Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे १४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

आपण आपल्या बाळाला जन्म देऊन जवळजवळ तीन महिने झाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे तीन महिने आपल्यासाठी थोडे कठीण गेले असावेत. होय ३ महिन्यांनंतरही तुम्ही अद्याप आपल्या बाळासोबत नवीन सवय दिनचर्येची लावत असाल,. जर नुकतेच आपल्या बाळाचे वय १४ आठवडे झाले असेल तर आपल्याला त्याच्यात काही बदल दिसतील. जसजसा तो वाढत जाईल, तसतसे तो आपली वेगळी ओळख असल्याचे दर्शवू लागतो! एखादे खेळणे आवडणे, एखादे विशिष्ट गाणे पसंत करणे आणि एखादा खेळ खेळण्याची उत्सुकता या सर्व गोष्टी वैयक्तिकरणाची चिन्हे आहेत आणि आपल्या बाळामध्ये ही चिन्हे दिसू लागतील.

तुमच्या १४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

साडेतीन महिने पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या बाळाला इतर लोकांशी संवाद साधायला आवडेल किंवा तो स्वतःसोबतच वेळ घालवेल. तो मोठा होऊन अंतर्मुख व्यक्ती होईल की बहिर्मुख होईल हे ह्या लक्षणांवरून कळत नाही. काही बाळे शांत वातावरणाला प्राधान्य देतात ते स्वतःचे स्वतः एकटे किंवा केवळ काही लोकांसोबतच राहणे पसंत करतात. तर काही बाळांना लोकांनी वेढले जाणे आवडते. तुमचे १४ आठवड्याचे बाळ आपल्या आजूबाजूच्या परिसरातून बरेच काही शिकेल आणि त्याचा मेंदू त्या माहितीवर प्रक्रिया करेल. घरातील काही गोष्टींमध्ये त्याला आता ड जास्त रस निर्माण होईल आणि तो संपूर्ण घरातील जागेचा शोध घेण्यास उत्सुक असेल.

तुमच्या १४ महिन्यांच्या बाळाच्या वाढीचे टप्पे

खाली तुमच्या १४ महिन्यांच्या बाळाच्या वाढीचे टप्पे दिलेले आहेत तुम्ही त्यावर लक्ष ठेवू शकता

  • आपल्या हातपायांविषयी बाळाला जागरूकता निर्माण झालेली आहे, कदाचित तुमच्या बाळाला त्याचा एखादा हात किंवा बोट आवडेल आणि बाळ ते शोधत राहतील. सहसा, बाळांना स्वतःच्या पायांनी भुरळ घातली जाते. बाळ त्याचे पाय पाहू शकत नाही, म्हणून जेव्हा बाळ त्याचे पाय उंच वर घेते तेव्हा त्यांना पायाबद्दल उत्सुकता निर्माण होते. जेव्हा तुमचे बाळ पाय उंचावर घेते तेव्हा कदाचित तो त्यांच्याबरोबर खेळू शकतो किंवा तोंडात घालू इच्छितो
  • या काळात बाळाची उर्जा पातळी उच्च असते. झोपलेले असताना तुमचे बाळ क्वचितच शांत राहते. बाळ सतत लाथ मारेल, त्याच्या हातांनी खेळेल किंवा वेगवेगळे आवाज काढेल
  • या काळात तुमच्या बाळाच्या पाठीमध्ये थोडी शक्ती येईल
  • १४ आठवड्यांपर्यंत, बाळाला डोक्यावर पूर्ण ताबा मिळतो, तसेच बाय डेक्स्ट्रॉस ग्रास्प देखील विकसित होते ज्याद्वारे बाळ वस्तू किंवा हलणाऱ्या खेळण्यांपर्यंत पोहोचू शकतो, त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याबरोबर खेळू शकतो. खुळखुळ्यासारखी खेळणी हलवून आवाज काढतो
  • जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा त्याच्या जवळ आणता तेव्हा तो कदाचित तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करून पाहिल
  • आपल्या छोट्या बाळाची संभाषण कौशल्ये देखील विकसित होतील. बाळ वेगवेगळे आवाज काढू लागेल आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल
  • १४ व्या आठवड्यात, तुमचे बाळ तुमचा चेहरा आणि त्याच्या वडिलांचा चेहरा ओळखण्यास सुरवात करेल. भुकेलेला, थकलेला किंवा घाबरलेला असेल तेव्हा त्याचे डोळे कदाचित तुमचा शोध घेतील
  • १४ आठवड्यांपर्यंत, नवीन गोष्टी शोधण्यासाठी तुमच्या बाळाला भीती वाटेल. तो नवीन चेहरे किंवा नवीन खेळण्यांमध्ये रस घेईल आणि त्यांचे स्वतःच विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेल. या वयात, बाळांना अनोळखी लोकांची चिंता नसते म्हणून कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच घरी आलेल्या पाहुण्यांसोबत बाळाला ठीक वाटेल. तथापि, तो भुकेलेला, झोपाळलेला असल्यास तो अस्वस्थ होऊ शकतो.

