In this Article
अभिनंदन! तुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहे. रात्रीची झोप नीट न मिळणे, आपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाही. हो ना ? परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर किती प्रेम आहे. या तीन महिन्यांत, तुमचे तुमच्या बाळासोबत बंध निर्माण झाले असतील. तुमचे बाळ मोठे झाल्यावर तुमच्याकडून बरेच काही शिकण्यास सुरवात करेल आणि कदाचित तुमची किंवा तुमच्या पतीची छटा बाळामध्ये तुम्हाला आधीपेक्षा अधिक स्पष्ट दिसू लागेल. आपल्या बाळाचा विकास कसा होतो ते शोधा!
तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाचा विकास
तुमचे १३ आठवड्याचे बाळ लवकरच तुमच्यासोबत आणि ओळखीच्या चेहऱ्यांसोबत आरामदायक होऊ लागेल. इतरांशी संवाद साधण्यात किती मजा आहे हे त्याला समजताच तुमच्या बाळाचे सामाजिक पैलू विकसित होण्यास सुरवात होते. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य सर्वात स्वागतार्ह असेल आणि बाळाची पापी घेण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही. वेगवेगळे आवाज काढून प्रदीर्घ संभाषणे करणे हे त्याच्यासाठी दुसरा स्वभाव बनेल. आवाजाच्या दिशेने बाळ मान वळवण्याचा प्रयत्न करू लागेल. तुमच्या बाळाला रात्री झोप देखील येऊ शकते, जेणेकरून तुम्ही रात्री थोडीशी झोप घेऊ शकता. तथापि, यावर लगेच विश्वास ठेवू नका. जर बाळ रात्री अजूनही जागे रहात असेल तर काही महिने थांबा. कधीतरी बाळाला रात्रीची शांत झोप लागेलच आणि तुम्हाला सुद्धा रात्रीची झोप मिळेल.
तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे
आतापर्यंत तुमच्या बाळाची बर्यापैकी इंद्रिये समान विकसित झाली आहेत. यास आणखी काही काळ लागू शकेल, परंतु तिसऱ्या महिन्याच्या आसपास होणाऱ्या वाढीचा परिणाम म्हणून, या वयानुसार तुमच्या बाळाची दृष्टी सुधारू शकते. तुमचे बाळ अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असेल. जवळ किंवा लांब हा फरक बाळाला समजू शकेल. पूर्वीपेक्षा वेगवेगळे रंग बाळाला अधिक स्पष्ट दिसू लागतील आणि आपले बाळ कदाचित इतरांपेक्षा काही विशिष्ट रंगांना प्राधान्य देईल. एखाद्या कोपऱ्यात एखादे संगीत सुरु करा आणि आपले बाळ आता मान फिरवू शकेल आणि आवाज कुठून येत आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू शकेल. फुलांचा वास असलेले लोशन बाळासाठी वापरा आणि बाळाला जेव्हा त्याचा वास येईल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ते भाव दिसतील.
इद्रियांच्या वाढीसोबतच, वेळेनुसार आपल्या बाळाच्या अवयवांमध्येही सुधारणा दिसू लागेल. ही वेळ अशी आहे जेव्हा तुमच्या बाळाला त्याला बोटे आहेत हे समजेल आणि त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो हे देखील त्याला समजेल. जरी तो आत्ता कदाचित एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे पकडू शकत नाही, परंतु त्याची बोटे आणि तळवे तो फिरवू लागेल. त्याच्या हात आणि डोळ्यांचा समन्वय पूर्वीपेक्षा बराच चांगला होईल.
आपल्या स्वत: च्या आवाजाचा शोध घेणे हा एक क्रियाकलाप देखील आपल्या बाळास खूप आवडेल. स्वतःशी दीर्घ संभाषणे करणे आणि निरनिराळ्या टोन आणि मोड्यूल्ससह प्रयोग केल्यामुळे तो दिवसाचा बराच काळ व्यस्त राहील. गेम खेळत असताना, जेव्हा तुम्ही लपून बसता तेव्हा तो मोठ्याने रडू लागेल आणि जेव्हा तुम्ही येता तेव्हा बाळ समाधानाने हसू लागेल. बरीच बाळे सकाळी लवकर उठतात. जर पोट भरले असेल तर बाळ तसेच पडून राहते, वेगवेगळे आवाज काढत स्वतःच्या पायाकडे बघत राहते.
दूध देणे
जसजशी बाळाची दिनचर्या सेट होऊ लागते तसे तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाला तुम्ही सहज दूध पाजू शकता. होय, तुमच्या लहान बाळाला स्तनपान करणे हे तुमच्या दोघांसाठी सुद्धा सोपे आणि सोयीचे होईल. बाळाला स्तनपान देण्याची क्रिया सुरळीत होईल, बाळाला कधी दूध दिले पाहिजे आहे आणि कधी नाही हे तुम्ही सांगू शकाल. भूक लागल्यावरचे बाळाचे रडणे तुम्ही ओळखू शकाल.
झोप
तुमच्या बाळाची वेगाने वाढ होत असल्यामुळे, कदाचित दिवसा आणि रात्रीच्या विचित्र वेळेला त्याला दूध पाजावे लागेल. रात्रीच्या वेळी स्तनपान करणार्या बाळाला, बाटलीचे दूध पिणाऱ्या बाळापेक्षा जास्त दूध लागते. तथापि, बहुतेक बाळे संपूर्ण रात्रभर झोपत नाहीत. मध्ये न उठता सलग जास्तीत जास्त ६–७ तास बाळ झोपू शकते.
दिनचर्या
आतापर्यंत, आपण पालकत्व आणि आहार आणि झोपेची संपूर्ण प्रक्रिया कशी कार्य करते हे शोधण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु आपल्या बाळासोबत सुमारे १३ आठवडे घालविल्यानंतर, आपण दोघांसाठीही रुटीन सुरु करण्यासाठी हा एक चांगला काळ असू शकतो. काही बाळांचे त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात रुटीन तयार होते. जर तुमच्या बाळाचे रुटीन नसेल, तर त्याच्यासोबतचा नित्यक्रम तयार करण्याची वेळ आलेली आहे
लहान बाळे थोडी मोठी झाल्यावर त्यांना दूध हवे किंवा नको हा पर्याय ते स्वतः निवडतात. एका विशिष्ट वेळेला तुम्ही बाळाला दूध दिले पाहिजे, परंतु कालांतराने, आपले बाळ काही वेळा पोट भरलेले असेल तर प्यायला नकार देऊ शकेल. जोपर्यंत त्याचे वजन ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याची काही गरज नाही. बाळ जेव्हा तो वेगवान वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा त्याची भूक वाढेल आणि कदाचित बाळ नेहमीपेक्षा जास्त दुधाची मागणी करू शकेल.
जर तुमचे बाळ एकदा दूध प्यायल्यानंतर पुन्हा खूप वेळाने पुन्हा दूध पीत असेल तर तुम्ही दूध पाजण्याचा दोन वेळांमध्ये ३ ते ४ तासांचे अंतर ठेऊ शकता. ह्यामुळे तुम्हाला तुमचे स्वतःचे रुटीन तयार करता येईल तसेच थोडी विश्रांती घेता येईल तसेच तुमच्या बाळास चांगले अन्न आणि आराम देखील मिळेल. बर्याच बदलांमुळे बाळाला त्रास होऊ शकतो, म्हणूनच तुम्ही त्याच्यासाठी दिनचर्या लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा त्याला माहित असेल की एकदा दूध दिल्यानंतर, पुढील फीड काही तासांनंतर असेल, तर तो शांतपणे झोपू शकतो. रात्रीसुद्धा कदाचित तुमच्या बाळास तुम्ही झोपत नाही तोपर्यंत झोप येऊ शकत नाही. अशा वेळी, आपले बाळ इतर वेळी झोपत नाही हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. बर्याच मातांना असा अनुभव आहे की त्यांचे बाळ आंघोळ घालताना किंवा दुपारच्या वेळी दूध पिताना झोपायला लागतात. तसे झाल्यास बाळाला जागे करा आणि क्रियाकलाप पूर्ण करा. बाळ कदाचित चिडचिड करेल झोपणार नाही. असे दोन दिवस चालू राहील. त्यानंतर, त्याला वेळ समजेल आणि त्यानुसार झोपायला सुरुवात होईल.
तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स
तुमच्या १३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही इथे दिलेल्या टिप्स पाळल्या पाहिजेत
- तुमच्या बाळाची त्वचा खूप कोरडी होणार नाही याची काळजी घेऊन काळजी घ्या. कोरडी त्वचा कायम राहिल्यास मॉइश्चरायझर्स आणि ह्युमिडिफायर्सचा वापर करा.
- तुमच्या बाळाला उद्यानात किंवा बागेत बाहेर न्या किंवा जेव्हा आपण सकाळ किंवा संध्याकाळी फिरायला जाता तेव्हा त्याला इतर मुलांशी संवाद साधू द्या.
- तुमच्या बाळाला निश्चित कालावधीपर्यंत झोपू द्या आणि सर्व क्रियाकलापांचे एक निश्चित वेळापत्रक तयार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे बाळ देखील त्याच्याकडे लक्ष देऊ शकेल.
