In this Article
- गरोदरपणाच्या ३१व्या आठवड्यात बाळांची वाढ
- गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यातील बाळाचा आकार
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यात आढळणारे शारीरिक बदल
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यातील लक्षणे
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३१ वा आठवडा – पोटाचा आकार
- जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३१ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
- जुळ्या किंवा एकाधिकबाळांसह गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यातील आहार
- गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
- आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
बालपणी आपल्या आवडत्या संघामध्ये सामील होण्यासाठी पार केलेल्या प्राथमिक फेऱ्या तुम्हाला आठवतात का? जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ३१ आठवडे पूर्ण करता तेव्हा नेमकी हीच भावना असते. ह्या काळात बाळाची वाढ सुद्धा वेगाने होत असते आणि अंतिम टप्प्यात असते. पहिली तिमाही ही तुमच्या गरोदरपणात महत्वाची मानली गेली असली तरीसुद्धा हा टप्पा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. खाण्यापिण्याच्या योग्य सवयी तसेच बाळाची वाढ योग्य होते आहे ना हे जाणून घेण्यासाठी वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, ह्यामुळे तुम्ही तुमच्या गरोदरपणाविषयी जागरूक रहाल. तुम्हाला त्यामुळे ह्या काळात थकवा जाणवू शकतो परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विश्रांती घेऊन संतुलन राखणे आवश्यक आहे.
गरोदरपणाच्या ३१व्या आठवड्यात बाळांची वाढ
गर्भधारणेच्या ३१वा आठवडा बहुतेक महिलांना त्यांच्या प्रारंभिक टप्प्यातल्या अत्यानंदातून जागृत करू शकेल आणि योग्य शेवट होण्याच्या दृष्टीने सतर्क करेल. त्याचप्रमाणे, तुमच्या पोटात असलेली बाळं आता अधिक सक्रिय असतील आणि त्यांच्या सभोवतालविषयी जागरूक असतील.
ज्ञानेंद्रियांची आकलनशक्ती वाढलेली आहे. शरीरात उपस्थित जवळजवळ सर्व इंद्रियांनी आपल्या मुलांना चांगली जागरूकता देऊन, त्यांचे कार्य सुरू केले आहे. बाळाला प्रकाशाची संवेदना आता समजू लागलेली आहे त्यामुळे जेव्हा झोप येते तेव्हा बाळ प्रकाशाकडे पाठ करून अंधाराकडे तोंड वळवून झोपते. तसेच बाळाला तुमचा आवाज सुद्धा समजू लागतो आणि तो ऐकून बाळ शांत होते. तसेच काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने त्यांना आनंद होऊन उत्साही वाटू शकेल. त्याचा परिणाम म्हणून त्यांना काही भावनांना सामोरे जावे लागेल. यापैकी कोणतीही गोष्ट क्वचितच स्मृती किंवा आठवणीसाठी जागा तयार करण्यासाठी पुरेशी वेगळी असेल परंतु ह्या सर्व सिग्नल मुळे मेंदू उत्तेजित होतो आणि त्याच्या कार्याची चाचणी होते.
आपले लहान बाळ किती वेळा पाय मारते ह्याचा मागोवा घेत असताना, बाळ केव्हा झोपते आणि केव्हा खेळत असते ह्याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तुमच्या डॉक्टर्ससाठी सुद्धा हे गरजेचे आहे कारण त्यांना सुद्धा बाळाचा अंदाज येण्यास त्यामुळे मदत होऊ शकते. जेव्हा बाळ सक्रिय असते तेव्हा ते हातापायांची हालचाल करते तसेच पकड घट्ट करण्याचा सराव करते. लवकरच बाळ तुमचे बोट मुठीत पकडणार आहे.
पुरुष मुलांच्या बाबतीत, स्क्रोटल सॅकचा विकास पूर्ण होतो आणि अंडकोष वेगाने खाली येऊ लागतात. आपल्या मुलांच्या जन्मापर्यंत, अंडकोष पूर्णपणे खाली उतरले पाहिजेत, जे डॉक्टरांकडून देखील तपासले जातील. क्रिप्टोरकिडिसमची समस्या असेल (ज्यामध्ये अंडकोष पूर्णपणे खाली उतरत नाहीत) तर ती जन्मानंतरच समजते.
गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यातील बाळाचा आकार
मागील आठवड्यातील सर्व चरबी वाढीचा फायदा ह्या आठवड्यात दिसू लागेल. चरबीचा थर पूर्ण झाल्यामुळे त्वचा पूर्वीपेक्षा बर्यापैकी नितळ असेल तसेच त्वचा बऱ्यापैकी ताणली जाईल. चरबीमुळे बाळांचे वजन वाढेल आणि ते १.३ – १. ५ किलोच्या आसपास असेल. बाळांची लांबी साधारणपणे ३८–४० सेमी इतकी असेल. जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या बाबतीत ही संख्या कमी असेल परंतु बाळांचा आकार आता नारळाएवढा असेल.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यात आढळणारे शारीरिक बदल
तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात बदल होतील त्यामुळे तुमच्या शरीराचे स्वरूप बदलेल. वजनात वाढ होण्यापासून बायोकेमिस्ट्रीमधील बदलांपर्यंत, तुमचे शरीर हे सर्व बदल प्रदर्शित करेल.
- अशी काही उदाहरणे आहेत की जिथे बऱ्याच स्त्रिया गर्भावस्थेच्या अंतिम तिमाहीची तुलना पहिल्या तिमाहीशी करतात. निश्चितच, सतत मळमळ किंवा मॉर्निंग सिकनेसचा कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. तथापि, हा कालावधी दुसऱ्या तिमाहीसारखा शांत आणि विश्रांती देणारा नसेल. येत्या काही आठवड्यांमध्ये प्रसूती होणार आहे हे शरीराला समजण्यास सुरवात झाली आहे. या संदर्भात आपली मनःस्थिती बदलण्यात हार्मोन्स थोडेसे जबाबदार असले तरी बाळांचा नीट जन्म होणे आणि प्रसूतीची चिंता ह्यामुळे तुमची मनःस्थिती थोडी बिघडू शकते. काही स्त्रियांना आता अस्वस्थता येऊन बाळांचा जन्म लवकर व्हावा असे वाटू लागते. तर काही स्त्रियांना बाळांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाटू शकते. एकाधिक बाळांना जन्म देण्याच्या विचाराने अस्वस्थता वाटू शकते.
- या आठवड्यापर्यंत बहुतेक स्त्रियांचा पोटाचा आकार वाढलेला असेल, बाळांची वाढ आता पूर्ण झाल्यामुळे ह्या आठवड्यात पोटाचा आकार कमी प्रमाणात वाढेल. परंतु ह्या आठवड्यात तुमच्या पावलांच्या आकारात बदल होईल. गर्भधारणेपासून तुमचा आणि तुमच्या वाढत्या बाळांचा भार ही पाऊले पेलत असतात. पावलांना सूज येणे ही गोष्ट आता नेहमीचीच झालेली असेल. तसेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला तुमची पाऊले रुंद आणि मोठी दिसू लागतील. काही स्त्रियांच्या बाबतीत प्रसूतीनंतर सुद्धा पाऊले मोठीच राहतात. रेलॅक्सीन नावाच्या संप्रेरकांमुळे तुमची हाडे आणि अस्थिबंध सैल पडतात आणि त्यामुळे तुमचे शरीर प्रसारण पावते आणि कायमसाठी तसेच राहते.
- तुमच्यामध्ये होणाऱ्या बदलांविषयी तुमची बाळे अज्ञात आहेत आणि जगण्याची शक्यता वाढविण्यासाठी बाळे शक्य तितकी वाढत जातील. तुमच्या गर्भाशयात तुमची बाळे अशा पद्धतीने असतील जेणेकरून तुमच्या शरीराच्या वरच्या भागावर त्याचा दबाव येतो. त्यासोबतच गर्भाशयाचा आकार सुद्धा वाढत जातो आणि त्यामुळे तुमची फुप्फुसे आणि डायफ्रॅमवर दबाव येतो आणि त्यामुळे लवकर दम लागतो. काही बाळे प्रसूतीसाठी योग्य स्थान घेतात त्यामुळे फुप्फुसांना पुन्हा शरीरात स्वतःची जागा सापडते आणि श्वासोच्छवास पुन्हा योग्यरितीने सुरु होतो.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यातील लक्षणे
तांत्रिकदृष्ट्या, आपण गरोदरपणाच्या ३१व्या आठवड्यात अनुभवत असलेली लक्षणे या सर्व महिन्यांमधील अनुभवापेक्षा भिन्न नाहीत. तथापि, त्यांचे अचानक परत येणे आणि प्रसूतीचा दबाव ह्यामुळे ती नेहमीपेक्षा तीव्र वाटू शकतात.
- गर्भधारणा किंवा झोपेची कमतरता किंवा आपल्या मनात असलेल्या विचारांमुळे तुम्हाला तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करता येत नाही. तुम्ही काय करत होतात हे तुम्ही विसरल्यास किंवा घरातून काहीतरी आणण्यास बाहेर पडल्यावर घरीच पाकीट किंवा घराच्या किल्ल्या विसरल्यास ते नॉर्मल आहे त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही गरोदरपणाच्या आधी सगळं नीट करत असलात तरी शरीरात होणाऱ्या बदलांमुळे लक्ष विचलित होऊ शकते. तुमचा बाळांच्या जन्मांनंतर तुम्ही पुन्हा पुर्ववत होणार आहात.
- आपल्या शरीराला होणाऱ्या वेदना ह्या तिसऱ्या तिमाहीत सर्वव्यापी असतील. ह्या आठवड्यात तुमच्या बाळांची अचानक वेगाने वाढ होऊ लागते आणि त्यामुळे तुमच्या शरीराला थोड्या कालावधीत जास्त वजन पेलावे लागते.
- या काळात मूत्राशय आणि आपल्या स्तनांमध्ये बऱ्याचदा गळती होईल. दुधाचे उत्पादन लवकर सुरू झाल्यास कदाचित आपल्या स्तनांमधून आपोआप स्त्राव येऊ शकेल. त्याचप्रमाणे, मूत्राशयावर दबाव देखील वाढत जाईल, ज्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागेल.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३१ वा आठवडा – पोटाचा आकार
३१ व्या आठवड्यात तुमची जुळी बाळे वजनाच्या बाबतीत आणखी महत्वपूर्ण टप्पा गाठतील आणि त्याचा परिणाम तुमच्या बाळांच्या पोटाच्या आकारावर होईल. तुमच्या पोटाचा आकार थोडा वाढेल. तसेच तुम्हाला अचानक सौम्य कळा जाणवू लागतील. ते सराव कळांचे (Braxton Hicks contractions) संकेत आहेत.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३१ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
ह्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड मध्ये केवळ तुमच्या बाळांची नव्हे तर तुमची सुद्धा तपासणी होते. एक थ्री डायमेन्शनल स्कॅन केले जाऊ शकते आणि तुम्हाला तुमचे बाळ दिसू शकते. नेहमीच्या स्कॅन पेक्षा हे खूपच महाग असते त्यामुळे त्याबाबतची विनंती तुम्हाला स्वतःला करावी लागते.
जुळ्या किंवा एकाधिकबाळांसह गरोदरपणाच्या ३१ व्या आठवड्यातील आहार
ह्या आठवड्यात तुमच्या आवडीचे आणि व्हिटॅमिन समृद्ध अन्न असावे. भरपूर प्रथिने, चरबी, कॅल्शियम आणि पौष्टिकतेचे असंख्य घटक आईने घेणे आवश्यक आहे जेणेकरून दुधाच्या उत्पादनात आवश्यक वाढ होईल आणि बाळाचा जन्म झाल्यावर त्यांना आवश्यक असणारे सर्व घटक त्यामध्ये असू शकतील.
गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
तुमची प्रसूतीची तारीख जवळ आल्याने, शेवटच्या टप्प्यावर सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्ही काही टिप्सचे पालन करीत असल्याचे सुनिश्चित करा.
हे करा
- प्रसूतीपूर्वी पूर्ण करायच्या गोष्टींची आणि क्रियाकलापांची यादी तयार करा.
- रुग्णालयात जाता येऊ शकले नाही तर प्लॅन–बी तयार ठेवा.
काय टाळावे?
- कुठल्याही कामासाठी आपले मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांची मदत मागण्यापासून परावृत्त होऊ नका.
- ह्या आठवड्यात भितीदायक चित्रपट किंवा घटना पाहणे टाळा.
आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
तुम्हाला आता फक्त प्रसूतीवर आणि लवकरच येणाऱ्या तुमच्या बाळांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खालील गोष्टींची खरेदी करून त्याचे समर्थन केले जाऊ शकते.
- स्तनाग्रांवर उपचार करण्यासाठी हलके क्रीम.
- नर्सिंग ब्रा ज्यामुळे स्तनपान सुलभ होऊ शकते.
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३१ आठवड्यांच्या गर्भवती मातांमध्ये उत्साह आणि भीती दोन्ही निर्माण होऊ शकते. ह्या उत्साहासोबतच तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होऊ द्या, त्यामुळे तुमची चिंता किंवा काळजी नष्ट होईल.