दूध देणे

तुमच्या बाळाची योग्य वाढ होत आहे आणि आता त्याची दिनचर्या ठरणे आवश्यक आहे. परंतु तुमच्या बाळासाठी कठोर वेळापत्रक तयार करण्याची शिफारस केलेली नाही. आपल्यापैकी बरेच जण संध्याकाळच्यावेळी नाश्ता घेतात तेव्हा तुमच्या १४ आठवड्यांच्या बाळाला सुद्धा दूध हवे असते. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजा आणि बाळाच्या आणि इतर कुटुंबातील सदस्यांच्या गरजा देखील संतुलित कराव्या लागतील, भूक लागली म्हणून अचानक तुमचे बाळ तुमच्या स्तनाला लॅच होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही आईचे दुध स्वतंत्रपणे साठवून ठेवू शकता आणि तुम्ही घरातील कामकाज करत असताना तुमच्या पतीला किंवा कुटुंबातील कोणालाही बाळाला दूध देण्यास सांगू शकता. या वयानंतर, तुमच्या बाळाला खेळण्याची किंवा व्यस्त राहण्याची इच्छा असू शकते. तुम्ही तुमच्या बाळाला बागेत फिरायला नेऊ शकता कारण यामुळे तो शांत होईल व व्यस्त राहील.

दूध देणे

बाळाची झोप

१४ आठवड्यांपर्यंत, तुमच्या बाळाचे नियमित वेळापत्रक नसते. जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा आणि रात्री बाळ जागे होईल. जसे जसे तुमचे बाळ वाढत आहे तसतसे वेगवेगळ्या क्रियाकलापांचा प्रयत्न करीत आहे, त्याला अधिक उर्जा आवश्यक आहे, म्हणूनच बर्‍याचदा त्याला दूध द्यावे लागेल. रात्री व्यवस्थित झोपणाऱ्या इतर बाळांबद्दल किंवा झोपेचे वेळापत्रक असलेल्या बाळांबद्दल ऐकल्यामुळे तुम्हाला तुम्ही काही चुकीचे तर करत नाही ना असे वाटू शकेल. परंतु तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक बाळाचे शरीरविज्ञान वेगवेगळे असते. एखादे बाळ दिवसा झोपून रात्रीचे जागू शकते तर काही बाळे दिवसा जागी राहून रात्रीची व्यवस्थित झोपतात. दोन्ही प्रकारांमध्ये बाळ दीर्घकाळ झोपते त्यामुळे त्यात व्यत्यय आणू नका कारण ह्या कालावधीत बाळाची जास्तीत जास्त वाढ होते.

तुमच्या १४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

तुमच्या १४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स इथे दिलेल्या आहेत

  • तुमच्या बाळाला कदाचित इतर बाळे करत असलेल्या सर्व गोष्टी करण्यात अधिक वेळ लागू शकेल. त्याबद्दल चिंता करू नका आणि त्याला त्याच्या स्वत: च्या गतीने प्रगती करू द्या
  • कदाचित काही बाळांच्या बुबुळांच्या रंगात बदल झाल्याचे दिसून आले आहे. जोपर्यंत बाळाचा डोळा लालसर होत नाही आणि त्यामुळे बाळ चिडचिड करत नाही, तोपर्यंत हा संसर्ग नाही आणि हे एक सामान्य लक्षण आहे.
  • जर तुम्ही दुसर्‍या कशामध्ये तरी व्यस्त असाल तर फॉर्म्युला दूध आणि आईचे दूध जवळ ठेवा जेणेकरून ते बाटलीमध्ये मिसळून पटकन बाळाला दिले जाईल

चाचण्या आणि लसीकरण

मागील आठवड्याच्या लसीकरणानंतर, १४ व्या आठवड्यात, आणखी लसी बाळाला देण्याची आवश्यकता आहे. आपल्या मुलास सर्व आवश्यक लसी वेळेवर द्या, कारण यामुळे तो निरोगी राहील आणि रोगप्रतिकार शक्ती वाढून त्याला आजारांपासून संरक्षण मिळेल. डिप्थीरिया आणि पोलिओची काळजी घेणारी तिहेरी लसदेखील दिली जाईल. ही डीपीटी / आयपीव्ही / एचआयबी लस आहे.

