In this Article
तुमचे बाळ आता दोन महिन्यांचे झाले आहे, आणि तो बरेच काही शिकण्यासाठी आणि बर्याच गोष्टी ओळखण्यासाठी देखील मोठा झाला आहे. तुमचे बाळ कदाचित घरातल्या प्रत्येकाला हास्य आणि आनंद देईल आणि प्रत्येकजण त्याबद्दल उत्सुक असेल. बाळाला हाताचा शोध लागल्यानंतर बाळ सर्व प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल आणि अत्यंत आनंददायक पद्धतीने अयशस्वी होईल. आपल्या छोट्या बाळाकडून आपण ज्याची अपेक्षा करू शकता त्याबद्दल ह्या लेखात अधिक माहिती दिलेली आहे.
९ आठवड्यांच्या बाळाचा विकास
९ व्या आठवड्यात बाळाची आधी कधीही झाली नव्हती इतकी वेगाने वाढ होईल. त्याची श्रवणक्रिया पूर्णतः विकसित झालेली असेल. आपणास हे लक्षात येईल की आपले मूल वेगवेगळ्या ध्वनींमधील सूक्ष्म फरक लक्षात घेण्यास सुरुवात करते आणि त्यानुसार त्यास प्रतिक्रिया देते. जर आपण त्याचे आवडते गाणे वाजवण्यास सुरूवात केली तर तो त्याच्या पायांनी लाथ मारण्यास सुरुवात करतो आणि लक्षपूर्वक गाणे ऐकू लागतो. गाणे अचानक बंद केल्यावर बाळ अस्वस्थ होईल. हळूवार गाणे किंवा वेगवान गाणे वाजवण्याचा प्रयत्न करा आणि बाळाला एकतर ते गाणे आवडेल किंवा बाळ झोपी जाईल.
ह्याच काळात, तुमच्या बाळाला स्वतःच्या हातांचा शोध लागेल आणि हातांची पकड कशी घट्ट ह्यावर बाळ प्रयोग करत राहील. त्याला एक खुळखुळा देण्यासाठी आता सर्वात अनुकूल वेळ आहे. आवाज शोधून काढणे आणि त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून अधिक चांगल्या पद्धतीने डोळ्यांमधील समन्वय विकसित करण्यास बाळ सुरुवात करेल. समन्वयाचे हे शिक्षण नेहमीपेक्षा वेगाने विकसित होण्यास प्रामुख्याने सुरवात होते, कारण त्यांचे डोळे आता थ्री डायमेन्शनल स्पेस आणि खोली जाणण्यास सक्षम आहेत. हे अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे परंतु पूर्वीपेक्षा बरेच चांगले आहे.
नऊ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे
९ आठवड्यांच्या बाळाचे वजन त्याच्या जन्मापासूनच एक किलो ते दीड किलो इतके वाढलेले असेल. बाळाच्या वाढीचा हा एक निरोगी टप्पा आहे आणि त्याच्याबरोबर इतरही अनेक टप्पे आहेत.
हात आणि पाय यांची उपस्थिती आणि ते कसे कार्य करतात हे समजून घेतल्यानंतर, बाळ कोपरातुन हात आणि गुडघ्यातून पाय वाकवणे हे समजून घेऊन पुढील हालचाली देखील करू शकतात. त्यानंतर बाळाचे हात आणि पाय मारणे पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान असेल आणि त्यांना योग्यप्रकारे लक्ष्य करण्यात बाळ सक्षम होईल. या सर्व कृती करताना बाळ वेगवेगळे आवाज काढेल आणि आपण काहीतरी नवीन शिकलो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करेल. बाळाशी वेगवेगळ्या आवाजात संभाषण करत रहा.
गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुमचे बाळ तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करेल आणि तुमचे केस पकडण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला लोंबते कानातले घालायला आवडत असतील तर ते कपाटात ठेवणे चांगले आहे कारण व्रात्य बाळांना ते पकडायला खूप आवडतील. तो इतर लोकांशी आणि इतर बाळांशी सुद्धा संवाद साधेल. जरी कोणतेही संभाषण होऊ शकत नसले तरीही या टप्प्यावर सामाजिक जीवनातील सहभाग खूप उपयुक्त आहे.
आहार देणे
पूर्वीच्या तुलनेत दोन्ही स्तनांना पिण्याची प्रवृत्ती अधिक वाढेल. आपल्या शरीराला कदाचित हे अंगवळणी पडण्याची गरज आहे परंतु हे अगदी थोड्या काळातच होईल. बर्याच मातांना असे वाटते की त्यांचे बाळ २ महिन्यांपेक्षा जास्त वयाचे असल्याने त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त दूध हवे असेल. ते खरे नाही. जोपर्यंत आपले मूल आनंदाने स्तनपान करीत आहे, वजन योग्य प्रमाणात वाढत आहे आणि चांगले झोपत आहे, तोपर्यंत या वयात अतिरिक्त खाद्यपदार्थ किंवा फॉर्म्युला दुधाची आवश्यकता नाही. तुमच्या बाळाचे वय ९ आठवड्याचे आहे, दात येण्यास देखील सुरुवात होऊ शकते.
झोप
जर आपल्या बाळाला झोपताना तोंडात चोखणी घालण्याची सवय नसेल तर हा आतापर्यंतचा सर्वात चांगला निर्णय आहे. साधारणत: जेव्हा बाळे २ महिन्यांची असतात तेव्हा त्यांना चोखणीची सवय लागते आणि मग जर ही चोखणी त्यांच्या झोपेच्या मध्यभागी तोंडातून पडली तर बाळ झोपू शकत नाहीत. जर आपल्या बाळाला आधीपासूनच याची सवय झाली असेल तर ती सवय हळूहळू त्यास सोडविणे सुरू करा म्हणजे त्यांना त्याशिवाय झोपू द्या. यास कदाचित काही दिवस लागू शकतात परंतु हे दीर्घकाळ फायदेशीर आहे.
आपल्या बाळाची लांबी आणि आकार दोन्हीही वाढलेले आहेत, झोपेत असताना त्याला लपेटण्यासाठी आपल्याला मोठे दुपटे शोधण्याची आवश्यकता असू शकेल. लहान दुपटे वापरणे त्याच्या हालचालींवर प्रतिबंध आणू शकते आणि बाळाची झोपमोड होऊ शकते.
वागणूक
बाळ जेव्हा थोडे उत्साही असते तेव्हा बाळ वेगवेगळे आवाज काढते आणि कधी कधी बाळ खूपच उत्साही असेल तर गुळण्या काढताना जसा आवाज येतो तसा आवाज काढते. दिवसाच्या काही विशिष्ट वेळी, तो अधिक प्रतिसाद देईल आणि सर्वात मोहक हास्य देईल आणि आपल्याबरोबर आवाज करेल. हे आपल्या दोघांसाठी बाळाच्या अंघोळीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी आनंद देणारे असते.
तुमच्या देखरेखीखाली बाळाला पोटावर झोपवल्याने, या वयात ते आपले डोके योग्यरित्या उंचावू शकतील आणि सरळ पुढे बघतील. स्वतःला आधार देण्यासाठी हात वापरणे बाळांना आता अधिक शक्य होईल, परंतु ते जास्त काळ टिकणार नाही. ते वारंवार पडतच राहतील आणि तरीही पुनःपुन्हा करत राहण्याचा प्रयत्न करतील. जोपर्यंत कठोर पृष्ठभागावर बाळ स्वत: ला दुखापत करत नाही तोपर्यंत हे सर्व नैसर्गिक आहे.
रडणे
२ महिन्यांची बाळे खूप रडतात. आपल्या ९ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेमध्ये अगदी थोडा देखील अडथळा आला तर बाळ खूप जोरात रडू लागते. रडण्याच्या इतर कारणांमधे थकवा, वेदना किंवा अगदी चिडचिड ही देखील कारणे असू शकतात.
नक्कीच, रडण्याची काही विशिष्ट कारणे कदाचित वेदना किंवा आजार असू शकतात परंतु त्यांना खरोखर वेदना होत आहेत की ते विनाकारण रडत आहेत हे तुम्हाला समजू शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या बाळाला क्रिबमध्ये किंवा पाळण्यात ठेवू शकता आणि आपली कामे सुरू ठेवू शकता. रडण्यापासून अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक असल्यास दरवाजा हलकेच बंद करा. ५ मिनिटांनंतर सुद्धा बाळ रडत राहिल्यास, त्यांना आपल्या हातात घ्या आणि जवळ घ्या. बाळाला धरून ठेवण्यासाठी स्लिंग वापरुन पहा आणि आपली कामे पुढे चालू राहू द्या.
९ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स
- आपल्या बाळाला जास्त स्तनपान हवे असेल किंवा त्याला नेहमीपेक्षा जास्त दुधाची गरज असल्यास स्तन बदलत असल्याची खात्री करा
- जर आपले बाळ खूप रडत असेल तर, त्याला जवळ घेऊन त्याच्या कानात बोला. त्याला शांत करा, तो पटकन झोपी जाऊ शकतो
- बाळाला तुमच्याशी खेळायचे असेल किंवा नुसते तुम्हाला बघायचे असेल तरी ते रडू लागते. बाळाने केलेल्या विशिष्ट आवाजांची नोंद घ्या आणि त्यांच्या गरजेशी तो आवाज जुळतो का ते पहा
- आपल्या बाळाला ताजी हवा मिळण्यातही घराबाहेर न्या आणि त्याच्याशी छान संभाषण करा. त्याला नवीन दृश्ये आवडतील किंवा शांततेत झोपी जाईल
चाचण्या आणि लसीकरण
मागील सर्व लसी पूर्ण झाल्याशिवाय आपल्या बाळाला वयाच्या ९ व्या आठवड्यात कोणतीही विशिष्ट लस दिली जात नाही.
खेळ आणि क्रियाकलाप
आपल्या बाळाच्या श्रवणविषयक इंद्रियांचा विकास करण्याचा हा एक चांगला काळ आहे. आपण घरामधून सर्व प्रकारचे आवाज करणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू एकत्रित करू शकता. खेळणी, चुरचुरीत पिशव्या, बबल रॅप्स, स्टीलच्या वस्तू आणि इतर. आत्तासाठी कोणतेही इलेक्ट्रॉनिक आवाज टाळा. मग आपल्या बाळाकडे पहात असताना एकावेळी एक आवाज काढण्यास प्रारंभ करा. एकदा त्याला आवाज समजू लागला की वस्तू दाखवा आणि आवाज त्याच्यासमोर करा. मग, ती वस्तू त्याच्याकडे द्या आणि त्याला स्वतः आवाज काढण्याचा प्रयत्न करू द्या. तुम्ही मजेदार आवाज काढताना पाहून त्याला आनंद होईल. परंतु स्वत: ला तसाच आवाज काढता येत असल्याचे कळल्यावर त्याला अफाट आनंद मिळेल आणि उत्साह येईल.
तुलनात्मकदृष्ट्या शरीराचा वरचा भाग आणि मान मजबूत असल्याने, आपण सरळ बसून गेम खेळण्याचा सराव करू शकता. सुरुवातीला, आपल्या बाळाला किंचित झुकलेल्या स्थितीत ठेवण्यासाठी काही उशा वापरा. मग हळूवारपणे त्याचे हात हळू हळू धरून त्याला सरळ बसवा. आपल्या खांद्यांसह, सरळ, मान ठेवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे याची खात्री करा. एकदा सरळ झाल्यावर त्याला पुन्हा उशीवर झोपू द्या. अशी हालचाल होताना मजेदार आवाज करा. हे केवळ बाळासाठी अफाट मजेदारच नाही तर आवश्यक सामर्थ्य वाढविण्यात देखील मदत करेल. असे करताना त्याच्या हातांशी खेळणे ही एक अतिरिक्त मजेदार गोष्ट असू शकते.
आपल्या डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्याल?
या टप्प्यावर काही वेळा आपल्या बाळाचे डोळे नेहमीपेक्षा थोडेसे पाणीदार असू शकतात. जर हे जन्मापासूनच असेल तर ते ठीक आहे. तथापि, जर असे अचानक दिसू लागले तर आपल्या बाळाला डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा संसर्ग झाल्याची शक्यता असू शकते. म्हणूनच, हे आपल्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणे महत्वाचे आहे, हे निदान योग्य असल्यास सामान्यत: बाळासाठी अनुकूल आय ड्रॉप सोल्यूशन डॉक्टर लिहून देतील. अशा वेळी सर्व कपडे आणि तुमचे हात स्वच्छ ठेवा.
डायपर रॅश असल्यास, बाळाला स्तनपान देणे हा त्यावर उपाय असू शकतो. जर कालांतराने ही स्थिती अधिक गंभीर होत गेली तर ती त्वचेशी संबंधित स्थिती असू शकते ज्याची डॉक्टरांनी तपासणी करणे आवश्यक आहे.
या अवस्थेत बाळांना आनंद होतो आणि थोडासा त्रास देखील होतो. त्यांचे रडणे वाढते परंतु त्यांचे क्रियाकलाप आणि परस्परसंवादाची पातळी देखील वाढते. ह्या काळात बाळासोबत आनंद घ्या आणि या आठवणी लक्षात ठेवा, कारण बाळाची वेगाने वाढ होत असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी लवकरच इतिहास ठरतील.
मागील आठवडा: तुमचे ८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे १० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी