याचे कारण आर्थिक सुद्धा असू शकते. अर्थातच, बाळानंतर तुमचा खर्च किती वाढेल याची स्पष्ट कल्पना तुमच्यापैकी कोणालाच नसेल, त्यामुळे खर्च आणि बचत याविषयी मतांमध्ये खूप फरक होऊ शकतो.

3. बाळाचे नाव

बाळाचे नाव ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बहुतेक जोडप्यांना अद्वितीय, अर्थपूर्ण आणि बाळासाठी योग्य असे नाव निवडायचे असते. दोघानाही एकच नाव आवडणे हे एक मोठे काम असते. विशेषतः जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ह्या नावाने हाक मारायची असेल तर एकमत होणे थोडे अवघड होऊ शकते.

4. सासरची भांडणे

कधी-कधी तुम्ही गरोदर राहिल्यानंतर सासरची मंडळी खूप मध्ये मध्ये येतात. हे तुमच्या पतीचे कुटुंब असल्याने त्याने मध्यस्थी करून थोड्या मर्यादा घालून द्याव्यात अशी तुमची इच्छा असते. परंतु ते म्हणणे सोपे आहे आणि करणे अवघड आहे.

परिस्थिती कशी हाताळाल? – या परिस्थितीत आधी कोण पुढाकार घेते हा प्रश्न असतो. पालकत्वाचे बहुतेक निर्णय पालकांवर अवलंबून असतात.  कारण तुम्ही आणि तुमचे पती तुमच्या बाळाला वाढवणार आहात. परंतु, सासरच्या लोकांना पालकत्वाचा अनुभव असतो. त्यांचे शांतपणे ऐकून जर तुम्ही असहमत असाल तर तुमचे मुद्दे त्यांच्यासमोर सकारात्मकपणे मांडा. असे केल्याने भांडणे कमी होण्यास आणि चिंता न करता समस्या सोडवण्यास मदत होईल.

5. सेक्स फाईट

तुमचे पती तुमच्याकडे आकर्षित होतील कारण तुमच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचा ग्लो आलेला असतो. परंतु तुम्हाला सेक्सची अजिबात इच्छा नसेल. तुम्हाला तुमची उशी आणि स्लीप मास्क ह्या दोनच गोष्टी तुमच्या जवळ असाव्यात असे वाटत असते.

परिस्थिती कशी हाताळाल?  – सेक्स दरम्यान उद्भवू शकणार्‍या हास्यास्पद, अप्रिय गोष्टींकडे बघून आणि हसून एकमेकांना रिलॅक्स करा. तुमच्या नात्यामधील जवळीकता अनुभवा.  तुम्‍हाला नातेसंबंधात काय करायचे आहे आणि काय नको आहे ह्याचा विचार करा. एकमेकांच्या जवळ राहण्यासाठी पर्यायी मार्ग शोधा. मग सोफ्यावर बसून फक्त एक मिठी मारली तरी चालेल. जर तुम्हाला बरे वाटत नसेल, तर तुम्ही सेक्ससाठी का तयार नाही हे समजावून सांगा.  तुम्हाला तुमचा जोडीदार आकर्षक वाटत नसेल तरी सुद्धा शांत आणि सकारात्मक वृत्तीने तुमचा मूड कसा आहे ते सांगा आणि तुमचे मत मांडा.

6. संप्रेरकांमुळे होणारे बदल

गरोदरपणात संप्रेरकांमध्ये खूप बदल होऊ शकतात. तुम्ही अधिक हळव्या व्हाल. कदाचित तुमच्या पतीच्या ज्या बोलण्याने तुम्हाला आधी हसू येत होते त्यामुळे तुम्हाला आता अधिक अस्वस्थता जाणवू लागेल. किंवा तुमच्या पतीने केलेल्या एखाद्या साध्या विनोदाने सुद्धा तुम्हाला रडू येईल. ह्या बदलांमुळे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल.

परिस्थिती कशी हाताळाल?  – हार्मोनल हेलन किंवा फ्रिकी फ्रॅन यांसारखी सर्वात, मजेदार नावे तयार करा किंवा आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवू शकत असल्यास थोडी मजा पण करा. मग, स्क्रीमी सारा दिसल्यावर तुमचे पती तुम्हाला स्वतःची थोडी स्पेस देतील त्यामुळे तुम्हाला शांत वाटेल.

बोनस: त्यामुळे तुम्हाला हसू येईल.

भांडणे आणि किंचाळणे यांचे आईवर होणारे परिणाम

जसजसे गरोदरपणाचे दिवस पुढे सरकतात, तसतसे स्त्रीमध्ये लक्षणीय भावनिक बदल होतात.  मूड बदलू शकतात, आणि त्यामुळे जोडीदाराशी वाद होऊ शकतो. हे बदल इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या झपाट्याने बदलणाऱ्या पातळीमुळे होतात. ओरडणे किंवा मारामारी करणे हे होणाऱ्या आईसाठी चांगले नसते. तणावामुळे पेटके येणे, डोकेदुखी, मळमळ आणि स्लीप एपनिया होऊ शकतो. ह्यामुळे अकाली प्रसूती देखील होऊ शकते. गरोदर असताना पहिल्या तिमाहीमध्ये वाद घातल्याने उदासीनता येऊन चिडचिड होऊ शकते. म्हणूनच, गरोदरपणात शांतता लाभण्यासाठी आपल्या जोडीदाराशी भांडणे टाळणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

गरोदरपणात भांडणे टाळण्यासाठी टिप्स

गरोदरपणात स्त्रीला पतीची साथ असणे अतिशय आवश्यक असते. संप्रेरकांमध्ये होणारे बदल, झोप तसेच उर्जेचा अभाव आणि आईच्या शरीराचा बदलणारा आकार हे सर्व बदल मोठ्या प्रमाणात होत असतात. ह्या बदलांचा नातेसंबंधांवर परिणाम होतो.आणि नेहमीपेक्षा जास्त वाद होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी वाद टाळण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

1. एकमेकांचे जास्त कौतुक करा

गरोदर पत्नीला ती सर्व परिस्थिती किती छान हाताळते आहे असे सांगून पती तिचे कौतुक करू शकतो. तसेच पोटातील बाळाची ती छान काळजी घेते आहे हे सांगून पती आपल्या पत्नीचे आभार देखील मानू शकतो. पत्नी सुद्धा आपल्या पतीचे कौतुक करू शकते. त्यामुळे भांडणे कमी होतील.

2. अधिक समजूतदार व्हा

तुमचे पती समजूतदार असल्यास वाद टाळण्यास मदत होते. घरातील नेहमीच्या कामात एकमेकांना मदत करा जेणेकरून तुम्हा दोघांनाही विश्रांतीसाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

3. भीती, चिंता आणि भविष्यातील योजनांबद्दल बोला

गरोदरपणात, अशा अनेक अज्ञात गोष्टी असतात की ज्यांची सतत भीती वाटत असते. पत्नीला गर्भारपण, प्रसूती आणि पालकत्वाबद्दल काळजी वाटत असते. तर पतीला आर्थिक बाबी, जबाबदाऱ्या इत्यादींबद्दल चिंता वाटत राहते. गरोदरपणातील  नियोजनाविषयी चर्चा केल्यास तुमचे बंध मजबूत होण्यास मदत होते  आणि एकमेकांच्या मनात जागा निर्माण करण्यास मदत होते.

4. एकत्र क्रियाकलाप वर्गांसाठी जा

तुम्हाला बरे वाटेल अश्या काही मजेदार गोष्टी करा. योग किंवा ध्यान गटात सामील व्हा. व्यायामामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त होते आणि मानसिक आराम मिळतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. गरोदरपणात तुम्ही तुमचा राग कसा नियंत्रित करू शकता?

गरोदरपणात मनस्थितीत बदलांचे व्यवस्थापन करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

  • स्वतःची आणि तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
  • तुमच्या जोडीदाराशी आणि मुलांशी संवाद साधा.
  • पुरेशी झोप घ्या.
  • तुमच्या भावना आणि शंका शेअर करण्यासाठी एक चांगला मित्र शोधा.

इतर गरोदर मातांशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला ह्या गर्भारपणाच्या प्रवासाबद्दल अधिक समजून घेता येईल.

2. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात वादविवादामुळे गर्भपात होतो का?

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट तज्ञांच्या मते, तणावामुळे गर्भपात होत नाही. परंतु गरोदरपणात ताणतणावामुळे हानी पोचू शकते. सततच्या ताणामुळे स्त्रीच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. गरोदर असताना भांडणे केल्यास आईच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचू शकते. गरोदर असताना वादविवाद झाल्यास बाळाला आणि आईला खूप जास्त  भावनिक ताण येऊ शकतो.

3. गरोदर स्त्रीच्या भावनांचा पोटातील बाळावर कसा परिणाम होतो?

मोठा आवाज, खोल भावना, तणाव इत्यादींमुळे बाळाचा अकाली जन्म होऊ शकतो आणि जन्मतःच बाळाचे वजन कमी भरण्याचा धोका असतो.

कधीकधी वाद होणे ठीक आहे. त्यामुळे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नसते. परंतु कोणतेही अतिवाद टाळले पाहिजे कारण यामुळे आई आणि बाळ दोघांवरही गंभीर परिणाम होऊ शकतात. वर दिलेल्या टिप्स आणि योग्य वैद्यकीय थेरपी वापरल्यास गरोदरपणात भांडणे टाळली जाऊ शकतात आणि गर्भारपण सुरळीत पार पडते.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article