आणखी एक लस देण्याची गरज आहे आणि ती म्हणजे पीसीव्ही लस, जी आपल्या बाळाला तिसऱ्यांदा देण्यात येत आहे. तिसऱ्यांदा दिली जाणारी आणखी एक लस म्हणजे रोटाव्हायरस लस, जी यावेळी तोंडाद्वारे दिली जाऊ शकते. या सर्व लसींमुळे कदाचित आपल्या बाळाला थोडासा ताप येऊ शकतो जे अगदी सामान्य आहे.

खेळ आणि क्रियाकलाप

तुमच्या बाळाच्या शरीराचा वरचा भाग विकसित होईल आणि त्याच्या मानेचे स्नायूही मजबूत असतील. तो आपली मान सरळ ठेवू शकेल आणि बर्‍याच वेळ सहजतेने पाहू शकेल. तुमच्या बाळाला खांद्यावर धरून घरभर फिरवा आणि वेगवेगळे आवाज काढा. त्याला असे पकडल्याने उलट्या दिशेला जात आहोत असा अनुभव येईल आणि बाळ खूप हसू लागेल. तुम्ही फिटनेस बाबतीत उत्साही असल्यास तुमच्याकडे जिम बॉल किंवा मोठा बॉल असल्यास तुम्ही बाळाला त्यावर ठेवू शकता. नंतर हळूवारपणे बॉल वेगवेगळ्या दिशेने फिरवा आणि बाळाला थोडे डोलू द्या आणि किंचित एका बाजूला झुकू द्या.

खेळ आणि क्रियाकलाप

बाळाचे वय कितीही असले तरी सुद्धा पीकबू हा खेळ सगळ्याच बाळांना आवडतो आणि म्हणून यशस्वी होतो. आता आपले बाळ जरासे आजूबाजूला पाहू शकते, आता खेळाला पुढील स्तरावर नेण्याची वेळ आली आहे. तुमच्या बाळाला थोडे उभे बसवा, काही उशांचा बाळाला आधार द्या जेणेकरून बाळ पडणार नाही. बाळाला तुमचा दिवाणखाना किंवा खोली दिसू द्या. त्यानंतर तुम्ही लपण्यासाठी आणि आवाज काढण्यासाठी सर्व पद्धती वापरू शकता, फक्त एखाद्या कोपऱ्यातून अचानक बाहेर येऊन त्याला आश्चर्यचकित करू शकता. पलंगाखाली वाकणे किंवा सोफाच्या मागे लपणे आणि नंतर दारातून बाहेर येणे किंवा सोफाच्या दुसर्‍या टोकाला येणे ह्यामुळे आपल्या बाळाला जादू वाटेल आणि त्याला मजा येईल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

या कालावधीत बाळाला वेगवेगळ्या लसी दिलेल्या असतील त्यामुळे बाळाला थोडासा ताप येण्याची शक्यता आहे. लस दिल्यामुळे बाळाला ताप येणे सामान्य आहे काळजी करण्याची काहीच गरज नाही. तथापि, ताप बराच काळ टिकून राहिला आणि १०० डिग्रीपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, जर तुमच्या बाळाला उलट्या होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

तसेच, जर तुमच्या बाळाला वस्तू पकडण्यास अडचण येत असेल किंवा लहान खेळणी कशी पकडावीत हे समजून घेण्यात काही समन्वय नसल्यास, कोणत्याही बाल विकृती किंवा समस्या तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी बालरोगतज्ञांकडून बाळाची तपासणी करुन घ्या

ह्या काळापासून तुमचे बाळ शारीरिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या वाढेल. त्याचे व्यक्तिमत्त्वही तयार होण्यास सुरुवात होईल. तुम्ही तुमच्या बाळास नवीन गोष्टींसाठी प्रयत्न करण्यास सतत प्रोत्साहित करत आहात ना हे सुनिश्चित करा. घरात एक सकारात्मक वातावरण ठेवा जेणेकरून तुमचे बाळ आनंदी राहील!

मागील आठवडा: तुमचे १३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

पुढील आठवडा: तुमचे १५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article