Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांमधील क्रेडल कॅपची समस्या

बाळांमधील क्रेडल कॅपची समस्या

बाळांमधील क्रेडल कॅपची समस्या

आपले बाळ डोक्यातील कोंड्याने त्रस्त असेल, तर कदाचित बाळाला क्रेडल कॅपही टाळूच्या त्वचेची समस्या असू शकते. ही स्थिती उपचार करण्यायोग्य आहे आणि ही स्थिती लागलीच कशी ओळखावी हे जाणून घेतल्याने अधिक सुलभतेने त्याचा सामना करण्यास मदत होईल.

क्रेडल कॅप म्हणजे काय?

ह्यास इन्फेन्टाइल सेब्रोरिक डार्माटायटीस म्हणून देखील ओळखले जाते, क्रेडल कॅप ही अर्भकांमध्ये आढळून येणारी त्वचेची समस्या आहे. ही त्वचेची समस्या टाळूपासून सुरू होते आणि नंतर शरीराच्या इतर भागात पसरते. ही एक दाहक त्वचेची स्थिती आहे ह्यामध्ये मुरुमांपेक्षा आकाराने लहान असलेले फोड येतात आणि नंतर त्वचा पिवळसर आणि कडक होते. त्वचेला स्पर्श झाल्यास पापुद्रे निघतात. क्रेडल कॅप ही त्वचेची समस्या बाळाला पहिल्या तीन महिन्यांमध्ये होते आणि पहिले एक वर्षभर राहते.

क्रेडल कॅप संक्रामक आहे?

ह्या प्रश्नाचे उत्तर नाहीअसे आहे. त्वचेची स्थिती संक्रामक नसते आणि त्वचेची ही समस्या निरुपद्रवी आहे. यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

बाळांमधील क्रेडल कॅपची कारणे

बाळांमधील क्रेडल कॅपची कारणे

क्रेडल कॅपच्या होण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही, परंतु अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवू शकते.

सेबेशियस ग्रंथी

सेबेशियस ग्रंथींद्वारे सेबमचे अत्यधिक उत्पादन केल्याने क्रेडल कॅपची समस्या होऊ शकते. सीबम त्वचेला गुळगुळीत आणि कोमल ठेवते. तथापि, कोणत्याही कारणास्तव ग्रंथी भरुन राहिल्यास, त्या बंद होऊ नयेत म्हणून जास्त स्रवतात. यामुळे टाळूवर पिवळसर रंगाचा कडक थर तयार होतो.

उष्णता आणि आर्द्रता

उन्हाळ्यामध्ये जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणच्या सानिध्यात बाळ आल्यास क्रेडल कॅप सारखा त्वचेचा त्रास होऊ शकतो. उष्णतेमुळे सेबेशियस ग्रंथी कोरड्या होतात, त्यामुळे त्या जास्त काम करतात. ओलसरपणामुळे, आपल्या बाळाला डायपर रॅश देखील होऊ शकते.

बुरशीजन्य संसर्ग

सेबेशियस ग्रंथींना प्रभावित करणारा मालासेझिया बुरशीजन्य संसर्गामुळे क्रेडल कॅप होऊ शकतो.

व्हिटॅमिनची कमतरता

बी १२ व्हिटॅमिनपैकी एक महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन म्हणजे बायोटीनच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला क्रेडल कॅप होऊ शकते.

आवश्यक फॅटी ऍसिड्स मध्ये रूपांतरित करणाऱ्या विशिष्ट एन्झाईम्सच्या अभावामुळे देखील क्रेडल कॅप होऊ शकतो.

इतर कारणे

बाळाचे डोके खूप जास्त धुण्यामुळे सेबेशियस ग्रंथी कोरड्या होऊ शकतात. काही शाम्पू उत्पादने आपल्या बाळाच्या नाजूक त्वचेसाठी देखील कठोर असू शकतात.

क्रेडल कॅपची सामान्य लक्षणे

क्रेडल कॅप सारखी त्वचेची स्थिती येते तेव्हा तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे अशी काही चिन्हे आहेत.

  • टाळू, खांद्यावर आणि गळ्याच्या भागावरील त्वचा पिवळसर किंवा तपकिरी होते
  • अत्यधिक तेलकट त्वचा
  • स्पर्श केल्यास पांढरट त्वचेचे खवले निघतात
  • टाळू वरची त्वचा कोरडी होते आणि त्यावर लाल फोड येतात

क्रेडल कॅपची समस्या किती काळ राहते?

क्रेडल कॅपबद्दल चांगली बातमी अशी आहे की ते आपोआप बरे होते. बाळ तीन महिन्यांचे असताना साधारणपणे ही समस्या निर्माण होते, परंतु ते ८ व्या ते १२ व्या महिन्यापर्यंत आपोआप बरे होते. तथापि, क्रेडल कॅप पुन्हा उद्भवल्याची प्रकरणे घडली आहेत.

क्रेडल कॅपसाठी उपचार

असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला क्रेडल कॅप होण्यापासून दूर ठेवू शकता.

  • वातानुकूलन यंत्रामुळे तुमच्या बाळाची संवेदनशील त्वचा कोरडी होऊ शकते. जर तुम्ही अशा प्रदेशात राहत असाल जिथे वातानुकूलन यंत्राचा वापर करणे अपरिहार्य असते तिथे बाळाच्या त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी कमी सेटिंगमध्ये ह्युमिडीफायर वापरा.
  • आपल्या बाळाच्या टाळूची मालिश करा आणि नंतर खास बाळांसाठीच्या मऊ दातांच्या कंगव्याने विंचरा.
  • क्रेडल कॅप बरा करण्याची एक महत्वाची पद्धत म्हणजे तेलाचा वापर. तेलामुळे त्वचेला पोषण आणि ओलावा मिळतो. तेलामुळे बाळाच्या त्वचेचे संतुलन पुनर्संचयित करण्यात मदत होते.
  • विशेषत: बाळांसाठी तयार केलेले शाम्पू वापरा. त्यातील घटकांची यादी वाचा आणि त्यामध्ये कुठले ऍलर्जीयुक्त घटक तर नाहीत ना हे सुनिश्चित करा.
  • शाम्पू केल्यानंतर टाळूसाठी सौम्य मॉइश्चरायझर वापरा. आपल्या बाळाच्या त्वचेसाठी कोणता ब्रँड सर्वात सुरक्षित आहे याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला.
  • कधीकधी, तुम्ही बाळाला जे फॉर्मुला दूध पाजता तो सुद्धा क्रेडल कॅप होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यासंदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या बाळासाठी योग्य आणि चांगला ब्रँड निवड.
  • पाणी आणि बेकिंग सोडाच्या समान भागासह पेस्ट बनवा आणि प्रभावित भागात लावा. पाण्याने धुण्यापूर्वी हे पेस्ट थोडावेळ तशीच राहू द्या. ही पद्धत क्रेडल कॅप काढून नाहीशी करण्यासाठी विशेषतः कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे

बाळांमध्ये आढळणारी क्रेडल कॅपची समस्या कशी रोखाल?

क्रेडल कॅपची शक्यता पूर्णपणे काढून टाकणे अशक्य असले तरीही, शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता.

  • दररोज बाळाची टाळू मऊ ब्रशने विंचरा
  • आपल्या बाळाची टाळू कोरडी आणि स्वच्छ ठेवा
  • जर आपल्या बाळाच्या टाळूला तेल लावले असेल तर बाळांसाठीच्या सौम्य शाम्पूने धुवा
  • बाळाच्या शरीराचे तापमान आणि आर्द्रता योग्य राखण्याचा प्रयत्न करा

सावधानता

कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या बाळाच्या टाळूवरचे पिवळ्या रंगाचे खवले काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने त्वचेचे खवले निघतात, त्यामुळे रक्तस्त्राव होतो. एकदा टाळू स्वच्छ झाली की आपण आपल्या बाळाच्या टाळूची स्वच्छता आणि आरोग्याची काही महिन्यांसाठी काळजी घेतली पाहिजे.

आपल्या बाळाच्या त्वचेवर काही जखम उद्भवल्यास कोणताही विषाणूजन्य किंवा जिवाणूजन्य संसर्गाची वाढ रोखण्यासाठी दररोज ती करा.

स्तनपान देणाऱ्या मतांसाठी काही टिप्स

जर तुम्ही बाळाला स्तनपान देणार असाल तर क्रेडल कॅपची समस्या हाताळण्यासाठी खालील टिप्सचा वापर करा.

  • जास्त प्रमाणात साखर खाऊ नका. साखर आपल्या बाळामध्ये बुरशी आणि जीवाणूंच्या वाढीचे प्रमाण वाढवते.
  • अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जर आई ऍलर्जी निर्माण करणारे पदार्थ खात असेल तर ती ऍलर्जी बाळाला होऊ शकते. म्हणूनच, दूध, अंडी आणि ग्लूटेन सारखे सामान्य ऍलर्जिक पदार्थ टाळणे चांगले.
  • लाल मांस आणि चिकन सारखी संतृप्त प्राण्याची चरबी कमी करा. त्याऐवजी, प्रथिनांसाठी मासे खा. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • लॅक्टोबॅसिलस ऍसिडॉफिलस एक जंतुनाशक जीवाणू आहे जो क्रेडल कॅपशी लढण्यासाठी ओळखला जातो. आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि दररोज त्यासाठी कॅप्सूल घेऊ शकता.
  • मसालेदार अन्नपदार्थ खाऊ नका. त्यामुळे क्रेडल कॅप पासून बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होईल.
  • स्तनपान देताना चांगली स्वच्छता ठेवा.

आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

क्रेडल कॅपची अशी काही उदाहरणे आहेत जिथे त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे चांगले. क्रेडल कॅप तीव्र असेल तर त्वचेला क्रॅक पडून रक्तस्त्राव होऊ शकतो. हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे संकेत देखील असू शकतात. जर क्रेडल कॅप सोबत दीर्घकाळ अतिसार असेल तर आपण आपल्या बालरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा.

क्रेडल कॅपची लक्षणे आपल्या बाळाच्या शरीराच्या इतर भागात देखील पसरू शकतात. जर आपल्या बाळास सतत बुरशीजन्य संसर्ग होत असल्यास आणि प्रतिजैविके घेऊन सुद्धा त्रास कमी होत नसेल तर आपण अनुभवी बालरोगतज्ज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.

क्रेडल कॅप हानिकारक नाही आणि आपोआप बरे होते, तरीही आपण जवळून लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अन्य आजाराची इतर कोणतीही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

आणखी वाचा:

मुलांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)
बाळाच्या त्वचेवरील फोडांवर कसे उपचार करावेत?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article