Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी वयाच्या ३५ नंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहात का?

वयाच्या ३५ नंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहात का?

वयाच्या ३५ नंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहात का?

वयाच्या पस्तिशीनंतर गर्भवती होणे अनेक जोडप्यांसाठी एक आव्हान आहे. जितके वय जास्त तितकी स्त्रीबीजांची संख्या कमी हे अभ्यासाद्वारे दर्शवले गेले आहे. आपला प्रजनन दर वयाच्या ३०व्या वर्षापासूनच कमी होऊ लागतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की मूल होण्यासाठीचे प्रयत्न सोडून दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली पाहिजे ? नाही! ३५व्या वर्षानंतर शरीर कसे कार्य करते आणि आनंदी गर्भारपणासाठी काय करावे ह्याची चर्चा आपण इथे करणार आहोत.

वयाचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का?

होय वयाचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. वय जसे वाढते तसे मधुमेह आणि उच्चरक्तदाब ह्यासारख्या आजारांचा धोका वाढतो.

वयाच्या ३५ नंतर गरोदरपणात निर्माण होणारी गुंतागुंत

वेगवेगळ्या वैद्यकीय परिस्थितीमुळे ३५ नंतर गरोदरपणात निर्माण होणारे वेगवेगळे धोके विसरू नका. येथे तुम्हाला खालील घटकांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे

  • जन्मतः बाळाचे वजन कमी असणे, अकाली जन्म आणि अनुवांशिक विकार
  • एकाधिक गर्भधारणेचा धोका (जुळे, तिप्पट आणि चौकोनी)
  • ओव्हुलेशन टप्प्यात कमी स्त्रीबीजनिर्मितीमुळे गर्भवती होण्यास त्रास
  • आधीच असलेला मधुमेह, ज्यामुळे वेगवेगळ्या अंतर्गत अवयवांचे नुकसान होते आणि प्रजनन समस्या उद्भवतात
  • गरोदरपणात मधुमेह आणि तीव्र वैद्यकीय परिस्थिती जसे की प्रीक्लेम्पसिया, उच्च रक्तदाब इ.
  • बाळाचा पोटात मृत्यू होण्याची प्रकरणे (जेव्हा गर्भधारणेच्या २० आठवड्यांनंतर बाळ गर्भाशयात मृत्यू पावते), गर्भपात आणि जन्म दोष (जसे की डाऊन सिंड्रोम आणि गुणसूत्र विकृतीमुळे जन्माला आलेली मुले)

पस्तिशीनंतर निरोगी गर्भधारणा होण्यासाठी कोणत्या चाचण्या पूर्ण केल्या पाहिजेत?

जन्मपूर्व चाचणी आणि आरोग्याची तपासणी गर्भवती स्त्रियांनी प्राधान्याने करून घेतली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका आणि तुम्ही गरोदरपणाच्या आधी आणि नंतर खालील चाचण्या केल्या असल्याचे सुनिश्चित करा

गर्भधारणा पूर्व चाचण्या:

यावेळी उद्भवणाऱ्या दोन मुख्य समस्या म्हणजे प्रजनन समस्या किंवा आहार / मानसिक आरोग्याची समस्या. अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून आरोग्यतपासणी करणे अत्यावश्यक आहे. गर्भधारणेपूर्वीची चाचणी करून घेतल्याने तुम्ही गर्भधारणेसाठी फिट आहे की नाही हे समजेल.

  • गर्भधारणेपूर्वी समुपदेशन तसेच वैद्यकीय तपासणी करून घ्या. तुमच्या वैद्यकीय इतिहासासंबंधी डॉक्टरांशी बोला. यामध्ये कुटुंबाच्या अनुवांशिक आरोग्याची स्थिती समाविष्ट आहे. तुमच्या बाळाला जन्मदोष आणि गुणसूत्र विकृती होण्याचा धोका असेल की नाही हे शोधण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.
  • तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा नैराश्यासारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त आहात? जर होय, तर गर्भवती होण्यापूर्वी त्यांच्यासाठी उपचार घेण्याची हीच वेळ आहे.
  • जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या मातांना मधुमेह आणि प्रीक्लेम्पियासारख्या गर्भारपणातल्या समस्या होण्याचा उच्च धोका असतो. सुरक्षित गर्भारपणासाठी वजन कमी करा त्यासाठी पौष्टिक आहार घ्या. (त्यासोबत व्यायाम सुद्धा करा).
  • गर्भवती होण्याची योजना असलेल्या मातांसाठी ४०० एमसीजी फॉलिक ऍसिड मल्टीविटामिन पूरक आहाराची शिफारस केली जाते. फॉलिक ऍसिड शरीरात योग्य पेशी आणि ऊतकांच्या वाढीस प्रोत्साहित करते आणि बाळांमध्ये जन्मतःच तसेच मज्जातंतू नलिका विकासदरम्यान होणारे व्यंग टाळले जाते.
  • धूम्रपान करणे, औषधे जास्त प्रमाणात खाणे किंवा बेकायदेशीर औषधे वापरणे टाळा. ह्यामुळे केवळ आपलेच नुकसान होत नाही तर बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ह्यामुळे निर्माण होणाऱ्या काही समस्या म्हणजे अकाली जन्मलेले आणि कमी वजनाचे बाळ ह्या आहेत.
  • घरात आणि घराबाहेर असुरक्षित रसायनांचा संपर्क टाळा. ह्यामध्ये काही साफसफाईची उत्पादने आणि डिटर्जंट्सचा समावेश होतो.
  • असुरक्षित रसायनांचा संपर्क टाळा. यामुळे बाळांमध्ये जन्म दोष उद्भवू शकतात

गर्भधारणेनंतरच्या चाचण्या:

अभिनंदन! तुम्ही गर्भवती आहात आणि आता गर्भधारणेनंतरच्या चाचण्या करण्याची वेळ आली आहे.

  • जरी तुमची तब्येत ठीक असेल तरीही सर्व जन्मपूर्व चाचण्या करा आणि संपूर्ण आरोग्याची तपासणी करा. आम्ही नुकत्याच गर्भवती झालेल्या मातांसाठी सेलफ्री डीएनए भ्रूण तपासणी आणि आईची रक्त तपासणी करण्याची शिफारस करतो. कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग आणि अम्नीओसेन्टेसिस यासारख्या चाचण्यांमुळे बाळाला विशिष्ट जन्म दोष विकसित होण्याचा धोका आहे की नाही हे स्पष्ट होईल. तुम्हाला कोणतेही लसीकरण आवश्यक असल्यास तुमच्या विश्वसनीय डॉक्टरांना विचारा. गर्भवती झाल्यानंतर मातांना फ्लूची लस घेण्याची गरज असते.
  • गर्भधारणेनंतर तुम्ही घेत असलेली कोणतीही औषधे आणि त्यांच्या डोसबद्दल डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या बाळावर आणि एकूणच गर्भारपणावर कसा परिणाम होतो त्यानुसार डोस किंवा औषधे बदलण्याची आवश्यकता असू शकते.
  • गरोदरपणात तुमची भावनिक अवस्था महत्वाची असते. योग करा, ध्यान करा आणि तणावमुक्त कार्यात सहभागी व्हा ज्यामुळे तुम्हाला चांगले आणि आनंदी वाटेल. भरपूर विश्रांती घ्या आणि स्वत: ला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी ठेवा.
  • तुम्हाला गरोदरपणात वजन वाढवावे लागेल. वजनवाढ किती व्हावी ह्याबाबत तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि पूरक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्यासाठी आहारतज्ञांचा सल्ला घ्या. बैठी जीवनशैली टाळा आणि सुलभ प्रसूतीसाठी मध्यम प्रमाणात सक्रिय रहा.

तुम्ही गरोदरपणातील समस्या कशा कमी करू शकता?

जर आपण ३५ नंतर गर्भधारणेचा प्रयत्न करीत असाल तर, गर्भारपणातील गुंतागुन कमी करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता.

  • बेकायदेशीर औषधे, कॅफिन, धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
  • निरोगी राहण्यासाठी सक्रिय रहा आणि पौष्टिक आहार घ्या.
  • योग, ध्यान आणि नियमित व्यायामाद्वारे तणावमुक्त होऊन आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
  • वेळ द्या. वय जास्त असलेल्या स्त्रियांना गर्भधारणा होण्यास १ ते २ वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून सकारात्मक रहा आणि त्वरित निकालांची अपेक्षा करू नका.
  • वजन जास्त किंवा कमी असल्यास संप्रेरकांच्या कार्यावर परिणाम होत असल्याने निरोगी वजन टिकवून ठेवा.
  • फर्टिलिटी स्क्रीनिंग इन्स्ट्रुमेंट्स आणि घरात करता येण्याजोग्या फर्टिलिटी स्क्रीनिंग चाचण्या खरेदी करण्याचा विचार करा. ही संसाधने मूलभूत शरीराचे तापमान तपासण्यासाठी, ग्रीवाच्या द्रवपदार्थाची स्थिती तपासण्यासाठी आणि आपल्या जोडीदाराला प्रजनन समस्या आहे की नाही हे शोधण्यासाठी वापरली जाऊ शकतात. यामुळे गोष्टी बऱ्याच सोप्या होतील कारण त्यामुळे गर्भधारणेसाठी केव्हा संभोग केला पाहिजे ह्याविषयीचा आदर्श काळ माहिती होण्यास मदत होईल.
  • मायओनोसिटॉल असलेलेपूरक औषध घेण्याचा विचार करा. हे ओव्हुलेशन दरम्यान तुमच्या स्त्रीबीजांची गुणवत्ता वाढवते आणि गर्भधारणेची शक्यता वाढवते.
  • काही वेळा, आपण वर नमूद केलेल्या प्रत्येक पद्धतीचा प्रयत्न केला असेल आणि तरीही सहा महिन्यांच्या कालावधीनंतर सुद्धा गर्भधारणा झाल्याचे दिसत नाही. जर असे असेल तर, प्रजनन चाचण्यांसाठी डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली आहे

गर्भवती होण्यासाठी समस्या असलेल्या महिलांसाठी उपचार

खाली गर्भवती होण्यास त्रास झालेल्या महिलांसाठी उपचार दिले आहेत.

  1. आरोग्यदायी जीवनशैली: निरोगी वजन राखणे, ड्रग्स आणि अल्कोहोल टाळणे आणि निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. हे पाळल्यास ते तुमच्या प्रजनन समस्येवर उपचार करू शकते आणि नैसर्गिकरित्या ३५ नंतर गर्भवती होणे सोपे करते. तुम्ही आणि तुमचा जोडीदार शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहात याची खात्री करा.
  2. विश्रांती: आपल्या सर्वांचे आयुष्य व्यस्त असू शकते परंतु मानसिक आणि भावनिकरित्या आराम मिळण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. ३५ नंतर निरोगी गर्भधारणाहोण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही महिलेसाठी हे नैसर्गिक उपचार आहेत. तुम्ही योग वर्ग, ताई ची, क्यूई गोंग करण्याचा प्रयत्न करू शकता आणि तसेच आर्ट थेरपी करून पाहू शकता.
  3. वैद्यकीय पद्धती: गर्भवती होण्यास त्रास होत असल्यास तुम्ही कृत्रिम रेतन, आयव्हीएफ आणि आयसीएसआय ह्या उपचारपद्धती वापरुन पाहू शकता. हार्मोन थेरपीची देखील शिफारस केली जाते. तथापि, हे लक्षात ठेवा की यापैकी कोणतीही पद्धत यशस्वी गर्भधारणा किंवा गरोदरपणाची हमी देत ​​नाही कारण वय आणि वैयक्तिक प्रोफाइलनुसार यशाचे दर वेगवेगळे असतात

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

निराशा येण्याआधी, कृपया लक्षात ठेवा की तुम्ही ३५ किंवा त्यापेक्षा मोठे असल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणेसाठी वेळ लागतो. बाळाचा विचार करण्याआधी जीवनशैली आणि सवयींमध्ये बदल करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे जरुरीचे आहे. तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रजनन समस्यांबद्दल चर्चा करा आणि कपल थेरपीला उपस्थित रहा (संबंधात समस्या येत असल्यास). त्यानंतर, गर्भवती होण्यापूर्वी प्रजनन तज्ञाशी संपर्क साधा आणि आता आपण गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यास सज्ज आहात.

३५ नंतर गर्भवती होणे अशक्य नाही. खरं तर, तुम्ही निरोगी जीवनशैली आणि स्वत: ची चांगली काळजी घेतल्यास पस्तिशीनंतर गर्भधारणेची शक्यता वाढून ती सत्यात उतरेल. लवकर तयारीस सुरुवात करा. योग्य निर्णय घेतल्याबद्दल पुढे जाऊन तुम्ही स्वतःलाच शाबासकी द्याल!

आणखी वाचा: अंतर्गर्भीय साधनांसाठी मार्गदर्शिका (आय.यु.डी.)

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article