चाचण्या आणि लसीकरण
बाळाने वयाचे ३ महिने पूर्ण केले आहेत आणि वेळेवर लसीकरण करण्याच्या दृष्टीने, त्याला लसीच्या दुसर्या फेरीसाठी तयार करण्याची वेळ आली आहे. हे इंजेक्शन्सद्वारे किंवा तोंडी औषधे देऊन देखील करता येते.
डीआयपीपी / आयपीव्ही / एचआयबी आणि हिपॅटायटीस बी ह्या लसी १३ व्या आठवड्यांनंतर दिल्या जातात. डिप्थीरिया, पेर्ट्युसिस, टेटॅनस, हेमोफिलस इन्फ्लुएंझा आणि हिपॅटायटीस बी तसेच पोलिओ आणि इतर अनेक रोगांची ह्या लसी काळजी घेतात. न्यूमोकोकल लस ही न्यूमोकोकल बॅक्टेरियामुळे होणार्या संक्रमण आणि आजारांची काळजी घेते. अखेरीस, रोटाव्हायरस लसीची पुढील फेरी दिली जाते, परंतु लस केवळ तोंडाद्वारे दिली जाते.
खेळ आणि क्रियाकलाप
तुमच्या बाळाची श्रावण क्षमता बर्याच प्रमाणात वाढेल. ध्वनी, संगीत समजून घेतल्यास वेगवेगळ्या नोट्समध्ये सारखा आवाज कसा येतो हे त्यांना लक्षात येऊ लागते. परंतु फक्त संगीत वापरण्याऐवजी आपण आपल्या मुलास वातावरण बदलण्यासाठी स्वयंपाकघरात घेऊन जाऊ शकता आणि त्याला एक ड्रमिंग १०१ सत्र देऊ शकता. घरातील भांडी, प्लॅस्टिक बॉक्स, पुठ्ठे बॉक्स किंवा इतरांपेक्षा वेगळी असणारी कोणतीही वस्तू वापरा. ह्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवून, एक लहान काठी किंवा पळी घ्या आणि आवाज करण्यासाठी प्रत्येक वस्तूवर हळूहळू मारा. वेगवेगळ्या आवाजांमुळे आपल्या बाळाला उत्सुकता वाटेल आणि उत्साह वाढेल. कुठला तरी ताल धरा. कदाचित आपल्या बाळाने देखील टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली असेल. मग, बाळाचा चेहरा तुमच्याकडे फिरवा आणि त्याच ड्रमबीटचा आवाज काढण्यासाठी तुमच्या तोंडाचा वापर करा. हा क्रियाकलाप तुमच्या बाळास बरेच दिवस व्यस्त ठेवेल.
बाळांना पाणी आणि त्याबरोबर खेळायला आवडते. आपल्याकडे बाथटब किंवा त्याहूनही लहान टब असल्यास तो कोमट पाण्याने भरा आणि त्यामध्ये हळूवारपणे आपल्या बाळाला धरा. बाळाचे डोके नेहमी पाण्याच्या पातळीपेक्षा वर आहे ह्याची खात्री करा आणि पाणी उडवण्यासाठी तुमचे हात वापरा. नंतर शिडकाव तयार करण्यासाठी त्याचे पाय घ्या. पायाने पाण्याचा शिडकाव कसा होतो हे शोधण्यासाठी आपल्या बाळाला थोडा वेळ द्या. एकदा बाळाला ते समजल्यावर तुमचे स्नानगृह काही वेळातच वॉटर पार्कमध्ये बदलेल.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
या वयातच, बाळांना यीस्ट–संबंधित संसर्गाचा त्रास होतो ह्यास इंग्रजीमध्ये थ्रश म्हणतात. ह्यामध्ये गाल आणि ओठांसह तोंडाच्या आतील भागात पांढरे डाग किंवा ठिपके येतात. हे स्तनपान करताना आईकडे देखील जाते आणि स्तनाग्रांना दुखवू शकते. अशी स्थिती असल्यास आपल्या डॉक्टरांशी बोला.
४ थ्या महिन्याकडे वेगाने पुढे जाताना, आपले बाळ बर्याच उपक्रमांची निवड करण्यास सुरुवात करेल आणि बर्याच नवीन गोष्टी शिकेल. त्याची वाढ तुम्हाला आश्चर्यचकित करेल. त्या सर्व आठवणी जपून ठेवा आणि बाळाबरोबर शक्यतो जास्तीत जास्त वेळ घालवा.
मागील आठवडा: तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे १४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी