Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात घरातील कुठली कामे करावीत आणि कुठली टाळावीत?

गरोदरपणात घरातील कुठली कामे करावीत आणि कुठली टाळावीत?

गरोदरपणात घरातील कुठली कामे करावीत आणि कुठली टाळावीत?

गरोदरपणात स्त्रियांचे वजन बर्‍याच प्रमाणात वाढते आणि त्यामुळे त्यांना शरीर संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कारण वजन एकाच ठिकाणी जास्त असते आणि ते म्हणजे पोट. त्यामुळे गर्भवती महिलांना वेगाने हालचाल करणे कठीण होऊ शकते. तसेच त्यामुळे थकव्याची भावना निर्माण होते आणि मग नेहमीची घरातील कामे करावीत का असा प्रश्न पडू शकतो.

गरोदरपणात बर्‍याच घरगुती कामांमध्ये भाग घेणं सुरक्षित असलं तरी काही कामे टाळली जावीत किंवा इतरांना दिली जावीत. आपण कोणते काम केले पाहिजे आणि कोणते काम करू नये तसेच गरोदरपणात बैठ्या जीवनशैलीमुळे येणारी जोखीम तसेच कठोर कामे केल्यास त्यासंबंधीची जोखीम ह्या बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात घरगुती कामे करणे सुरक्षित आहे का?

उत्तर सोपे आहे तणावमुक्त गर्भधारणा होण्यासाठी कामामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. हे सामान्यपणे समजले जाते की कठोर काम करणे धोकादायक असले तरी काहीच काम न करणे तेवढेच आरोग्यहीन आहे. बैठी जीवनशैली देखील गरोदरपणात प्रतिकूल परिणाम देऊ शकते. म्हणूनच, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की घरातील बहुतेक कामांमध्ये भाग घेणे सुरक्षित आहे.

गर्भवती असताना आपण करू शकता अशी घरगुती कामे

गर्भवती असताना आपण करू शकता अशी घरगुती कामे

काही मूलभूत कामे सहजतेने केली जाऊ शकतात, तर काही कामे वेगळ्या पद्धतीने करण्याचा सराव असावा लागतो.

  • भाज्या कापून स्वच्छ करणे हे एक सहजतेने करता येण्याजोगे काम आहे. बहुतेक स्त्रियांना उभे राहून भाज्या चिरण्याची सवय असते, परंतु गर्भवती महिलांनी खुर्चीचा वापर करण्याची आणि कामे करताना बसण्याची शिफारस केली जाते.
  • झाडणे आणि पुसणे देखील थोडसे वेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते. त्यासाठी झाडू आणि मॉप्स निवडताना त्यांचे हॅन्डल लांब असले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला जास्त वाकण्याची गरज पडणार नाही. गरोदरपणात वजन वाढल्यामुळे अतिरिक्त ताण पडतो आणि शरीराच्या गुरुत्वाकर्षणाच्या केंद्रामध्ये किरकोळ बदल होतो. त्यामुळे काम करणार्‍या स्त्रीच्या शरीरावर ताण वाढू शकतो आणि सायटिक मज्जातंतूवर ताण येऊ शकतो सायटिक नर्व्ह ही कंबरेच्या मागच्या भागापासून पाय पर्यंत असते. अशा प्रकारे, ज्या कामांना वाकणे आवश्यक आहे आणि दीर्घकाळ उभे रहाणे आवश्यक आहे अशी कामे गर्भवती स्त्रियांनी टाळली पाहिजे. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर क्रियाकलाप ताबडतोब थांबवा आणि विश्रांती घ्या. तुमच्याकडे योग्य प्रकारचे झाडू आणि मॉप्स नसल्यास, कोणीतरी दुसऱ्याने साफसफाई करणे चांगले.
  • ग्रीन/ इकोफ्रेंडली क्लीनर असतील तरच गर्भवती स्त्रीने स्नानगृह आणि स्वच्छतागृहे साफ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कठोर, रासायनिकआधारित उत्पादने वापरणे पूर्णतः टाळले पाहिजे. व्हाईट व्हिनेगर, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा ही काही प्रभावी आणि स्वस्त साफसफाईची उत्पादने आहेत जी गरोदरपणात सुरक्षितपणे वापरली जाऊ शकतात. तुमच्याकडे अशी साफसफाईची उत्पादने नसल्यास ती कामे दुसऱ्याने केलेली चांगली.
  • भांडी घासण्याचे हलके काम केले जाऊ शकते, परंतु १५२० मिनिटांपेक्षा जास्त काळ उभे राहण्यापासून स्वतःला परावृत्त करा.

गरोदरपणात टाळावीत अशी घरगुती कामे

गरोदरपणात टाळावीत अशी घरगुती कामे

जवळजवळ सर्व घरगुती कामे गरोदरपणात पहिल्या काही महिन्यांमध्ये करता येतील. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात घरगुती कामे करणे सुरक्षित असल्यास, काही घरगुती कामे ह्या काळात टाळली पाहिजेत कारण शरीरावर अनावश्यक ताण येऊ शकतो आणि बाळाला संभाव्य धोका पोहोचण्याची शक्यता असते. रोजची तीच आणि नीरस कामे केल्याने स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात जे गर्भवती महिलांसाठी चांगले नाही.

  • अवजड भार उचलणे किंवा फर्निचर हलविणे यांपैकी कोणतेही काम टाळले पाहिजे. लॉन्ड्री वाहून नेण्यासारख्या क्रिया देखील टाळल्या पाहिजेत कारण त्यामुळे अकाली प्रसूतीची शक्यता वाढते आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो.
  • चढण्याची आवश्यकता असलेले कोणतेही काम करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. गरोदरपणामुळे वाढलेले वजन शरीरातील गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बदलते आणि स्त्रिया त्यांचे शारीरिक संतुलन गमावण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे पंखे स्वच्छ करणे किंवा पडदे बदलणे ह्यासारखी कामे दुसऱ्याला सोपवणे उत्तम.
  • पाळीव प्राणी असलेल्या गर्भवती मातांनी, विशेषत: मांजरीची घाण साफ करणे पूर्णपणे टाळावे. मांजरीच्या घाणीमध्ये टॉक्सोप्लाझ्मा गोंडी नावाचा एक परजीवी असतो ज्यामुळे आई आणि बाळाला गंभीर धोका पोहचू शकतो. जरी कोंबडीच्या मांसामुळे किंवा बागेत गेल्यामुळे सुद्धा हा धोका असला तरीही मांजरांमुळे देखील हा धोका असतोच. जर हे काम करण्यास दुसरे कुणीही नसेल तर अत्यंत सावधगिरी बाळगा. तसे करण्यासाठी हातमोजे वापरा आणि काम पूर्ण केल्यानंतर आपले हात साबणाने चांगले स्वच्छ धुवा.
  • झुरळे, मुंग्या आणि कीटकांचा तुम्हाला त्रास होतो का? त्यांना त्वरित दूर करू इच्छिता? आपल्या फायद्यासाठी, ते करू नका. झुरळे आणि घरातील इतर कीटकांचा पाठपुरावा करण्यामध्ये जवळजवळ नेहमीच विषारी रासायनिक फवार्यांचा वापर असतो. ह्या कीटकांना मारण्यासाठी तयार केलेले विषारी धूर देखील तुम्हाला आणि तुमच्या बाळाला धोकादायक ठरू शकतात.
  • जर तुम्हाला तुमच्या खोलीला रंग द्यावासा वाटला तर तुम्ही बाळाचा जन्म होईपर्यंत थांबणे चांगले. पेंट्स लावल्यावर वायू बाहेर टाकतात आणि कोरडे होईपर्यंत कित्येक तास हे वायू येत राहतात. आणि त्यामुळे होणाऱ्या आईवर आणि बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

गरोदरपणात घरातील कामे करणे सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. गरोदरपणात घरगुती कामे करणे सुरक्षित असले तरी काही घरगुती कामे गर्भवती महिलांसाठी धोकादायक असतात. टाळावयाची कामे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या शरीराचे ऐकणे देखील महत्वाचे आहे. तुम्हाला थकवा येईल अशी कामे करणे टाळा. कामासोबत तुम्हाला चांगली विश्रांतीसुद्धा मिळेल असे वेळापत्रक तयार करा.

संदर्भ आणि स्रोत:

स्रोत १

आणखी वाचा:

गरोदरपणात होणारा ‘मॉर्निंग सिकनेस’
गरोदरपणातील पोटदुखी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article