In this Article
तुमचे बाळ आता अकरा महिन्यांचे आहे. ४८ आठवड्यांपूर्वी ते अगदी छोटंसं बाळ होतं ह्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे. तो आता आत्मविश्वासाने सगळीकडे फिरत असेल, आधारासाठी फर्निचरला धरून चालेल आणि लवकरच तो स्वतंत्रपणे चालू लागेल (जर त्याने अजून चालण्यास सुरुवात केलेली नसेल तर). त्याचा मेंदू देखील वेगाने विकसित होत आहे, जटिल प्रक्रिया समजून घेत आहे. तुमच्या लहान बाळाचा भाषेचा विकास देखील होत आहे. जेव्हा तुमच्या लहान बाळाची वाढ होते तेव्हा संवादाला उच्च प्राधान्य दिले जाते. तुम्हाला त्याचे विचार अधिक सहजपणे समजावेत अशी तुमची इच्छा असते. जेव्हा बाळाचा पहिल्या वाढदिवसाचा शेवटचा आठवडा सुरु होतो तेव्हा तो काळ तुमच्या साठी सुखद आश्चर्यानी भरलेला असेल!
४८ आठवड्यांच्या बाळाचा विकास
४८ व्या आठवड्यात तुमचे बाळ कदाचित खूप बडबड करू लागेल. तो कदाचित खरे शब्द बोलत नसेल, परंतु जर तुम्ही नीट ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की त्याचे बोलणे एखाद्या वाहत्या संभाषणासारखे आहे. उदाहरणार्थ, तो एखादे वाक्य बोलत आहे कि प्रश्न विचारत आहे त्यानुसार बोलताना स्वर वर खाली होऊ शकतात. ह्याचाच अर्थ बाळाने संभाषणाची मूळ संकल्पना आत्मसात केली आहे आणि कालांतराने तो शब्द एकत्र जोडू लागेल. काहीवेळा जेव्हा तो तुमच्याशी अगदी मनापासून बोलत असतो, तेव्हा तुम्हाला त्याचे बोलणे समजले आहे असे दाखवा आणि ‘खरंच? आणि मग काय झाले?’ असे प्रश्न त्याला विचारत रहा. तुम्ही असे करत राहिल्यास, तुम्हाला त्याच्या बडबडीमध्ये एक–दोन खरे शब्द ऐकायला मिळतील.
आणखी वाचा: तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
४८ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे
४८ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे काही टप्पे खाली दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही बाळाची काळजी घेऊ शकता.
- तुमचे बाळ स्वतंत्रपणे एकटे उभे राहू लागेल.
- तुमचे बाळ स्वतःचे स्वतः कप मधून पाणी पिऊ लागेल.
- तुमचे बाळ ‘मामा’ किंवा ‘पप्पा’ ह्या व्यतिरिक्त आणखी दोन किंवा तीन वेगळे शब्द बोलू शकेल.
- तुमचे बाळ त्याच्याकडे टाकलेला चेंडू पुन्हा तुमच्याकडे टाकू शकेल.
- तुमचे बाळ ‘मला तो बॉल द्या‘ सारख्या एका वाक्याच्या सूचनांना सूचनेला प्रतिसाद देईल.
- तुमचे बाळ स्वतःहून चालायला सुरुवात करू शकते
- तुमचे बाळ आता त्याला काही हवे असेल तर रडणार नाही आणि इतर मार्गानी त्याला हव्या असलेल्या गोष्टी सांगेल.
- तुमचे बाळ लहान खेळणी आणि अन्नाचे तुकडे अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये चिमटीने उचलू लागेल.
- जर त्याने तुम्हाला फ्लाइंग किस देईल आणि तुम्हाला टाटा करेल.
बाळाला आहार देणे
तुमचे बाळ ४८ आठवड्यांचे झाल्यावर तुम्ही हळूहळू बाळासाठी वाट्या, ताट आणि चमचे आणू शकता. ह्याचे कारण म्हणजे ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची मोटर कौशल्ये अधिकाधिक विकसित होतील, त्यामुळे त्याचा हात ताट वाटी पर्यंत पोहोचू शकतो, अन्नपदार्थाचा एखादा घास घेऊन तो तोंडापर्यंत नेऊ शकतो. एकदा का त्याला ही प्रक्रिया समजली की, तो चमच्यांचा वापर करू लागेल. तुमच्या बाळाने उंच खुर्चीवरून वस्तू खाली फेकू नयेत म्हणून सक्शनने ट्रे ला चिकटतील अश्या वस्तू घ्या. तुमच्या बाळाने अन्नपदार्थ उचलायला सोपे जावे म्हणून खोल भांड्यांऐवजी सपाट भांडी वापरा. चमचे वापरण्यासाठी तुमच्या बाळाच्या हात–डोळ्याचा व्यापक समन्वय आणि कौशल्य आवश्यक असल्याने, उंच खुर्चीवरून बाळ जमिनीवर चमचे टाकेल आणि त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. खुर्चीभोवती अनेक स्वच्छ चटया ठेवा जेणेकरुन खाली पडलेली वस्तू उचलून तुम्ही पुन्हा ट्रे मध्ये ठेवू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या नवजात बाळांना प्युरी खाऊ घालण्यासाठी लहान चमच्यांऐवजी मोठ्या हँडलचे चमचे निवडा आणि ते तुमच्या मोठ्या बाळाला पकडणे सोपे जाईल.
आणखी वाचा: ११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय
बाळाची झोप
तुमच्या ४८ आठवड्यांच्या बाळाला दात येण्यास सुरुवात होईल, वयाच्या १३ महिन्यांच्या बाळाला पहिले ८ दात आलेले असतात. हिरडीच्या बाहेर येण्यासाठी त्याचे दात सध्या तयार असतील. त्यामुळे दात दुखतात आणि अस्वस्थता येते. त्यामुळे तुमचे बाळ रात्रीचे जाते राहते. वरचे चार दात जिथे बाहेर येतील तिथे बाळाच्या हिरड्या सुजलेल्या असतील. त्यामुळे त्याला अस्वस्थता येऊ शकते. तसेच बाळाला झोप लागणे कठीण होईल. म्हणूनच अशावेळी, तुमच्या बाळाला तुमचे अतिरिक्त प्रेम आणि लक्ष आवश्यक असेल. बाळाला स्तनपान करणे, थोपटणे , बाळाला झुलवणे तसेच इतर आरामदायी तंत्रे तुमच्या बाळाला झोपताना शांत करू शकतात. जर तुमच्या बाळाच्या दातदुखीचा त्रास होऊन त्याला असह्य वाटत असेल तर, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे पाहण्यासाठी तुमच्या बालरोगतज्ञांशी बोला.
तुमच्या ४८ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी टिप्स
तुमच्या ४८ आठवड्यांच्या बाळाची काळजी तुम्ही खालीलप्रमाणे घेऊ शकता:
- मोटर कौशल्यांचा सराव करण्यासाठी आपल्या बाळासाठी सुरक्षित वातावरण असल्याची खात्री करा. त्याला कधीही एकटे सोडू नका आणि क्षेत्र बालरोधक असल्याची खात्री करा.
- तुमच्या बाळाच्या समोर उभे रहा आणि तुमचे हात धरून चालण्यास त्याला प्रोत्साहित करा जेणेकरून तो तुमच्या आधाराने पावले टाकू शकेल.
- हा आठवडा तुमच्या बाळासाठी ‘कृपया’ आणि ‘धन्यवाद’ हे शब्द वापरण्याचा आठवडा आहे, जेणेकरून बाळाला हे शब्द केव्हा वापरायचे हे समजेल.
- या वयात लहान मुले जे काही ऐकतात ते लक्षात ठेवतात आणि त्यांच्या पालकांची नक्कल करतात. त्यामुळे तुमच्या बाळासमोर मोठ्या मुलांना ओरडू नका, तो तुमची नक्कल करण्याचा प्रयत्न करू शकतो.
- ‘नाही‘ हा शब्द जास्त वापरू नका. खरोखरच धोकादायक परिस्थिती असेल तेव्हासाठी ‘नाही‘ हा शब्द राखून ठेवा उदा: इलेक्ट्रिकल सॉकेटला स्पर्श करणे किंवा पायऱ्यांजवळ जाणे.
- जर तुमचे बाळ चमच्याने खाण्यास नकार देत असेल तर त्याला हातात धरण्यासाठी चमचा द्या. त्यामुळे बाळाला स्वतः तोंडात अन्न टाकण्याची सवय होईल.
- तुमच्या बाळाला इतर मुलांसोबत खेळण्याची सवय लावण्यासाठी आणि अतिरिक्त ऊर्जा काढून टाकण्यासाठी त्याच्यासोबत प्लेग्रुपमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करा.
चाचण्या आणि लसीकरण
तुमचे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बहुतेक डॉक्टर या वयात कोणतीही वैद्यकीय तपासणी करत नाहीत.
१. चाचण्या
तुमच्या बाळामध्ये ऍनिमिया किंवा इतर काही विकारांची लक्षणे दिसत असल्यास, तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन, शिसे आणि लोहाची पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी करण्यास सांगू शकतात. तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी डॉक्टर नियमितपणे त्याची उंची आणि वजन देखील मोजू शकतात.
२. लसीकरण
तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी लसीचा अंतिम डोस आणि आयपीव्ही (पोलिओ) लसीचा तिसरा डोस आवश्यक असू शकतो, हे दोन्ही डोस ६–१८ महिन्यांच्या दरम्यान देणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या शिफारशीवर आधारित, तुमच्या बाळाला इन्फ्लूएंझा लसीची देखील आवश्यकता असू शकते.
खेळ आणि उपक्रम
तुम्ही आणि तुमचे ४८–आठवड्याचे बाळ खेळू शकता असे काही क्रियाकलाप आणि खेळ येथे आहेत:
१. पीकबू
दरवाजा किंवा वस्तूंच्या मागे लपून हा गेम खेळा. यामुळे तुमचे बाळ हसेल आणि खेळात सहभागी होईल.
२. शर्यत
जर तुमचे बाळ चालत असेल किंवा रांगत असेल, तर त्याच्या हालचालीची नक्कल करा आणि खोलीत त्याच्या विरुद्ध धावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्याची मोटर कौशल्ये आणि अंतर व गतीची संकल्पना विकसित करण्यात मदत होऊ शकते
३. पुस्तक वाचणे
तुमच्या बाळासोबत एखादे पुस्तक वाचा, शक्यतो चमकदार चित्रे असलेले पुस्तक घ्या आणि तुम्ही पुस्तकात दाखवत असलेल्या गोष्टींची नावे देण्यासाठी त्याला प्रोत्साहित करा. जर बाळाला नाव माहित नसेल तर, पुन्हा सांगा जेणेकरून बाळ नावे लक्षात ठेवू शकेल.
४. चालवण्याचा प्रयत्न करा
तुमच्या बाळाच्या समोर उभे राहा आणि तुमच्या हातात त्याचे हात घ्या. लहान पावले टाका आणि त्याला पुढे चालण्यासाठी प्रोत्साहित करा. असे केल्याने तुमच्या बाळाला चालण्याच्या हालचालीची जाणीव होण्यास मदत होईल आणि बाळाच्या स्नायूंना ते लक्षात राहण्यास मदत होईल आणि तो लवकरच स्वतःचे स्वतः चालू शकेल.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
तुमच्या ४८ आठवड्यांच्या बाळाचा विकास होत असताना खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या:
- जर तुमच्या बाळाला कमी दर्जाचा ताप आणि त्याच्या शरीरावर खाज सुटणारे लाल ठिपके दिसत असतील आणि त्यावर तापकिरी खपली असेल तर तुमच्या बाळाला कांजिण्या असू शकतात म्हणून ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जर तुम्ही तुमच्या बाळाचे नाक वाहत असेल, डोळ्यात पाणी येत असेल, बाळाला ताप येत असेल आणि घरातील कोणत्याही वस्तूमुळे किंवा अन्नपदार्थांमुळे पुरळ उठून ऍलर्जीची प्रतिक्रिया दिसून येत असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्रत्येक बाळाचा चालण्याचा एक वेग असतो. तुमचे बाळ आत्तापर्यंत काही पावले टाकत असेल किंवा अजूनही रांगत असेल तर काळजी करू नका. बाळे त्यांची मोटर कौशल्ये वेळेवर आत्मसात करतील. फोटो क्लिक करण्यासाठी तुमचा कॅमेरा नेहमी तयार ठेवा!